चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल परिचय बघितला..फार आधी बघितला होता...हा जितेन्द्रचा सर्वोत्तम सिनेमा आहे अस माझ मत आहे, खुप सुरेख अभिनय..त्याला अजुन असे रोल का मिळाले नाहित..एकाच जम्पिन्ग जॅकच्या प्रतिमेत अडकुन पडला.
सन्जिव कुमारचा रोल अगदी छोटा आहे अगदी एक दोन सिन पण पुर्ण सिनेमाभर त्याच अस्तित्व जाणवत राहत..प्राण विषयी तर काय बोलणार? थ्री पिस सुट , हातात पाइप, त्याचा दरारा शिस्त, नजरेतला धाक स्क्रिन फोडुन आपल्यालाही जाणवाव.
जया भादुरी ..तिच्या अभिनयाचा सुवर्णकाळ..दिसण, बोलण केवळ नजरेतन व्यक्त होण.
गुलझारच डायरेक्शन, आर डी बर्मन सन्गित.

तरीही त्यात काहीतरी आहे की तो अर्धवट सोडता येत नाही पूर्ण बघितलाच जातो. >> प्रियदर्शन, अक्षय कुमार, परेश रावल असल्यामूळे एखादा तरी सीन खरच मनापासून हसवेल असे वाटण्याची अपेक्षा रे , दुसरे काहि नाही ! हाय रे माझ्या कर्मा ! Wink

हो साउंड ऑफ म्युझिकचं भारतीयकरण आहे परिचय. साउंड ऑफ म्युझिक बरेच वेळा पाहिलाय, परिचय या वर्षी. मला यात संजीव कुमार जरा कॅमेरा कॉन्शस वाटला काही ठिकाणी. तरी छा गया.

मास्टर राजुचा किताब पण याच वर्षी पाहिला. भारीच काम केलंय त्याने. खूप आवडला चित्रपट.

मला दोन्ही सिनेमे आठवत नाहीयेत. म्हणजे परिचयची गाणी आठवत आहेत, खुशबूचे काहीही आठवत नाहीये. बहुतेक तो पाहिलाच नाहीये. सारेके सारे गमाको लेकर गाते चले हे परिचय मधे आहे का? शिकवणी मास्तर आहे का जितेंद्र?

परिचय ची १६ एम एम ची फिल्म घरी होती. प्रोजेक्टरवर अनेकदा पाहिला होता. नंतर टिव्हीवर अनेकदा.

गुड्डी आणि मिलीचीही होती. माझे वडील सिनेमे बघायचे नाहीत. पण त्यांच्या प्रोजेक्टसाठी स्थानिक गावकर्‍यांना आपलंसं करण्यासाठी सिनेमे दाखवत. अमिताभ बच्चनचे मारधाड वाले पिक्चर बघता बघता गुलजारछाप सिनेम्यांची सवय अशी लागली. प्रोजेक्टर जोडून नेमका कासवाचा सीन लावण्याइतकं आम्हालाही जमायला लागलं होतं. भिंतीला हिरवा रंग होता. त्यामुळं ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट प्रिंट असून रंगीत वाटायचा सिनेमा.

कुणी गवर्नर पाहिलाय का?

भूतबंगला मधे एक पितळी चक्रं बसवलेले मशीन आहे. ते पुरातन काळापासून आहे आणि त्यात ओम नमः शिवाय रिपीटावर चालू असते. चांगल्या साधूंकरवी रात्रंदिवस आवर्तनं करून रेकॉर्ड केले आहे म्हणे. त्यावर बाकी सगळे प्राचीन असले तरी रिव्हर्स फॉरवर्ड मात्र इंग्लिश मधे लिहिले आहे. रिव्हर्स केले की बॅटमॅन सदृश भूत, असूर* उठून बसत असते, फॉरवर्ड केले की निद्राधीन होत असते. मग अव्हेलेबेल कशाला करायचे हे उलटे यंत्र. राक्षस आहे का मॅन्युअल कुंभकर्ण! Lol

* ज्याला नव्या नवेल्या अप्सरा हॉटी दुल्हनने सुरा खुपसून मारलेले असते म्हणून तो नव्या नवेल्या दुल्हन मारणारा संधीविग्रह चुकलेला वधूसूर - हे वधू+ असूर= वध्वासुर व्हायला हवं. पण राक्षसाचे लक्ष हॉटी कडे असल्याने त्याने स्वतःचे नाव चुकवले , वर तो जानी दुष्मन मधल्या अस्वला प्रमाणे दुल्हने उठवायला लागला.

