वेबसिरीज - ४

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26

हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.

आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680

त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मटका किंग
आवडली. शेवटचा एपिसोड राहिला आहे फक्त. मधे मधे विस्कळीत वाटली मलाही. तरीही आवडली. नागराज मंजुळेने जवळजवळ सगळी सपोर्टिंग कास्ट मराठी घेतली आहे. त्यामुळे आत्मा थंड झाला. सिद्धार्थ जाधवचे काम आणि निवेदन दोन्ही आवडले. नागराजची खासियत म्हणजे तो सगळ्या प्रकारची, ब्लू कॉलर वाटावी अशी आपली जनता घेतो. तो त्याचा युएसपी आहे. मला व्हिज्युअली जुन्या काळातील प्रकाशयोजना पहायला आवडली, सूदिंग वाटली.
क्रितिका कामरा लक्षात राहात नाही पण यात पारशी स्त्री म्हणून आवडली. सईचा ओव्हरडोस अजून झाला नाही कारण मी तितक्या सिरीजच बघत नाही. मला ती सुंदर वगैरे वाटत नाही पण तिचा वावर आवडतो. सहज आहे. बरखा आणि तिचे बाबा सतत मराठीच वाटले. भट्टी कनेक्शन काही कळले नाही. तो गुजराती म्हणावा तर आडनाव पंजाबी आणि आला कराचीतून. असो.

मला पण मटक्यात करिअर करायचं आहे. पण सुरवातीचे गणित मला नीट कळाले नाही. कुठलाही खेळ तयार करणं, त्याचे नियम बनवणं व त्याचा फायदा व नियंत्रण आपल्याकडे राहील, तरीही लोक सातत्याने खेळत राहतील. हे फार क्रिएटिव्ह जिनियस आहे. असो. त्याशिवाय का हा यशस्वी झाला! एकुण गणित बिंगो+ स्टॅटिस्टिक्स = मटका असं वाटलं. फ्रिक्वेन्सी आणि प्रोबॅबिलिटी आहेच मटक्यात. पण तो इतक्या इमानदारीच्या गप्पा मारत होता की त्याचा फायदा अवास्तव वाटू लागला. स्वतः कडे कंट्रोल ठेवण्यासाठी पत्ते उघडण्याची परंपरा स्वतःकडे ठेवली हे एक. कुणीही उघडू शकलं असतं, कुठलेही तीन नंबर निवडायचे होते असेही. विमानात, पोलीस स्टेशनमध्ये - ड्रामा झाला त्यापायी.

मधेच तो हिंदी सिनेमात पैसे गुंतवतो हे दाखवण्यासाठी मेहमूद आणला आहे. सायरस साहुकार - तो फार पर्फेक्ट वाटला, पहिल्या सीनपासून मेहमूद आठवला. नंतर ते अधांतरी सोडून दिल्यासारखे वाटले. नंतर डोंगरी का माफिया - दाऊद इब्राहिम टाईप - अजय देवगण - वन्स अपॉन असं टाईम इन मुंबई मधला मानेपर्यंत केस भरघोस मिशा टाईप छपरी लूक. हा काही त्याच्याशी व्यवहार करत नाही कारण आपण काही गॅंगस्टर नाही.
रतन खत्री जो मूळ मटका किंग आहे त्याच्याविषयी थोडे ऐकून आहे. त्यांचं आयुष्य तुकड्यात बांधून मांडलं असावं. मधून मधून दोन बायका फजिती ऐका झाले. सई आणि क्रितिका!
जेमी लिव्हर आणि सिद्धूच्या लग्नात विघ्न मग आयुष्यात विघ्न. असे काही बाही. गुलशन ग्रोवर मात्र अजूनही तितकाच कृत्रिम, काही reinvent करणं नाही काही नाही. बाकी मेथड ॲक्टर याच्यासमोर सफाईदार वाटले. भरत जाधवचे काम छोटं पण छान, गिरीश कुलकर्णी पण आवडला. किशोर कदमही आपापल्या जागी मस्त.

हो अस्मिता, पण भूत आत्मा तसं पॉवरफुल आहे, अंबिकासारखं बावळट, मठ्ठ नाहीये.

अंबिकाने त्यातल्या रामदेव आजोबांकडे खास भुताची ट्युशन लावायला हवी.

स्पॉयलर असतील.

मला त्यातला पांचटपणा फार आवडला नाही. कोकण छान निसर्गसौंदर्य. काही जणांनी फार सहज अभिनय केलाय. मला भुताची फार भीती वाटली नाही. पण रामदेव chara परफेक्ट वाटलं, त्यांची जरब भीती वाटली, ते मूळ मस्त. ज्यांच्यात नंतर शिरतात तो संकेत फार नाही आवडला. शेवटच्या सिझनला आवडला तो.

