Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
कोण मला समजावून सांगेल का?
कोण मला समजावून सांगेल का? नक्की विरोध कशासाठी आहे.
थोडा वेळ असं समजू की बिहार आणि उत्तर प्रदेश ही दोनच राज्ये गायपट्ट्यात येतात.
सध्याचं गणित :
- बिहार : 40 जागा
- उत्तर प्रदेश : 80 जागा
- एकूण : 120 जागा
- लोकसभेच्या एकूण जागा : 543
म्हणजे 120 ÷ 543 × 100 = 22.10%
आता समजा, सर्व राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये सरसकट 50% वाढ केली.
50% वाढीनंतर :
- बिहार : 60 जागा
- उत्तर प्रदेश : 120 जागा
- दोन्ही मिळून : 180 जागा
- लोकसभेच्या एकूण जागा : 814.5 (अंदाजे 815)
म्हणजे 180 ÷ 814.5 × 100 = 22.10%
म्हणजेच, जागा वाढल्यानंतरही बिहार आणि उत्तर प्रदेशचा लोकसभेतील टक्केवारीचा वाटा जवळपास तसाच राहणार.
मग सरसकट 50% जागा वाढवल्याने दक्षिणेकडील राज्यांचा लोकसभेतील संख्यात्मक प्रभाव कमी कसा होणार?
माझा प्रश्न एवढाच आहे की, जर सर्व राज्यांना समान प्रमाणात 50% जागा वाढवल्या जात असतील, तर दक्षिणेकडील राज्यांचा विरोध नेमका कशासाठी आहे?
मतदारसंघ वाढल्यामुळे मतदार संघ पुनर्रचना होईल. पण केवळ ह्याचं कारणा साठी विरोध योग्य वाटतं नाही.
महिला आरक्षण विधेयकhttps:/
महिला आरक्षण विधेयक
https://www.maayboli.com/node/88159
महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली परिसीमनच करायचं होतं.
त्याच धाग्यावरून
Naidu ji, let’s try a thought experiment. Say your salary is 2 lakhs and your driver’s is 20,000. You announce a 50% increase for everybody. Your salary is now 3 lakhs and your driver’s is 30,000. The percentage or proportional increase is the same — but aren’t you much better off than your driver, than you used to be?
That’s what your fellow Southern CMs are concerned about. You don’t think there’s any difference between UP’s 80 MPs today versus Kerala’s 20 MPs, if it tomorrow becomes 120 vs 30? Some proportionate difference, huge difference in political weight — with 90 more UP MPs against 10 more Kerala MPs. Is that of no concern to you at all? शशी थरूर
जागा वाढल्याने पक्षाचा खर्चही
जागा वाढल्याने पक्षाचा खर्चही वाढला. छोटे प्रादेशिक पक्ष हा वाढीव खर्च करूच शकणार नाही , सत्ताधारी पक्षाकडे पैशाची समस्या नाही. पैशाच्या जोरावर सत्ताधारी पक्ष प्रादेशिक पक्षांना संपवून टाकेल. दक्षिणेकडे प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहे ते संपुष्टात येईल.
१२ /१३ निवडलेले उमेदवार
१२ /१३ निवडलेले उमेदवार म्हणजे पूर्ण बहुमत नाही. म्हणजे अध्यक्ष निवडायला त्यांच्या एका बाइलॉप्रमाणे बहुमत नाही .तिढा आहे. हौ. सोसायटीच्या बाइलॉजमध्ये किंचिंत फरक आहे. जुना अध्यक्ष नव्या कमिटीसाठी सभेची नोटिस लावतो. सर्व जमतात. नवे निवडलेले उमेदवार त्यांच्यातल्या एकाला अध्यक्ष निवडतात. जुना अध्यक्ष नव्या अध्यक्षाकडे सर्व रेकॉर्ड, नोंदवह्या, सभासद रजिस्टरं, शिक्के, बँकबुकं हस्तातंतरण करतो. नवीन उमेदवार नव्या अध्यक्षाच्या अनुमतीते त्यांचे पदाधिकारी निवडतात, काम समाप्त. त्या दिवसापासून नवीन कार्यकारिणी ( मॅनेजिंग कमिटी)काम करू लागते. निर्णय घेते.
