महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

3000-4000.jpg

आरक्षण आर्थिक आधारावर असावं असं भाजप समर्थकांनी कितीही म्हटलं तरी त्यांच्यातल्या core समर्थकांना गरिबांची मुलांनी आपल्या मुलासोबत एकाच शाळेत शिकणे पटत असेल? हा पैसा देवस्थानांवर खर्च होणं त्यांना कधीही योग्य वाटेल.

गांधी घराण्यातील वारसांची नावं दिली हे न पटणारं समर्थन. लोकशाही म्हणायची आणि राजे लोकांसारखं आपलीच मालमत्ता.

आताच्या चर्चेची सुरुवात कुठून झाली? महाराष्ट्रात सरकारी खर्चाने नमो उद्याने तयार होणार आहेत. तुम्ही कोणाबद्दल बोललात नेहरू गांधी. म्हणजे तुम्ही नमो हे नाव देण्याचं अप्रत्यक्ष समर्थन केलंत.

तुम्ही असं म्हणताय की जसं काही सगळ्या रस्त्यांना वा वास्तू , वस्त्यांना फक्त नेहरू गांधींचीच नावं आहेत.

तसंच इथे महाराष्ट्रासंबंधी एवढ्या बातम्या मी शेअर केल्या. तुम्ही रिअ‍ॅक्ट कोणत्या एका बातमीवर झालात?

तुम्हांला देशाचं आणि राज्याचं काही पडलेलं आहे का ते स्वतःलाच सांगा.

बरं ते के इ एम रुग्णालयाचं नाव बदलून काहीतरी कौशल्यवीर एकलव्य मेमोरियल रुग्णालय करणार आहेत. हे नाटक कशाला? यात एकलव्य कुठून आला? ते रुग्णालय के इ एम म्हणूनच ओळखलं जाणार.
नाव बदललं म्हणून इंग्रजांची स्मृती मिटणार नाही. उलट त्या भागात ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या कितीतरी संस्था आहेत, ज्या आजही उपयुक्त आहेत.

जलजीवन मिशनच्या २४ हजार योजना अधांतरी
जलजीवन मिशनअंतर्गत केलेल्या कामांची ५० हजार कोटींचे देयके थकीत असल्याने कंत्राटदारांच्या महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा संघटनेने गेल्या महिनाभरापासून कामे थांबवली आहेत.
https://www.loksatta.com/nagpur/jal-jeevan-mission-maharashtra-contracto...

ठाणे महापालिकेत शिंदे सेना-भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी; गोंधळात २३१ विषय मंजूर, राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप
अवघ्या पाच मिनिटांत २३१ विषय चर्चेविना मंजूर केल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेत व्यासपीठावर ठिय्या आंदोलन केले.
शिवसेनेने राष्ट्रगीत घेऊन सभा विसर्जित करत आंदोलन मोडीत काढल्याने राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करत याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले. यामुळे या दोन्ही पक्षांचा सभागृहातील वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला आहे.
https://www.loksatta.com/thane/thane-municipal-corporation-general-body-...

पोलिस ठाणे म्हटलं की मला बाई कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड आठवतात. यांनी चक्क पोलिस ठाण्यात शिंदे सेनेच्या महेश गायकवाडांवर गोळ्या झाडल्या. याची शिक्षा म्हणून गणपत गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट दिलं आणि त्या आमदार झाल्या.

आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे

कोकण रेल्वेवर उन्हाळी सुटीनिमित्त १० अतिरिक्त गाड्या सोडणार आहेत. म्हणजे दोनच गाड्या. त्याच परत आल्या की दोनाच्या चार. आठवड्यातून एकदा अशा दोन / तीन आठवडे सुटणार. अशा १० गाड्या. तर या कुठून सुटणार असतील ओळखा बरं?

प न वे ल.

दादर , लोटिट किंवा छशिमट वरून सोडायला काय त्या उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये थोड्याच जाणार आहेत? त्या बिचार्‍यांना दोन दिवस गावाला पोचायला दोन दिवस लागणार असतात. म्हणून सोयीचं स्टेशन. कोकण काय इथेच आहे. प्रवासाची गंमत नको का यायला? मग पोराटोरांना घेऊन सामान सांभाळात पनवेलला जा आणि तिथून परत या. गाड्यांच्या पनवेलहून सुटायच्या वेळाही अगदी सोयीच्या आहेत हो. एक सका ळी ६:१० मिनिटांनी आणि एक सकाळी ५:४५ ला. म्हणजे तुम्हांला मुंबई ठाण्याहून पनवेलला जायला लोकल मध्ये गर्दी अजिबात नसेल. दयाळू आहे आमचं सरकार आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव.

