Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रिएटरचं मी क्रिकेटीयर वाचलं
क्रिएटरचं मी क्रिकेटीयर वाचलं म्हटलं कोण ही,पहिल्यांदा नाव ऐकतेय.
पूजा दलालचे शाळेचे बोअर
पूजा दलालचे शाळेचे बोअर वाटतात मला, बाकी चांगले असतात. खान्देशी गर्लपण चांगली रील बनवते.
अग ती पुजा दलाल भन्नाट
अग ती पुजा दलाल भन्नाट क्रियेटर आहे, मी तिचे व्हीडिओ बघितलेत...फार मस्त करते.>>>+111.. मला पण आवडतात...
नेफ्लि वर मिलियन डॉलर सिक्रेट
नेफ्लि वर मिलियन डॉलर सिक्रेट नावाचा रिएलिटी शो आहे. सहज म्हणून बघितला आणि दोन्ही सीझन्स बघून संपवले. ट्रेटर्स टाइप कन्सेप्ट आहे साधारण पण मला मजा आली बघताना. ट्रेटर्स पण आवडते मला.
हनिमून से हत्या - झी ५
हनिमून से हत्या - झी ५
पहिले दोन भाग बघितले. पहिला भाग राज कुस्वाह, राजा रघुवंशी आणि सोनम. अगदी थाटामाटात लग्न आणि लग्नाचे खरे व्हिडीओ आणि खरे विधी असे सगळे दाखवले आहे. फोन रेकॉर्डिंग पण खऱ्या आहेत. राजाचे सगळे कुटुंब बोलले आहे, आई,वडील, दोन भाऊ. सोनमच्या घरचे काही समोर आले नाहीत. एक फर्निचरचं दुकान चालवणारी मुलगी त्या दुकानात काम करणाऱ्या नोकराच्या प्रेमात पडते जो तिच्यापेक्षा रंग, रूप, आर्थिक परिस्थिती कशातही बरोबरी करू शकत नाही. तो तिला सोनम दीदी म्हणत असतो आणि त्याच्या फोनमध्ये तिचा नंबर तसाच सेव केलेला असतो. राजा रघुवंशी खरोखर देखणा होता. मुलीकडचे लग्नाची घाई करतात आणि सोनम साखरपुडा झाल्यावर राजाशी फोनवर जास्त बोलतही नसते, या मुद्द्यावर तरी मुलाकडच्यानी तिचा नीट तपास करायला हवा होता. मुलगी, तिचा प्रियकर आणि तिचे आई वडील या सगळ्यात बिचारा राजा जीव गमावून बसला. सोनमचे वडील तिला निर्दोष सोडून द्यावे म्हणून अजून कोर्टात तिची बाजू मांडत आहेत. कशी हिम्मत होते हे सगळे करण्याची. मला राजासाठी फार वाईट वाटले.
दुसरी स्टोरी रील बनवणाऱ्या बाईवर आहे जिचे पस्तीस हजार फॉलोअर आहेत. तिच्या नवऱ्याला तिचे रील बनवणे पसंत नसते, त्याचे उत्पन्नही कमी असते, तो दारुही पीत असतो, अशा सगळ्या कारणामुळे ती त्याला मारून टाकते आणि त्याचा मृतदेह स्कुटरवर मध्ये बसवून घेऊन जाते आणि नदीत टाकून देते. हे खून करणारे आणि त्यांना मदत करणारे काहीतरी वेगळ्या मातीचे बनलेले असतात बहुतेक.
हे काय नवीन
हे काय नवीन
प्रिया बापटचा कपडेपट. कमालीचा फिटनेस दोघांचा. शुभांगी गोखलेचा अभिनय. उदय टिकेकर गोड बाबा. प्रिया आणि उमेशच्या स्वयंपाकघरातली नवीन फॅशनची भांडी. प्रियाने डिझाईन केलेले कपडे रोजच्या वापरासाठी न वाटता लग्न वगैरेसाठीच योग्य वाटले. छोटुसा गोडूला रेवण. लिव इन वाल्याना सहजासहजी घर भाडयाने न मिळणे. मस्त आहे सिरीज.
तस्करी पाहिली. (नेटफ्लिक्स)
तस्करी पाहिली. (नेटफ्लिक्स)
स्कॉलरशिपच्या पेपरात प्रश्न असायचे, तसं -
'अ'ला 'ब' पैशाची लालूच दाखवतो. 'ब' 'क'साठी काम करत असतो. 'क' स्वतः डबल एजन्ट असतो. 'क'चा पार्टनर 'ड' आणखी एका 'य'साठी काळे धंदे करत असतो. 'य'चा सहकारी 'र' 'अ'चा इन्फॉर्मर असतो. या सर्वांबद्दलची माहिती 'ल'ला असते. 'ल' 'ड' ला पैशाची लालूच दाखवतो. 'ड' ला अधूनमधून फोन येत असतात. त्यावरून तो स्मगलर्सचं रॅकेट भेदण्याचे प्लॅन करतो. तर स्मगलिंगची सुरुवात कुणी केली? - असं कोडं म्हणजे ही मालिका.
सुरुवात प्रॉमिसिंग वाटली होती. पहिल्याच एपिसोडला ५-७ तस्करांचं प्रोफाइल इ दाखवतात. नावांची लेबलं वगैरे. त्यामुळे वाटलं, की तस्करीसाठी ते कोणकोणती लफडी-कुलंगडी करतात आणि विमानतळावरचे कस्टम अधिकारी कसं काम करतात, त्यांच्या कामातले बारकावे, वगैरे पहायला मिळेल. अख्खी सिरीज त्या ५-७ तस्करांच्या केसभोवती फिरेल. असं वाटलं कारण नीरज पांडे.
पण तसं काही झालं नाही.
मालिका चकाचक, स्टायलिश करण्याच्या नादात हळूहळू कथानक सरधोपट व्हायला लागलं. डबल एजन्टपणाचा, इमानदारीचा, झटपट काळ्या धंद्यांचा सगळ्याचाच अतिरेक होत गेला.
लाँग कंटिन्युअस दृश्यांचाही अतिरेक झाला. कॅमेराची इतकी पॅनापॅनी की नंतर नंतर आपण सतत एका स्लो-मोशन मेरी गो राउंडमध्ये बसलोय असं वाटायला लागलं.
ती एअरहोस्टेस-कम-स्मगलर-कम-पोटेन्शियल गर्लफ्रेंड अजिबात आवडली नाही.
शरद केळकर बहुतेक शॉट्समध्ये एन्ट्रीला पाठमोरा उभा असलेला दाखवलाय. अल-डेरानामक वाळवंटी ठिकाणी विमानतळावरून बाहेर येतो तेव्हा अंगात वूलन कपड्यांचे ३-४ लेयर्स, गळ्यात स्कार्फ
स्टाइलच्या नावाखाली काहीही!
कोण कुणावर संशय घेतो, कोण कुणासाठी काम करतो, कोण पैसे खातो, कोण पैसे चारतो, सगळं रॅन्डम वाटायला लागतं.
'नीरज पांडे' यू टू!
Pages