Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Devil wears prada 2 बद्दल तीच
Devil wears prada 2 बद्दल तीच शंका होती. धन्यवाद मंदार, सियोना.
आता ओटीटीवर येईल तेव्हाच बघीन.
ग्रीन बुक आत्ता का चर्चेत आला
ग्रीन बुक आत्ता का चर्चेत आला? मला तो बघूनही ४,५ वर्षं झाली बहुतेक.
डेविल वेअर्स येत्या विकेंडला जमतोय का बघू. गेल्या रविवारी मायकल जॅक्सन बघितला. छान आहे. त्याचं काम केलेला अॅक्टर त्याचा पुतण्याच आहे आणि चेहरेपट्टी सारखीच वाटते.
सायो - नेफिवर नुकताच आलाय
सायो - नेफिवर नुकताच आलाय म्हणून. मी बरेच दिवस शोधत होतो.
अच्छा
अच्छा
रात्री नाम शबाना पाहिला.
रात्री नाम शबाना पाहिला. प्रचंड उकाडा आणि लो व्होल्टेज मुळं एसी बंद पडला. झोप येत नव्हती. युट्यूबवर दिसला. सुरुवातीला फॉर्वर्ड केला. पण मनोज वाजपेयींच्या प्रवेशानंतर एकदम पकड घेतली. ती कुरळ्या केसाची हिरॉइन विस्कटलेली वाटते. कुरळे पण लांब केस दिसत नाहीत आता. अभिनय उत्तम आहे पण रोल मधे मिसफिट वाटली. अंगकाठी action साठी योग्य नाही. एकटा व्हिलन मारामारीत तरबेज आहे, पण त्याचे गार्डस झापडीचे पण नाहीत.
मनोज वाजपेयीला पाहिलेले नसताना मिशनवर काम करायला होकार कुठली बाई देईल? कसलीच शंका येत नाही का? हे प्रश्न फ्रॅक्शन ऑफ सेकंद साठी पडतात. वेळ चांगला गेला.
तापसी पन्नू आहे ती. बेबीमध्ये
तापसी पन्नू आहे ती. बेबीमध्ये तिचा छोटासा रोल गाजल्यावर 'नाम शबाना' आला होता. आता 'नाम..'ची फारशी स्टोरी आठवत नाही पण बेबीमधली तिची फाईट आवडली होती.
काल बेबी पण दिसला होता पण
काल बेबी पण दिसला होता पण दोन्हीत जराही फरक नव्हता.
बेबी आवडतो मला. कधीही
बेबी आवडतो मला. कधीही टीव्हीवर लागला तर पाहू शकते मी. नाम शबाना एकदाच बास आहे.
sheep detective काल बघितला.
sheep detective काल बघितला. जबरदस्त आहे. माझा फुल रेको. बघा जरूर बघा.
भूत बंगला च्या आधी ट्रेलर
भूत बंगला च्या आधी ट्रेलर पाहिला होता Sheep Detective चा
इंटरेस्टिंग वाटला होता
लहान मुलांना दाखवण्यासारखा आहे का?
लहान आणि मोठ्या मुलांनीही
लहान आणि "मोठ्या" मुलांनीही बघावा असा आहे, मी गेलो होतो तेव्हा अनेक आई बाबा आपल्या लहानग्याना घेऊन आले होते.
शीप डिटेक्टिव्हचं ट्रेलर
शीप डिटेक्टिव्हचं ट्रेलर बघितलेलं. बघतो.
बेबी आवडतो मला. कधीही
बेबी आवडतो मला. कधीही टीव्हीवर लागला तर पाहू शकते मी.>> +१
शीप डिटेक्टिव्हचं तिकीट
शीप डिटेक्टिव्हचं तिकीट काढलेलं आहे. आता बघून सांगतो. खरं म्हणजे mortal Kombat पण बघायचा आहे
माझे मन तुम्ही सांगितल्यामुळे
माझे मन तुम्ही सांगितल्यामुळे बेबी पाहिला. सफाईदार वाटला. बऱ्याच गोष्टी धुरंधर प्रमाणे ओढूनताणून कोंबल्या आहेत. नाम शबाना आणि बेबी एकाच दिग्दर्शकाचे असावेत असे वाटतात. शबाना मध्ये प्लास्टिक सर्जरी चा अशक्यप्राय प्लॉट सोडला तर तो जास्त सफाईदार आहे
बॉंडच्या प्रभावातून हेरकथा बाहेर पडल्या हे समाधान आहे.
काल बारामुल्ला लावला.
काल बारामुल्ला लावला.
काश्मीर सस्पेन्स पोलीस तपास काफिर वगैरे सगळे व्यवस्थित चालू होते..