गोकुळमध्ये १३ पैकी एकजण अध्यक्ष झाल्यावर उरले बारा.
कोणत्याही ठरावावर निर्णयावर मतदान झाले तर दोन्ही पक्षांचे बारा बारा उमेदवार मतदान करतील आणि अडचण येईल म्हणून संख्याबळ १४-११ किंवा १५-१० हवे..
अध्यक्षाला मतदानाचा अधिकार
अध्यक्षाला मतदानाचा अधिकार नसतो.
शशी थरूर यांनी फक्त
शशी थरूर यांनी फक्त खासदारांची निरपेक्ष संख्या (Absolute Numbers) पाहिली आहे. पण त्याच वेळी लोकसभेच्या एकूण जागाही 50% वाढणार आहेत, हे त्यांच्या उदाहरणात लक्षात घेतलेलं नाही.
उदाहरणार्थ, आज उत्तर प्रदेशचे 80 आणि केरळचे 20 खासदार आहेत. म्हणजे 543 सदस्यांच्या लोकसभेत यूपीचा वाटा 14.73% आणि केरळचा 3.68% आहे.
आता सरसकट 50% वाढ केली, तर यूपीचे 120 आणि केरळचे 30 खासदार होतील. पण लोकसभेच्या एकूण जागाही 543 वरून सुमारे 815 होतील. त्यामुळे यूपीचा वाटा 14.73% आणि केरळचा 3.68% च्या आसपासच राहील.
यूपी आणि केरळमधील खासदारांच्या संख्येतील फरक 60 वरून 90 होईल. पण संपूर्ण लोकसभेची सदस्यसंख्याही 50% वाढलेली असेल. त्यामुळे केवळ हा संख्यात्मक फरक वाढला म्हणून यूपीची संसदेतील सापेक्ष ताकद वाढली आणि केरळची कमी झाली, असं म्हणता येणार नाही.
शशी थरूर यांनी दिलेलं पगाराचं उदाहरणही पूर्णपणे लागू होत नाही.
समजा तुमचा पगार 2 लाखांवरून 3 लाख झाला आणि ड्रायव्हरचा पगार 20 हजारांवरून 30 हजार झाला. पण त्याच वेळी महागाईही 50% वाढली, तर दोघांच्या खरेदीशक्तीत कोणताही बदल होणार नाही. पगारातील संख्यात्मक फरक वाढला असला, तरी सापेक्ष आर्थिक स्थिती बदललेली नाही.
अगदी तसंच, सर्व राज्यांच्या जागा समान प्रमाणात वाढत असतील, तर केवळ खासदारांच्या संख्येतील फरक वाढला म्हणून दक्षिणेकडील राज्यांचा लोकसभेतील सापेक्ष प्रभाव कमी झाला, असं म्हणता येणार नाही.
मतदार संघ लहान झाले तर लहान सहान पक्षाचा फायदाच आहे. लहान मतदार संघामुळं त्यांची होणारी पळा पळ कमी होईल. खासदारालाही लहान मतदार संघ लक्ष ठेवायला बरा पडलं.
एव्हढं गुणाचं आणि अन्य छोट्या
एव्हढं गुणाचं आणि अन्य छोट्या पक्षांचं भलं करणारं बिल मोदी शाह ने आणलं यासाठी त्यांचे चरण धुवून तीर्थ प्राशन करायला हवं.
आहे तेवढ्या आमदार खासदारांची
आहे तेवढ्या आमदार खासदारांची बीले भरताना, त्यांच्या पेन्शन्स आपल्या करातून देताना देशाच्या करदात्यांना जबरदस्त फटका बसतोय. असले व्ही आय पी आणखी वाढवून देशाचा काय फायदा होणार आहे?
