Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उचक्या आल्या नाहीत. कुणीच
उचक्या आल्या नाहीत. कुणीच आठवण काढत नाही हे समजलं आणि निश्चिंत होऊन तीन पिक्चर बघितले.
१. भावनाओंको समझो.
२. विग बॉस
३. गाली गलोज . हा सुरू केला आहे.
तिन्ही सुंदर आहेत. गोलमाल फेल आहे यापुढे. अजून राहिलेले.
४. कॉफी विथ अलोन
५. मनी ब्याक ग्यारन्टी
६. लॉकडाऊन टू अनलॉक
प्रोजेक्ट हेल मेरी पहिला.
प्रोजेक्ट हेल मेरी पहिला. अमेझ अमेझ अमेझ.
मी अजून कादंबरी वाचली नाही. पण मला खात्री आहे की ती एवढीच भारी असेल.
आमच्या इथली imax थेटरे एवढी लहान आहेत की तिथे पाहण्याचा काही विशेष अनुभव वाटला नाही. घरच्या थेटरात तेवढेच मस्त वाटले असते.
परंतु एकंदरीत
संगीत, कथा, अभिनय सर्वच बाबतीत सरस आहे.
This one is for Project Hail
This one is for Project Hail Mary ( in reference with La La land)

कर्तव्य अजिबात बघू नका. >>
कर्तव्य अजिबात बघू नका. >> बरं
त्या लल्लनटॉपमधे आमिर खानची तब्बल ५ तास मुलाखत होती. पण तो काव्यात्मक ओळख करुन देतो, एकही शब्द न अडखळता, न वाचता हे भारी वाटतं
Remarkably bright creatures.
Remarkably bright creatures.
खूपच गोड सिनेमा आहे. एकदम साधा, इमोशनल ड्रामा. खूप आवडला. खूप साधं articulate करणं, गुंतागुंतीची गोष्ट मांडण्यापेक्षा आव्हानात्मक असतं. ते अगदी सहज जमले आहे. सॅली फिल्डचा अभिनय आणि देहबोली फारच खरी वाटते. कुठेतरी एकाकी वाटणारी लोक माणसं टाळून दुसरीकडे गारवा शोधत असतात. तो तिला हे अक्वेरियम साफसफाई करताना तिथल्या जलचरांशी बोलत मिळत असतो. त्यातले एक ऑक्टोपस ज्याचे वय झालेले आहे व ते आता दुर्बळ पण हुशार होत आहे, त्याच्या तोंडून काल्पनिक नॅरेशन व निरीक्षण मांडले जाते. डेव्हिड ॲटनबरो सारखा आवाज वाटला, एकदम सूदिंग. येथे माणसांना पर्सनॅलिटी नसते पण या ऑक्टोपसला आहे. ते आपले टेंटेकल्स आणि सक्शन कप्सने कुठूनही कुठेही जात असते आणि विचार मांडत असते. कथा एकदम गोड आणि प्रेडिक्टेबल आहे तरीही पाहावी वाटते. आवडला.
How many tentacles does an
How many tentacles does an octopus have? None.
Octopuses are named for their eight limbs, known generally as arms. Their cousins, the squid and cuttlefish, have eight arms plus two tentacles.
आपल्या पश्चात Octopuses will inherit the earth!
कर्तव्य फार डार्क वाटला. तो
कर्तव्य फार डार्क वाटला. तो बाबा तर डिट्टो दीपक चोप्रा सारखा दिसतो मात्र नाव श्री म्हणजे 'श्री श्री रविशंकर' टाईप.
मी तर टेंटेकल्स ऐकलं आहे,
मी तर टेंटेकल्स ऐकलं आहे, असेल. ते अंग चोरुन घेतात आणि बारक्या जागेतूनही सरपटतात. भूजलचर, amphibians समजायचे पण invertebrates आहेत.
होऊ दे inherit earth, माणसांपेक्षा तर प्राणी बरेच आहेत. त्यातील ऑक्टोपसचाच एक संवाद - माणसांकडे बोलण्यासाठी अब्जावधी शब्द असतील पण भावना व्यक्त करताना मात्र ते आटून जातात, कमालच आहे. आपल्या desire इतरांना बोलून का नाही दाखवत मानव!