काही सस्पेन्स आणि थ्रिलर दृश्याना मात्र हॉरर चित्रपटांसारखी अचानक अंगावर येणारी बॅकग्राऊंड म्युझिक खटकत होती.
पण थोड्यावेळाने ती तशी का होती हे लक्षात आले जेव्हा काहीतरी अमानवीय दिसले.
मग बॅक करून चित्रपटाचा जॉनर चेक केला तर हॉरर लिहिले होते.
मग गुगलवर स्टोरी चेक केली तर समजले चित्रपटात खरोखरची भुते आहेत.
मग ही हॉलमध्ये रात्री दीड वाजता एकट्याने बघायची गोष्ट नाही हे समजताच सोडून दिला
मला बेबी व नाम शबाना दोन्ही
मला बेबी व नाम शबाना दोन्ही आवडले होते. तापसी पन्नु तेव्हा नुकतीच पुढे येत होती. छान काम केलेय नाम शबाना मध्ये. तिला फक्त सुड घ्यायचा असतो त्यासाठी वाट्टेल ते. त्यामुळे मवाचे ती सगळे ऐकते.
अरे बारामुल्ला मस्त आहे
अरे बारामुल्ला मस्त आहे ऋन्मेष!
(मीपण रात्री लावलेला बंद केला आणि मग दुसऱ्या दिवशी पूर्ण केला)
वावे हो, तुमचीच पोस्ट वाचून
वावे हो, तुमचीच पोस्ट वाचून बघायच्या लिस्टमध्ये टाकलेला.
काल बंद केला. पण बाद नाही. येत्या आठवड्यात जरा घरादाराला जाग असताना बघेन
काल नेटफ्लिक्सवर धुरंधर (नंतर
स्पॉयलर्स आहेत.
काल नेटफ्लिक्सवर धुरंधर -२ (नंतर आलेला ) पाहिला. ते उगा बाहुबली कन्क्लूजन आणि बाहुबली पदार्पण टाईप. पहिला कोणता विचारू नका. बाहुबली इ स पूर्व टाईप उलटा मोजावा लागायचा. धुरंधर खरंतर एकच लांब पिक्चरचे दोन तुकडे आहेत. दुसऱ्या भागात पहिल्या भागाच्या आधीचे कथानक सोडले तर फक्त बदला, बदला, बदला आहे. नावातच "रिव्हेंज" आहे. मी आधीच्या धुरंधर-१( त्याच धाग्यावर) पोस्टीत Revenge is one of the strongest emotion, easier to express and make money out of! असे लिहिले होते. पहिला मला खरंच आवडला, दुसरा त्यामानाने निष्प्रभ वाटला. कामं चांगलीच आहेत, तरीही निष्प्रभ वाटला खरा.
रणवीरने उत्तम काम केले आहे यावेळीही. पण सर्व फोकस तो इतरांना हालहाल करून कसे मारतो यावरच आहे. का मारतो हे उगाच तळटीप मधे जस्टिफाय केल्यासारखे येते. अतिशय gory , प्रचंड रक्तपात तोही अनावश्यक आणि अतिशय तपशीलात दाखवला आहे. जितकी शस्त्रं दाखवता येतील तितकी दाखवून, टेबलने ढकलत नेऊन, सिमेंटच्या ओंडक्यातल्या गजासहित वगैरे मारून, तलवारीत माणसं ओवून. माणसं कशी मारावीत याचं प्रात्यक्षिक आहे. बंदूक असूनही न वापरता बदला कसा घ्यावा किंवा पिक्चर कसा लांबवावा. यामुळे सिनेमा हेsss लांबला आहे. कथानक जेमतेम एक तासाचे असेल. सनयाल/ माधवन एकदा हवनातून उठून व्हिडिओ कॉल वर "भारत माता की जय" वदवून घेऊन मग मारतात जहूर मिस्त्रीला ( कंदाहार - हिंदू डरपोक कौम है - संदर्भ) . मला जरा जास्तच वाटले. सरळ मारून कमीत- कमी ड्रामा करण्याचा प्रोटोकॉल असतो खरेतर. येथे जितके पसरता आले आहे तितके पसरलेत.
अर्जुन रामपालचे अपंग आणि बुली वडील आणि डाऊन सिंड्रोम असलेली मुलगी. नंतर वडिलांच्या बांग्लादेशातल्या बढाया, नंतर हौदात बुडवून जलसमाधी. हे अनावश्यक वाटलं. अर्जुन रामपाल एकदम बेसिक अभिनेता आहे आणि त्याला बेसिकच दिले आहे ते बरे. हा मरता मरत नाही, फारच वेळ लागतो याला.
