Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
मुंबई सेंट्रल अहमदाबाद वंदे
मुंबई सेंट्रल अहमदाबाद वंदे भारत एसी चेअर कार तिकीट १२२० Executive chair car 2315 अंतर ५२१ किमी वेळ ६ तास
शताब्दी १४००/२१०५ व्हिस्टाडोम २२५५ अनुभूती २४०५ वेळ ६ तास २० मिनिटे
वंदे भारत दिवसाला दोन दिसताहेत
दुसरी ५:३० मिनिटे घेते १३८५ /२५०५
तेजस ६:३५ मिनिटे घेते १६७० /२३६०
(No subject)
खरातचे कॉल डेटा रेकॉर्ड्स
खरातचे कॉल डेटा रेकॉर्ड्स अंजली दामानियांना कसे मिळाले? कोणी दिले?
----
हे सगळं कोणत्या पक्षाबद्दल असेल?
— पक्षाच्या अधिकृत खात्यावर फक्त 2 लाख कसे शिल्लक राहिले?
— हेलिकॉप्टरचे बिल 18 कोटी कसं काय झालं?
— एका महिला नेत्याने हॉटेलमधील 'स्पा'चे बिल पक्षाच्या अकाउंटवर कसं काय टाकलं?
— निवडणुकीत वयक्तिक गाडीचं पेट्रोलही पक्षाच्या पैशाने कसं भरलं?
सगळा हिशोब विचारला गेलाय असं कळलं.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा शुक्रवारी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला
१.अंजली दामानिया या हल्लीच्या
१.अंजली दामानिया या हल्लीच्या शकुंतला देवी आहेत. त्यांना सगळ्या बित्तंबातम्या समजतात.
२. खरातचे प्रकरण वीस वर्षे चालेल असं वाटतंय.
३. कामे रेंगाळली का यासाठी एक कारण मिळाले. बिलं थकली.
राज्यातील सत्तासमीकरणे
राज्यातील सत्तासमीकरणे बदलल्यानंतर जुन्या प्रकल्पांच्या पुनरावलोकनाचे सत्र सुरू झाले असून, त्याचा मोठा फटका खुद्द एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील योजनांना बसला आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील १४ तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, प्रकल्प रद्द करून न थांबता, या कामांसाठी आतापर्यंत वितरित केलेला सुमारे ९१ कोटी रुपयांचा निधी व्याजासह सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आहे. रद्द करण्यात आलेल्या १४ प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांना शिंदे स्वतः मुख्यमंत्री असताना मंजुरी मिळाली होती, तर उर्वरित ३ प्रकल्प माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळातील आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. काही प्रकल्पांचे प्रस्ताव विहित नमुन्यात नसल्याचे आणि काहींचे सुधारित आराखडे दोन वर्षे उलटूनही सादर न झाल्याचे तांत्रिक कारण विभागाकडून देण्यात आले आहे.
मस्त बातमीhttps://www
मस्त बातमी
https://www.loksatta.com/nashik/nashik-ring-road-kumbh-mela-land-acquisi...
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक वळण रस्ता अर्थात रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भू संपादन प्रक्रियेतील मोजणीला शनिवारी वेगळे वळण लागले. मातोरी, मुंगसरा भागात काही शेतकऱ्यांनी विरोध केला. तेव्हा पोलिसांनी घरात शिरून महिला व पुरूषांना मारहाण केल्याची तक्रार होत आहे.
संबंधितांना त्यांच्या घरातून फरफटत बाहेर काढण्यात आले. या संदर्भातील चित्रफिती प्रसारित झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
तशीही शेती नुकसानीतच चालते. शेतकर्यांनी जमिनीच्या मोबदल्यात मिळतील ते पैसे घेऊन अंबादानीच्या कंपन्यांत गुंतवावे आणि श्रीमंत व्हावे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले आणि करुणा धनंजय मुंडे हे दोघे अपक्ष उमेदवार आहेत.
कर्तारसिंग थत्तेंचा वारस मिळाला.
एकूण साठ आनंद दिघे वाहतूक
एकूण साठ आनंद दिघे वाहतूक उद्याने, प्रत्येकी एक कोटी रुपये खर्चून एक एकर जागेवर महाराष्ट्रभर उभी करणार आहेत.
कोण हे दिघे? ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई यापलिकडे यांचे नाव किंवा कर्तृत्व किंवा ओळख काय? का शिंदेंचे गुरू म्हणून सगळे चालते?
