महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भगतसिंग कोशियारी - पद्मभूषण. बक्षीस मिळालं.

( महागाई विरोधात लोकांनी आंदोलन करू नये म्हणून? ) पुण्यात १४ दिवस जमाव बंदीचा आदेश

यावर एका भाजप समर्थकाचं म्हणणं -गेल्या 70 वर्षां वर्षात अपवाद सोडले तर कधीही महागाई विरुद्ध विरोधी पक्षांनी आंदोलन केल्याचं मला आठवत नाही गेल्या १० वर्षात आणि त्यापूर्वीच्या यूपीएच्या १० वर्षाच्या काळात सुद्धा महागाई 10% वरती गेली असताना कधी महागाईचा भांडवल करून विरोधी पक्षांनी हे धंदे केले नव्हते.

भाजपनेच महागाई विरोधात भारत बंद पुकारला होता https://www.bjp.org/pressreleases/press-statement-issued-bjp-national-pr...
याची आठवण करून दिली, स्मृती इराणींची प्रेस कॉन्फर न्स दाखवली तर म्हणे तेव्हा विनाअनुदानित सिलिं डरची किंमत १२४३ रुपये होती.
वर्षाला ९ अनुदानित सिलिंडर ४१० रुपयांना मिळत होते, हे बरोबर विसरला.

दरम्यान ८ दिवसांपूर्वी पुण्यात राजमाता भुयारी मार्ग पुलावर दिवसाढवळ्या थरार अनुभवायला मिळाला

शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता विसरली आहे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!

जून २०२४ मध्ये लाडकी बहीण योजना आणली तेव्हा लाभार्थ्यांची संख्या होती २.४७ कोटी. केवायसी न केल्याने व निकषात न बसल्याने त्यातल्या ८१ लाख महिला आता अपात्र ठरल्या. म्हणजे जवळपास एक तृतीयांश.
म्हणजे करदात्यांचे किती पैसे सरकारने अपात्र लोकांना वाटले? ही आकडेवारी या धाग्यावर आधी आलीच आहे.

आता फडणवीस म्हणतात योजना आणली तेव्हा सेल्फ सर्टिफिकेशनवर मानधन देऊ असं सांगितलं होतं. सरकार अशा आणखी कोणत्या योजनांत सेल्फ सर्टिफिकेशनवर अर्ज मान्य करतं?
कॅगकडून विचारणा होते की तुम्ही पडताळणी केली होती का? म्हणून पडताळणी सुरू केली.
आता ते म्हणतात की फक्त ज्या पुरुषांनी १५०० घेतले त्यांच्याकडून वसूल करू. अपात्र महिलांना माफ करू.

कॅग म्हटल्यावर विनोद राय, 2G आणि १.७६ लाख कोटी presumptive loss या गोष्टी आठवल्या.
पडताळणी न करण्याच्या पॉलिसी डिसिजनमुळे सरकारचे कोट्य वधी रुपये अपात्र लोकांना मिळाले, त्यामुळे इतर कामांना पैसा कमी पडला. आणि हे पैसे ज्यांनी घेतले त्यांच्याकडून वसूलही करणार नाहीत. (वसूल करायला गेले तर त्यालाही खर्च येईल आणि त्यातही पैसे खायची सोय).यापेक्षा ज्यांनी पडताळणी न करण्याचा निर्णय घेतला त्या मुख्यमंत्री , संबंधित खात्याच्या मंत्री , मंत्रीमंडळाची सामूहिक जबाबदारी असते - म्हणून तेव्हाचे सगळे मंत्री आणि संबंधित सरकारी अधिकार्‍यांकडून ते पैसे वसूल का करू नयेत?

पण ते निवडून तर आले ना? बाकी कॅग वगैरे गेले झालनात!
म्हणून तेव्हाचे सगळे मंत्री आणि संबंधित सरकारी अधिकार्‍यांकडून ते पैसे वसूल का करू नयेत?>>> हे पैसे ते कुय्हून आणणार?