जमील जमाली (राकेश बेदी) जेवढी मजा पहिल्यात आणतो, तितकी येथे नाही आली. गडबडीत वाटलं त्याचं सगळं. संजय दत्त पुन्हा तेच पण किमान लवकर मेला आहे. अर्जुन रामपालला इतका वेळ लागला मारायला की चिरंजीव वाटू लागला. पण सप्त चिरंजीवात आठवा धुरंधर आहे. त्याला कवच कुंडले आहेत. हे त्याला माहीत आहे, त्यामुळे तो काहीही करत असतो. युपीच्या अतिफ डॉनचे मला काही कळाले नाही, चार शिव्या देऊन जेवून मेला. बाकी सगळे धुरंधरच्या हातूनच मरतात किंवा त्याच्या आयडियाने मरतात. दाऊद पाकिस्तानात राजा आहे, सगळे त्याचेच ऐकतात, त्याला इतका मान पाहून झेपले नाही. प्रत्यक्ष खंगून, खंगून मरत आहे. सगळ्या दंडकारण्यातला "रावण" भारतीयच निघाला. दाऊदचं सोडून सगळ्यांचं नाव थोडं, थोडं बदललं आहे.
पिक्चर वाईट नाही. यामीही आहे, मोदीही आहेत. नोटबंदी वगैरे सगळं आहे. एंगेजिंग आहे पण पहिल्या इतका चांगला नाही. तशी मजा आली नाही. तरीही मी सलग पाहू शकले म्हणजे अगदी तहान- भूक विसरून नाही पण खातपित पाहू शकले.
धुरंधर-२ न म्हणता "नंतर आलेला
बाकी तलवारीत माणसे ओवणे, शिव्या देऊन जेवून मरणे वगैरे
तो भाग दोन नाही टेक्निकली
व्हिलन लोक हिरोपेक्षाही व्यवस्थित जेवतात एकंदरीत, जीवनाचा व जेवणाचा जास्तच लुत्फ की काय घेतात. लांबलचक कोतबो ऐवजी चार सणसणीत शिव्या देऊन मन शांत ठेवतात. आपण व्हिलन्स कडून शिकण्यासारखे बरेच आहे.
अग इतका रक्तपात, खात पित कसा
अग इतका रक्तपात, खात पित कसा बघितलास तू.
दुसरा एकंदरीत उरकला आहे का, मग मरण वगैरे ह्याचं त्याचं का लांबवलं.
रक्तपात असल्याने बघणार नाही
रक्तपात असल्याने बघणार नाही - असे आत्ता म्हणते आहे.
तलवारीत माणसं ओवून. माणसं कशी
तलवारीत माणसं ओवून. माणसं कशी मारावीत याचं प्रात्यक्षिक आहे >>
IIZ
IIZ
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/ii...
IIZ
IIZ
ह्या सिनेमाचे रसग्रहण इथे आहे.
https://tenvow.com/box-office/iiz-2026-movie-box-office-collection/
कुणी बघितला तर प्लीज इथे लिहा.
सौरभ द्विवेदीने लल्लनटॉपला
सौरभ द्विवेदीने लल्लनटॉपला लोकप्रिय केलं असं म्हणणं function at() { [native code] }इशयोक्त ठरू नये.
त्याच्या या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी त्याला थेट मुख्य खलनायक म्हणून सिनेमात घ्यावं का?
कर्तव्य पाहून इथे उत्तर देण्याचे कतव्य करा कुणी!
कर्तव्य अजिबात बघू नका. दोन
कर्तव्य अजिबात बघू नका. दोन विषयांची खिचडी केली आहे त्यामुळे कुठल्याच गोष्टीला बरोबर न्याय देऊ शकले नाहीत. द्विवेदी ला वाया घालवले आहे. सैफ बरा दिसतो पण भूमिका काय आहे हे ना डायरेक्टरला कळले आहे ना सैफला. सगळा गोंधळ नुसता. मी तर मध्ये मध्ये फॉरवर्ड केला. आणि सगळी कथा अर्धवट सोडलेली वाटते. त्यामुळे सगळेच मुसळ केरात.
कर्तव्य बघितला.
कर्तव्य बघितला.
सौरभ द्विवेदी मोजुन ५ मिनिटे असेल. त्याला फारतर चार वाक्यं असतील. प्रसिद्धीचा फायदा वगैरे काही घ्यायचा उद्देश दिसला नाही, असेल तर तो तसा घेतलेलाच नाही.
नाही बघितला तरी चालेल असाच मला ही वाटला. कसलं कर्तव्य आणि काय निभावलं त्यांचच त्यांना माहित. धनि +१
Pages