चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मा बहेन आवडला. मस्त आहे. माधुरी आवडतेच, इथे जास्त आवडली, कारण काहीतरी वेगळे काम वाट्याला आले आहे आणि तिने चांगले केले आहे, नेने बाई ६० च्या झाल्या.. आदर्श कॉलनी मधली तिची एन्ट्री एकदम भारी घेतली आहे. बरीच रूपके ( including creation of Adam) वापरली आहेत पूर्ण सिनेमात. ' चोली ' चा पण संदर्भ आहे. एकदम quirky आहे चित्रपट. शेवट अजून छान करता आला असता. पण तरीही एकंदरीत आवडलाच.

लंपन +७८६

MPA @ निरमाचा संदर्भ.. हो की
रेखा, जया, सुशमा एकत्रित असल्याने लक्षात आलेले माझ्या... हेमा लक्षात नव्हती आली. पण म्हणजे हे ठरवून होते तर.

तृप्ती दिमरीने अक्सेंट भारी उचललेला. पण म्हणून हे काही माधुरीसोबत तुलना करून हलके दाखवायचे कारण झाले नाही.
माधुरीने एकाच रोल मध्ये जे एकाच व्यक्तीचे वेगवेगळे कॅरेक्टर दाखवले ते कमाल होते. तो मिक्सर सोबत उद्रेक होतो तेव्हाचा सीन सुद्धा भारी केला तिने.

कोणाला निरमाचा संदर्भ नाही लागला का?>>>>>>>>> लगेचच लागला. जया सुसमा ऐकल्यावर पण तो आता फारच क्लिशे झालाय सगळीकडे वापरून!

परेश रावल आणि तो टकलू इन्स्पेक्टर बळंच आहेत.

अवांतरः
काल इन्स्टावर पाहिलं. माधुरी जेव्हा जयाला फोन करते पहिल्यांदा आणि सुसमा ला फोनवर घे म्हणत असते, तेव्हा ती सुसमा झोपलेली असते तिच्याकडे लांबून कॅमेरा जात असताना एक सीन आहे, खाली एक कोणीतरी झोपलेलं आहे आणि त्या शेजारी गुडघ्यापर्यंत पांढरा फ्रॉक आणि पांढरे मोजे घालून कोणीतरी उभं आहे Proud याचा काय संदर्भ माहित नाही. एरवी लक्षातही येणार नाही.

माधुरीची जिथे ओवर ॲक्टिंग वाटते तो तो भाग मुद्दाम तसा घेतलाय असे वाटले >> मला ओव्हर अ‍ॅक्टींगचाही प्रॉब्लेम नाहि वाटला. ते जे काही विचित्र हावभाव केले आहेत ते माधुरीने केले आहेत ह्याचे आश्चर्य वाटले.

ते जे काही विचित्र हावभाव केले आहेत ते माधुरीने केले आहेत ह्याचे आश्चर्य वाटले.>>> पण तिच तर स्टोरी आहे ना? स्लिवलेस घालणारी , सुन्दर दिसणारी, मेकप करणारी...नवरा गेल्यावरही निटनेटकी राहुन फुलाफुलाच्या साड्या नेसणार्‍या स्त्रीला समाज कसा जज करतो किवा तिच्या मागे काय काय कन्ड्या पिकवल्या जातात तिने केलेले हावभाव हे समाजाच स्वप्नरन्जन आहे.

त्या शेजारी गुडघ्यापर्यंत पांढरा फ्रॉक आणि पांढरे मोजे घालून कोणीतरी उभं आहे याचा काय संदर्भ माहित नाही.>>>>

संदर्भ माहित नाही हे मजेत लिहिलेय का??

निरमा गर्ल ह्याच कपड्यात असे. अजुनही पाकिटावर तोच फोटो असेलही.

मा बेहेन बघायला हवा असे वाटायला लागलेय Happy

खूषखबर !
देऊळबंद आता हिंदीत येणार. हिंदीत मोहन जोशी किंवा बम्मन इराणी स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसू शकतात.
देऊळबंद २ मुळे हिंदी पिक्चरला थेटर मिळेना.

