Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माधुरी दीक्षितला अंजाममध्ये
माधुरी दीक्षितला अंजाममध्ये चणे की खेत मे गाणे मिळाले ज्याचे तिने सोने केले.>> +10000000 हो कसली भारी नाचालिय आणि दिसली आहे माधुरी ,सुंदरच.
शाहरुख आवडतो पण डर मध्ये नव्हता आवडला फार ओव्हरअँकटिंग केलीय .ते क...क....किरण तेव्हा फेमस झालं होतं मुलांमध्ये पण माझ्या डोक्यात जायचं . तसंही फेमस काहीही होतं ती तेरे नाम ची वियर्ड हेयरस्टाईल ही फेमस झाली होती पिच्चर पडला तरी.
माधुरी दीक्षितला अंजाममध्ये
.
तेरे नाम हेअरस्टाईल माझ्याही
तेरे नाम हेअरस्टाईल माझ्याही डोक्यात जायची
पण ठीक आहे आवडणारेही असतील.
ककक किरण तर अजरामर झाले आहे आणि यात शाहरुखने तो रोल एका वेगळ्याच उंचीला नेला याचा मोठा वाटा आहे. दुसऱ्या कोणी म्हटले असते तर ककक कल्पकतेला न्याय मिळाला नसता.
पण तोच टोन घेऊन शाहरुखची मिमिक्री करणारे मात्र फार बोअर करतात.
मिसेस देशपांडे सुरू केली आहे.
मिसेस देशपांडे सुरू केली आहे. माधुरी दीक्षितच्या चेहर्यावरचा पनीर, चीज चा थर चमकतो. त्या शानदार थरामुळे डोळ्यांना अवघडल्यासारखं होतंय. हेमामालिनी अजून चेहरा टिकवून आहे. पण हेमामालिनीचा आवाज खरखरीत कि माधुरीचा या स्पर्धेत कोण जिंकणार हे समजत नाही. मृणाल देव कुलकर्णीचा चेहराही अजून टवटवीत आहे. मराठी सिनेमा, मालिकात काम केल्यान मध्यमवर्गीय राहणीमानाचा परिणाम. ती काही म्हणाली नाही ने मजसी अमेरिकेला ने ने. अमेरिकन पिझ्झा मग बाकीचं काम करतोच.
खानावळ एकच नंबर. भाऊ भात घेताय ना ? असं वाटतंय कि लग्नातच जेवायला आलेत पहिल्या पंगतीचे मानकरी.
नवीन जोडप्यांना मूल होण्यासाठी टीप्स देणारे सदर चालवणार्या ताईच्या सल्ल्यापेक्षा भारी सल्ला मिसेस देशपांडे खून पाडण्यासाठी देत असतात. स्त्री पुरूष समानता अजून काय राहिली यायची ?
काय खून पाडतेय बाई, आपण तर आता फॅन झालो हिचे टाईप वातावरण आहे. हिला खूनश्री पदवी का नाही दिली शासनाने ? अधून मधून योगा साठी डमी वापरण्याऐवजी स्वत:च ती आसने केली असती तर डोळे बाहेर आले असते चेहर्यातून.
"फोर मोर शॉट्स.." चा जीवच
"फोर मोर शॉट्स.." चा जीवच मुळात छोटासा आहे. दाखवुन दाखवुन काय दाखवणार?
पण या वेळी तर इंटिमेट सीन्सचा सुद्धा कंटाळा आला. (माझं वय झालंय का सिरिजमध्ये ओव्हर केल्याने बोर झाले कळेना).
नेहेमीप्रमाणे पुन्हा पुन्हा फिरुन जोड्या जमवणे एवढाच खेळ आहे असे वाटले होते.
फक्त या सिझनमध्ये प्रत्येकीला चांंगले इमोशनल क्लोजर मिळाले आहे हा अगदीच सुखद धक्का होता माझ्यासाठी.