२३ एप्रिल २०२६
२३ एप्रिल २०२६
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मागणी फेटाळून लावत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्याने डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाचे वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून, सरकारने सुचवलेल्या नामनिर्देशित पद्धतीला विरोध करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत, निवडणूक प्रक्रिया अबाधित राहावी ही सरकारची जबाबदारी असल्याचे परिषदेच्या सदस्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे माजी अध्यक्ष डाॅ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले की, लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया महत्त्वपूर्ण असते. निवडणूक प्रक्रियेने स्थापित झालेली परिषद ही डाॅक्टरांच्या हिताची असेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रात नक्कीच दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
३० एप्रिल २०२६ महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीत यंदा राजकीय रंग चढल्याचे स्पष्ट दिसून आले. निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वतोपरी प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) मध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप डॉक्टरांकडून करण्यात आला. मात्र निकालात भाजप पुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडाला, तर ‘आयएमए मेंबर एमएमसी पॅनल’ने दणदणीत विजय मिळवला.
भाजपकडून ‘आयएमए परिवर्तन पॅनल’च्या मागे जोर लावण्यात आला होता. हा पॅनल आयएमएचा अधिकृत पॅनल असल्याचा दावा करत होता. या पॅनलसाठी मतदानाच्या दिवशी मंत्री आशिष शेलार यांची मतदान केंद्रांवर उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर ‘आयएमए मेंबर एमएमसी पॅनल’ने उभारलेल्या लढ्याला यश मिळाले. भाजप पुरस्कृत पॅनलला मतदारांनी नाकारत ‘आयएमए मेंबर एमएमसी पॅनल’ला स्पष्ट कौल दिला. या पॅनलने नऊपैकी तब्बल आठ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. विजयी पॅनलच्या मागे राज्यातील सर्व आयएमएच्या माजी राज्य अध्यक्षांनी ताकद लावली होती.
७ मे -In a move that has sent shockwaves through the medical community, the Maharashtra government has decided to abolish the election process for the Maharashtra Medical Council (MMC). Instead of the traditional system where doctors elect their representatives, the state will now move to a 100% nominated body. The cabinet has already approved amendments to increase the council size from 18 to 23 members—all of whom will be hand-picked by the government.
साई रिसॉर्टप्रकरणात अनिल परब
साई रिसॉर्टप्रकरणात अनिल परब यांची निर्दोष मुक्तता; किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया टाळली, पत्रकाराच्या प्रश्नावर गप्प
वरच्या IMA निवडणूकीच्या
वरच्या IMA निवडणूकीच्या बातमीला जास्त traction मिळाले नाही, पण निदान डोक्टर लोकांनी तरी कणा ताठ ठेवला हे सुखद आहे.
धागा महाराष्ट्राबद्दलच आहे तर शरद पवार या वयात राज्यसभेवर जाऊन काय करणार हे कोडेच आहे. आयडियली त्यांनी रयत शिक्षण संस्थेकडे लक्ष द्यायला हवे होते असे मला वाटते.
हो ना. अर्ज भरायला सुद्धा
हो ना. अर्ज भरायला सुद्धा अधिकारी घरी आला म्हणे. आणि कधी मुंबईत मतदान करतात कधी बारामतीत करता आलं नाही म्हणतात.
कोकण रेल्वेच्या गाड्या भरपूर
कोकण रेल्वेच्या गाड्या भरपूर उशिराने धावत आहेत अशी लोकसत्तेत बातमी होती. दोन नातलगांना अनुभव आला.
मडगाव छशिमट तेजस एक्स्प्रेस छशिमटला रात्री बारा (शून्य) वाजून तीस मिनिटांनी अपेक्षित आहे. मामी आणि तिची मुलगी दोघी मार्चमध्ये आल्या तेव्हा ती इतकी रखडत आली की पनवेलला पहाटे पाचला पोचली. तिथून त्या कॅब करून मुलुंडला आल्या.
परवा मावसबहीण आली तेव्हा ठाण्याला रात्री २ च्या नंतर पोचली. तिथून कॅब करून गोरेगावला आली.
तेजस ही अत्यंत भंगार गाडी आहे
तेजस ही अत्यंत भंगार गाडी आहे. सध्या तिच्या येण्यावर जुगार खेळावा
वैशिष्ट्यपूर्ण” योजनेअंतर्गत
वैशिष्ट्यपूर्ण” योजनेअंतर्गत नगर परिषद/ नगरपंचायत क्षेत्रात “नमो उद्यान” विकसित करण्यास मान्यता देणेबाबत.
https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3524e7ce0a1c6e07eab12cfa2ff7d8865/uploads...