प्राजक्ता समाजाला तिचे वागणे असे वाटते वगैरे ह्याबद्दल नाही तर 'ते वागणे ज्या तर्‍हेने माधिरी दिक्षित ह्या अभिनेत्रीने दाखवले आहे' त्याबद्दल म्हणत होतो. त्या अदा नखरेल, मादक, उच्छृंगल वगैरे न वागता हुकलेल्या ( वेडगळ ?) वाटत होत्या

<<<< अदा नखरेल, मादक, उच्छृंगल वगैरे न वागता हुकलेल्या ( वेडगळ ?) वाटत होत्या
>>>>>

किंबहुना मला तर त्याचेच फार कौतुक वाटले. कारण माझ्यामते मुद्दाम ते तसे जरा नाटकी caricatcher पद्धतीने दाखवले. कारण ती तशी नव्हती हे पुढे जेव्हा उघड होत गेले तेव्हा त्या आधीच्या सर्व अदांचा संदर्भ लागत मजा आली.

आता मी कधीतरी पुन्हा बघणार हा चित्रपट..
बरेच काही मिस केले असणार जे गवसत जाईल असे वाटते Happy

>>. कारण माझ्यामते मुद्दाम ते तसे जरा नाटकी caricatcher पद्धतीने दाखवले. << +१
करेक्ट! पटकथेला सटिरिकल ट्रिटमेंट दिलेली असल्याने इट मे साउंड लाउड, पण माधुरीने कमाल केली आहे. डिमरीचा स्क्रीन प्रेझेंस जास्त आहे तरिहि माझ्या मते ती माधुरीला ओवरशॅडो करु शकलेली नाहि...

सटायर नक्की कसले होते ? बाह्य समाजाचे जो एका ओपन विचारांच्या स्त्रीला बाहेरख्याली, उच्छृंगल , अव्हेलेबल , इतरांना आपल्या नादी लावणारी अशा नजरेने बघतो ह्या प्रकाराचे. caricatcher दाखवल्याने ते साध्य होते असे मला वाटले नाही. caricatcher हाही शब्द इथे चपखल बसत नाही असे वाटले. असो.

शेवटी एकदाचा Obsession पाहिला. गर्दी कमीच होत नव्हती. सिनेमा super creepy आहे. खूपच आवडला. भितीदायक नाही पण सिनेमाचा darkness हळुहळु वाढत जातो. शेवटी न बोलता आपण बाहेर पडतो. याला नॉमिनेशन मिळतील व काही बक्षिसे पण मिळतील का पाहु आता पुढल्या वर्षी.

मी पण काल बघितला. आमच्या इथे मग गुरुवारी रात्रीच्या ९:३० च्या शोला थिएटर बर्‍यापैकी भरलेलं होतं.
आवडला.
न बोलता बाहेर पडतो +१. क्रिपी आहे, जंप स्केअर नाहीत.

********************************* म्हटलं तर स्पॉयलर वाटू शकेल ****************
शेवट मला शेक्स्पिरिअन ट्रॅजेडीने होतोय वाटलेले. एकदम रोमिओ ज्युलिएट सिच्वेशन तयार झालेली. तसा शेवट नाही झाला पण तरीही शेवटी तेच होणार आहे. हे जे काय झालेलं आहे त्यातून स्वार्थी रोमिओ हुतात्माच होतोय वाटत होतं, ते न होता, त्यात ही तो स्वार्थ बघू लागतोच, तो सुटतो आणि बाकी बघायला ज्युलीएट अडकते.
अमानवीय सायको डार्क रोमान्स थ्रिलर असा काही आहे. डोकं भंजाळल्याने आवडला.

ऑब्सेशन मी बघायची शक्यता नाही पण मुलाने पाहिला गेल्या आठवड्यात थिएटरला. तो ही रात्री दहाचा शो. तो पण थोडा स्केअरी आहे म्हणाला. सकाळी उठल्यावर तू रात्री माझ्या दारावर थापा मारत होतीस का असं विचारलं. पिक्चरनंतर भासही तसाच झाला.