खासदारांची संख्या सरसकट
खासदारांची संख्या सरसकट पन्नास टक्के वाढवली की 50 ते 100 झाले, 60 चे 120 झाले हे सगळं मान्य.
पण याने खासदारांचे संख्या नक्कीच जास्त होणार आहे.
याचाच अर्थ पक्षामध्ये किंवा एखाद्या फॅमिली मध्ये बऱ्याच इच्छुक लोकांना खासदारकीची समान संधी मिळेल. ते आपापसात ठरवतील हा प्रांत माझा तो प्रांत तुझा. आणि सर्वांच्या संधीची सोय झाली ना. त्यामुळे वर्षानुवर्षे वाट पाहायची वेळ येणार नाही त्यांच्यावर. फायदा खासदार आणि त्यांच्या राजकारणात येऊ घालणाऱ्या फॅमिलीचाच आहे. फायदा प्रस्थापित राजकीय घराण्याचाच होईल. त्यांच्या पुढच्या पिढ्या (वारसदार ) व कार्यकर्ते (कामगार) यांच्यामध्ये संधीचा समान वाट करता येईल.
यामुळे महायुती, महाविकास आघाडी यासारख्या जॉईंट पक्षांमध्ये सर्वच पक्षांना समान संधी मिळणार. आणि युती टिकवता येतील. तिथली पण चलबिचल संपेल.
रात्रीच्या चांदण्यात शशी थरूर
रात्रीच्या चांदण्यात शशी थरूर यांच्या ट्वीटमधले ५०% दिसले नाहीत. मोदीं शहांनी डोळ्यांत अंजनच तसं घातलंय.
संसदीय लोकशाहीत बहुमतालाच महत्त्व असतं. आणि म्हणून अॅब्सोल्यूट नंबरच महत्त्वाचा.
गायपट्ट्यातल्या जागा वाढल्या की भाजपला घटनेत मूलभूत बदल करायला रान मोकळं.
मुळात जनगणनेनंतर डिलिमिटेशन करायचं भाजपनेच ठरवलं होतं, आताच काय घाई आहे?
राचा
राचा
एक ची दुप्पट दोन होते. ५० ची १०० होते. टक्केवारीने दोघांचेही दोनशे पट वाढले असले तरी. बहुमताला ४०८ लागतात. त्यातले ७६% पाच राज्यातून आले. नॉर्थ ईस्ट, झारखंड, छत्तीसगढ, प. बंगाल. जम्मू काश्मीर, लडाख, ओरिसा आणि महाराष्ट्र शिल्लक आहेत. दक्षिणेची बार्गेनिंग पावर कमी झाली आहे. पुढे या बिलाला अॅमेंडमेंट होईल आणि २९२१ च्या जनगणेनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात जागा ठेवल्या जातील हीच भीती आहे.
राज अज्ञानी, काहीतरी गफलत
राज अज्ञानी, काहीतरी गफलत होतेय असं वाटतंय. तुम्ही काढलेला 76% चा आकडा दोन्ही परिस्थितींमध्ये सारखाच राहायला पाहिजे, जर सर्व राज्यांच्या जागा सरसकट 50% वाढवल्या जात असतील तर.
समजा, बिहार आणि उत्तर प्रदेश ही दोनच राज्ये गायपट्ट्यात धरू.
Delimitation पूर्वीचं गणित :
- बिहार : 40 जागा
- उत्तर प्रदेश : 80 जागा
- एकूण : 120 जागा
- लोकसभेच्या एकूण जागा : 543
- बहुमतासाठी आवश्यक जागा : 272
म्हणजे (40 + 80) ÷ 272 × 100 = 44.12%
अर्थात, बहुमताच्या आकड्याच्या 44.12% जागा गाय गायपट्ट्यातील राज्यांकडे आहेत.