आनंदी आनंद गडे

या गाण्यात पण साहेब आहेत

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहीकडे
वरती खाली मोद भरे
वायुसंगे मोद फिरे

कोकण रेल्वेवर उन्हाळी सुटीनिमित्त १० अतिरिक्त गाड्या सोडणार आहेत. म्हणजे दोनच गाड्या. त्याच परत आल्या की दोनाच्या चार. आठवड्यातून एकदा अशा दोन / तीन आठवडे सुटणार. अशा १० गाड्या. तर या कुठून सुटणार असतील ओळखा बरं?

आपले प्रतिसाद किती एकांगी आणि द्वेषपूर्ण आहे याचा हा आणखी एक नमुना आहे.

मुळात कोकणात जाण्यासाठी उन्हाळी सुटीच्या अतिरिक्त गाड्या ०११७१/७२ हि गाडी मुंबई सी एस टी ते मडगाव १६ एप्रिल ते ११ जून पर्यंत चालू आहेच
तसेच ०१११९/२० हि गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव १७ एप्रिल ते १२ जून चालू आहेच.
०११५९/६० हि दिवा चिपळूण मेमू सुद्धा आठवड्यात तीन दिवस चालू आहे. शिवाय
०१००३/०४ आणि ०११०३/०४ या लोटीटी मडगाव गाड्या चालू आहेत.

आता केवळ अतिरिक्त गर्दीसाठी पाच आठवडे पनवेल ते मडगाव अधिक गाडी चालू केली एकंदरच मुंबई तुन बाहेरगावी जाणार्या उन्हाळी गाड्यांच्या गर्दीमुळे गाडीला मुंबईतून सोडणे कठीण आहे म्हणून पनवेल वरून सोडली जात आहे.

तरी आपला शिमगा करणे चालूच आहे.

कधीही पाहावे कोणत्याही धाग्यावर आपली कायम रडारड च कशी चालू असते.

आपल्याला कंटाळा येत नाही का?

माहितीबद्दल धन्यवाद. माझं गाव कोकणात आहे आणि मी जात नसलो तरी अनेक नातलग जात असतात. तिकिटं मिळायला मारामार आणि प्रवासातले हाल हे नेहमीचे असल्याने जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
--

मुंबईतल्या नालेसफाईच्या कामाच्या पाहणीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी वेगवेगळे पाहणी दौरे केले. महापौर आणि उपमहापौर यांच्यात कलगीतुरा सुरू आहे.

१.कोकण रेल्वेवर एकेरी मार्ग वीर ते संगमेश्वर आहे आणि इथे बोगदे असल्याने आणि त्यात एकेरी मार्गच असल्याने अडचण होते. बाकी ठिकाणी दुहेरी मार्ग करतच आहेत.
२. परतीची गाडी ठेवायला जागा शोधत आहेत. जिथे शक्य नाही तिथे तीच गाडी एक दोन तासात फिरवतात वेगळ्या नंबरने. त्यामुळे सर्वच गाड्या उशीरा धावतात.
३. रेल्वेला दुसरा जलद स्वस्त पर्याय नाही त्यामुळे प्रवासी रेल्वेनेच जातात. अगदी मुंबई - पुणे इंद्रायणी गाडीची हीच अवस्था आहे. तिप्पट प्रवासी यातून जातात. रिझर्व डब्यांतून अनारक्षित तिकिटेवालेही जातात. शिवाय या आणि इंटरसिटीच्या सीटांमध्ये पाय सोडायला जागा भरपूर आहे. टिकेट चेकर दुर्लक्ष करतात, येतच नाहीत. या मुख्य शहरांत जाऊन येऊन काम करणारेए खूप आहेत.
४. पूर्वी सहा महिन्यांतून एकदा कोकणात जाणारे आता महिन्याला चार वेळा जाऊन येतात.
५. कुर्ला टर्मिनस वर एवढा बोजा आहे की काही गाड्या अधुनमधून पनवेलहून सोडतात. त्यात नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस कायमच असतात.
६. सीएसएमटीच्या काही गाड्या तर ठाण्यालाच शेवट कराव्या लागतात. इतका बोजा आहे.
७. टर्मिनस स्टेशनचे फायदे जेवढे तेवढे तोटेही आहेत. गाडी फिरवणे मोठे कामच असते. ती काढल्याशिवाय दुसरी आणता येत नाही.