त्यात ही तो स्वार्थ बघू लागतोच, >> हे नक्की कोणत्या सीनमधे वाटलं ते कळलं नाही पण लोकांना पाहुदे मग जाणुन घेईन. बॅकरुम्स पाहिला का?

सायो , ‘ दारावर थापा मारत होतीस’, >> Happy

माधुरीला रडताना पाहूनच तो सिनेमा बंद केला. आधीच वयोमानानुसार तिचा आकर्षकपणा कमी झालाय त्यात रडताना विचित्र दिसते ती.
.
तो काय स्ट्रेन्ज ब्युटिफुल क्रिचर्स सिनेमा काय तो सिनेमा तोही मेंगळट वाटुन बंद केला.

*******************************************वाचू नका**********************************************
*******************************************वाचू नका**********************************************
*******************************************वाचू नका**********************************************
*********************************************
फक्त सुनिधी साठी.... बाकी कोणी वाचू नका.
*********************************************
तो वर मागताना, 'निकी माझ्यावर जगातल्या कशाही पेक्षा जास्त प्रेम करेल' असा वर मागतो. “I wish Nikki Freeman loved me more than anyone else in the f*ng world.” इथे निकी त्याच्यावर इतरांपेक्षा जास्त प्रेम करेल असं त्याला हवंय, का जगात इतकं प्रेम अजुन कोणी कोणावर केलेलं नाही इतकं प्रेम करावं असं त्याला हवंय ते क्लिअर नाही. पण असा वर मागितल्याने निकी ऑबसेसिव्ह बनते, तुम्हाला एका व्यक्तीवर जगातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करायचं असेल तर तुम्हाला वेडाचार करण्याशिवाय गत्यंतरच नसतं. ह्या विश मध्ये निकीला कुठे फ्री विल नाहीच आहे. तिला काय हवंय, तिला आकर्षण, प्रेम वाटतं का? हु केअर्स. तिने माझ्यावर सर्वाधिक प्रेम करावं. का करावं? तर माझी इच्छा.
आता त्याला ते तसं हवं होतं का? तो तितका एक्स्ट्रीम होता का? ह्या प्रश्नाला काहीच अर्थ नाही. त्याने काय इच्छा व्यक्त केली या व्यतिरिक्त कशालाच काही अर्थ नाही. त्याला तिने नॉर्मल माणसासारखे प्रेम करायला हवे होते, पण तो काय बोलला?? Happy बाकी 'नॉर्मल माणसासारखे प्रेम माझ्यावर कर' हे तरी तो कोण सांगणारा? तिला काही निर्णयस्वातंत्र्यच राहिलं नाही ना यात!? विच इज जस्ट नॉट राईट!
वर मिळाला की शब्द आणि शब्द जपून मोजुन मापून बोलायचे ही किती वेळा सांगायचं??? Happy

बाकी नाही लिहित.. तू शेवटी स्वार्थी का वाटला विचारलं आहेस ते लिहितो.
निकीला त्यातुन बाहेर काढायचा एकमेव मार्ग बेअरचा मृत्यू समजल्यावर आणि तो एक्झिक्युट करायची वेळ आल्यावर, तो ओव्हरडोस करतो. इथे आपलीच चूक तो सुधारतो आहे वगैरे काही मागमूस नाहीच आहे, ओव्हरडोस केल्या केल्या त्याला ते ही करू नये वाटतं आणि तो गोळ्या ओकून बाहेर काढू बघतो. ते ही जेव्हा जमत नाही, तेव्हा तो किस करुन मरतो.
बरं हा मेल्यावरही मित्राला गोळी लागून तो समोर मेलेला, मैत्रिणीचे प्रेत घरात, लव्हर ओव्हरडोसने मेलेला, आणि मित्राच्या घरात १ मिलियन / का बिलियन? डॉलरचा पाऊस. यातुन निकी सुटणे शक्य नाही. ती तरी आता काय करणार आहे!!?? म्हणूनच शेवटी आवंढा आला आणि छाती भरुन आली!
*******************************************वाचू नका**********************************************