निर्णय घेताना अक्कल जिथे ठेवली होती, तिथून.
स्वतः कडचे कमी पडले तर पक्षनिधीतून
अधिकार्‍यांची संपत्ती कमी पडली तर निवृत्तीनिधीतून .

ह्या लाडक्या भावांनी 21 कोटी हडप केलेत. अपात्र असलेल्या बहिणींच्या घशात किती कोटी गेले असतील. हे सर्व पैसे कोणाच्या खिशातून काढणार ? 1 कोटी 40 लाख रुपये मिळाले नाहीत म्हणुन कंत्राटदाराने आत्महत्या केली
Submitted by भ्रमर on 27 July, 2025 - 13:41
तुरुंगात वगैरे पाठवणार नाही का? हेच ते शिक्षेचे अपुरेपण इत्यादी...
रुंमेश चे ७८६!

आणि तरीपण आमचा देवभाऊ प्रामाणिकतेचा पुतळा आणि भाजप अखंड ब्रम्हाण्डमधली प्रामाणिक पार्टी

उधोबांच्या पक्षातले खासदार फुटीच्या वाटेवर आहेत.
नुकतीच मातोश्री इथे घरकोंबडा बनलेल्या उधोबांच्या घरी खासदारांची बैठक झाली. तिथे उधोबाच्या राजदरबारात सर्व खासदारांनी आपली निष्ठा उधोबाराजेंच्या चरणी ठेवली तेव्हाच स्पष्ट झाले होते की ह्यातले अनेक फुटून जाणार ! Happy Happy Happy

थोरल्या पवारांनी संजय राऊत नामक धुरंधर उधोबांच्या आतील गोटात घुसवून शिवसेनेचा पार नायनाट करून टाकायचा असा विडा उचलला होता तो थोरल्या पवारांच्या हयातीतच खरा होताना दिसत आहे.
उधोबांचे हिंदुत्वाची झूल उतरवून हिरवी सेक्युलर झूल पांघरण्याचे प्रयोग प्रचंड यशस्वी होताना दिसतायत!

उद्धव ठाकरे म्हणत आहेत, ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे.
=====
आज प्रथमच टीव्हीवर संजय राऊत यांचा चेहरा किंचित रडवेला दिसला. वाईट वाटले. शिवराळ भाषा तर खुद्द हिंदुहृदयसम्राट यांच्याही तोंडी अधूनमधून असायची. राऊतांनी प्रचंड आंतरजालीय टीका, तुरुंगवास, प्रसंगी शारीरिक वेदना सहन करूनही पक्षाची साथ सोडली नाही. त्या प्रक्रियेमध्ये थोरले पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते यांच्याबद्दलही ते चांगलेच बोलले. काही प्रमाणात त्यांच्या अघळपघळ वक्तव्यांमुळे उबाठा गट अडचणीतही आला. पण संजय राऊत ठाम राहिले. शरद पवारांनी व काँग्रेसमधून फुटलेल्या सर्वांनी आपापले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावेत हा सल्लाही त्यांनी दिला. महाराष्ट्रातील राजकारणी व महाराष्ट्रातील सामान्य जनता या नेत्याने समाजासाठी व राजकारणातील सांस्कृतिक समृद्धीसाठी दिलेल्या योगदानाला व त्यागाला कायम स्मरणात ठेवेल.

काळ बदलला आहे, आज काल लोकं मुलांनी सुपरमार्केट मधून उचलेगिरी करुन गोष्टी घरी आणल्या तरी पालक त्यांचं 'मास्टर स्ट्रोक' म्हणून कौतूक करतात...न्यू एज ऑफ प्रॅक्टिकल पेरेंटीग...पण चोरी ती चोरीच, संबोधनं बदलून कृतींचे अर्थ बदलत नसतात, अशा पालकांसाठी नसेल कदाचित पण त्यांना पहात आपल्या जिवनमुल्यांचे प्राथमिक धडे गिरवणाऱ्या, व त्या पायावर पुढे आपले जिवन उभारणाऱ्या त्यांच्या पाल्यांसाठी केवळ आणि केवळ कणव वाटते. कारण ते एक 'माणूस' म्हणून पुढे समाजात ज्याप्रकारे वावरतील त्यात त्यांचा खचितच दोष नसेल.

