Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रिएटरचं मी क्रिकेटीयर वाचलं
क्रिएटरचं मी क्रिकेटीयर वाचलं म्हटलं कोण ही,पहिल्यांदा नाव ऐकतेय.
पूजा दलालचे शाळेचे बोअर
पूजा दलालचे शाळेचे बोअर वाटतात मला, बाकी चांगले असतात. खान्देशी गर्लपण चांगली रील बनवते.
अग ती पुजा दलाल भन्नाट
अग ती पुजा दलाल भन्नाट क्रियेटर आहे, मी तिचे व्हीडिओ बघितलेत...फार मस्त करते.>>>+111.. मला पण आवडतात...
नेफ्लि वर मिलियन डॉलर सिक्रेट
नेफ्लि वर मिलियन डॉलर सिक्रेट नावाचा रिएलिटी शो आहे. सहज म्हणून बघितला आणि दोन्ही सीझन्स बघून संपवले. ट्रेटर्स टाइप कन्सेप्ट आहे साधारण पण मला मजा आली बघताना. ट्रेटर्स पण आवडते मला.
हनिमून से हत्या - झी ५
हनिमून से हत्या - झी ५
पहिले दोन भाग बघितले. पहिला भाग राज कुस्वाह, राजा रघुवंशी आणि सोनम. अगदी थाटामाटात लग्न आणि लग्नाचे खरे व्हिडीओ आणि खरे विधी असे सगळे दाखवले आहे. फोन रेकॉर्डिंग पण खऱ्या आहेत. राजाचे सगळे कुटुंब बोलले आहे, आई,वडील, दोन भाऊ. सोनमच्या घरचे काही समोर आले नाहीत. एक फर्निचरचं दुकान चालवणारी मुलगी त्या दुकानात काम करणाऱ्या नोकराच्या प्रेमात पडते जो तिच्यापेक्षा रंग, रूप, आर्थिक परिस्थिती कशातही बरोबरी करू शकत नाही. तो तिला सोनम दीदी म्हणत असतो आणि त्याच्या फोनमध्ये तिचा नंबर तसाच सेव केलेला असतो. राजा रघुवंशी खरोखर देखणा होता. मुलीकडचे लग्नाची घाई करतात आणि सोनम साखरपुडा झाल्यावर राजाशी फोनवर जास्त बोलतही नसते, या मुद्द्यावर तरी मुलाकडच्यानी तिचा नीट तपास करायला हवा होता. मुलगी, तिचा प्रियकर आणि तिचे आई वडील या सगळ्यात बिचारा राजा जीव गमावून बसला. सोनमचे वडील तिला निर्दोष सोडून द्यावे म्हणून अजून कोर्टात तिची बाजू मांडत आहेत. कशी हिम्मत होते हे सगळे करण्याची. मला राजासाठी फार वाईट वाटले.
दुसरी स्टोरी रील बनवणाऱ्या बाईवर आहे जिचे पस्तीस हजार फॉलोअर आहेत. तिच्या नवऱ्याला तिचे रील बनवणे पसंत नसते, त्याचे उत्पन्नही कमी असते, तो दारुही पीत असतो, अशा सगळ्या कारणामुळे ती त्याला मारून टाकते आणि त्याचा मृतदेह स्कुटरवर मध्ये बसवून घेऊन जाते आणि नदीत टाकून देते. हे खून करणारे आणि त्यांना मदत करणारे काहीतरी वेगळ्या मातीचे बनलेले असतात बहुतेक.
हे काय नवीन
हे काय नवीन
प्रिया बापटचा कपडेपट. कमालीचा फिटनेस दोघांचा. शुभांगी गोखलेचा अभिनय. उदय टिकेकर गोड बाबा. प्रिया आणि उमेशच्या स्वयंपाकघरातली नवीन फॅशनची भांडी. प्रियाने डिझाईन केलेले कपडे रोजच्या वापरासाठी न वाटता लग्न वगैरेसाठीच योग्य वाटले. छोटुसा गोडूला रेवण. लिव इन वाल्याना सहजासहजी घर भाडयाने न मिळणे. मस्त आहे सिरीज.