एचबीओ वर एक "एलेव्हेशन" नावाचा पिक्चर पाहिला. मॉन्स्टर चित्रपट आहे पण कल्पना थोडी वेगळी आहे. एलियन्स वाटणारे पण डायनॉसोर सारखे दिसणारे अनेक प्राणी एका दिवशी जमिनीतून अचानक वर येऊन माणसांना मारायला सुरूवात करतात. बाकी प्राण्यांना काही करत नाहीत. पण त्यांची मजल फक्त ८००० फुटांपर्यंतच असते. त्याच्या वर असलेल्यांना ते काही करू शकत नाहीत. त्यांना बंदूक, बॉम्ब वगैरेने काही होत नाही.

त्यांना मारायचे कसे याचा शोध घेणारी एक शास्त्रज्ञ आणि स्वतःच्या मुलाकरता लागणारा ऑक्सीजन आणायला ८००० फुटांखाली जायची गरज पडलेला नायक. त्यांना खाली जावेच लागते. शेवटी जो उलगडा होतो त्याने ८००० फूट का हे कळत नाही आणि हे सगळे का झाले ते ही. यातला ड्रामा बर्‍यापैकी बघणेबल आहे पण हा जॉनरा आवडत असेल तरच.

वाचु नका ===== ऑब्सेशन =====
अमितव, माझ्या मते , शेवटी ती पण “काडी मोडते “ म्हणुन तो गोळ्या ओकतो व पापी घेतो पण गोळ्यांचा परिणाम झालेला असतो म्हणुन मरतो. म्हणुन मला त्या सीनमधे स्वार्थीपणा कळला नव्हता. सुरुवातीचे मान्य.

हे वाचु शकता ====== Proud
“एलेवेशन” मलाही आवडला होता.

नवा भूतबंगला नेटफ्लिक्सवर आलाय. कशी माझी हिंमत झाली कायकी इतका बंडल सिनेमा १५ मिनिटे पण पहायची. अक्षयकुमारची बहीण ती छोटुकली मिथिला पालकर, त्याचा वडील त्याच्याहुन १५-२० वर्षाने लहान, तुकतुकीत व फक्त डोक्यावरचे आणि दाढीचे केस जरा पांढरे केलेला रितेश दे. सारखा दिसणारा कोणीतरी. नंतर असरानी आणि परेश रावल येऊन कायतरी करायला लागतात व आपण हसायचं म्हणे.

टेलर पार्करची डो़युमेंटरी पाहुन अंगावर काटा आला. किती भयानक बाई आहे ही.

भूतबंगला अतिशय टुकार आहे. कपड्यांच्या घड्या करत पाहिला, असेही काही अपेक्षा नव्हती. पण नसलेल्या अपेक्षेपेक्षा खालच्या पातळीवर गेला आहे. अभिनय, कथा, संवाद, दिग्दर्शन व एडिटिंग सगळेच बोंबलले आहे. अक्षरशः परेश रावल, मनोज जोशी, अक्षय कुमार, असरानी यांचा अभिनय सुद्धा आवडला नाही. भुतं तर मुरमुऱ्याच्या चिवड्यासारखी सतत दिसतात म्हणून मेन भूत बॅटमॅन सारखं करते. अजिबात बघू नका. काही जण बोलताना डबिंग हुकलेले किंवा साऊथचे ठिगळ चिकटवल्यासारखे आहे. कुछ तो गडबड है! गाणीही साऊथला हिंदी डब्यात बसवल्या सारखी. तबूला अजिबात नाचता येत नाही. रंग दे रंग दे आठवा. तरीही येथे तिचं नृत्य आहे. तरुणपणी अंग वाकलं नाही, आता काय वाकणारे! मधेच सिनेमा पंचवीस तीस वर्षे मागे जातो आणि सगळे तरूण दिसतात पण वाटत नाहीत. विचित्र वाटत राहतात. मिथिला पालकर अक्षयची मुलगी वाटते पण बहीण आहे. बरेचसे जोक्स तर अश्लिल होते. फारच लाऊड सिनेमा आहे, सगळे पकडापकडी सारखा फिजिकल विनोद का काय करत एकमेकामागे पळत सुटतात. अक्षय आता म्हातारा दिसतोय तरीही उड्या मारत होता. अजून एक विशेष नोंद म्हणजे या आधी विनोदी सिनेमात मुंडकं उडवणं, हात छाटणं असे सीन नसायचे ते ह्यात आहेत. सिनेमाचा रक्तपाताचा व हिंसाचाराचा बार उंचावला आहे.