परिचय आमच्याकडे आईचा फार आवडीचा आणि "लहान मुलांचा आहे बघ तुलाही आवडेल म्हणत मलाही सोबत बसवायची" या कॅटेगरी मधील असल्याने लहानपणी बरेचदा बघणे झाले. पण शेवटचे बघून बरेच वर्षे झाली असल्याने पुन्हा नव्याने बघायला हवे.

त्यातला जितेंद्र वेगळाच आहे हे मात्र खरे. बाकी मला जंपिंग जॅक जितेंद्र सुद्धा आवडायचा. म्हणजे ते नटखट रूप नाही तर लोक परलोक सारख्या सिनेमातील कॉमेडी आवडायची.

त्याचा कारवा चित्रपट फार आवडीचा. यामागचे कारण कदाचित आशा पारेख वर तेव्हा क्रश असणे असेल. पण तिच्यासोबत त्यात तो सुद्धा आवडला होता. शोभला होता.

ही आहे खुशबू ची लिंक.
https://www.youtube.com/watch?v=hndmPsKh6AE
ह्या वेळी जितेंद्रचे करिअर गाळात गेले होते. म्हणून तो गुलजार कडे गेला. परिचय आणि खुशबू केल्यावर पुन्हा त्याचे करिअर वधारले. मग पुन्हा तो गुलजार कडे वळला नाही.
खरेखोटे देव जाणे.

"मग अव्हेलेबेल कशाला करायचे हे उलटे यंत्र." - सेम पिंच!! हाच नेमका विचार आला होता माझ्या मनात सिनेमा बघताना. Happy

हायला. दोन्हीची निर्मिती जितेंद्रची होती, हे माहीतच नव्हतं.

तिरुपती पिक्चर्स. मुलीची बालाजी टेलिफिल्म्स.

खुशबू म्हणजे तो गावात डॉक्टर असतो तो का? त्या पिक्चरमध्ये मला जीतूपेक्षा हेमा मालिनीचं आणि फरीदा जलालचं पात्र फार आवडलं. त्यातली ‘बेचारा दिल’ आणि ‘घर जाएगी’ गाणी तर आवडतातच.

गुलजार नी डिरेक्ट केलेला 'अंगूर' म्हणून एक हिंदी सिनेमा आहे. शेक्सपिअर च्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर बेतलेला आहे. संजीव कुमार, देवेन वर्मा, मौसमी चॅटर्जी, दिप्ती नवल असे कलाकार आहेत. उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट संवाद, दर्जेदार ह्युमर.
You tube वर सहज नजरेसमोर आलेला. बघितला तर तब्येत खुश झाली एकदम.

बर्‍याच दिवसांनी या धाग्यावर बोलता येतील असे सिनेमे आलेत.

परिचय, आनंद, नमकहराम, गुड्डी, आशिर्वाद, बावर्ची, खामोशी, कोशिश, खूशबू, दिल्लगी, अंगूर, गोलमाल, चुपके चुपके, आंधी, अंगूर, इजाजत, किनारा, लिबास, लेकिन, माचिस, हुतूतू, राझी

ओ माय गॉड आयुष्यात इतकी वर्षे अंगुर पाहिलाच नव्हता काय???

अंगुर नाव वाचताच कितीतरी प्रसंग नजरेसमोर आले. पोलिस स्टेशनातुन बाहेर येणार्‍या देवेन वर्माला रिक्शावाला विचारतो, साब कहा है?