आता सरसकट 50% वाढीनंतरचं गणित पाहू :
- बिहार : 60 जागा
- उत्तर प्रदेश : 120 जागा
- एकूण : 180 जागा
- लोकसभेच्या एकूण जागा : अंदाजे 815
- बहुमतासाठी आवश्यक जागा : अंदाजे 408
म्हणजे (60 + 120) ÷ 408 × 100 = 44.12%
म्हणजेच, सरसकट 50% वाढीनंतरही बहुमताच्या आकड्याच्या तुलनेत बिहार आणि उत्तर प्रदेशचा वाटा बदलत नाही.
हाच नियम दक्षिणेकडील राज्यांनाही लागू होतो. सर्व राज्यांच्या जागा समान प्रमाणात वाढवल्या, तर त्यांच्या लोकसभेतील जागांचा आणि बहुमताच्या आकड्याचा परस्पर संबंध बदलत नाही.
जर Delimitation लोकसंख्येच्या आधारावर केलं तर मात्र पूर्ण गणित बदलेल.
खरी गोम मतदार संघ कोणते आणि
खरी गोम मतदार संघ कोणते आणि कसे तोडणार यातच आहे, आणि कॉंग्रेसला हे पुरते ठावूक आहे. जर लोकसंख्येच्या निकषावर विभाजन करायचे असे असेर तर ग्यानेश ने एस आय आर आधिच भाजपाच्या दावणीला बांधली आहे, जे मतदारसंघ विरोधकांचे बलस्थान आहेत तिथून जास्तीत जास्त मतदार वगळून ( निदान निवडणूकींच्या तोंडावर, निवडणूका झाल्त्यांयावर मतदारांची पात्रता पुनर्स्थापित केलीही जाईल) त्यांना विभाजनाच्या पात्रतेच्या बाहेर ढकलने तितकेसे कठीण नाही. मणजे विरोधकांचे बल असलेले मतदारसंघ तेवढेच रहाणार आणि भाजपचे पुरेसे वाढणार, हे समजायला फार काही राजकीय विश्लेषक असण्याची गरज नाही.
भरमसाठ सभासद वाढल्यावर
भरमसाठ सभासद वाढल्यावर त्यांचा पगार, भत्तेही अफाट वाढतील. खर्च करण्याचा निधीही वाढेल. खासगी उद्योगच पैसे देतात पक्षांना त्यांच्या मागण्याही वाढतील.
आणखी एक मुद्दा - सदनात तोंड न उघडणारे, झोपा काढणारे, मोबाईलवर गेम खेळणारे यांची टक्केवारीही वाढेल.
यापेक्षा प्रत्येक राज्यांतून उठसूठ दिल्लीवारी करणाऱ्यांनी फोन कॉल्स\ कान्फरन्सने कामे करावीत. दिल्लीतल्या मुख्यालयातल्या पक्षश्रेष्टींना भेटायला दहा पंधरा जणांनी जाण्यापेक्षा त्या पक्षश्रेष्ठींनी राज्यात जावे. हीच संख्या चाळीसवर जाईल.
मला एक कळत नाही - इथल्या
मला एक कळत नाही - इथल्या सर्व मोदी विरोधकांनी जर असं गृहीतच धरलेलं आहे कि मतांची चोरी करून किंवा इ व्ही एम हॅक करून भाजप मतं मिळवतो आणि निवडणूका जिंकतो.
जसे झिया उल हक़ यांनी ९७.८ % मते मिळवून राष्ट्रपतीपदाचे सार्वमत जिंकले होते किंवा पुतीन हे ८७ % मते मिळवून राष्ट्राध्यक्ष झाले होते.
मग मोदी विरोधकांच्या विचार सरणी प्रमाणे हे डीलिमिटेशन किंवा तत्सम भंपक गोष्टी करायची आवश्यकता का असावी. इतका दुटप्पी पणा?
याचा सरळ अर्थ असा आहे कि मतांची चोरी होते किंवा ए व्ही एम हॅक करता येतात याबद्दल कितीही टाहो फोडला तरी त्यांना स्वतः:ला ते सपशेल असत्य आहे हे माहिती आहे.