दुसर्या आणि तिसर्या सिझनमध्ये तो न मिळाल्याने मीच वैतागले होते.
The beast in me पाहून संपवली.
The beast in me पाहून संपवली. फार आवडली. मधला भाग थोडासा लांबला. पण overall शेवट आवडला.
मेरा नाम बोकलत है
मेरा नाम बोकलत है
आय कम इन पीस
में आपकी मदत करना चाहता हू
बऱ्या बोलाने समोर या
नाहीतर मी एकदा का भडकलो…
मिसेस देशपांडे ..
मिसेस देशपांडे ..
=========== स्पॉईलर असु शकतात=======================
आता सुरु केलीच आहे तर संपवलीच पाहिजे म्हणुन संपवली..
खुनी कोण याचा अंदाज साधरण चौथ्या एपिसोड मधे आला होता.. त्यामानाने जरा उशीराच ट्युब पेटली..अभ्यास कमी पडतोय..
दुसरा ट्वीस्ट उगीच ओढुन ताणुन होता.. आणि खरंतर त्या व्यक्ती ला मारण्यासाठी माधुरीने इतकी वर्षे का घेतली ? २५ वर्षांपुर्वी इतके घावुक प्रमाणात खून करत होती तेव्हा घरच्या घरी हे काम झालच असतं ना... पण असो...चाईल्ड अॅब्यूज, LGBTQ असे वेब्सिरीज चे सगळे चेकबॉक्सेस पूर्ण व्हायला हवेत ...
माधुरी २५ वर्ष जेलमधे कोणती ब्यूटी ट्रीटमेंट घेत असेल बॉ... चेहेर्यावर सुरकुती नाही की डोळ्याखाली काळी वर्तुळ नाहीत.. रोज सकाळी सुर्यनमस्कार केले की इतका फरक पडतो.. ? जेल की चक्की का आटा बराच हेल्दी दिसतोय
खानावळ ला खानावळी असं का म्हणतात सगळे मराठी लोक ? हिंदी लोक म्हणत असले तर ठीक पण मराठी लोक पण असं का म्हणत असतील ?
एकुण फारच मंद टीम दाखवली आहे पोलिसांची आणि सिबीआय ची.. आमच्या श्रीकांत तिवारी आणि जेके ला काम दिलं असतं तर जास्त फास्ट झालं असतं...
मिसेस देशपांडे संपवली.
मिसेस देशपांडे संपवली.
खूपच अतर्क्य आहे. विशेषतः नावे आणि कृती यांची सांगड लागत नाही. मिसेस देशपांडे अगदी कोल्हापुरी मटण बनवते तेही खटकलं.
आणि तिच्या चेहऱ्यावरचे मेकअप चे थर तर फारच खटकतात.
मला अजून एक अचाट कल्पना सुचली आहे ती म्हणजे..
माधुरीच्या नवऱ्याबद्दल कुणीच काहीच बोलत नाही. तर तो तेजस नक्की कुणाचा मुलगा???
येस... येस... यू गेस्ड इट राईट !!
म्हाताऱ्याला तेव्हाच का नाही खतम केले? आठव्यासोबत नववा काय जड होता?
<<<मिसेस देशपांडे अगदी
<<<मिसेस देशपांडे अगदी कोल्हापुरी मटण बनवते तेही खटकलं >>>
अशी एक वायरल पोस्ट वाचनात आली होती. पण कोणाला स्वयंपाक करायची आवड आहे आणि तोच व्यवसाय देखील आहे तर यात काही वावगे नसावे.
यावरून आठवले, मुंबईत चायनीज गाड्या नव्याने आलेल्या तेव्हा त्या ऑथेंटिक वाटाव्या म्हणून नेपाळी लोक कामाला ठेवली जायची
.
