चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्सी - झी ५. चांगला आहे. दर वीस मिनिटाला बलात्कार होतो हि पाटी सतत काही मिनिटानी स्क्रिनवर येते. बलात्कार करणाऱ्या मुलांना वाचवणारे आई वडील, बहीण, भाऊ, लाच घेऊन पुरावे नष्ट करणारे पोलीस, कोर्टात घडणारे नाट्य,सगळंच आहे. तापसीचा अशा भूमिकेत हातखंडा आहे. नसीरच्या भूमिकेचे प्रयोजन, तो नक्की काय काम करतो काहीच कळले नाही. मनोज आणि सीमा पाहवा ही जोडी आवडते.

प्राईम वर सिस्टिम पाहिला काल. मला खूप आवडला. कोर्ट रूम ड्रामा तर आहेच, पण एक वेगळा ट्विस्ट आहे तो जास्त आवडला.

बदलापूर, शेवट तर अगदीच फुस्स आहे ????
शेवट्चा ट्विस्ट तर खतर्नाक आहे. दुसरा चान्स सगल्याना मिळत नाही .. म्हणुन नवाझ वरुण ला सन्धी देतो,

द मॅन फ्रॉम दि अर्थ हा संवादासाठी उत्तम सिनेमा होता. ट्वेल्व्ह अँन्ग्री मेन पण. त्याचा हिंदी एक रुका हुआ फैसला पण चांगला होता. मानो ना मानो मात्र बघण्याची इच्छा नाही

नेफ्लि वर लेडीज फर्स्ट - साशा बरोन कोहेन ( बोराट आणि डिक्टेटर फेम) चा सिनेमा पाहिला. पुरुष प्रधान कॉर्पोरेट वर्ल्ड मधला एक गर्विष्ठ , माचो , अल्फा मेल वृत्तीचा एक एक्झेक्युटिव, जो अचानक पॅरलल जगात जाऊन पोहोचतो जिथे स्त्रीप्रधान दुनिया आहे. तिथे तो स्वतः एरव्ही इतरांना जी ट्रीटमेन्ट देत असतो ती त्याला स्वतः ला मिळाल्यावर डोळे उघडतात वगैरे. सगळे प्रसंग पॅरलल घेतलेत . पूर्वीचे त्याचे तेच वाक्य , फ्लर्टिंग किंवा तोच इन्सल्ट नंतर स्त्रीच्याकडून पुरुषाला अशा प्रकारे टेकींग आहे. ऑनेस्टली मला स्त्री म्हणूनअसे टिपिकल इन्सल्ट्स स्त्रीकडून पुरुषाला उद्देशून बघताना एक किक मिळते खरी , काही प्रसंग फनीही वाटतात पण अशा प्रकारचे सिनेमे येऊन गेलेत त्यामुळे तसे नाविन्य कमी वाटते. प्रेडिक्टेबल होते बर्‍यापैकी पण साशा कोहेन त्यात ही काहीतरी अतरंगी करेल अशी अपेक्षा होती. त्या मानाने तो सेफ खेळला आहे. एकूण लाइट टाइम पास म्हणून ठीक आहे बघायला.

बदलापूर, शेवट तर अगदीच फुस्स आहे ????
मला अपेक्षित नव्हता हा शेवट. नवाजकडे कमी वेळ असतो आणि त्याला पैसे घेऊन उरलेलं आयुष्य ऐश करायची असेल, मग तो आणि वरुण यांच्यात खूप मारामारी वगैरे होईल असं मी गृहीत धरलं होतं. बदलापूर हे नाव बदला घेणे यासाठी ठेवलं असेल असंही माझं एक गृहीतक जे चुकीचंही असू शकतं. नवाज जसा दाखवला होता तसा शेवटी वागला नाही म्हणून फुस्स. Happy

बदलापूर चा शेवट जबरदस्त होता! तो नवाज तो गुन्हा करतो, शिक्षा भोगतो. आजारी पडतो वगैरे. मरणार हेही शांतपणे स्विकारलेले असते त्याने पण वरूण स्वतः चे आयुष्य बदल्याच्या आगीत होत्याचे नव्हते करतो. त्या बदल्याच्या ध्यासातच अडकून पडतो, इतका की जेव्हा फायनली नवाज त्याला भेटतो तेव्हा तोही त्याचे ते वेड पाहून हादरतो अन म्हणतो माना मेरे हाथ से मर्डर हुआ लेकिन उस वक्त हडबडाहट मे गरम दिमाग की वजह से हुआ . तुमने तो ठंडे दिमाग से २ मर्डर किये वो भी हाथोडे से! पागल हो गये हो आप, कुछ इलाज करो अपना. हे दोघांचे उलट दिशांना झालेले ट्रान्जिशन भारी वाटले होते.