तस्करी पाहिली. (नेटफ्लिक्स)
तस्करी पाहिली. (नेटफ्लिक्स)
स्कॉलरशिपच्या पेपरात प्रश्न असायचे, तसं -
'अ'ला 'ब' पैशाची लालूच दाखवतो. 'ब' 'क'साठी काम करत असतो. 'क' स्वतः डबल एजन्ट असतो. 'क'चा पार्टनर 'ड' आणखी एका 'य'साठी काळे धंदे करत असतो. 'य'चा सहकारी 'र' 'अ'चा इन्फॉर्मर असतो. या सर्वांबद्दलची माहिती 'ल'ला असते. 'ल' 'ड' ला पैशाची लालूच दाखवतो. 'ड' ला अधूनमधून फोन येत असतात. त्यावरून तो स्मगलर्सचं रॅकेट भेदण्याचे प्लॅन करतो. तर स्मगलिंगची सुरुवात कुणी केली? - असं कोडं म्हणजे ही मालिका.
सुरुवात प्रॉमिसिंग वाटली होती. पहिल्याच एपिसोडला ५-७ तस्करांचं प्रोफाइल इ दाखवतात. नावांची लेबलं वगैरे. त्यामुळे वाटलं, की तस्करीसाठी ते कोणकोणती लफडी-कुलंगडी करतात आणि विमानतळावरचे कस्टम अधिकारी कसं काम करतात, त्यांच्या कामातले बारकावे, वगैरे पहायला मिळेल. अख्खी सिरीज त्या ५-७ तस्करांच्या केसभोवती फिरेल. असं वाटलं कारण नीरज पांडे.
पण तसं काही झालं नाही.
मालिका चकाचक, स्टायलिश करण्याच्या नादात हळूहळू कथानक सरधोपट व्हायला लागलं. डबल एजन्टपणाचा, इमानदारीचा, झटपट काळ्या धंद्यांचा सगळ्याचाच अतिरेक होत गेला.
लाँग कंटिन्युअस दृश्यांचाही अतिरेक झाला. कॅमेराची इतकी पॅनापॅनी की नंतर नंतर आपण सतत एका स्लो-मोशन मेरी गो राउंडमध्ये बसलोय असं वाटायला लागलं.
ती एअरहोस्टेस-कम-स्मगलर-कम-पोटेन्शियल गर्लफ्रेंड अजिबात आवडली नाही.
शरद केळकर बहुतेक शॉट्समध्ये एन्ट्रीला पाठमोरा उभा असलेला दाखवलाय. अल-डेरानामक वाळवंटी ठिकाणी विमानतळावरून बाहेर येतो तेव्हा अंगात वूलन कपड्यांचे ३-४ लेयर्स, गळ्यात स्कार्फ
स्टाइलच्या नावाखाली काहीही!
कोण कुणावर संशय घेतो, कोण कुणासाठी काम करतो, कोण पैसे खातो, कोण पैसे चारतो, सगळं रॅन्डम वाटायला लागतं.
'नीरज पांडे' यू टू!
इथे ऋ ने बहुतेक चिरैया बद्दल
इथे ऋ ने बहुतेक "चिरैया" बद्दल लिहिले होते ते वाचून आणि मरायटल रेप हा विषय असल्याने पाहून संपवली. हॉटस्टार वर आहे.
संपूर्ण द्रोणगिरी दिव्या दत्तानेच उचलला आहे. ती खूप छान काम करते, तिचा आवाजही डिस्टिंक्ट आहे. पहिले चार एपिसोड खूप खरे वाटतात नंतर दोन एपिसोड मला जरा नाट्यमय केल्यासारखे वाटले. तरीही एंगेजिंग आहे आणि मी एकादिवसात संपवली.
