चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<< सौरभ द्विवेदी मोजुन ५ मिनिटे असेल. त्याला फारतर चार वाक्यं असतील >>>>

सिरीयसली BRO??
आणि एवढ्यासाठी तो बरेच ठिकाणी इतका ट्रॉल होत आहे??

मी पण तेच पाहून उत्सुकतेने विचारलं. पाच मिनिटाचा रोल म्हणजे मुख्य खलनायक कसा?
तो अभिनेता नाही.

मलाही फेसबुकवर आले आहे ते लल्लनटॉपचे मीम. मी मेंबर नाही आणि मी ह्याला ओळखतही नाही. पण उलट त्यामुळेच मी कर्तव्य बघणार होते. धनि नोटेड.
https://www.facebook.com/share/p/1GqQVdtLUW/

आणि चारच वाक्यं असतील तर ती सुद्धा माझी एकाने त्याला चिडवायला शेअर केलेल्या व्हिडिओत बघून झाली.
कोणीतरी दुश्मनीत बदनामी सुरू केली असेल..

अरे त्याला दिलेले संवाद पण चांगले नाहीत. Lallantop मध्ये त्याची हिंदी चांगली होती. यात ती पण दिसली नाही. अगदी अतिसामान्य.

कर्तव्य पाहिला

सैफ चं काम चांगलं वाटलं
संजय मिश्रा, मनीष शर्मा अन् झाकीर हुसेन ही बरे आहेत
रसिका दुग्गल ला अगदीच काही काम नाही
अन् त्याहून कमी सौरभ द्विवेदी ला.
पण बाकी सगळ्यांच्या समोर तो फारच ठोकळा आहे. कुठल्याही इमोशन मधे सेम च एक्सप्रेशन देतो. आवाजाची पाताळी ही एकच. मुख्य खलनायकाचा टॅग मिळावा म्हणून त्यानीच पैसे दिले असावेत
स्टोरी अन् डायरेक्षन मात्र कायच्या काय गंडलं आहे

काय ट्रोल होतय कल्पना नाही. मला तरी सिनेमा बघुन ट्रोल करता येईल असं काहीच दिसलं नाही. त्याच्या संवादात काय होतं असं? तो भोंदू बाबा आहे, आता कॅरेक्टर सोडून त्याने वैज्ञानिक आणि लॉजिकल बोलावे असं अपेक्षित आहे का काय जन्तेला? Lol

मी ह्याला ओळखत नाही, त्यामुळे मला हा वाया कसा गेला आहे त्या सिनेमात त्याचाही अंदाज आला नाही. आणि तरीही मला वरचं फॉरवर्ड मजेशीर वाटले , मी हसलेही. हाकानाका. Lol मी इमानेइतबारे कमेंट्सही वाचल्या.

भोंदू बाबा आहे ? मला पोस्टरवरून नेता वाटला. एकुण एकच. Wink एक मराठी सिरियल होते, त्यात बाबाचे नावच "गंडवरे बाबा" होते. त्यामुळे सगळ्या बाबांना जनरली "गंडवरे बाबा की जय" येतेय मनात.

सिनेमा बघायला शोधत असाल तर 'रिमार्केबली ब्राईट क्रिचर' बघा.
काल लॉंग वीकेंडला बघितला. काल चालू केला तेव्हा काहीच अपेक्षा न्हवत्या, का हा काय सिनेमा आहे काही माहिती शोधलेली होती. नेटफ्लिक्स वरचा ब्लॉब वाचुन हा काही फार आवडेल असं वाटलं न्हवतं. पण इतर शोधण्यात वेळ दवडण्याऐवजी हा बघू, नाही बरा वाटला तर दुसरं काही बघू अशा प्रचंड उत्साहाने चालू केला. साधारणपणे न आवडतील अशा अनेकोनेक गोष्टी, योगायोग इ. आहेत पण ते असं काही दाखवलं आहे की मी टोवा (सॅली फील्ड), कॅमरुन (लुईस पुलमन), इथन (कोल्म मीनी), एव्हरी (सोफिया ब्लॅ़क-डीएला) आणि बाकी सगळ्यांच्या प्रेमात पडलो.

टोवा विधवा आहे, आता म्हातारी झालेली आहे. ती गावातील मत्स्यालयात क्लिनिंग लेडीचं काम करते, पैशासाठी नाही तर वेळ घालवायला काहीतरी जोडून ठेवायला म्हणून. ती टॅंक मधील ऑक्टोपस बरोबर सुखदु:खाच्या गोष्टी बोलते. तो ऑक्टोपसही म्हाताराच झाला आहे. टोवाला काहीतरी सल आहे, तो तिने आता खोल मनात दडपून टाकलाय. कथेच्या ओघात टोवाला एक मुलगा होता हे ही आपल्याला समजतं आणि तो आज नाही हे ही. त्या लहानश्या गावात कॅमरुन आपल्या बापाला शोधत येतो. याचा बाप याला जन्मण्यापूर्वीच सोडून गेलेला असतो, आणि आईचा हा लहान असतानाच मृत्यू झालेला असतो. कॅमरुन फॉस्टर होम टू होम फिरत वाढलेला, संगीताची आवड असलेला आणि त्याच्या बँडचा गिटारिस्ट आहे. आपले बाबा या गावात आहेत, आणि ते अज्बाधिश आहेत हे समजल्यावर चाईल्ड केअरचे न मिळालेले पैसे मिळतील आणि आपण बँडचा आल्बम काढू अशी त्याची स्वप्नं आहेत. गावात शिरतानाच त्याची कँपर व्हॅन धापा टाकत बंदच पडते. जवळच्या ब्रेकफास्ट/ डायनर मध्ये त्याला इथन भेटतो. हा मध्यमवयीन कनविनिअन्स स्टोर चालवणारा आणि माणसांचा, गप्पांचा भुकेला आहे.