किशकिंधा कांडम चांगला सस्पेन्स आहे, शेवटी थोडासा ३ ~४ मिनिट पळवत बघितला तरी पण संपल्यावर का बघितला असं वाटलेलं मला.

भारी आहे किष्किंधा कांडम्. मला आवडला होता. याच दिग्दर्शकाचा 'इको' पण चांगला आहे पण तो अजून बघितला नाही.

एको पण किशकाम सारखाच आहे, घनदाट जंगल, रहस्यमय लोक आणि समजायला कठीण Biggrin मला कोणीतरी नंतर उलगडून सांगितला तेव्हा समजला.

मी तर एको अजुनही पुर्ण पाहिलेला नाही.
आणि तो मला समजेल असं वाटत नाही.

किष्किंधा कांडम पण कोणीतरी थोडक्यात लिहा. शेवट.

किष्किंधा कांडम स्पॉयलर अलर्ट:
तो मुलगा हरवलेला नसतोच. त्याच्या आईकडून तो चुकून मारला जातो पिस्तूल हिसकाहिसकीत. आजोबा प्रेताची विल्हेवाट लावतात. कशी, ते आईवडिलांना समजत नाही. पण हे बाहेर येऊ नये म्हणून ते मुलगा हरवल्याची कंप्लेंट करतात. विसरण्याच्या आजारामुळे आजोबा सगळं विसरतात. पण पुन्हा पुन्हा तेच सगळं शोधून काढतात आणि पुन्हा पुन्हा तेच सत्य समजल्यावर शोधाचे पुरावे जाळून टाकतात.

होमबाऊंड पाहिला.
छान आहे.
एका उत्तर प्रदेशातील लहान गावातील गरीब दोन मित्र. त्यांचे पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न. ज्यामुळे समाजात त्यांना तो आदर मिळेल. पण, संघर्ष, मैत्रीत दुरावा, कोविड, लॉकडाउन यात त्यांचे आयुष्य पिचून जाते.

इको म्हणजे जंगलात डोंगरावर ती फिलिपिनी बाई राहत असते तो का?

त्याची स्टोरी रेडिओ वर पुरूषोत्तम जोशी वाटसरू हे नभोनाट्य सादर करायचे त्यात होती.

एक बाई जंगलात राहत असते. तिथे एक वाटसरू येतो. भारी असायचं ते नाटक. त्या थीमवर किती तरी पिक्चर आलेत. एक तर इंग्रजी आलेला. अलका ला होता.

एक पुस्तक पण होतं. हिंदी की मराठी कि इंग्रजी आठवत नाही. रेल्वे स्टेशन ला घेतलं होतं.

वावेने जे लिहिले ते बरोबर आहे पण चित्रपट तेवढाच नाही. त्याला खुप लेयर्स आहेत.

आजोबांना विस्मरणाचा आजार जडुन काही महिने/वर्षे झालीत. पण ते अजुन पुर्ण ग्रस्त झालेले नाहीत. आपण विसरतोय हे त्यांना माहित आहे आणि ते जगापासुन लपवायचा त्याण्चा जोरदार प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी ते दोन गोष्टी करताहेत. एक म्हणजे आजुबाजुच्या प्रत्येकाशी ते तुसड्यासारखे वागतात. म्हणजे कोणी जवळ येणार नाही आणि त्यांचा आजार कोणाला कळणार नाही. आणि दुसरी गोष्ट ही की आजुबाजुच्या प्रत्येकावर त्यांनी फाईल बनवुन ठेवलीय. म्हणजे कोणी मित्र म्हणुन घरात भेटायला आला तर त्याचे नाव, आवड, मुलाण्ची नावे वगैरे सगळे बारिक चिठ्ठ्यात लिहुन ठेवायचे आणि तो मित्र परत आला तर त्या चिठ्ठ्यांमधले रेफरन्सेस गुपचुप बघत त्याच्याशी संभाषण करायचे. मित्र कोणी नाहीतच, एकच नायर घरी येतो.