– स्पॉयलर –
<<< म्हाताऱ्याला तेव्हाच का नाही खतम केले? आठव्यासोबत नववा काय जड होता? >>>>
त्यात दाखवल्याप्रमाणे तिला तेव्हा शॉक बसलेला असतो. त्यातून तिला मानसोपचाराने बाहेर काढतात त्यात तिच्या सर्वच कटू आठवणी पुसल्या गेलेल्या असतात. जेव्हा आठ खून करून ती जेल मध्ये जाते तेव्हा पुन्हा तिची ट्रीटमेंट सुरू होते त्यात तिला उपचाराचा भाग म्हणून ते आठवायला लावतात.
माधुरी दीक्षितवरून हिंदीत
माधुरी दीक्षितवरून हिंदीत गेलेली मराठी नटी आठवली.
माझ्या काकाची ऑल टाईम फेवरीट. तो सांगायचा कि मुंबईत एकदा ती , शेखर सुमन आणि विशाल ददलानी यांना त्याने पाहिलं होतं. ददलानी पोरगेलासा असताना. काही दिवसांपूर्वी पाहिलं तर ती, विशाल ददलानी आणि शेखर सुमन त्याच्या टॉक शो मधे होते.
ओळखलंच असेल कोण ती.
मिसेस देशपांडे पाहिली
मिसेस देशपांडे पाहिली
फार काही ग्रेट नाही वाटली मला.
अश्या प्लॉट वरील खूपसे इंगजी चित्रपट आणि सेरीज पाहिल्याने फुसकी वाटंत गेली.
माधुरीची acting देखील दिसली नाही.
चेहरा वेगळाच वाटतोय आता तिचा.
मेकअप काहीतरी झोल करतोय त्यामुळे असेल.
Character बिल्ड नाही झाले.
असो.
आपली इंडियन dexter म्हणूया प्रोत्साहन द्यायला.
नागेश कुकुनूर दिग्दर्शक आहे
त्याने ह्याहून खूप उत्तम असे काम।केले आहे
कथा पटकथा जरा ढिसाळ वाटली।
स्पॉयलर......
स्पॉयलर......
तेजस फडके, म्हातारा फडके ( चेक्ड ऑन आय एम डी बी) आणि काकू मात्र देशपांडे. मुलाला बापाचं नाव आपल्याकडे लावतात. केस क्लोज्ड. सीझन टू नको.
बापरे! खरेच का अमितव?
बापरे! खरेच का अमितव?
नागेश कूकनूर म्हणले की city
नागेश कूकनूर म्हणले की city of dreams आठवते.. वेगवान पटकथा अन ऊत्तम डायरेक्शन
सिंगल पापा – नेटफ्लिक्स
सिंगल पापा – नेटफ्लिक्स
कोणी बघतेय का?
मी आता ६ पैकी ४ एपिसोड बघितले. फार गोड आहे. खूप आवडली. आणि विषय सुद्धा हृदयाच्या जवळचा आहे.
कुणाल खेमूचा अभिनय आवडतोच. यात परफेक्ट रोल मिळाला आहे त्याला. पूर्ण सिरीज त्याची एकट्याची आहे. बाकी सगळे सुद्धा परफेक्ट कास्ट आहेत. महत्वाचे म्हणजे ज्या गोष्टी प्रेडिक्टेबल किंवा स्टिरीओटाईप आहेत त्याला उगाच वेगळे दाखवायच्या नादात सांस्कृतिक धक्का देऊन त्याची वाट लावली नाहीये. तर सादरीकरण फ्रेश ठेवले आहे.
आता बाहेर जात आहे पण रात्री आल्यावर पहिले संपवणार.
सिंगल पापा – नेटफ्लिक्स
सिंगल पापा – नेटफ्लिक्स
कोणी बघतेय का?>>>>
बघितली आहे मी... गोड आहे series..
बाळ पण गोड आहे त्यातले... सगळी कास्ट पण आवडली..
संपवली सिंगल पापा. शेवटपर्यंत
संपवली सिंगल पापा. शेवटपर्यंत तितकीच मजा आली. शेवटी कुठल्या लव्ह अँगलला जास्त फुटेज न देता पापा मेरी जान वरच फोकस केला हे सुद्धा आवडले.