पेपरात याबद्दलची एका नगरपरिषदेची जाहिरात दिसली असतो.
आताच कुठेतरी वाचलेल्या लॉजिकनुसार ही उद्याने नमोंनी दिलेल्या पैशांतून बांधली असल्याने त्यांचे नाव या उद्यानांना देणे अगदी योग्य आहे.
काय म्हणता? नमोंनी नाही दिले पैसे? करदात्यांनी दिले? अहो पण नमोंना करदात्यांनीच निवडून दिले आहे आणि नमो आहेत म्हणूनच करदाते इतका कर भरतात आणि भरू शकतात. त्यामुळे या उद्यानांसाठी कोटीच्या कोटी
उद्याने उड्डाणे भरणे योग्यच आहे.
तुमची नमो उद्याने तर आमची
शिंदेधर्मवीर आनंद दिघे उद्यानेराज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. राज्यभरात तब्बल ६० ‘वाहतूक उद्याने’ (ट्रॅफिक गार्डन्स) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे १ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
या उद्यानामध्ये वृक्षाची लागवड करताना देशभरातील दुर्मिळ वृक्षांच्या जाती निवडून तेथे लागवड करण्यात येणार असून त्या वृक्षाचे पर्यावरणातील महत्त्व असलेली माहिती तिथे उपलब्ध केली जाणार आहे. वाहतुकीच्या नियमाबरोबरच नागरिकांना पर्यावरणाचे धडेही तिथे दिले जाणार आहेत. तसेच भविष्यात येणाऱ्या ई -वाहनांची प्रतिकृती आणि त्याबद्दलची माहिती या उद्यानात दिली जाणार आहे. त्यामुळे हे उद्यान अबालवृद्धांसाठी एक ज्ञान आणि विरंगुळा केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होणार असून, सुरक्षित आणि जबाबदार वाहतुकीकडे महाराष्ट्र आणखी एक मोठे पाऊल टाकणार असल्याची भावना सरनाईक यांनी व्यक्त केली.
आहे की नाही बहुउद्देशीय उद्यान?
क्रूर कपटी जनतेचा छळ करणार्
क्रूर कपटी जनतेचा छळ करणार्या औरंग्याच्या नावाच्या जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं. तिथला व्हिडियो
https://www.facebook.com/watch/?v=1707226560628738
Archana Parkhe, a differently-abled woman whose roadside shop was her primary source of income.Location: Roadside at Chhatrapati Sambhajinagar (formerly Aurangabad), Maharashtra.The Event: During a city municipal corporation anti-encroachment drive to clear roads, her stall selling clay pots was dismantled.Aftermath: Visuals showed her collecting broken pots and crying.
तिला मदत करणारे सगळे अँटी भाजप , अँटी मोदी = सर्टिफाइड अँटीनॅशनल्स आहेत.
आता भाजप समर्थक म्हणतील ते दुकान बेकायदेशीर होतं. अनधिकृत होतं. त्यामुळे हे कायद्याचंच राज्य आहे.
भारतातील विविध शहरांत मुख्य
भारतातील विविध शहरांत मुख्य रस्ते पूल विमानतळ, झोपडपट्ट्यांना गांधी घराण्यांच्या वारसांची नावे आहेत कारण त्यांचे कर्तृत्व आहे सर्व ठिकाणी.
मेल्यावर दिली हो त्यांची नावं
मेल्यावर दिली हो त्यांची नावं.
ह्याला त्याला विनाकारण नावे
ह्याला त्याला विनाकारण नावे ठेऊ नये म्हणतात ते उगीच नाही.
कोटी मस्त जमली ना वरची?
कोटी मस्त जमली ना वरची?
भारतातील विविध शहरांत मुख्य
भारतातील विविध शहरांत मुख्य रस्ते पूल विमानतळ, झोपडपट्ट्यांना गांधी घराण्यांच्या वारसांची नावे आहेत कारण त्यांचे कर्तृत्व आहे सर्व ठिकाणी.>>> don’t you know they are the owner of the country , first family.
बोकलत सगळे धागे वाचनीय बनवतात
बोकलत सगळे धागे वाचनीय बनवतात
प्राजक्ता, मान्य आहे
SRD आणि प्राजक्ता, ही गझल
SRD आणि प्राजक्ता, ही गझल तुमच्यासाठी लिहून घेतली आहे.
https://www.maayboli.com/node/88218
बेफिकीर यांनी वाचली आहेच.
