Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
महाराष्ट्र आणि रेल्वे हे
महाराष्ट्र आणि रेल्वे हे विषय चाललेत आणि बुलेट ट्रेनचं नाव निघू नये असं होता कामा नये.
सगळ्या pantry car मध्ये भैयेच
सगळ्या pantry car मध्ये भैयेच, बिहारी आहेत. तेच काम करू जाणे. तमिळनाडूत चेन्नईत काही हॉटेलात बिहारी वेटर आणि आचारी होते. तिकडेही तीच परिस्थिती आहे. मी अनुभव घेतला. अरेरावी नाही, आळस नाही. प्रेमाने पदार्थ करून वाढतात. संध्याकाळी साडेसातला कॉफी साठी पॅन्ट्रीमध्ये गेलो त्या करणाऱ्याने लगेच करून दिली समोर. वीस रुपये.( जागेवर देणारा पंचवीस रु घेतो). Train 22179.
तमिळ माणूस कामाला टिकत नाही. सतत सुट्ट्या घेतो. केरळात मल्लु आला की लाल झेंडा घेऊन येतो unionचा. परदेशात पैसे मिळवून भारतात परत आलेल्या मल्ल्याळींनी काही व्यवसाय सुरू केले आहेत. दुधाचा धंदा वगैरे. सर्व कर्मचारी बिहारी किंवा उप्रचे. जजो तो उद्योजक आपला फायदा आणि धंदा पाहतो. अस्मिता वगैरे गेली उडत.
बुलेट ट्रेनचं काम जोरात आहे.
बुलेट ट्रेनचं काम जोरात आहे. काही बिल्डर ' बुलेट ट्रेन स्टेशनजवळ' इमारत असा प्रचार करत आहेत पालघर, विरारचे पण बुलेट ट्रेन फक्त मुंबई वडोदरा आणि अहमेदाबादलाच थांबणार आहे. ती सुरू झाल्यावर 'तमाम' हिंदी सिने कलाकार आणि लेखक पत्रकार नाचणार आहेत. गोरेगाव मेट्रो डेपोला विरोधकांत शोभा डे होती. पण मुंबई मेट्रो तीन सुरू झाल्यावर नाचायला आली होती. आम्ही ज्या इमारतींत राहतो तिथे पूर्वी झाडेच होती, पक्ष्यांचा किलबिलाट होता. आता काही नाही हे सत्य आहे.
बुलेट ट्रेनचं तिकिट मिळणार नाही इतके लोक जातील. मुंबईहून रेल्वेने अहमेदाबादला उतरल्यावर उदयपूर, नाथ द्वारा आणि माउंट अबूला नेणाऱ्या बसेस मधून मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक जातात. ते या गाडीने नक्की जाणार.
बुलेट ट्रेनचा मराठी लोकांना
बुलेट ट्रेनचा मराठी लोकांना किती उपयोग होईल? बुलेट ट्रेन महाराष्ट्रात १५६ किमी आणि गुजरातमध्ये ३५२ किमी धावणार आहे. महाराष्ट्रात ४ स्टेशन्स . गुज्रातमध्ये ८. वाटा मात्र दोन्ही राज्यांचा सारखा प्रत्येकी ५००० कोटी.
महाराष्ट्रातील ( मुंबईतील)
महाराष्ट्रातील ( मुंबईतील) गुजराती लोकच जाणार बुलेटने. आमचे यूट्यूबर एकदा जाणार विडिओ साठी.
बाकी कोकण रेल्वेचा अधिक फायदा गोव्याचेच घेतात. केरळचेही घेतात. महाराष्ट आणि कर्नाटकाने ३५० कोटी दिले प्रत्येकी ,गोवा केरळ १५० कोटी.
झिरवाळांची पण हिरवळ... !
झिरवाळांची पण हिरवळ... !
कशाचंही समर्थन? कोकण
कशाचंही समर्थन? कोकण रेल्वेचा सर्वाधिक फायदा घ्यायला गोव्याची लोकसंख्या किती ?
मी वर बुलेट ट्रेनचा मराठी माणसाला काय उपयोग असं स्पेसिफिकली म्हटलं असताना मुंबईतले गुजराती जातील हे सांगून काय मिळवलं?
मला वाटतं सिंधूताई पतिपरायण आहेत, म्हणून असं लिहितात. आता वाटतंय, तळीरामाच्या हातातली बाटली हिसकावून स्वतःच तीर्थप्राशन करू लागल्यात.