दिव्या दत्ता ही कमी शिक्षीत मोठी सून आहे, जिला पेपर वाचन म्हणजे " स्वयंपाकाच्या टिप्स" ही लुगाईची कामं हेच स्त्रीचे आयुष्य वाटत असते. अतिशय जुन्या विचारांची, प्रेमळ पण कुठेतरी विवेक असलेली वेगळीच भूमिका आहे. जसे विचार बदलतात तसे ती धैर्याने कबूल करून स्वतःत परिवर्तन आणत जाते. हे सगळं तिच्या धाकट्या जावेमुळे होत जाते. दिरावर प्रचंड विश्वास आणि विवाहानंतर अनुमती हा प्रकार किंवा एकंदरीतच हे जे आहे ती सगळी पुरुषसत्ताक पद्धती आहे ही अवेअरनेस तिला नसते पण हळूहळू येत जाते. कारण दिर लग्नाच्या पहिल्या रात्री पासून बायकोवर सतत बलात्कार करायला लागतो.
बऱ्याच वरवर वाटणाऱ्या गोष्टींचे मग ती स्वतःच परीक्षण करते कारण दिराला ह्या विचारांचे खतपाणी कुठेतरी तिच्याकडूनही मिळत गेलेले असते. सासरा संजय मिश्रा आहे, ह्याला समाजात प्रतिष्ठा आहे. जो उच्च अशा कविता करतो पण मुळात तोही स्त्रियांना कस्पटच मानत असतो. नवरा खूप चांगला आहे, त्याला चूक बरोबर कळतं पण त्याच्यात हिला साथ द्यायची, भावाला कोर्टात खेचायची धमक नाही. काही काही सीन्स फार सुंदर आहेत. इतकी सटल भिणलेली पेट्रियार्की , विषवल्ली कशी होत जाते हे दाखवणं जमलं आहे. एकदम निमशहरी भागातील वातावरण आहे. त्यामुळे हे अजून तीव्र आहे. जावेनेही चांगले काम केले आहे. अजून धक्कादायक बाब म्हणजे मरायटेल रेपला कायदा नाही, हुंड्याला आहे. कंसेंट आणि संमती शिवाय स्त्रियांना सहन करायला लावलेलं लैंगिक शोषण, एकंदरीत less human treatment हे कसं नॉर्मलाईज केले आहे ह्यावर उहापोह आहे. पण फार खोलात न शिरता बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केला. पाहून बघा.
हो, मी लिहिले होते चिरैय्या
हो, मी लिहिले होते चिरैय्या बद्दल. शेवट मलाही काहीतरी वेगळा बघायला आवडला असता. या गुन्ह्याबद्दल कायदा नाही तर किमान हे चारचौघांना सांगून त्यांचा गुन्हा जगजाहीर करू तसेच अवेअरनेस निर्माण करू हा शेवटामागचा विचार योग्य होता. पण आधी जशी सिरीज चालू होती त्यामानाने शेवटची मांडणी फिल्मी आणि प्रचारकी वाटली. त्या आधीचा दिव्या दत्ताच्या आत्मपरीक्षणाचा भाग आवडला होता.
अगदी अनुमोदन. शेवटाला पकडही
अगदी अनुमोदन. शेवटाला पकडही ढिली वाटली, सुरवातीला असणारे कन्व्हिक्शन पण घसरले. तरीही सिरीज आवडलीच. वेगळा विषय, वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.
द बॅड्स ऑफ बॉलिवूड -
द बॅड्स ऑफ बॉलिवूड -
तिसर्या एपिसोडला मला कंटाळा आला. बॉलीवूडवर सार्कॅस्टिक कमेंट्स भरपूर आहेत, पण सगळ्याचा एकसंध परिणाम जाणवत नाही. बर्याच बॉलिवूड 'स्टार्स'ना बळेबळे कथानकात घुसवलं आहे, एखाद-दुसर्या सीनसाठी, केवळ ठिगळ म्हणून सुद्धा - ते हळूहळू बोअर होतं.
