Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यादी मध्ये "नरम गरम" पण टाका
यादी मध्ये "नरम गरम" पण टाका . धमाल सिनेमा आहे. शत्रुघ्न सिन्हा ने मस्त काम केलय .
अंगुर हा खूप आवडता चित्रपट आहे->+११११ तो खुशकुदी चा सीन पण कमाल आहे.
हो, आणि शेवटी ‘कौन सोच सकता
हो, आणि शेवटी ‘कौन सोच सकता था कभी ऐसा भी होगा’ म्हटल्यावर पोर्ट्रेटमधून डोळा मारणारा शेक्सपिअर!
देवेन वर्मावरून आठवले.
देवेन वर्मावरून आठवले.
दिल्लगी मधे धर्मेंद्रसोबत तो ही होता. धर्मेंद्रने आश्चर्यकारकरित्या विनोदी भूमिका मस्त केलीय. एरव्हीही त्याच्या हाणामारीच्या मूव्हीत त्याचे विनोदी सीन्स असायचेच. पण अशा कॅरेक्टर ड्रिव्हन कॉमेडीत धर्मेंद्राचा विचार बासू च्चटर्जीच करू जाणे. आता नीट लक्षात नाही. पण यातली पात्रांची नावं महाभयंकर आहेत. धर्मेंद्र संस्कृतचा प्रोफेसर. कुर्ता पायजमा, शबनम, चष्मा अशा वेषात आहे. हेमामालिनी केमिस्ट्रीची टीचर. धर्मेंद्रला तिला वश करायचं असतं आणि देवेन वर्मा त्याला एकसे एक फॉर्म्युले सुचवत असतो. पुन्हा बघायला हवा.
पण यातली पात्रांची नावं
पण यातली पात्रांची नावं महाभयंकर आहेत
<<<< स्वर्णकमल आणि फूलरेणू!
राज अज्ञानी, तुमच्या
राज अज्ञानी, तुमच्या पोस्टीवरून रंगबिरंगी आठवला. त्यात फारूख शेख, अमोल पालेकर, परवीन बाबी, दीप्ती नवल आणि देवेन वर्मा आहेत. त्यातही तो फारूख शेखला आयडिया देत आहे. अमोल पालेकर आपली बायको आजारी आहे सांगून दीप्ती नवल सोबत फिरत असतो. हे कळाल्यावर एक नाटक बसवतात आणि परवीन तिचं आणि फारूखचे आहे असे दाखवते. यातला जो गाऊन सेक्रेटरीला घेतला आहे तोच बायकोला घेण्याचा सीन तंतोतंत सवत माझी लाडकी मधे आहे. बटरफ्लाय कंपनीचा गाऊन आणि सटरफ्लाय कंपनीचा गाऊन. बायकोचे नाव सीमा व गर्लफ्रेंडचे बीना असते. ते ब आणि स घेऊन कोलांट्या. पण "रंगबिरंगी" प्रसन्न आहे. परवीन एवढी सुंदर दिसते, ते दीप्तीच्या मागे लागणं बिलिव्हेबल वाटत नाही. गर्लफ्रेंडपेक्षा हळूहळू बायकोच फटाकडी होत जाते हा सारांश.
किंवा बायको मुळात फटाकडी असते पण तिच्या मागे घरकाम लावून दिल्याने तिची झळाळी लपलेली असते. ती अशी बाहेर येते.
रंगबिरंगी आठवत नाहीये. झूठी
रंगबिरंगी आठवत नाहीये. झूठी आणि त्यात गल्लत होतेय. बघेन आता.
दिल्लगी सुरू केलाय.
श्रद्धा मेमरीला सलाम. हीच नावं आता ऐकली.
अंगूरमधले एक एक डायलॉग आमच्या
अंगूरमधले एक एक डायलॉग आमच्या घरात मीमसारखे वापरले जातात.
बाजार में झूल रहा था सांड की तरहा... (हातवार्यांसकट)
अबे! प्रीतम आन मिलो
अंदर कर दिया उन को? अंदरवाले अंदर नहीं है, बाहर है, लेकिन अंदर हैं
अगर मेरा नाम चिरकुट कुमार होता...
लेकिन ग्यारह तो कब के बज चुके
उर्दू में अशोक को क्या कहते हैं? अब हार से अशोक का क्या ताल्लुक? अच्छा! हार से हमारा कोई ताल्लुक ही नहीं है!
आप सो जाओ चटई पे, मच्छरों को लगेगा कि आप मच्छरदानी में हैं
आंखें नहीं हैं मेरी? बटन लगा रखे हैं? (या वाक्याला देवेन वर्माचं स्वत:च्या कुडत्याच्या बटनाकडे बघणं)
अगर मैं आ-ता-ही नहीं...