१. हा मराठी माणसाचा मुद्दा
१. हा मराठी माणसाचा मुद्दा लक्षातच आला नाही. मुंबईतील मराठी माणूस कशाला बुलेट ट्रेनने अहमेदाबादला जाईल ? नाहीच जाणार. मग ती गाडी मागीतली कोणी? महाराष्ट्रातील सरकारने उगाचच पदराला खार लावून घेतला.
[ या म्हणीचा उगम: एक बाई शेजारणीला लोणचं घालायला मदतीला जाते आणि लोणच्याचा खार लागून चांगल्या साडीला डाग पाडून घेणे.]
२. मुंबईतील मराठी माणूस कोकणात जाणार तर त्यांच्यासाठी तीन गाड्या पुरेशा आहेत असं कोरेचं मत आहे.
३. >>कोकण रेल्वेचा सर्वाधिक फायदा घ्यायला गोव्याची लोकसंख्या किती ?>> गोवा पर्यटन वाले आणि गोवेकर धरून कोरेचाच उपयोग करतात. धोबीतलावहून सुटणाऱ्या गोव्याच्या बसेसचा धंदा बुडाला. ज्यांना अगदी आपल्या गावाच्या नाक्यावर उतरायचं असतं तेच बसने जातात.
४. यापुढे महाराष्ट्र सरकारने फक्त मराठी माणसाला उपयोग होईल अशाच रेल्वे, विमाने यासाठी निधी खर्च करावा..
<हा मराठी माणसाचा मुद्दा
<हा मराठी माणसाचा मुद्दा लक्षातच आला नाही. > घोडं इथेच पेंड खातं.
<मग ती गाडी मागीतली कोणी? > ते तुमच्या मोदींचं स्वप्न आहे. त्याचा उद्देश लोकांना वाहतुकीला सोयीचं साधन मिळावं हा नाही, तर जगाला दाखवण्यासाठी करायचं आहे. त्या ट्रेनने कोणी प्रवास बिवास करणार नाही. , असं तेच म्हणालेत.
म्हणजे हा पांढरा हत्ती आहे. स्टॅच्यु ऑफ युनिटीबद्दलही तेच सांगितलंय. स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या दुप्पट मोठा पुतळा हवा.
बुलेट ट्रेनचा फायदा
बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्रा पेक्षा गुजरातलाच जास्त होणार. आपल्या राज्य सरकारने बुलेट ट्रेनची जेव्हढी महाराष्ट्रात लांबी तेवढाच खर्च देऊ ही भूमिका घायला पाहिजे होती.
गोव्याचं क्षेत्रफळ कमी.
गोव्याचं क्षेत्रफळ कमी. त्यामुळे ट्रेनने तिथे गेल्यावर आपल्या गावी जायला फार प्रवास करावा लागत नाही. तेच रत्नागिरी सिंधु दुर्ग मोठे जिल्हे. ट्रेनचं जेवढं तिकीट तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त रिक्षावर होतो. सिंधु दुर्गला जाणार्या खाजगी बसेस भरून वाहत असतात. विशेषतः गणपती, होळी. तिकीटाचे दर वाढतात. ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. सिंधु दुर्गात चिपी विमानतळ आहे , ते चालू नसे. आता त्यासाठी विमान कंपन्यांना सबसिडी महारा ष्ट्र सरकार देणार. माझ्या बहिणीचं सासर वेंगुर्ला तालुक्यात आहे. ती मंडळी गोव्याला विमानाने जाऊन कारने मागे येतात. गेल्या गणपतीत मुंबई गोवा विमानप्रवासापेक्षा मुंबई हैद्राबाद गोवा असा विमान प्रवास स्वस्त पडला त्यांना.
NDTV मराठी - खरात सारख्यांना
NDTV मराठी - खरात सारख्यांना मारून विषय संपवा - संभाजी भिडे
मोपा एअरपोर्ट वर उतरून
मोपा एअरपोर्ट वर उतरून सावंतवाडी वेंगुर्ला प्रवास स्वस्त पडतो. माझे अनेक नातेवाईक तेच करतात
ईथे योग्य आहे किंवा नाही
ईथे योग्य आहे किंवा नाही कल्पना नाही तर
तरीपण आजचा अनुभव सांगतो.
दुपारी बारा पासूनच मुख्य सांगली मिरज रस्ता पोलिसांनी बंद केला होता. आता रात्री साडे नऊ वाजता राम मंदिरात 20 मिनिटे जावे म्हणून गेलो, तर डॉल्बी वर 1. दुश्मन असुदे गनिम असुदे कितीबी हुशार, 2. दो घुट मुझे बी पिल्लादे शराबी 3. अहो शेठ, लई दिसांनी झालीय भेट. 4. बिडी जाळायले जिगर से पिया, 5 ब्राझील ही राम नाम जप करणारी गाणी ऐकून आलोय.