माझी बहीण भांडुपला राहते. एकदा असेच कोकणात जाणार्‍या गाडीत बसायला पनवेलला सकुटुंब गेली. गाडी काही तास उशिरा. प्लॅटफॉर्मवर एवढी गर्दी झाली की ती प्लॅटफॉर्म वरून खाली पडता पडता वाचली.

रेल्वेचे तिकिट मिळाले नाही की लोक खाजगी बसने, अगदी विमानानेही जातात. गणपती, गावच्या जत्रा हा कोकणवासीयांच्या श्रद्धेचा विषय आहे.

हे आधीही लिहिलं आहे. विमानाने जायचं तर गोव्याला जाऊन बाय रोड मागे येतात. सिंधुदुर्गातलं चिपी विमानतळ फक्त नावाला असा काही महिन्यांपूर्वीचा अनुभव आहे. आताचं माहीत नाही.

सिंधुदुर्गातलं चिपी विमानतळ फक्त नावाला असा काही महिन्यांपूर्वीचा अनुभव आहे. आताचं माहीत नाही.>> तो फक्त राणे कुटुंबियांसाठी आहे . तुम्ही कधीही गेलात तर एखादा राणे असतोच म्हणे.

कोकण रेल्वे ही कोंकणी माणसाच्या तोंडाला पाने पुसत दक्षिणेकडे जाण्यासाठी बनवली गेली आहे.

पनवेल हे भारीच जंक्शन झाले आहे. जेएनपीटीच्या मालगाड्या/ कोकण फाटा/ पुणे फाटा/कल्याण नाशिक फाटा/दिवा ठाणे फाटा आणि नवीन मुंबई मार्गे ठाणे/कुर्ला फाटा एवढा बोजा आहे. त्यामुळे तिकडे गाड्यांना लवकर फलाट मिळत नाहीत.
रेल्वेसोडून सर्व पर्याय खर्चिक आहेत.

चांगले पगार घेऊनही हाव सुटत नाही. शिक्षक लोक अप्रामाणिकपणाने पैसे कमवायच्या मागे आहेत. आणि मागणी- पुरवठा इथेही लागू आहे. पालकांना आपल्या मुलांना फुकटचे भरपूर गुण हवे आहेत. दहा दहा लाख रुपये द्यायला तयार आहेत. महाराष्ट्र यात पुढे आहे हे पेपरफुटीतून उघड झाले. गरजा महाराष्ट्र माझा... मराठी पाऊल पडते पुढे. हल्ली राजसाहेब महाराष्ट्राची थोरवी भाषणांतून सांगत आहेत. यापुढे हासुद्धा मुद्दा घ्यावा त्यांनी.

यापुढे खूप गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशावर कायमच प्रश्नचिन्ह राहील.

दोष सरकारचा नसून समाजातील वाढणाऱ्या वाईट प्रवृत्तीचा आहे.

<<<तरी आपला शिमगा करणे चालूच आहे.
कधीही पाहावे कोणत्याही धाग्यावर आपली कायम रडारड च कशी चालू असते.
आपल्याला कंटाळा येत नाही का?>>>

—— रडा रड वाटत असेल तर दुर्लक्ष करणे हा पर्याय उपलब्द असताना न वापरण्याचा कन्टाळा का करायचा?

कोकणातील लोकं बस, ट्रेन, विमानाने का जातात हे मला पडलेलं कोडं आहे. एव्हडा मोठा समुद्र आहे मस्त सीएसटीला जायचं तिथून पोहत पोहत आपापल्या गावी जायचं. आपापल्या गावाला जी नदी असेल तिथून बाहेर पडायचं.

आमच्या गाडीमध्ये डिझेल नाही, म्हणून आम्ही तुमच्या मुलीला शोधू शकत नाही!”

हा संवाद एखाद्या चित्रपटातील नाही, तर नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमधील आहे.