असो
अरण्यरुदन चालू द्या.
इथल्या सर्व मोदी विरोधकांनी
इथल्या सर्व मोदी विरोधकांनी जर असं गृहीतच धरलेलं आहे कि मतांची चोरी करून किंवा इ व्ही एम हॅक करून भाजप मतं मिळवतो आणि निवडणूका जिंकतो.>>> २००९ ते २०१४ लालकृष्ण अडवाणी, जी व्ही एल नरसिंहराव ( अध्यक्ष) आणि भाजपाचा आयटीसेल काय म्हणत होता? सर्वोच्च न्यायालयात ते कुठल्या मुद्द्यावर गेले होते? ते खोटारडेपणाचं लक्षण होतं का?
पुण्यात कोर्टाबाहेर पोलिस
पुण्यात कोर्टाबाहेर पोलिस बंदोबस्त असताना दिवसाढवळ्या हत्या. आरोपी शांतीदूत होते का ? गृहमंत्री काय करत आहेत ?
पुणेकरांचा हेवा वाटावा अशी
पुणेकरांचा हेवा वाटावा अशी आणखी एक घटना.
पुण्यात कोर्टासमोर फायरिंग करून कोयत्याने वार केलेत
कुणाचे तरी माहेरघर
कुणाचे तरी माहेरघर
ती कुणीतरी सासरी गेलीय
ती कुणीतरी सासरी गेलीय केव्हाच
जिवंत हाडामासाच्या भाजप
जिवंत हाडामासाच्या भाजप समर्थकांशी डिलिमिटेशनच्या विषयावर वादविवाद झाला. वाद झाला असे म्हणत नाही. त्यांना बहुमताच्या ७६% ही आकडेवारी लगेच समजली. कारण ही चर्चा बंदीस्त (म्हणजे दहा बारा जणात) होती आणि ती बाहेर कुणाला दिसण्याची, ऐकू येण्याची शक्यता नव्हती. सोशल मीडीयात हेच भाजपचे समर्थक समोरचा काय बोलतो याच्या पेक्षा जग काय वाचतेय, ऐकतेय हे ध्यानात ठेवून वावरत असतात. त्यामुळं मुद्दलालाच ते अडून बसतात. त्यांना तसेच सोडून द्यावे. आता पूर्वी सारखे झापडण्यात अर्थ नाही हे कळून चुकले आहे. कारण तुम्ही कितीही आपटा ते समजून घेणारच नसतात.
तर मुद्दा असा आहे कि पूर्वी ५४० खासदारांमधे प्रत्येक सदस्याला देण्यात येणारा वेळ कमी झाला होता. आता ८००+ (नेमका आकडा गुलदस्त्यात) झाल्यानंतर काय होणार?
माझं म्हणणं कि संसदेचा वेळ वाढवला पाहीजे आणि अधिवेशन तेव्हढा वेळ चालवण्याची जबाबदारी सरकारवर टाकली पाहीजे. म्हणजे सरकारने स्वतःहून अधिवेशन गुंडाळल्यास सरकार बरखास्त केले पाहीजे असा कायदाही त्यात घाला. तर भाजप समर्थक म्हणतात कि आताही काही सदस्यांना कमी वेळ मिळतोच. पण दीडपट खासदार झाल्यानंतर तोंड उघडल्या उघड्ल्या खाली बसावे लागेल हे लक्षात आणून दिल्यावर ते म्हणाले , "त्यात काय! आताच्या ५४० सदस्यांइतके प्रभाग पडून प्रभागाला वेळ द्यायचा"
मी म्हटले मग त्या पेक्षा ५४० च खासदार ठेवणे इष्ट नाही का?
हा एक भाग झाला. आता एक उदाहरण.