>>>>>>आपल्या desire इतरांना
>>>>>>आपल्या desire इतरांना बोलून का नाही दाखवत मानव! Happy
बोलण्याआधी भावना, निराकार आणि चितीयुक्त असतात. सगुण व निर्गुणाच्या सीमारेषेवर कुठेतरी गणेशलोकात.
एकदा बोलल्या गेल्या की फुस्स आणि मर्यादित होउन जातात. ऐकणार्याच्या इन्टरप्रिटेशनशी मिळते जुळते घेत डागळतात.
तुम्ही नार्फी सिनेमा बघिअला
तुम्ही नार्फी सिनेमा बघिअला असेल.
एक शब्दही न बोलता त्यांचे त्याना जे समजायचे तरे समजते.
माणसांपेक्षा कोणी ही बरे नाही
माणसांपेक्षा कोणी ही बरे नाही. आपल्या पश्चात जळो की पृथ्वी, हु केअर्स! हम है तो खुदा भी है!
टेंटॅकल्स आणि आर्म्स मध्ये काय फरक वाचत होतो, एकावर सक्शन कप्स फक्त एजेसला असतात आणि दुसर्याला पूर्ण लांबीत असतात सोडून फार काही उपयोगीतेत फरक दिसला नाही.
तर ते असो..
आजचा डॅड जोक!
How many tickles does it take to make an octopus laugh?
Ten tickles
And, the octopus laughs because… THEY DON’T HAVE ANY TENTACLES! They have arms.
अमितव!
अमितव!
मंगेश पाडगावकरांचे एक गीत आहे,
>>>>Ten tickles Proud
>>>>Ten tickles Proud
खतरनाक.
आमच्या मीटींगमध्ये एकाने टुम काढली आहे, सुरुवातीला , सगळे जमायच्या सुमारास, एकेक जण येतो तेव्हा डॅडी जोक्स सांगायची. आज सांगेन हा.
काल मी सांगीतलेला - माय पेन कॅन राईट अंडरवॉटर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
इट कॅन राईट अदर वर्डस टु
तुमचं बरोबर आहे केकू, वाचून
तुमचं बरोबर आहे केकू, वाचून आले.
बर्फी पाहिला आहे की. पण सगळीकडेच मुकं किंवा बोलकं राहून चालत नाही. समोरचा नग बघून ठरवावं लागतं.
शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले!
मागे मी एडक्याची माहिती घेतली होती, आज ऑक्टोपसची. खरेच highly intelligent invertebrates आहेत का नाही काय माहीत. सहसा मॅमल्स हुशार असतात. असो.
आजचा डॅड जोक!>>>>
पण ऑक्टोपस मॅमल आहे का? व्हेल
पण ऑक्टोपस मॅमल आहे का? व्हेल मॅमल आहे. ऑक्टोपस मॅमल नसूनही भयंकर हुषार व मानवी भाव भावना असलेला प्राणी आहे.
वरच्या पोस्ट्समधली ऑक्टोपसची
वरच्या पोस्ट्समधली ऑक्टोपसची निरीक्षणे वाचून दिल धडकने दो मधला कुत्रा आठवला
अनुभव मागे दु द वर पाहिलेला.
अनुभव मागे दु द वर पाहिलेला. त्याआधी आलेला अनुराधा व हा अनुभव दोघांची कथा सारखीच आहे. अजुन एखाद दुसरा ह्याच कथेवरचा चित्रपट पाहिल्याचे आठवतेय.
बायकोसाठी दुसरा पर्याय उभा ठाकतोय हे लक्षात येताच आपले वागणे जरासे बदलणारे नवरे आणि त्यामुळे त्या दुसर्या पर्यायाला धुडकाऊन लावणार्या बायका. कुत्र्याची शेपटी नळीत घातल्यावर थोडा वेळ सरळ दिसते, नळी काढली की वाकडी ती वाकडीच हे बायका विसरतात
साधना
साधना
वरच्या पोस्ट्समधली ऑक्टोपसची
वरच्या पोस्ट्समधली ऑक्टोपसची निरीक्षणे वाचून दिल धडकने दो मधला कुत्रा आठवला >> मला penguins of madagaskar आठवला...त्यातल्या ऑक्टोपसने थेट बॉलीवुडी व्हिलन साकारलाय..लल्लन टॉप गाय शुड वॉच हिम!!