टोवा एका रात्री मत्स्यालयाची स्वच्छता करताना पडते. थोडं पायाला लागतं. काही दिवस अजिबात इच्छा नसताना सुटी घ्यावी लागते का काय अशी वेळ येते. ति़कडे कॅमरुन टेंपरवारी म्हणून काम करू लागतो. टोवा डेडिकेटेड, नो नॉनसेन्स, प्रेमळ पण तत्त्वनिष्ठ आजी आहे आणि कॅमरुन वेळ मारुन न्यायला आणि कँपर व्हॅन दुरुस्तीला/ हातखर्चाला पैसे म्हणून हे पार्टटाईम काम चालू करतो, जुलमाचा रामराम म्हणून.

लहान गाव, टोवाच्या विणकाम करणार्‍या आणि काही झालं की कॅसरोल वर कॅसरोल देणार्‍या मैत्रिणी, गावातली लहान दुकानं, टोवा ऐकणार नाही म्हणून तिच्या नवर्‍याने जाण्यापूर्वीच ओल्डएज होम मध्ये टोवाचं घातलेलं नाव, आता टोवाला सोडून जायलाच लागणार तर घरही विकावं लागेल, त्यातील मुलाच्या स्मृती, तो आज नक्की का नाही? कॅमरुनला बाप भेटणार का? का जीवनसाथी मिळणार? टोवाचं काय होणार? आणि हो! आपल्या ऑक्टोपसचं... सॉरी मार्सेलोचं काय? तो ही आपल्याशी पूर्ण सिनेमा संवाद साधतो. तो या सगळ्या गुंत्याला सोडवायला काय करेल? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळतात. काही समजुन घ्यावी लागतात.
सरळसोट जे साधारण घडेल असं वाटतं तसंच घडत जाणारा सिनेमा. पण स्क्रीन प्ले आणि अभिनयाने पुरता मला त्या ऑक्टोपससारखा विळख्यात घेतला. रोम कॉम आहे, आजीचा लाघवी आणि कठोर स्वभाव आहे, सॅली फील्डने फार सुंदर काम केलंय! गोडगोड गोष्टी होतात, कनविनियंट वळसे येतात, आपल्या मराठी सिरियला लाजवेल असे ट्विस्ट येतात. एक ऑक्टोपस, ८० वर्षांची म्हातारी आणि तिशीच्या चाचपडण्यार्‍या तरुणाला एकत्र आणतो हे किती अशक्य वाटलं तरी किती लाघवी गोड कोणी करू शकतं असं काही झालं मला.
माझा रेको. Happy

हो मी पण याबद्दल छान छान वाचलं कुठे कुठे... सुरू केला आहे. असे वेगळे विषय आवडतात बघायला.

ब्राईट क्रिचर्स लिस्ट मध्ये आधीपासून टाकला आहे. नक्की बघेन.

या विकांताला शीप डिटेक्टिव्ह पाहिला. फार मज्जा आली. मस्त बनवलेला आहे पिक्चर. आणि त्या सगळ्या शीप पाहून फार गंमत वाटली. तसे पाहिले तर लहान मिडसोमरच्या एपिसोड इतकाच जीव आहे कथेत पण त्यांचे प्रेझेंटेशन झकास जमलेले आहे. परत एकदा त्या सगळ्या शीप भारी आहेत.

अ‍ॅन्की >>+१
सौरभ ची व्हिलन म्हणून काहीही छाप पडत नाही, सैफ आणी सन्ज्य मिश्रा त्याला भेटायला जातात तर त्याच्या चेहर्‍यावर मन्द स्मित असत..अस वाटत कुठल्याही क्षणी हा मुलाखतच घ्यायला सुरवात करेल..सैफ हसु दाबायच प्रयत्न करतोय अस वाटल.सिरियस सिन जो अन्गावर यायला हवा...व्हिलनचा दरारा वाटायला हवा ते काहिच न होता कॉमेडी झाली..तोच मिम म्हणुन व्हायरल होतोय.