त्यांची पहिली सुन कर्करोगाच्या शेवटच्या स्टेजला आहे आणि तिच्या १०-१२ वर्षांच्या मुलाच्या हातात आजोबाण्चे पिस्तुल पाहुन वर वावेने लिहिलेला प्रसंग घडतो. ती दु:खाने तिच्या औषधांचा ओव्हरडोस घेते. आजोबांचा मुलगा घरी आल्यावर हे बघतो. मुलगा मृत व बायको बेशुद्ध बघुन तिला तरी वाचवुया म्हणुन तो तिला घेऊन दाराला बाहेरुन कडी लाऊन हॉस्पिटलात जातो. तिथे तिच्यावर उपचार सुरु होतात व त्याला लगेच घरी जाता येत नाही. तो दिवशी घरी येतो तेव्हा खोलीतुन मृत्देह गडप झालेला असतो.

इथे डिमेन्शिया ग्रस्त लोक सुरवातीला काय त्रास सहन करत असतील याची आपल्याला झलक पाहायला मिळते. आजोबांना नातवाचा मृतदेह दिसतो तेव्हा पिस्तुलही दिसले असणार. नातु आपल्या पिस्तुलाने मेला हे कळते पण कसा मेला ते कळत नाही.
नातु बेपत्ता आहे हे लोक बोलताहेत म्हणुन त्यांना सतत लक्षात राहतेय. आणि यात काहितरी मिसिंग आहे ही भावना त्यांना वाटतेही. म्हणुन ते प्रत्येक गोष्ट लिहित लिहित तपास करतात आणि प्रत्येक वेळेला एकाच निष्कर्षाला येतात की नातवाचे पिस्तुलाने काहीतरी झाले आणि त्याला जबाबदार घरातले कोणीतरी आहे, तेही असु शकतील. हा निष्कर्ष मिळाला की ते अस्वस्थ होऊन सगळ्या नोट्स जाळुन टाकतात.

काही दिवसानी त्यांना परत नातवाचे काय झाले हा प्रश्न छळायला लागतो. मग ते परत शोध सुरु करतात, त्याच लोकांना जाऊन तेच तेच प्रश्न परत परत विचारतात आणि शेवटी निष्कर्षाला आले की नोट्स जाळुन परत ब्लँक होतात. मग परत सुरवात.

बिचारा मुलगा दुहेरी ताणाखाली. बाबाचा आजार त्याला कळलाय. बाबाला तो त्यालाही कळू द्यायचा नाहीय हेही त्याला माहित आहे. तोही बाबाच्या नाटकात पात्र बनतो आणि काहीच माहित नाही असे दाखवतो. नायर अंकल म्हणुन जो मित्र येतोय तो खरेतर डॉक्टर आहे. नायर नावाचा बाबाचा कोणीही मित्र नसतो. पण बाबा हे म्हणत नाही कारण त्याला वाटतेय आपण नायरला विसरलो असणार. Happy तर हा नायर वेळोवेळी येऊन आजार किती बळावलाय हे चेक करतोय आणि तो बहुतेक तसे सर्टोफिकेटही देतो.

मुलगा कसा गेला हे बायको त्याला सांगते आणि बाबा विल्हेवाट लावतो हेही त्याला कळते. पण बाबा तुरुंगात जाऊ नये म्हणुन तो मुलगा घरातुन गेल्याची खोटी तक्रार पोलिसात करतो.

आता पोलिसांना कुठेही त्या वयाचा मुलगा सापडला/मृतदेह सापडला तरी ह्याला ओळखायला बोलावतात आणि याला जावे लागते.

मुलगा सत्य कधी सांगणार? बाबाला पुर्ण विस्मरण झाल्यावर बहुतेक सांगेल. तेव्हा कदाचित त्याला अटक होणार नही. तोवर तो गप्प.