राऊतांनी प्रचंड आंतरजालीय टीका, तुरुंगवास, प्रसंगी शारीरिक वेदना सहन करूनही पक्षाची साथ सोडली नाही.

पक्ष ठार बुडेपर्यंत सोडायचं नाही अशा सूचना आहेत त्यांना.

थोरल्या पवारांनी संजय राऊत नामक धुरंधर उधोबांच्या आतील गोटात घुसवून शिवसेनेचा पार नायनाट करून टाकायचा असा विडा उचलला होता

>>>> मिंध्ये गटाला गुवाहाटीला घेऊन तेच गेलेले ना!

भाजपा ने ज्या ज्या प्रादेशिक पक्षांशी युती/ आघाडी केली त्या त्या सर्व पक्षांची स्थिती काय आहे हे जरा डोळे उघडून बघा

साप साप म्हणून भुई थोपटणे बंद करा

>>
मिंध्ये गटाला गुवाहाटीला घेऊन तेच गेलेले ना!
<<
पहिला दगा उधोबा आणि राऊतने केला. ज्या हिंदुत्वाने त्यांना सत्ता दिली ज्या युतीने त्यांना सत्तेवर बसवले त्या युतीला खोटे कारण देऊन भंग केले. हिंदुत्वाला सोडले. दाराआड मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिल्याचे खोटे कारण सांगत युती तोडली आणि त्यानंतर सगळे रामायण महाभारत घडले हा इतिहास आहे. भाजपने अशा प्रकारे पाठीत खंजीर खुपसल्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली. ती प्रतिक्रिया होती. सूड होता. उधोबाने युतीचा धर्म सोडल्यावर भाजप काही सर्व नियम पाळून धर्मयुद्ध खेळायला बांधील असण्याचे कारण नव्हते.

शरद पवार यांनी संजय राऊतला तयार करून हा सगळा बनाव केला आहे. जेणेकरून उधोबा सेना पार नष्ट व्हावी. अर्थात त्यांच्याही पक्षाची फार चांगली स्थिती नाहीच.

संजय राऊतांनी त्यांच्या खासदारांच्या फुटून जाण्यावर प्रतिक्रिया देताना ते फुटीर लोक साले भो**** आहेत अशी एक सुसंस्कृत शिवी देऊन आपली पातळी अधिकच उंचावली!
हरामखोर, चु* वगैरे शब्द पत्रकार परिषदेत वापरण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहेच. आता शिरपेचात एक नवा तुरा खोवला आहे!

ban.jpghttps://x.com/NavnathBanBJP/status/2067143855502401623

उद्धव ठाकरेंकडे साडे नऊ लाख कोटी कोटी आहेत, तरी त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लागत नाही?

लोक विचारताहेत, लाख कोटी मध्ये किती शून्य?
--
२०१९ च्या रडगाण्याला अनेक वेळा उत्तर देऊन झालं आहे. शिवाय भाजपने अचानक राष्ट्रपती राजवट मागे घेऊन फडणवीसांनी पहाटे अजित पवारांसोबत शपथ घेतली , तेव्हाच भाजपायींनी उद्धव ठाकरेंना काहीही म्हणायचा हक्क गमावला.
आपण ज्याला नॅचरली करप्ट पार्टी म्हटलं तो आपला नॅचरल पार्टनर आहे, हे फडणवीसांनी दोनदा करून दाखवलं.

१०५ लोकांना घरी बसवलं हि दर्पोक्ती करणार्यांना त्यातला एकही फुटला नाही हे दिसत नाही( बघायचंच नसतं).

मी पुन्हा येईन म्हणता म्हणता ते आले सुद्धा अगोदर अडीच आणि आता पाच वर्षे सत्तेत बसले आहेत.