अंगूरमधला ट्रेनचा प्रसंग सुरू
अंगूरमधला ट्रेनचा प्रसंग सुरू होतो तोपासून सिनेमा सुसाट सुटतो. प्रत्येक संवाद त्यातल्या कलाकाराच्या हुबेहुब लकबीसकट आठवतो ह्यापेक्षा त्या कलाकारांना वेगळी दाद देणे अशक्य आहे.
लोकहो, माझी गल्लत होत होती.
लोकहो, माझी गल्लत होत होती.
दिल्लगी हा फार्सिकल कॉमेडी नाही. एक प्रसन्न मूडचा सिनेमा आहे. यात देवेन वर्मा आहे पण तो क्रेझी सल्ले देत असतो तो भलताच चित्रपट आहे. आता आठवत नाही.
देवेन वर्मा सल्ले देतो तो मला
देवेन वर्मा सल्ले देतो तो मला तरी रंगीबेरंगी वाटतो आहे. तो सुरुवातीला अमोल पालेकराला सल्ला देतो. मग फारूख शेखला सल्ले देऊन धुरंधर भाटवडेकर बनवतो. आणि उत्पल दत्त खरा धुरंधर भाटवडेकर असतो. तो सगळ्यांना पकडतो.
या सगळ्यांमध्ये आम्हाला आवडणारा अजून एक पिक्चर म्हणजे छोटी सी बात. यात मेक ओव्हर मुलीचा न होता अमोल पालेकराचा होतो. अशोक कुमारचा फार भावखाऊ रोल आहे. विद्या सिन्हा असलेले जानेमन जानेमन तेरे दो नयन हे सुश्राव्य गाणे आहे.
वाह धनि,
वाह धनि,
छोटी सी बात कमाल रिलेट होणारा चित्रपट.
म्हणजे मी वयात आल्यापासून लग्न होईपर्यंत जेव्हा जेव्हा कुठल्या मुलीच्या खरोखर प्रेमात पडून तिला पटवायचा विचार करायचो तेव्हा तेव्हा छोटी सी बात मधील संदर्भच डोक्यात यायचे. कारण मी मुलींच्या बाबतीत त्यातला अमोल पालेकरच होतो आणि शेवटपर्यंत तसाच राहिलो. फक्त आव अशोक कुमार असल्याचा आणायचो
छोटीसी बात टिव्हीवर पाहिलेला.
छोटीसी बात टिव्हीवर पाहिलेला. पाठोपाठ दामाद.
दामाद बघताना खुर्चीतून झाली पडलो होतो. तो टेबलाचा सीन नंतर मराठीत कॉपी झाल्याचं आठवतंय.
कुठे आहे मी-अनु?
कुठे आहे मी-अनु?
अंगुर पण कितीतरी वेळा पाहिलाय. काय सिनेमा! काय सिनेमा!
अंगूर - “लेकिन यह जीप मुझे
अंगूर - “लेकिन यह जीप मुझे चलानी नहीं आती“ “पुलिस स्टेशन, कौनसा? छोटा या बडा? …. मुझे खरीदना नहीं हैं“
किसके घर?
किसके घर?
इसकेss?
हहाहा.. फारच भारी सिनेमा
अंगुर पण कितीतरी वेळा पाहिलाय
अंगुर पण कितीतरी वेळा पाहिलाय. काय सिनेमा! काय सिनेमा!>> अगदि अगदी !! सगळे डायलॉग पाठ झालेत.
छोटी सी बात कितीही वेळा
छोटी सी बात कितीही वेळा पाहिला तरी प्रत्येकवेळी तेवढाच एन्जॉय करता येतो. पिक्चरमध्ये दिसणारी स्वच्छ आणि शांत मुंबई बघाविशी वाटते.
छोटी सी बात - “क्लोटोझोव्ह…..
छोटी सी बात - “क्लोटोझोव्ह….. ग्रँडमास्टर“ आणि “चिकन आलापूर्झ“ (रंगबिरंगी मधलं “चिकन आलाक्यू“)
सायो >> मुंबईबद्दल अगदी तसेच
सायो >> मुंबईबद्दल अगदी तसेच वाटते.
फे फ>> येस त्या समोवर मधले चिकन आलपू खूप शोधलेले होते. पण तशी काही डिश नव्हतीच. अशोक कुमारने ते नाव शोधून काढले होते म्हणे.