उद्या हिंदी सक्तीचा विषय आला. तर दक्षिणेच्या खासदारांची संख्या कमी भरणार. म्हणजे पूर्वीपेक्षा बिल हाणून पाडायला त्यांना तीनशेपेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा घ्यावा लागेल. जिथे संख्या जास्त तिथे खासदार जाणे हे स्वाभाविक असेल. म्हणजे दक्षिणेच्या राज्यांना बहुमत जुळवता जुळवता दमछाक होणार आहे. त्यांचे काहीच चालणार नाही. हिंदी सक्तीसारखी एकतर्फी विधेयके मंजूर झाली तर दक्षिण भारत भारतातून वेगळं होण्याची मागणी करणार नाही का?
टक्केवारीची भाषा फसवी आहे. संख्या जमवण्याचं गणित तोंडाला फेस आणणारं आहे. ज्या राज्यांची खासदार संख्या पूर्वी २ होती ते ३ होतील. तर ८० खासदारांची संख्या १२० होईल. १ ने झालेली वाढ आणि ४० ने झालेली वाढ हे टक्केवारीने योग्य वाटत असले तरी हा फरक लांघून जाणे सोपे आहे का?
ज्यांचे म्हणणे आहे कि ५०%
ज्यांचे म्हणणे आहे कि ५०% जागाच वाढणार आहेत त्यांना विनंती. त्यांनी या विधेयकाचा मसुदा (पब्लीक डोमेन मधे पब्लिश करावा लागतो तो) इथे द्यावा. टीका झाल्यानंतर सुळेंचं वक्तव्य असं आहे कि जर ५०% जागा वाढल्या तर... म्हणजे नक्की किती वाढणार हे त्या ही ठामपणे सांगत नाहीत. जर तर ही संशयास्पद भाषा आहे.
खासदार दुप्पट झाले तर सगळ्या
खासदार दुप्पट झाले तर सगळ्या खासदारांचे वेतन भत्ते निम्मे करणार का?
अपेक्षेप्रमाणे नवा मसुदा कुणी
अपेक्षेप्रमाणे नवा मसुदा कुणी दिलेला नाही. जर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच बिल पास करून घ्यायचं आहे तर किमान पंधरा दिवस आधी त्याचा मसुदा स्थायी समितीकडून मंजूर करून घ्यावा लागतो. त्या आधी तो पब्लीक डोमेन मधे टाकावा लागतो. यातलं काहीही झालं नाही याचा अर्थ काय?
कि त्याची बहुधा गरज नाही. म्हणजेच माझ्या आठवणीप्रमाणे पावसाळी अधिवेशन स्थगित करण्यात आलं होतं असं सरकारने सांगितलं होतं. याचा अर्थ ते अजून चालूच आहे. म्हणजेच नव्याने बिल मांडले जाणार नाही. म्हणजेच जुनेच बिल येणार आहे. अशा परिस्थितीत अमित शहांच्या आश्वासनाला काय अर्थ उरतो? तीन डिसेंबरच्या आत बिल पास केलं जाणार असेल तर ते जुनंच आहे हे शंभर टक्के. ५०% जागा सर्व राज्यांना ही दुरूस्ती कधी केली?
https://www.lokmat.com
https://www.lokmat.com/maharashtra/supriya-sule-son-in-law-sarang-lakhan...
मसुदा दिलेला नाही. सरकार
मसुदा दिलेला नाही. सरकार ऐनवेळी काहीतरी फेकेल असे दिसते. % प्रकार फसवा आहे. कुठलेही विधेयक , कायदा संमत करताना संख्याबळ पाहिले जाते.
हेमंता bisvsarmaa म्हणतो खासदार संख्या वाढली की स्त्री खासदार पण वाढतील. भाजप स्वतः 50% स्त्री उमेदवार देतो का ?
केंद्रात शरद पवारांचा डाव आणि
केंद्रात शरद पवारांचा डाव आणि महाराष्ट्रात थयथयाट.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=v7mQOOe22Eo
पुस्तक
https://bookshub.co.in/dagabaaz/m-b-patil/B0D49S68Z3
Pages