आज दिल तेरा दिवाना पाहिला. हा
आज दिल तेरा दिवाना पाहिला. हा चकचकीत करून आज पुन्हा लावला तर तुफान चालेल. मेहमूद पोट धरून हसवतो.
आजच्या पिढीला हसायला येईल का माहिती नाही.
त्या वेळच्या पिक्चर मधे हिरॉइन शेवटी जीव द्यायला निघायची. ती जंगलातून जायची. पुढे कडा असायचा. कड्याची चढण असायची. तिच्या मागे शोधाधोध करणारे हाका मारत येत असायचे. कधी हिरॉइएचे पाय दाखवायचे, मग मागून येणार्यांचे दिसायचे,
एकदा रीळात प्रॉब्लेम झाला आणि क्रम चुकला. त्यामुळं खूप लोक आरडा ओरडा करत पळताहेत आणि हिरॉईन त्यांच्या मागे लागलीय असं दिसत होतं. जंगल, अंधार, डोंगरकडा यामुळं बहुतेक हिरॉईन मेली असेल आणि भूत होऊन यांच्या मागे लागली असेल असं वाटत होतं.
शोध घेणारे हाका मारायचे त्या हाका घुमायच्या. जंगलात इको कसा येईल हे तेव्हां डोक्यात यायचं नाही. हिरॉईन जीव द्यायला अशा अडचणीच्या जागा कधी शोधत असेल असं पण डोक्यात यायचं नाही. हा प्रश्न नातवाने विचारल्यावर डोक्यात उजेड पडला. त्याने तर शोले बघताना पण विचारलं कि जयने आत्ताच पूल उडवला होता ना? मग वीरू कसा काय पूलावरून गेला हा पण प्रश्न विचारला,
सर्वम माया - जिओ. मी मराठीत
सर्वम माया - जिओ. मी मराठीत बघितला. इतकं चांगलं मराठी डबीग मी पहिल्यांदा ऐकलं. सुखद धक्का बसला. शब्दाला पर्यायी शब्द असं न करता आपण मराठी चित्रपट बघतोय असा भास व्हावा इतकं ते जमून आलं आहे. ती भूत झालेली गोड मुलगी बघून तरूपणीची जिनिलिया देशमूख आठवली. तिकडचा निसर्ग आणि मोठी तरी पारंपरिक घरं मस्त आहेत. हिरोचा मित्र रूपे आणि त्याची आई यांनी चांगली कॉमेडी केली आहे.
भाग्यश्री देशमुख, रेको बद्दल
भाग्यश्री देशमुख, रेको बद्दल धन्यवाद..
छानच आहे. मराठी डबिंग बद्दल तर अगदी, अगदी..
सर्वममाया चित्रपटाबद्दल मागे
सर्वममाया चित्रपटाबद्दल मागे इथे लिहिले होते. https://www.maayboli.com/node/87052?page=1
मलाही तो आवडलाच होता. पण मी मराठी डब कधी बघितला नाही अजून. हिंदी डब मात्र हल्ली दर्जा सुधारल्याने छान वाटतात. मराठी बाबत सुद्धा हे होत असेल तर चांगलेच आहे.
काल "हर दिल जो प्यार करेगा "
काल "हर दिल जो प्यार करेगा " बघितला. सलमान राणी आणि प्रीती झिंटा. ठीक ठाक आहे. जुने गुडी गुडी family ड्रामा. इथे एव्हढ्या साठी लिहित आहे कि शाखा चा केवळ काही मिनिटांचा गेस्ट अपिरीअन्स आहे. what an electrifying presence!
"कुछ कुछ होता है" ह्या सिनेमाशी कनेक्ट केला आहे.
एक थिअरी.
शाखा वेडा झाला आहे आणि हॉस्पिटल मध्ये आहे. "कुछ कुछ होता है" हे त्या वेड्याला पडलेले स्वप्न!
Shah Rukh Khan’s Cameo In Salman Khan’s Har Dil Jo Pyar Karega Linked With Kuch Kuch Hota Hai In This Crazy Fan Theory!
https://www.koimoi.com/bollywood-news/shah-rukh-khans-cameo-in-salman-kh...
वाचा इथे. अरे धमाल आहे.