संवाद महाबंडल, विनोद पन्नास वर्षे जुने. दोन सीन एकमेकांना जोडतात ते एडिटिंग सुद्धा हुकलेले होते. प्रियदर्शनच्या सिनेमा कडून ही अपेक्षा नव्हती. नीरज वोरा नसल्याने की काय! मला लक्षात आले होते की बंडल आहे तरीही पूर्ण पाहिला. किती बंडल आहे हे जाणून घेण्यासाठी. असरानीचा हा शेवटचा चित्रपट असावा, पाहून बरं आणि वाईट दोन्ही वाटलं.

सिनेमे बघावेसे वाटत नाहीत. एका सिने समीक्षकाने अनुभव शेअर केला आहे कि हल्ली एखादा सिनेमा पंधरा वीस मिनिटं बघितल्यानंतर केव्हां तरी लक्षात येतं कि हा आधी पाहिला आहे. म्हणजे सिनेमे बघितल्या बघितल्या तो विस्मरणात जातो. शोले, मदर इंडिया, दीवार, मुघल ए आजम किंवा काही पडलेले सिनेमे सुद्धा एक दोन फ्रेम्स पाहिल्या तरी लगेच आठवतात.

आता फार अपेक्षा ठेवूच नयेत. भूतबंगला बघताना नाईलाज होता. म्हणजे घरात सिनेमा चालू होता आणि तिथेच बसावं लागलं म्हणून बघितला. खटकणारी गोष्ट म्हणजे सगळी दृश्यं चकचकीत तरी कुठेच खरी वाटत नाहीत. सावल्या पडत नाहीत. सगळीकडे एलईडी लावल्यासारखा झगझगीत प्रकाश, जणू काही टिव्ही मालिकाच चालू आहे. बाहेरची सगळी दृश्यं सेटस मधे चित्रित केल्यासारखी वाटली. जयपूरचा चोमा कि चुमा पॅलेस आणि त्याच्या बाजूलाच जंगल दाखवलंय. पण ते खरं वाटावं ही मेहनत नाही. हॉरर ही नाही आणि कॉमेडीही नाही. तरीही आताच्या इतर सिनेमांसारखा अजिबातच करमणूक करत नाही असा नाही. किमान याला एक काल्पनिक मनोरंजक कथा आहे, ती पुढे कशी जाते हे बघण्याइतकी उत्सुकता कायम ठेवतो. परेश रावल, असरानी हे खूप वय झालेले कलाकार आहेत. वय झालेले नायक असतात.

भूत बंगलाबाबत वरील सर्व पोस्टशी सहमत.
तरीही त्यात काहीतरी आहे की तो अर्धवट सोडता येत नाही पूर्ण बघितलाच जातो.
भूलभुलैया दोन तीन सारखेच आहे हे.. त्याबाबत सुद्धा असेच होते.
त्यातल्या त्यात भूलभुलैया 2-3 मध्ये कार्तिक आर्यन होता. यात जुना झालेला अक्षय कुमार होता. त्यामुळे विनोद सुद्धा आउट dated आले

आमच्याकडे मुलांना हा कॉमेडी भुताचा फार प्रकार आवडत असल्याने. भूत बंगला सुद्धा ओटीटीवर आला आहे तर बघितला जाणार..

Pages