मटका अर्धा भाग पाहिला. उत्सुकता वाढली नाही अजुनही. तरी नेटाने पाहीन. सई ताम्बणकर आवडत नाही पण पाहु शकते तिला. पण गुलशन ग्रोव्हरची कमाल आहे. माणुस म्हातारा दिसतच नाही. चेहरा जराही सुरकुतला नाही (व काही खोट्या प्रक्रिया पण केलेल्या वाटल्या नाहीत)

मटका किन्ग ठिकठाक ! मधे मधे आवश्यक फास्ट पेस पुर्ण मिसिग असल्याने सन्थ चालु राहते..विजय वर्माने एकट्याने पेलली आहे म्हणता येइल...सईच काम चान्गलय पण पुर्ण सिरिज मधे एक बोअरिन्ग सुर आहे.
नवर्‍याच अफेअर आहे हे उदार मनाने बायको मान्य करते आणी बायको मित्र घरी आणते ह्याबाबत नवराही कुल आहे..कुठला काळ आहे हा नक्की??
जोशी,बापट,देशपान्डे मिळुन लॉटरी सुरु करतात हा एक बारिक पण उत्तम विनोद होता.

गुलशन ग्रोव्हरची कमाल आहे. माणुस म्हातारा दिसतच नाही. चेहरा जराही सुरकुतला नाही - गळा सुरकुतला आहे (कुठेतरी बघितल्याचं आठवतंय). दीड भाग मी बघितला त्यात त्याचा गळा झाकलेला आहे.

चिरैया .. दिव्या दत्ता.. मस्त आहे
मला बरेचदा दिव्या दत्ता छान अभिनय करणारी असूनही बोअर वाटते. पण यात मस्त बाटली.
विषय असा की आधी रोना धोना टाईप सिरीज वाटलेली. पण positive आणि फील गुड आहे..
संवाद सगळेच छान.. कोर्ट कचेरीतील संघर्ष न दाखवता विचारांचा संघर्ष दाखवला आहे हे चांगले वाटले.
रात्री उशीरा सुरू केली आणि पूर्ण करूनच झोपतो आता

सैराट कनेक्शन कोणीच ओळखले नाही? त्यातला "सल्ल्या" यात पोलिसाच्या रोल मधे आहे. इन्स्पेक्टर भरत जाधव आहे पण सल्ल्याही काही वेळा दिसतो स्क्रीनवर.

ओळखले की सल्ल्याला !
तानाजी गालगुन्डे पण आहे चहावाल्याच्या रोल मधे.. जिथे भट्टि आपला पहिला मटका लावतो.

तानाजी गालगुन्डे पण आहे चहावाल्याच्या रोल मधे.. जिथे भट्टि आपला पहिला मटका लावतो.
>>> अरेच्या! माझं लक्ष गेलं नाही.

मटका किंग ८-१० दिवसांच्या अंतराने पहिले २ एपिसोड बघितले. पुढे बघेनसं वाटत नाही.

नागराज मंजुळेने सपोर्टिंग कास्ट सगळी मराठी घेतली, तर मग लीड रोल सुद्धा मराठी कलाकाराला का दिला नाही?

मटका किंग ८-१० दिवसांच्या अंतराने पहिले २ एपिसोड बघितले. पुढे बघेनसं वाटत नाही.>>> त्यापेक्षा हर्शद मेहताची चान्गली होती.

सई ताम्हणकर फार अंडर रेटेड अभिनेत्री आहे>>> Lol काहीही.
अंडर रेटेड च्या विरुद्ध आहे. लिमिटेड अभिनय क्षमता असून खूप रोल्स मिळतात तिला..

एका मराठमोळ्या मुलीला जी सर्वसामान्य निकष लावता फार सुंदर नाही तिला हिंदीमध्ये सुद्धा खूप रोल मिळतात ते अभिनयक्षमता असल्याशिवाय शक्य नाही.
मराठीमध्ये आपण तिची बोल्ड इमेज करून टाकली पण हिंदीमध्ये तिला बोल्ड दृश्यांची किंवा इमेजची गरज नसलेले रोल मिळाले ते अभिनयक्षमता असल्याशिवाय शक्य नाही.
हिंदीमध्ये तिने अभिनयाचे पुरस्कार सुद्धा मिळवले आहेत.

माझ्यापुरते म्हणाल तर मी सईला आतापासून नाही तर लहानपणापासून फॉलो करत आहे आणि आधीपासून तिचा चाहता आहे.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

नाही जरी ‘सई’ तरी ...
https://www.maayboli.com/node/50822

मला सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीत त्यातल्या त्यात बरी सई च वाटते आणि आवडते सुद्धा.
बेहेरे बाई, बापट बाई असह्य आहेत.