हितेन तेजवानी , राजीव (स्टँड
हितेन तेजवानी , राजीव (स्टँड अप कॅमेडियन) हे दोनच ओळखू येणारे चेहरे असलेला मानो या ना मानो नावाचा सिनेमा यू ट्यूब वर पाहिला. अश्मयुगातला एक माणूस अजूनही जीवंत आहे अशी थीम आहे सिनेमाची. फार लोकेशन्स नाहीत. अगदी एक गार्डन आणि घराचा हॉल इतक्याच ठिकाणी घडतो सिनेमा. फार ग्रेट वगैरे काही नाही पण बरा केलाय.
त्यातल्या त्यात नरेंद्र मोदींचे कौतुक केलेले आहे.
केशवकूल लेख इंग्रजीत आहे
केशवकूल लेख इंग्रजीत आहे त्यामुळे आता वाचत बसत नाही. ट्रान्सलेट करून नंतर वाचेन. पण शाहरुखचा तो सीन धमाल होता. त्याची कुछ कुछ सोबत लिंक जोडणे इंटरेस्टिंग वाटत आहे
मागे मर्दानी ३ पाहिला होता.
मागे मर्दानी ३ पाहिला होता.
तो तसा बरा वाटला म्हणून आज बरेच दिवसांनी मर्दानी २ पाहिला.
हा जास्त भारी आहे.
राणी छान वाटलीच पण त्यातील व्हिलन - विशाल जेठवा .. फुल डर चा शाहरुख आठवला.. मजा आली. एकदम ऍक्शन पॅकड पिक्चर आहे.
आता मर्दानी १ सुद्धा बघायला हवा लवकर..
>> क्षहितेन तेजवानी , राजीव
>> क्षहितेन तेजवानी , राजीव (स्टँड अप कॅमेडियन) हे दोनच ओळखू येणारे चेहरे असलेला मानो या ना मानो नावाचा सिनेमा यू ट्यूब वर पाहिला. अश्मयुगातला एक माणूस अजूनही जीवंत आहे अशी थीम आहे सिनेमाची. फार लोकेशन्स नाहीत. अगदी एक गार्डन आणि घराचा हॉल इतक्याच ठिकाणी घडतो सिनेमा. फार ग्रेट वगैरे काही नाही पण <<
दक्षिणा,
तुम्ही कदाचित 'मॅन फ्रॉम अर्थ' हा अत्यंत जबरदस्त खिळवून ठेवणारा चित्रपट पाहिला नाही. त्यामुळे तुम्हाला ही हिंदी एक भ्रष्ट आवृत्ती आहे असे कळाले नसावे.
तर जरूर हा चित्रपट पाहून घ्या. दुर्दैवाने तुम्ही अत्यंत सुमार कॉपी पहिली असल्याने कदाचित हा चित्रपट तुम्हाला थोडा कमी इफेक्टिव वाटेल. पण खरेच कौतुक म्हणजे फक्त संवाद अक्षरश कसे बांधून ठेवतात त्याचा अत्यंत उत्कृष्ट नमुना.
https://youtu.be/HAX2RuZm-Fk?si=q8SI93LkeopsW_as
इथे मला एक चांगली कॉपी मिळाली. प्लीज पहा.
बदलापूर, हा मी नव्हता बघितला
बदलापूर, हा मी नव्हता बघितला आजपर्यंत. खूप ऐकलं होतं वरुणच्या अभिनयाबद्दल. मला वाटलं फार मारधाड असेल पण तसं काही नव्हतं. तो वरुण एका छोट्या घरात राहतो आणि कुठल्या कंपनीत काम करतो ते आउट of डिप्रेशन की त्यामागे काही उद्देश असतो, काही कळलं नाही. अश्विनी काळसेकर दहा मिनिट असेल आणि तिचा नवरा मुरलीही तेव्हडाच वेळ पूर्ण चित्रपटात पण दोघे आवडते आहेत. शेवट तर अगदीच फुस्स आहे. वरुण आणि दिव्या दत्ता यांचं नीट काही कळलं नाही, आधी वाटलं नवाजला कॅन्सर झालाय असे खोटे रिपोर्ट ती तयार करते, मधेच असं दाखवलंय की वरुण तिच्या घरी असतो आणि तिला मारून टाकतो. कुमुद मिश्रा वध मधेही करप्ट पोलिसाच्या भूमिकेत आहे.
रॉय नक्कि बघते. धन्यवाद.
रॉय नक्कि बघते. धन्यवाद.
Pages