दुपारी बारा पासूनच मुख्य
दुपारी बारा पासूनच मुख्य सांगली मिरज रस्ता पोलिसांनी बंद केला होता
कशासाठी ?
आता नवीन सरकार येईल ते करील
आता नवीन सरकार (केंद्रात आणि राज्यात)येईल ते करील बंदोबस्त. युपी बिहार कोलकाता दिल्ली केरळ सर्व गाड्या बंद. फक्त परळ /भांडुप/कांदिवली येथून सावंतवाडी/ नागपूर/जळगाव चालू.
गाड्या डहाणूपर्यंत जाणार मग गुजरात वाले दुसरी गाडी तिथून ओढणार. दक्षिणेला तारकर्लीपर्यंतच.तिथून गोवा वाले काणकोण पुढे.तिथून कारवारवाले पुढे दुसरी शटल चालवणार.
सगळ्यांनी भराभर अर्ज करा आणि ती गठ्ठी टाका / पाठवा योग्य ठिकाणी.
एकदम फाडू कल्पना.
दुपारी बारा पासूनच मुख्य
दुपारी बारा पासूनच मुख्य सांगली मिरज रस्ता पोलिसांनी बंद केला होता
कशासाठी ?
>>>
राममंदिरासमोर रामनवमी साजरी करायला.
भाजप सरकार कायम मराठी
भाजप सरकार कायम मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताला बाधा पोचेल, असंच वागणार हे सिंधूताईंनीच सांगितलं ते बरं झालं.
हे मुंबईतून कोकणात जाण्याबद्दल झालं. इतर भागांचं काय?
ही फेसबुक पोस्ट बघा
१६ वर्षांपासून मी कंसिस्टंटली पुणे-गोवा-पुणे प्रवास करते. यातला अर्थातच बहुतांश प्रवास बसने होतो कारण गोव्याला जायला रेल्वेगाड्या खूपच कमी आहेत, ज्या आहेत, त्या थांबतात ती स्थानकं, त्यांच्या वेळा, सोयीच्या नाहीत. इथल्या वर्षांत कायम हाच विचार येतो, की गोव्यात जायला चांगल्या ट्रेन्स असत्या, तर किती बरं झालं असतं.
गेल्या काही वर्षांत असं कळत गेलंय, की पुण्यातून फक्त गोव्यात नाही, तर महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात जायचं झालं, की हेच वाटतं, की इथे जायला चांगल्या आणि सोयीच्या ट्रेन्स का नाहीत? कामासाठी विदर्भ, मराठवाडा, नाशिक, कोकण, कुठंही जायचं असलं, म्हणजे खरं तर पुण्यातून मुंबई आणि त्यातल्या त्यात सोलापूर सोडून कुठंही जायचं झालं, तरी असंच वाटतं.
आपल्याकडे राज्यातल्या मुख्य शहरांना जोडणाऱ्या नियमित रेल्वे गाड्या नाहीत, वेगवेगळ्या भागांना एकमेकांशी जोडणाऱ्या नियमित गाड्या नाहीत. कुठेही जाणाऱ्या लोकांना २-३ महिने आधी तिकीट काढायचा प्रयत्न करावा लागतो, नाहीतर विनातिकीट प्रवासाची तयारी ठेवावी लागते. बसने जायचं झालं, तर ट्रॅव्हल्स अत्यंत महाग झाल्या आहेत, रस्त्यावरची वाहतूक धोकादायक झालेली आहे. एकुणातच सामान्य माणसाला परवडणारा, रस्त्या प्रवासापेक्षा जास्त सुरक्षित असणारा रेल्वे प्रवास अत्यंत कठीण झाला आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातून उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या वाढत चालल्या आहेत, त्यांचे थांबे आणि वेळा अत्यंत सोयीच्या असतात, आणि सामान्य मराठी माणूस क्वचितच प्रवास करेल, अशा हाय स्पीड रेल्वे प्रत्येक बजेटमध्ये वाढत जातात.
यावर्षीच्या रेल्वे बजेटच्या निमित्तानं यासगळ्याबद्दल एक व्हिडियो केला आहे. कमेंटमध्ये लिंक टाकत आहे, नक्की बघा!
सिंधूताईंनी लिहिलेलं बरोबर
सिंधूताईंनी लिहिलेलं बरोबर आहे. सहमत.