खासदार सुनील दत्त यांनी वसवलेल्या गरीब नगर अशा फिल्मी नाव धारण करणार्या बेकायदा, रेल्वेच्या मालकीच्या जमिनीचा ताबा घेऊन बनवलेल्या गलिच्छ वस्तीवर बुलडोझर चालवून ती जागा साफ केली.
काही शांतिदूतांनी पोलिसांवर दगडफेक केली पण लगेच लाठीधारी पोलिसांचे दल त्यांचा समाचार घेण्यासाठी नियुक्त केले.
निव्वळ व्होटबँक म्हणून सुनील दत्त यांनी ह्या बेकायदा वस्तीला अभय दिले होते. शिवसेना आणि बाकी कुणी ह्या वस्तीला हात लावण्याचे धाडस केले नव्हते. ते आजच्या ट्रिपल इंजिन सरकारने दाखवले. अभिनंदन! पुन्हा असले दरिद्री गरीब नगर उभे राहू नये अशी प्रार्थना!

संसदेत घटनादुररुस्ती विधेयक पडल्यावर महाराष्ट्र भाजपने मुंबईत गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक तथाकथित आक्रोश मोर्चा काढला. तो बराच गाजला. त्याबाबत ताजी बातमी
वरळीतील जांभोरी मैदान ते एनएससीआय डोमदरम्यान काढण्यात आलेल्या ‘जनआक्रोश मोर्चा’ संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी केलेल्या आरटीआय अर्जाला उत्तर देताना वरळी पोलिसांनी मोर्चासंदर्भातील अनेक महत्त्वाच्या नोंदी “अभिलेखावर उपलब्ध नाहीत” असे स्पष्ट केले आहे.

आरटीआयमधून मोर्चासाठी मागितलेल्या पोलिस परवानगी अर्जाची प्रत, दिलेल्या परवानगीची प्रत, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जाहीर केलेल्या पर्यायी मार्गांची माहिती, प्रसारमाध्यमांना दिलेली सूचना, तसेच मोर्चामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याच्या नोंदी मागवण्यात आल्या होत्या. मात्र या सर्व बाबींवर “अभिलेखावर उपलब्ध नाही” असे उत्तर देण्यात आले आहे.

पोलिसांनी मोर्चाच्या आयोजकांविरोधात नियम न पाळल्याबद्दल केस दाखल केल्याची २२ एप्रिलची बातमी आहे. त्याचं पुढे काही होणार आहे का?

ज्या मोर्चाला परवानगी नव्हती, त्याला पोलिस संरक्षण का देत होते?

गरीब नगर हाटवले हे चांगलेच झाले, आता हीच कारवाई गणपत पाटील नगर वर करण्याचे धाडस ट्रिपल इंजिन ने करावे ही आशा

बाकी हायकोर्टाच्या निर्णयाचे क्रेडिट सरकार कसे काय घेते ?

>>
बाकी हायकोर्टाच्या निर्णयाचे क्रेडिट सरकार कसे काय घेतले?
<<
भारताच्या महान दैदीप्यमान लोकशाही इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा कोर्टाने निर्णय देऊनही सरकारने तो अमलात आणण्यात चालढकल केली इतकेच काय कधी कधी तो कोर्टाचा निर्णय संसदेत रद्दबातल केला. उदाहरणे हवीच असतील तर देऊ शकेन.
इथे ते घडले नाही. रेल्वेने तात्काळ कारवाई सुरू केली. शांतिदूतांची वस्ती आहे हे ओळखून मोठा सशस्त्र फौजफाटा आणला. पूर्ण तयारी करून आले आणि त्यात खंड आणणार्या समाकंटकांना योग्य पद्धतीने नियंत्रणात आणले. राज्य सरकारने योग्य ती मदत केली.

हिंदी सक्ती, 'हिंदी सक्ती कुठाय? तिसरी भारतातील कोणतीही भाषा निवडू शकता (देवनागरी लिपी सोडून इतर लिपीतली भाषा पहिली पासुन?) म्हणत पर्यायाने हिंदी सक्ती', मराठी भाषेचा प्रश्न, सोबतच कलाकार बोलण्यास धजावत नाहीत यामागचे राजकारण. यावरील ही चर्चा. शिर्षक क्लिक बेट आहे.
मराठी कलाकारांनी बोललंच पाहिजे का हा एक प्रश्न आहे. मराठी दुरवस्थेबद्दल तक्रार असेल तर बोललं पाहिजे असं वाटतं.

Pages