आणि तेल लावलेला पहिलवान आपला पक्ष आपल्या सारखाच जराजर्जर होऊन उभा फुटला हे पाहत दिवस कंठत आहे.

आणि

वडिलांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिलेले उद्धव ठाकरे अजान स्पर्धा भरवताना आपला पक्ष धुळीला मिळतो आहे हे पाहण्या व्यतिरिक्त काहीही करू शकत नाहीत.

बाकी भाजप एका मागून एक राज्ये जिंकत चाललेले पाहून त्याच आठ दहा मोरू( मोदी रुग्ण) लोकांची तडफड प्रत्येक धाग्यावर मायबोलीवर व्यक्त होताना गेली काही वर्षे पाहतोय.

मग ईडी, आयकर, सी बी आय, निवडणूकआयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या नावाने शिमगा करणे सोडून त्यांच्या हातात काहीही नाही

बरं आहे अन काय?

>>
२०१९ च्या रडगाण्याला अनेक वेळा उत्तर देऊन झालं आहे.
<<
साधे उत्तर आहे उधोबाने सत्तेच्या मोहासाठी युतीशी, हिंदुत्वाशी दगाफटका केला आणि त्यानंतर घडलेली सर्व अधर्मकृत्ये ही ह्या पहिल्या अधर्माची प्रतिक्रिया आहे. यात औट घटकेचे फडणवीस अजितदादा सरकार येते, गुवाहाटी येते, राष्ट्रवादीची फूट येते आणि खासदार पळवापळवी येते.
पण पहिली कुरापत उधोबाचीच. जसे महाभारतात कौरवांनी द्रौपदीचे वस्त्रहरण केले म्हणून कुरुक्षेत्र घडले तसेच.

केंद्रात भाजपचं सरकार नसतं तर १०५ मधले किती फुटले असते ते जगाने पाहिलं असतं... आणि सत्ताधार्यांनी तर आता देव पाण्यात ठेवूनच राहावे, कारण ज्या दिवशी केंदातून सत्ता जाईल त्या दिवशी पक्षातून किती फुटतात आणि रस्त्यावर किती यात चढाओढ लागेल हे नक्की.

दाराआड मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिल्याचे खोटे कारण सांगत युती तोडली
>>>> हे तुम्हाला अमित शहाने सांगितलं का?

कोण पलटीबहाद्दर आहे हे माहीत आहे सगळ्यांना.
युतीत असताना मिंधे राजीनामा खिशात घेऊन फिरायचे, फडणवीसांनी माझा कट्टा वर आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, काही झालं तरी राष्ट्रवादीशी युती नाही हे छातीठोकपणे सांगितल होतं, त्यांनाच घेऊन पहाटे शपथविधी उरकला.

जाऊ द्या हो. भाजपने एखादी निवडणूक जिंकली किंवा पक्ष फोडला की या लोकांना बोलायची संधी मिळते. बोलू द्या त्यांना. इतर वेळी भाज पच्या कारभारावर काय बोलणार ते?
लाडक्या बहिणींच्या नावावर जो भ्रष्टाचार केला आणि राज्याला दिवाळखोरीकडे ढकललं त्यावर बोलतील की राज्यातल्या कायदा सुव्यवस्था स्थितीबद्दल?

देव बुडवायचा मक्ता आमच्याकडे नाही....असो, जे बोललो त्यातील तथ्याची भिती आहे मनात कुठे तरी कोपऱ्यात, ती रहू द्या तशीच...आणि सर्व वेळ नुसती गंमत पहाण्यात घालवली तर ऐन प्रसंगी वरचे सगळे झोला उठाके पसार होतील आणि नुकतेच फुल पॅंटीत आलेल्यांची, हाफ पॅन्ट सोडा लंगोट सुटेस्तोवर दाणादाण होईल. Biggrin

है शाबास

आले आले सगळे

धुळवड सुरु

```````````

Pages