रेल्वेसाठी मुंबई मुख्य केंद्र ठरलं आहे. इथून रात्री दहा अकराच्या सुटणाऱ्या गाड्या ( पुण्याहून पुढे जाणाऱ्या) पुण्याला दोन वाजता येतात.नाशिकवरून पुढे जाणाऱ्या गाडीसाठी मुंबईत यावे लागते किंवा दौंड मनमाड मार्गाची गाडी धरावी लागते.
बाकी पुणे हे मुंबईसारखे लांबुडके न पसरता चौफेर पसरले आहे. सकाळी सहाची सिंहगड पकडण्यासाठी पुण्यातीलच काही लोकांना प्राइवेट टॅक्सी बुक करावी लागते कारण पुण्यातल्या ओटोरिक्षा सहाला सुरू होतात.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/mumbai/minister-mangal-prabhat-lodha-jain-templ...
जय जिनेंद्र.
मंगलप्रभात लोढा जैन मंदिरांसाठी गॅस सिलिंडर्सची खास व्यवस्था करणार.
करोनाकाळातही भाजपने औषधांची अशीच साठेबाजी केली होती ना?
व्वा!
व्वा!
मुंबईत पाणी तुंबुंन लोकल
मुंबईत पाणी तुंबुंन लोकल गाड्या बंद पडल्या , फोर्टातले लोक घरी जाऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी काहींनी वडापाव फुकट वाटला. काहींनी पन्नास रुपयाला विकला. ओळखा पाहू कोणी हा उपक्रम केला असेल?
जानेवारीतली ही बातमी नजरेतून
जानेवारीतली ही बातमी नजरेतून सुटली होती.
मुंबईत उभारणार 'बिहार भवन'! ३० मजल्यांची इमारत, अद्ययावत सोयी-सुविधा; तब्बल ३१४ कोटींच्या खर्चाला मंजुरी
बिहार सरकारने दिल्लीनंतर आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्येहीबिहार भवन उभारण्याची घोषणा केली आहे. बिहारच्या गृहनिर्माण विभागाचे सचिव कुमार रवी यांनी याबाबत माहिती देताना मुंबईमधील एलिफिस्टन इस्टेट, मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात हे बिहार भवन उभे राहणार असून, राज्य मंत्रिमंडळाने त्यासाठी ३१४ कोटी २० लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मान्यता दिली आहे, असे सांगितले
प्रस्तावित बिहार भवन हे बेसमेंटसह सुमारे ३० मजली असणार आहे. तसेच त्यामध्ये आधुनिक सोईसुविधाही असणार आहेत. याची उंची जमिनीपासून ६९ मीटर असेल. या इमारतीमध्ये १७८ खोल्या असतील. त्यांचा वापर सरकारी अधिकारी, पाहुणे आणि गरजू लोकांसाठी केला जाईल.
तसेच या बिहार भवनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीमध्ये बिहारमधून मुंबईमध्ये उपचारांसाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल. कर्करोगासह इथर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी २४० बेड क्षमता असलेलं वसतीगृह या इमारतीत असेल. त्यामाध्यमातून अशा गरजू व्यक्तींना सुरक्षित आणि सुलभ निवासस्थान मिळेल.
No, the Maharashtra state
No, the Maharashtra state government is not funding the construction of the Bihar Bhawan in Mumbai.
According to reports, the project is being funded solely by the Bihar government.
Government of Bihar has sanctioned over ₹314 crore for the construction of Bihar Bhawan in Mumbai on our proposal. This is in addition to ₹160 crore spent for acquiring land for the building from the Mumbai Port Trust. I express my deep sense of gratitude, as Chairman Bihar Foundation Mumbai to the entire, Honourable Chief Minister, Shri Nitish Kumar, Deputy Chief Minister Shri Vijay Kumar Sinha Government of Bihar, Secretary Department of Industry, CEO Bihar Foundation, past Chairmen and office bearers of Bihar Foundation Mumbai. This 32 floor proposed building will have offices of the Resident Commissioner, department of Industry, tourism, investment commissioner, Bihar Foundation Mumbai and various other ministries and departments. It will have dining facilities for Bihari food, handicrafts and guest house for the needy and visitors.
“The proposed Bihar Bhawan in Navi Mumbai is being built by the government of Bihar, which has allotted a fund of Rs 325 crores. Using that money, Bihar government has bought land from the Maharashtra government. The aim of constructing Bihar Bhawan is to accommodate the large number of cancer patients and their relatives who come to Mumbai for treatment at Tata Memorial Hospital,” Nirupam said.
https://www.thestatesman.com/india/bihar-bhawan-mumbai-row-explained-150....