कुणाल खेमू यात संयत अभिनय करताना बरेचदा आमिर खानची आठवण करून देतो.
नेहा धुपिया नेहमीच आवडते. तिचे कॅरेक्टर नेहमी छोटे असले तरी भाव खाते असे काहीसे आहे तिच्या व्यक्तिमत्वात.
मेल नानी दया तोड दो दरवाजा पहिल्यांदा बघताच फनी कास्टिंग केली का असे वाटले होते पण ते चेरेक्टर सुद्धा आवडले.
काही कौटुंबिक कारणाने ह्या
काही कौटुंबिक कारणाने ह्या आठवड्यासाठी वर्षांखेर/नववर्षस्वागत निमित्ताने ठरवलेले सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करावे लागल्याने बऱ्याच दिवसांनी बिंज वॉचिंग करून एखादी क्राईम/अॅक्शन थ्रिलर वेब सिरीज पाहून संपवण्याची संधी मिळाली आहे. 'आज बघू, उद्या बघू' करत अद्याप बघायची राहून गेलेली 'मनी हाईस्ट' आणि 'माईंडहंटर' पैकी कुठलीतरी एक (किंवा शक्य झाल्यास दोन्ही) बघायचा विचार आहे.
ह्या दोन व्यतिरिक्त दोन ते पाच सिझन्स ऑलरेडी प्रदर्शित होऊन पूर्ण झालेली आणखीन कुठली पाहण्यात आलेली चांगली वेब सिरीज सुचवेल का कोणी? हिंसाचार/रक्तपात/शिवीगाळ/न्यूडिटी ह्यापैकी कुठल्याच गोष्टीचे वावडे नाही. फक्त इंग्लिश्/स्पॅनिश्/हिंदी ह्या तीनपैकी कुठल्याही भाषेतली फॅमिली ड्रामा विरहित क्राईम/अॅक्शन थ्रिलर असावी एवढीच अपेक्षा आहे!
ता.क. : नार्कोस (मेक्सीको सहीत), ब्रेकिंग बॅड, सॅक्रेड गेम्स, मिर्झापुर ह्या आधीच बघुन झालेल्या आहेत!
नरेंद मोदी ही वेबसिरीज बघा.
सर्व अपेक्षा पूर्ण करणारी नरेंद मोदी ही वेबसिरीज बघा.
Special OPs चे तीन सीझन्स - स्पाय
मुखबिर - Spy
Family Man - Spy
Bard of Blood - Spy
फर्जी
अजून काही आहेत क्राईम थ्रिलर. नावं आठवली कि सांगतो.
वर लिहिलेल्या गेम ऑफ़ थ्रोन्स आणि हाऊस ऑफ ड्रॅगन पाहिलेल्या नाहीत. पण स्पार्टाकस पाहिली आहे. तशाच असतील तर न बघितले तर बरं. उगीचच भडक हिंसा आणि उठसूठ न्युडिटी. एखाद दुसरा सीन ठीक असतो. पण हे काहीच्या काहीच. पॉर्न च्या जमान्यात कशाला असले सीन घालतात कळत नाही. फॅमिली सोबत एकत्र बघता येत नाही.
>>"नरेंद मोदी ही वेबसिरीज बघा
>>"नरेंद मोदी ही वेबसिरीज बघा.">>
"दोन ते पाच सिझन्स ऑलरेडी प्रदर्शित होऊन पूर्ण झालेली आणखीन कुठली पाहण्यात आलेली चांगली वेब सिरीज सुचवेल का कोणी? हिंसाचार/रक्तपात/शिवीगाळ/न्यूडिटी ह्यापैकी कुठल्याच गोष्टीचे वावडे नाही. फक्त इंग्लिश्/स्पॅनिश्/हिंदी ह्या तीनपैकी कुठल्याही भाषेतली फॅमिली ड्रामा विरहित क्राईम/अॅक्शन थ्रिलर असावी एवढीच अपेक्षा आहे!"