रंगीबेरंगी मधले मात्र चिकन अ - ला किव्ह आहे. ती खरच डिश आहे. चिकन ब्रेस्ट मध्ये हर्ब बटर घालून मग ते ब्रेड क्रंब्स लावून तळतात. आम्हाला शेवटी बोस्टन मध्ये खायला मिळालेली
अंगूरमधला ट्रेनचा प्रसंग सुरू
अंगूरमधला ट्रेनचा प्रसंग सुरू होतो तोपासून सिनेमा सुसाट सुटतो. प्रत्येक संवाद त्यातल्या कलाकाराच्या हुबेहुब लकबीसकट आठवतो ह्यापेक्षा त्या कलाकारांना वेगळी दाद देणे अशक्य आहे.
_/\_
>>>
अगदी!
सुरुवातीच्या ट्रेन सीनमध्ये संजीवकुमार काल्पनिक रिव्हॉल्वरच्या नळीवर फुंकर मारून देवेन वर्माच्या हातात देण्याची अॅक्शन करतो, देवेन वर्मा ते घेऊन बाजूला फेकून देण्याची अॅक्शन करतो, ते एक नंबर आहे!
संजीवकुमारच्या त्या गँग च्या
संजीवकुमारच्या त्या गँग च्या संशयाने पछाडलेल्या अभिनयाला देवेन वर्माने कपाळावर आठ्या पाडून कन्फ्युज्ड रिअॅक्शन्स दिल्यात त्या भारी आहेत. त्याच्या काँम्प्लिमेंटरी रिअॅक्शन्समुळे संजीवकुमारचा तो अतरंगीपणा जास्त हायलाईट होतो. देवेन वर्मा या विषयावर स्वतंत्र धागाच पाहीजे.
रंगीबेरंगी मधले मात्र चिकन अ
रंगीबेरंगी मधले मात्र चिकन अ - ला किव्ह आहे
>>
चिकन नाही, व्हेजिटेबल अ - ला किव्ह
नरम गरम" पण टाका . धमाल
नरम गरम" पण टाका . धमाल सिनेमा आहे. शत्रुघ्न सिन्हा ने मस्त काम केलय
>>
साला घोंचू
चना गुड
मैं उस बाग वाली कोठी की तरफ मुह करके सोउंगा भी नही
मैं उस बाग वाली कोठी की तरफ मुह करके xxx भी नही करूंगा...
इसे कहाते है आदर्श भ्राता...
किसी से ना कहना पण याच टाइप
किसी से ना कहना पण याच टाइप चा आहे...
ती पूर्ण category ऑफ सिनेमा
ती पूर्ण category ऑफ सिनेमा आवडता आहे
किसीसे ना केहना दोनच दिवसापूर्वी पाहिला
.
साधीशी छोटी गोष्ट
साधी लोक
पण किती सुंदर पद्धतीने सादर होतं
रंगबिरंगी मी पार्ल्यात थेटरात
रंगबिरंगी मी पार्ल्यात थेटरात जाऊन पाहिलेला.. अमोल
पालेकर पिवळा ड्रेस विकत घेतो ते फ्रेंडशिप दुकान आमच्या सांताक्रुझचे. पडद्यावर दिसताच थेटरात कुजबुजाट झाला.. फ्रेंडशिप फ्रेंडशिप …
परवीन बाबी कॉटनच्या घरगुती साड्यांमध्ये कसली सुंदर दिसलीय. जीव चुटपुटतो तिला पाहुन. सुखी व्यक्तिगत आयुष्य मिळायला हवे होते तिला.
परवीन बाबी कॉटनच्या घरगुती
परवीन बाबी कॉटनच्या घरगुती साड्यांमध्ये कसली सुंदर दिसलीय>> खूपच सुंदर दिसते ती.
खरंच परवीन बाबी काय कमालीची
खरंच परवीन बाबी काय कमालीची ग्लॅमरस दिसायची!
परवीन ग्लॅमरस वेस्टर्न कपडे
परवीन ग्लॅमरस, वेस्टर्न कपडे तर मस्त कॅरी करायचीच पण साध्या सलवार कमीझमध्येही सुरेख दिसलीय इथे
कबीरांवर एक उत्कृष्ट
कबीरांवर 'चलो हमारा देस' म्हणून एक चांगली डॉक्युमेंटरी बघितली आज.
यामध्ये काही लोक आहेत, (प्रल्हाद टिपानिया, शबनम विरमानी, लिंडा हॅस वगैरे), ह्यांना कबीरांनी झपाटलेलं आहे. दिसतंच आहे ते. कारण आनंद आहे.!
लिंक देऊन ठेवतो, To Whomsoever It May Concern:
https://m.youtube.com/watch?v=liSbaO4BH9g&list=LL&index=1&pp=iAQBsAgC
Pages