महाराष्ट्र सरकार बांधतंय असं
महाराष्ट्र सरकार बांधतंय असं कुठे म्हटलंय मी किंवा त्या बातमीत? बिहार सरकारने घोषणा केली, असंच म्हटलंय.
उगाच धावत येऊन स्पष्टीकरण कशाला?
बिहारमधून महाराष्ट्रात जनांचा प्रवाहो कायम येत राहणार हे, हे नक्की.
२०१३ मध्ये वाशीतच असंच उत्तर प्रदेश भवन बांधून तयार झालं. कॉंग्रेस, भाजप याबाबत सारखेच.
माझा प्रतिसाद येईपर्यंत आपण
माझा प्रतिसाद येईपर्यंत आपण प्रतिसाद संपादित केला.
असो.
बिहारमधून महाराष्ट्रात जनांचा
बिहारमधून महाराष्ट्रात जनांचा प्रवाहो कायम येत राहणार.
बिहार मध्ये असणारी गरिबी आणि महाराष्ट्रतील तुलनात्मक सुबत्ता यामुळे हि स्थिती राहणारच आहे.
याला आपण कायद्याने बंधन घालू शकत नाही कारण भारतात कुठेही स्थायिक होणे आणि नोकरी करणे हा मूलभूत हक्क घटनेनेच दिलेला आहे.
बिहार मधील गरिबीचे एक उदाहरण देतो.
१९९९ मध्ये बिहार मध्ये आर्मीच्या रिक्रुटमेंट साठी गेलो असता तेथे उमेदवारांना पॅन्ट काढून केवळ अंडरवेअर वर उभे राहण्यास सांगितले होते गुढघे जोडले जातात किंवा पायात व्यंग आहे का हे पाहण्यासाठी
तेंव्हा काही उमेदवार तसे करू शकत नव्हते. कारण त्यांच्या कडे अंडरवेअर घेण्याइतके पैसेच नव्हते.
वडील काय करतात विचारल्यावर शेतीत मजुरी करतात असे उत्तर आले.
त्यांना किती पगार मिळतो?
दोन वेळचे लिट्टी चोखा आणि १८०० रुपये.
१८०० रुपये वर्षाला (महिन्याला नव्हे).
लष्करात सैनिक म्हणून भरती झाल्यास महिना १५ हजार पगार मिळत असे तेंव्हा. लोक वाटेल ते करून नोकरीसाठी येत असत.
लालूंच्या राज्यातील हि स्थिती मी चक्षुर्वैसत्यं पाहिलेली आहे.
अशी भयानक गरिबी असेल तर माणसे काय करतील ?
तेथील राजकारण आणि समाजकारण पाहिल्यास महाराष्ट्रात जन्माला आलो हेच आपले केवढे भाग्य आहे असे लक्षात येते.
तरीही महाराष्ट्रात येऊन
तरीही महाराष्ट्रात येऊन हिंदीमी बोलो म्हणून मराठी माणसावर दादागिरी करण्यात हेच बिहारी पुढे असतात!
महाराष्ट्रात जन्माला आलो हेच आपले केवढे भाग्य आहे असे लक्षात येते. >>>
धन्यवाद त्या यशवंतराव, पवार ते पृथ्वीराज चव्हाण ह्या महाराष्ट्राच्या सर्व बिगर भाजपी मुख्यमंत्र्यांचे!
प्रतिसाद संपादित केला? टाईम
प्रतिसाद संपादित केला? टाईम स्टॅंप बघा.
नितीशकुमार २००५ पासून मुख्यमंत्री आहेत. सुशासन कुमार म्हणून मिरवतात. आणि आठवण लालूप्रसादची.
भले शाब्बास....बीजेपी जवळपास
भले शाब्बास....बीजेपी जवळपास साडे सतरा वर्षे बिहार मध्ये सत्तेत आहे...केंद्राचा ११% टॅक्स शेअर बिहारला जातो. आता ही स्थलांतरितांचा जो डेटा आहे तोन २०११ च्या सेन्सस नुसार आहे. भारताच्या मागील १५० वर्षांच्या इतिहासात सेन्सस इतक्या उशिरा होण्याची ही पहलीच वेळ आहे...कदाचित अनेक दडवलेली बिंगे फुटू नयेत म्हणून मोडस ऑपरेंडी जुळवण्यात इतका वेळ जात असावा...चोरी करतात ते करतात पण ना त्यांना लाज, ना त्यांच्या अंधभक्तांना (जे भामटे हे सर्व समजून उमजूमन आहेत त्यांना ), बाकीच्या मुर्खांना अक्कल असती तर आणखी काय हवे होते.
Pages