ह्यात ती बसणारी असेल तर कुठे पहाता येइल हे सांगण्याचीही कृपा करा 😉
Where to watch on OTT (India)
Where to watch on OTT (India) असा सर्च द्या. कुठली सिरीज कुठे बघितली हे लक्षात ठेवत नाही.
The sopranos Better call Saul
The sopranos
Better call Saul
एक साऊथची होती, चेटूक,
एक साऊथची होती, चेटूक, आदिवासी देव वगैरे आणि त्यात मिस्ट्रीचा तडका. कांताराच्या आधीची आहे.
एक झाडाची मालिका होती. गूढ होती. भन्नाट होती. नावं अजिबात आठवत नाही. तो फॉरेस्ट इन्स्पेक्टर असतो , जंगलातल्या आदिवासी जमाती एव्हढंच लक्षात आहे.
एका शाळेची मालिका. एका बॅचचे विद्यार्थी जमलेले असतात. खून पडू लागतात. ती पण गूढ होती.
एक साऊथची होती, चेटूक,
एक साऊथची होती, चेटूक, आदिवासी देव वगैरे आणि त्यात मिस्ट्रीचा तडका. कांताराच्या आधीची आहे. > Suzhal ????
बरोबर. थँक्स.
बरोबर. थँक्स.
The Night Manager -
The Night Manager -
The Test Case
ह्या दोन व्यतिरिक्त दोन ते
ह्या दोन व्यतिरिक्त दोन ते पाच सिझन्स ऑलरेडी प्रदर्शित होऊन पूर्ण झालेली आणखीन कुठली पाहण्यात आलेली चांगली वेब सिरीज सुचवेल का कोणी? >>>> पाताल लोक, द मॅन इन द हाय कॅसल, डिप्लोमॅट, द वायर, ओझार्क या सगळ्या चांगल्या आहेत आणि शेवटपर्यंत दर्जा राखलेल्या आहेत.
लाइटवेट हव्या असतील तर व्हाइट कॉलर आणि बर्न नोटिस या आता थोड्या जुन्या असल्या तरी मस्त आहेत. सिरीज मधे एक सलग धागा पुढे जात असतो पण प्रत्येक भागात एक नवीन प्रॉब्लेम निर्माण करून त्याच भागात तो सोडवतात. दोन्हीमधे थोडा लाइट ह्यूमरही आहे.
याबद्दल इथे आले आहे का लक्षात
याबद्दल इथे आले आहे का लक्षात नाही. एचबीओ वर "इण्डस्ट्री" नावाची एक सिरीज आहे. लंडनच्या एका इन्वेस्टमेण्ट बँक/कंपनी मधे नव्याने घेतलेले काही ग्रॅज्युएटस (बहुधा) पर्मनंट पोझिशन्सकरता प्रयत्न करत असतात, त्यांचे स्ट्रगल, एकमेकांतले संबंध, त्यांची वैयक्तिक आयुष्ये याबद्दल आहे. मधे कधीतरी पाहायचा प्रयत्न केला होता पण कंटाळून पहिलाच भाग अर्धा सोडून दिला होता. पण आता परत लावली आणि आता एकदम खिळवून ठेवत आहे. पहिल्या सीझनवर आहे आणि आवडत आहे. माझ्याकडून रेको. पहिला भाग जरा नेटाने पाहा, पुढे रंगत जाईल.
याचा चौथा सीझन लौकरच येतोय आणि त्यात "जॉन स्नो" किट हॅरिंग्टन आहे.
नेफीवर ब्लॅक मिरर च्या
नेफीवर ब्लॅक मिरर च्या सातव्या सिजनचा पहिला भाग पहिला. जाम आवडला. उरलेले भाग सुद्धा पाहीन असे वाटते.
Pages