मी ह्याला ओळखत नाही >> मी सुद्धा ट्रंपला ओळखत नाही. Wink
सौरभ द्विवेदीने घेतलेल्या मुलाखती बघण्यासारख्या आहेत. आमीर खानची तीन तास झालेली वगळता.
जावेद अख्तर आणि मौलाना यांच्यात देव आहे का या विषयावर डिबेट घडवून आणल्यामुळे इंडीया टुडे ग्रुपमधून जावं लागलं. त्याने इलेक्शनच्या वे़ळेस केलेले दौरे गाजले. पुण्याची अमर्यादीत थाळी पण दाखवली आणि कोल्हापूरचा ७/१२ ढाबापण. मजेशीर पण प्रसन्न शैली आहे त्याची.

कर्तव्य अजिबात बघू नका. दोन विषयांची खिचडी केली आहे त्यामुळे कुठल्याच गोष्टीला बरोबर न्याय देऊ शकले नाहीत.>>> सहमत, दोन्ही विषयाना नुसताच स्पर्श करुन आल्यासारख...कुठेहि विषयाची इन्टेसिटी दिसत नाही.,काहीही भिडत नाही...अर्ध्या भागापर्यत काहितरी होणार अस वाटत अस्तानाच सन्पवुन टाकला ...अस वाटत कि डायरेक्टरला वेबसिरिज करायची होती पण प्लॅन बदलुन मुव्ही करुन टाकला.

दुसऱ्यांचे कर्तव्य बघण्यापेक्षा आपापल्या कर्तव्याकडे लक्ष द्या असा संदेश देण्यास चित्रपट बनवला असेल.

दुसऱ्यांचे कर्तव्य बघण्यापेक्षा आपापल्या कर्तव्याकडे लक्ष द्या असा संदेश देण्यास चित्रपट बनवला असेल. Lol

'कर्तव्य' मलाही आधी सिरीज आहे असंच वाटत होतं, त्यामुळे गपकन संपल्यावर काहीच धड साध्य न झाल्याचा वैताग आला.

पण त्या लहान शूटर मुलाने मात्र फार फार सुंदर - अगदी कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे काम केलं आहे.
आधी कधी त्याला पाहिल्याचं आठवत नाही.

त्या लहान शूटर मुलाने मात्र फार फार सुंदर - अगदी कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे काम केलं आहे.

+ १

बाकी कर्तव्य बोअर झाला

मी अनुभव नावाचा हिंदी चित्रपट बघितला प्राईमवर, ब्लॅक आणि व्हाईट. आवाजाची qualiti इतकी खराब आहे की बराच वेळ कोण काय बोलतंय काही कळत नाही. संजीव कुमार आणि तनुजा आहेत, बाकी ए के हंगल ओळखू आले बाकीच्या पात्रांमधले. मध्ये मध्ये रेडिओवर पण कोणीतरी काहीतरी बोलत असतं. संजीव कुमार प्रचंड बिझी असतो, लग्नाला सहा वर्ष होऊनही त्यांना मुलबाळ नसते, तनुजा श्रीमंत नवऱ्याची ट्रॉफी वाइफ असते. घरात चार नोकर असतात. नवऱ्याशी संवाद वाढावा, घराला घरपण यावं म्हणून तनुजा चारही नोकरांना एकाच वेळी काढून टाकते (किती आत्मविश्वास आणि करंटेपणा) ए के म्हणतो मी जाणार नाही, हे माझं घर आहे, मी तुझ्या नवऱ्याचं xxण धुतलंय वगैरे वगैरे. मग त्याला ठेवून बाकीच्यांना काढण्यात येते. नोकर गेल्यावर जणू काही त्यांच्या धाकाने बिझी असलेला संजीव कुमार अचानक खूप रोमँटिक होतो, त्याच्याकडे वेळच वेळ असतो आणि तेवढ्यात तनुजाचा जुना प्रियकर संजीवच्या ऑफिसमध्ये नोकरीला लागतो. मग गैरसमज, दुरावा आणि गोड शेवट.

सौरभ द्विवेदीचं हिंदी चांगलं आहे - याच्याशी सहमत.
पण मला ते 'ऐकायला' आवडतं,
लल्लनटॉपचे व्हिडिओज मी ५ मिनिटाच्या वर बघू शकत नाही.
तो लांबलचक वाक्यं न थांबता बोलतो, मुलाखतीचा इंट्रोच किती मोठा असतो, आणि तो कॅमेरा फ्रेन्डली वाटत नाही अजिबातच.

सौरभ द्विवेदी फारसा आवडत नाही. तो त्याचे गेस्ट उत्तरं देताना स्वतःचा फोन वगैरे बघत असतो. पूर्ण लक्ष नसतं त्याचं. मला ते अजिबात पटत नाही.
त्याची आणि गिरिजा गोडबोलेची सिरिज उगाचच लांबली होती असं वाटलं.

मला ही सौरभ द्विवेदी बोर होतो. फापट पसारा वाटतो. मी नाही बघत त्याचे व्हिडिओ. आलेला गेस्ट आवडीचा असेल तरी एकदा का मुलाखत विषयावर न राहता माणसावर गेली की बोर व्हायला लागते. गोडवे आले की झालंच!

Pages