अमेरिकेत पीकॉक वर "एम आय ए"
अमेरिकेत पीकॉक वर "एम आय ए" नावाची नवीन सिरीज आली आहे. थोडी पाहिली. सुरू केल्यावर पाच मिनिटांतच "टोटली हुक्ड"! जितकी पाहिली आहे त्यावरून तरी फुल रेको माझ्याकडून. थ्रिलर आहे. एम आय ए म्हणजे मिसिंग इन अॅक्शन आणि एम आय ए हे मायामीच्या विमानतळावरून मायामी करता शॉर्टफॉर्म, अशा दोन्ही अर्थाने असावे यात.
ती चिरैय्या मधील छोटी सुन
ती चिरैय्या मधील छोटी सुन प्रिया मराठे सारखी दिसते आणि आवाज पण तसाच आहे.
'बॅड्स ऑफ बॉलिवूड' नेटाने
'बॅड्स ऑफ बॉलिवूड' नेटाने बघितली. मध्ये कंटाळवाणी झाली, पण शेवटी ट्विस्ट चांगला आहे.
हिंदी मालिका, सिनेमे यांत सहसा असा शेवट दिसत नाही.
एकूणात, २-३ एपिसोड्स कमी असते, तर आणखी क्रिस्प झाली असती.
रेको चा फुल फॉर्म सान्गा
रेको चा फुल फॉर्म सान्गा बाबा मला एकदाचा, केव्हाची विचारीन विचारीन म्हणून मनात धरून ठेवलं होतं.
recommendation
recommendation
हो रेकमेण्डेशन. थॅंक्स ऋन्मेष
हो रेकमेण्डेशन. थॅंक्स ऋन्मेष.
एम.आय.ए. पुढेही ग्रिपिंग आहे. "ओझार्क" काढणार्यांपैकी एकानेच काढली आहे हे ही कळाले.
फारेन्ड, एम.आय.ए मी पण
फारेन्ड, एम.आय.ए मी पण बघायला सुरुवात केली लगेच. पहिला एपिसोडच झालाय अजून, पण इन्टरेस्टिंग वाटत आहे नक्कीच.
"ओझार्क" काढणार्यांपैकी एकानेच काढली आहे>>> ओझार्क च्या रुथ ला घ्यायला पाहिजे होतं मग! सूट झाली असती
झी-५ वर धनंजय ही सिरीज पाहीली
झी-५ वर धनंजय ही सिरीज पाहीली. छोटे भाग असल्यामुळे पाहवली गेली. नाहीतर यात सांगण्यासारखे काही नाही. आदिनाथ कोठारेचा अभिनय एकदम थंड वाटतो. कुणीतरी जबरदस्ती केली म्हणून या सिरीज मध्ये तो काम करतोय असे वाटले. (कोठारे व्हीजनचीच सिरीज आहे).
पुष्कराज चिरपुटकर म्हणजे या सिरीज मध्ये वॅटसन च्या भुमिकेत आहे. त्याचाही अभिनय थंड वाटतो. एकंदरीत ही सिरीज आवडली नाही. मुळात बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यजाल ही कादंबरीच बोअर असावी म्हणून ही सिरिज तशी बनली असावी नाहीतर हे दोघे चांगले अभिनेते आहेत. (पुष्कराज ला एकदा वस्त्रहरण नाटकाच्या प्रयोगानंतर भेटलो होतो. छान माणूस आहे. नाटकातही मास्तरांच्या भुमिकेत धमाल उडवली होती). काही जोक मात्र मस्त होते.
इथं सपने vs एव्हरीवन फॅन आहे
इथं सपने vs एव्हरीवन फॅन आहे का कुणी?? जबरदस्त सिरीज. मी फक्त प्रशांतचे लांबलचक प्रेम प्रकरण फॉरवर्ड करून करून बघितली. खास जिमी साठी. आता पुढच्या सिझनची उत्सुकता
योगी मला सुद्धा धनंजय फार
योगी मला सुद्धा धनंजय फार आवडली नाही. शेवटचे १-२ भाग तर फारच रटाळ.
सपने वर्सेस एव्हरिव न कुठे आहे?
सपने vs एव्हरी वन amazon
सपने vs एव्हरी वन amazon prime
Pages