पोलिसालाही कळलेय म्हातार्‍याला डिमेन्शिया आहे. पण तो गप्प कारण त्याच्याकडुन म्हातार्‍याने पिस्तुलाचे लायसेन्स रिन्यु करुन घेतलेय. आता पोलिस बोलला तर अशा व्यक्तीला कसे रिन्युअल दिले असा त्याच्यावर ठपका येईल ही भिती वाटतेय.

अशा तर्हेने सगळे गप्प आहेत आणि आपापला रोल गपचुप निभावताहेत.

हल्ली डिमेंशिया वाढत चाललाय. डिमेंशियाग्रस्त माणुस घरात असल्यावर घराला काय त्रास सहन करावा लागतो हे आपण बघतो पण डिमेन्शियाग्रस्तालाही काय त्रास सहन करावा लागत असेल हे आपल्याला कळत नाही. हा चित्रपट पाहुन मला असे वाटले. मला खुप विस्मरण होते त्यामुळे मला आजोबाशी रिलेट होता आले व चित्रपट आवडला.

एको पण सुंदर आहे. कि का मध्ये शेवटी मुलगा बायकोला सगळे सांगतो तेव्हा आपल्याला कळते. पण एकोमध्ये आपल्याला फक्त अंदाज करावा लागतो. कोणाला पाहायचा नसेल पण कथा हवी असेल तर सांगा, मला लिहायला आवडेल. Happy

परवा "तिघी" पाहून काल दुपारी "चमेली की शादी" पाहिला. माझा फारच ऑटाफे आहे चमेली की शादी. अमजद खान, अनिल कपूर, पंकज कपूर, भारती आचरेकर, अन्नू कपुर आणि अमृता सिंग.

मी कितीदाही कुठूनही कुठेही बघू शकते चमेली की शादी. अमृता सिंग दे दणादण बुकलून काढत असते राग आला की, जे वाटले ते बोलून दाखवत असते. आठवीत चार वेळा नापास झालेली असते. यात दंगल सिनेमाचा पाया घातला होता तिने- उतर आयी आखाडेमें तेरे सपनोकी रानी. हे गाणं बघा. कल्लूमल कोयलेवाला - पंकज कपूरने बायको आणि पोरीच्या गोंधळात सुधरेना वाली ॲक्टिंग जबरदस्त केली आहे. पोरगी पळून गेल्यावर सुद्धा टोपी शोधत असतो. अजूनही संवाद चुरचुरीत वाटतात.

धमाल चित्रपट आहे.

इको आणि किष्किंधा कांडम नोट करून पाहायचे राहून गेले होते. मला वाटतं ऋ ची पोस्ट होती पहिली. इको थोडा सुरूही केला होता पण डबिंगमुळे कंटाळा आला होता.

होम बाऊंड - येथे फा नेही रेको दिला होता, तेव्हा पाहिला होता. आवडला होता, लिहिले होते त्यावर.

दक्षिणा, "सिस्टीम" काल सुरू केला आहे.

मी पण बघावा म्हणतो. इकडे जीओ हॉटस्टारला आहे.
वावे आणि साधना यांच्या पोस्ट पाहिल्या पण वाचल्या नाहीत अद्याप स्पॉईल होऊ नये म्हणुन. बघितला की वाचेन.

"चमेली की शादी" चाळीस वर्षांपूर्वीचा आहे. पण त्याला पुन्हा पुन्हा पाहिल्याने एक नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू आली असेल. जुन्या गोलमाल टाईप. तसेच समजून पाहा. आताचा काळ, काम, वेग त्याला लावू नका. Happy पण सिनेमात अशी बोल्ड आणि बिनधास्त नायिका तरीही कुठेतरी निरागस, बावळट वाटणारी क्वचित पाहायला मिळते. सगळीच कॅरेक्टर्स एकेक "नग" आहेत.

चमेली की शादी माझाही आवडता आहे ..स्टार कास्ट धमाल आहे..अनिल कपुर आपली नसलेली बॉडी डबल असल्यासारखा चालतो ते फार फनी आहे...अनिल-अम्रुता दोन्घाच्या पोरात यातल चमचाभरही अ‍ॅक्तिन्ग स्किल आल नाही.

च कि शा खरेच अफलातुन आहे. मी पहिल्यादा पाहिला तेव्हा पंकज कपुरला ओळखले नाही. हा कोण तेली आणलाय पकडुन असे वाटले होते.

Pages