तर Nehru Gandhi family बद्दल. They will always remain the first family of the country. नुकतेच व्हिएतनामचे अध्यक्ष भारत भेटीवर आले, त्यांनी नेहरूंचा आवर्जून उल्लेख केला.
We will never forget that Prime Minister Jawaharlal Nehru was the first foreign leader to visit Vietnam in 1954, just one week after the liberation of Hanoi,” To Lam said
He recalled the personal friendship between Ho Chi Minh and Nehru, noting India's steadfast support during Vietnam's independence struggle.
Mera Naam, Tera Naam" Slogan: To Lam referenced the 1960s Indian anti-war slogan "Mera Naam, Tera Naam, Vietnam, Vietnam," illustrating the deep bond between the peoples of both nations
तुमच्या नॉन बायॉलॉजिकलची पुढे कोण कशी आठवण काढेल बरं? खी खी खी करायचे आणि माय फ्रांड डोलांड म्हणायचे म्हणून? म्हणूनच आपल्या हयातीतच आपली स्मारकं बनवून घेताहेत का?
असो.
भाजप स्पॉन्सर्ड वारकरी संग्राम भंडारे - "माझ्यावर हल्ला झाला होता ना. हल्ला झाल्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं नाव कसं आठवल ? तुकाराम महाराजांचं नाव कसं आठवल? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांवर हल्ले झाले आणि माझ्यावर हल्ला झाला होता, त्यांचं नाव आठवून काय करायचं? मला तिथे नथुरामजींचंच नाव घ्यावं लागेल ना?
गीतेचं सार - अर्जुना लढ, युद्ध कर. मी संविधानिक मार्गाने आज युद्ध केलं पाहिजे हेच सांगतोय. मी कुठे म्हणतोय गोळ्या घाला ?"
नथुरामजींचं नाव घेतल्याच्या अर्ध्या मिनिटाच्या आत मी कुठे म्हणतोय गोळ्या घाला असंही म्हणताहेत हे संग्रामबापू भंडारे.
वारकरी संप्रदायाच्या
वारकरी संप्रदायाच्या तुळशीच्या बागेत भांग पेरण्याचे काम पूर्वीच सुरू झाले होते, माझ्या मते नंग्या तलवारी घेऊन पुण्यात वारीत धारकरी शिरले तेव्हा.
महाराष्ट्राच्या
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा - विरार आर टी आय कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून हत्या
विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील अवैध खाणींविरोधात कायदेशीर लढा देणाऱ्या आत्माराम पाटील या आरटीआय (RTI) कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या खाणीविरोधात त्यांनी तक्रार केली होती, त्याच खाणीमध्ये त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला.
चला . पालघर साधूंच्या नावाने गळा काढायची वेळ झाली.
पालघरचे साधू पोलिसांच्या
पालघरचे साधू पोलिसांच्या ताब्यात असताना जमावाने त्यांना ठेचून मारले होते. पोलिस फाटा हतबल होऊन बघत बसला होता.
आणि सरकार अनेक दिवस झोपलेले होते.
इथे तसे झालेले नाही. निदान आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अर्थात फडणवीस आणि भाजपबद्दल तिरस्कार असेल तर हा फरक लक्षात येणे अवघड आहे.
थापाडे आले.
थापाडे आले.
१६ एप्रिलला ते लिंचिंग झालं. पोलिसांनाही मारहाण झाली. १७ तारखेलाच केस रजिस्टर झाली. शंभराहून अधिक लोकांना अटक झाली. सरकार बदलल्यावर केस सीबीआ कडे गेली. त्यांची चौकशी कूर्मगतीने सुरू आहे.
भाजपने ज्याला मुख्य आरोपी म्हटले त्या कैलाश चौधरीला नोव्हेंबर २०२५ मध्ये आपल्या पक्षात घेतले. मग आपलं पितळ उघडं पडल्यावर २४ तासांत त्याला टाटा बाय बाय केलं.
बोकलत सगळे धागे वाचनीय बनवतात
बोकलत सगळे धागे वाचनीय बनवतात Lol >>>>>>_/\_
पालघर च्या दुर्दैवी घटनेचा
पालघर च्या दुर्दैवी घटनेचा खुलासा इथेही इतक्यांदा झाला आहे की अजूनही त्याचे राजकारण करणारे (आर्णब ने तर सोनिया गांधी ख्रिस्चन असण्याशी संबंध लावला होता) निगरगट्टच म्हणायला हवेत.
Pages