दक्षिणा, खरे आहे!
प्रिया बापट अजिबात आवडत नाही मला.
कसे काय तिला इतके रोल्स आणि जाहिराती मिळतात कोण जाणे!
अमृता खानविलकर पण ठीक आहे तशी...
Happy

सई चान्गल काम करतेय, मधे तिची जी मराठी सिरिज आलि होती ती फार आवडली होती, मटका किन्ग मधेही चान्गल केलय काम पण मुळात तिला फार कामच नाहिये..
गुलकन्द मधल तिच काम आवडल होत.
प्रार्थना बेहरे अ‍ॅव्हरेज वाटते, प्रिया बापट आधी फारशी आवडत नव्हती पण आम्ही दोघी आणी तिची हिन्दी सिरिज आली होती त्यात चान्गल केलय काम..ते आवडल ..गेल्या काहि वर्षात तिने खुप प्रयत्नपुर्वक स्वतःला ग्रुम केलय..फिटनेस अफाट आहे तिचा.मराठित फार कमी जणी ते मेन्टेन करताना दिसतात.

कालच प्रिया बापट, उमेश कामतची ‘हे काय नवीन‘ ही आठ भागांची सिरीज पाहून संपवली. एकदा बघायला ओके वाटली. उका आणि प्रिबा हे १० वर्ष लग्नाला झालेलं जोडपं. त्यांना मूलबाळ नाही. प्रिबाचे आईवडील शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर. प्रिबा आपल्या नोकरीतून ४ महिन्याची सबॅटिकल घेऊन कपडे डिझाईन करायचा व्यवसाय करुन बघायचा ठरवते. तिची आई एकदम टिपीकल असल्यामुळे तिला हे काही पटत नसतं. प्रिबाने मूल जन्माला घालावं म्हणून मागे लागलेली असते.
प्रिबा पेक्षा तिच्याकडच्या दोन मुलीच मला त्या व्यवसायाबद्दल पॅशनेट वाटल्या.

हो मी पण पाहिली. ठिक आहे टिपी म्हणून. पण मलाही असे वाटले की प्रिबा मधे कधीच तिच्या बिझिनेस्बद्दल पॅशन किंवा सिरियसनेस जाणवत नाही. कधी त्यावर फार काम करतानाही दिसत नाही, उलट एकेक पाउल मागेच घेताना दिसते. बाकीचेच सगळे या लाडावलेल्या प्रिविलेज्ड मुलीचा हट्ट पुरवायला धडपडत आहेत असे फीलिंग आले.

मी सुद्धा चक्क हे काय नविन बघितली आणि फॉर द first time प्रिया बापट बरी वाटली. उका त्यामानाने फार फार रियल वाटला.

उमेश आणि प्रिया दोघांची आपसात केमिस्ट्री छान जुळत असली तरी जे आधीच नवरा बायको आहेत त्यांना पुन्हा काय बघायचे हा विचार डोक्यातून काढता येत नाही. त्यामुळे माझी ही सिरीज बघायची राहिली आहे अजून.

अभिनयक्षमता असल्याशिवाय शक्य नाही>>> ज्याची त्याची आवड. लिमिटेड हटले मी, शुन्य नाही.

प्रिया बापट & उमेश ची युट्युब वर सिरीज होती ना? ती पाहिली मी. ठीक होती ती. प्रिया बापट मला दिसायला फार आवडते. स्कीन , फिटनेस कपडेपट छान.
मिथिला पालकर ही आवडते, तिची अ‍ॅक्टींग पण मस्त.
प्राजक्ता कोळी & माळी दोघी गोड आहेत पण अगेन अभिनय क्षमता लिमिटेड.

मिथिला पालकर भयंकर गोड आहे. प्राजक्ता कोळीला फार बघितलेलं नाही. माळी मात्र अतिपरिचयात अवज्ञा झाली आहे.

प्रिया बापट हलक्याफुलक्या, खेळकर भूमिकेत मला आवडत नाही.
गंभीर भूमिका ती मस्त करते. तिचा खालच्या पट्टीतला आवाज त्यासाठी मस्त आहे.

पूजा दलाल नावाची एक influencer आहे तिने एक रील बनवलं होतं. त्यात म्हणे तिने प्रिबा ची अॅक्टिंग केली आहे. (comments वरुन कळलं,) तिची मुलाखत कधीही न बघता सुद्धा मला खातरी पटली की ती अगदी अशीच बोलत असणार.

https://www.instagram.com/reel/DOqiruckh91/

अग ती पुजा दलाल भन्नाट क्रियेटर आहे, मी तिचे व्हीडिओ बघितलेत...फार मस्त करते.

Pages