अंदर है..
अंदर कर दिया????
नही वैसे अंदर नही है, अंदर है अंदर नही.

ओ माय गॉड आयुष्यात इतकी वर्षे अंगुर पाहिलाच नव्हता काय???>>> माहितीच नव्हतं ना! Happy

<<<आणि 'इम्पिरियल होटल चलो, लेकिन हम वहाँ ठहरनेवाले नहीं है' !>>>
'हॉं साब. कौन कहॉं ठहरा हुआ है हमें सब मालूम है'-- ड्रायव्हर

तो रिक्षा स्टँडवरचा एक सीन आहे. मन्सूर मियॉं तो वादग्रस्त हार घेऊन संजीव कुमारच्या घराकडे निघालेला असतो सकाळी सकाळी.
ह्या मियॉंवर सगळा वेळ एक मस्त गुलाबी म्हातारपण उतरलेलं आहे.

"मुझे मालूम है कल रात आप पर क्या गुजरी होगी. क्या कुछ नही सहना पडा होगा!" मन्सूर मियॉं.

'रात वाली बात तुम्हें कैसे मालूम?'-- संजीव कुमार (संशयाने बघत ! त्याला प्रत्येक अनोळखी इसम 'गॅंग का आदमी' भासत असतो.)

"जवानी के तजुर्बे से हुजूर.! कभी पल को सोये कभी पल को जागे.." मन्सूर मियॉं.

देवेन वर्मा हा उच्च दर्जाचा, कंबरेखालच्या विनोदाचा सहारा न घ्यावा लागलेला सभ्य विनोदवीर आहे. पण यात संजीव कुमार त्याच्याही पुढे दोन पावले निघून गेला आहे.

उत्तम गंभीर भूमिका करणारे अभिनेते प्रसंगी उत्तम विनोदी भूमिका करतात. उत्पल दत्त, ओमप्रकाश हे स्वभावाने गंभीर होते. अमरीश पुरी ने घातक मधे सुरुवातीला चांगली विनोदनिर्मिती केली आहे. संजीवकुमारने नौकर मधे मेहमूदपेक्षा उत्तम काम केले आहे.

अंगुर हा खूप आवडता चित्रपट आहे. त्यात ते प्रीतम आन मिलो गाणे कसे भारी म्हणतो तो.

मला तर देवेन आणि संजीव बरोबर बाकी लोक पण आवडतात. मौशमी, दीप्ती आणि सोनारचे काम करणारा युनुस परवेझ पण खूप आवडतो.

त्याचे ओरिजनल नाटक मागच्या महिन्यात आमच्या इथे लागले होते. ते पण पाहून आलो. मज्जा आली.

"अंगूर"चे येथे कल्ट आहे ओ संप्रति. तुमचेच कल्टात स्वागत. Happy लोक वेळी अवेळी "प्रीतम आन मिलो" करत फिरत असतात. सगळे संवाद पाठ असणारे सुद्धा माबोकर असतील. मी आहे. मन्सूर मियां एक चावट हिरवा रसिक म्हातारा आहे.‌ त्याची खरी जागा मुशायऱ्यात आहे खरेतर. बीवी तो सालमें बासी हो जाती है, ये हार जरूर साली के लिये होगा, आँखो में ड्रॉप्स डालने की क्या जरुरत है, ऐसेभी दिनभर रो रो के आंखे साफ होती होगी, भांगके पकोडे, हिरे का नेकलेस. शिवाय शेवटी सुद्धा स्वयंपाकीणीला आई समजून पाया पडायला जाणारा संजीव कुमार. संजीव कुमारचे डोळे खुप बोलके होत. यात दीप्ती नवल, देवेन वर्मा, मौशुमी चॅटर्जी, अरूणा इराणी, सगळ्यांचीच कामं उत्कृष्ट झाली आहेत. छोट्याशा साध्वीच्या रोलमधे पद्मा चव्हाण सुद्धा आहे.

अनुची आठवण आली. तिने लिहिलेलं आठवतं आहे अंगूर बद्दल.

Pages