नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:46

मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.

नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी

झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्‍याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्‍या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव - नितिन
गाव - नांदेड
फळ - नारळ
फुल -नारसिसस
प्राणी - नीलगाय
पक्षी - ?
पुस्तक पूर्वरंग
लेखक प्रल्हाद केशव अत्रे

नाव नलिनी
गाव नायगाव
फळ नारळ
फुल निशीगंध
प्राणी नीलगाय
पक्षी नाचण
पुस्तक नाच ग घुमा
लेखक जयंत नारळीकर

नाव - मोनालिसा
गाव - माझगाव
फळ - मोसंब
फुल - मोगरा
प्राणी - माकड
पक्षी - मोर
पुस्तक - मोर
लेखक - मधुकर केचे

पुढील अक्षर - च

नाव चार्वाक
गाव चांदीवली
फळ चिकू
फुल चंपा
प्राणी चतुर
पक्षी चक्रवाक
पुस्तक चौघीजणी
लेखक चंद्रशेखर गोखले.

पुढचं अक्षर ज

नाव जयंत
गाव जैतापूर
फळ जांभूळ
फुल जास्वंद
प्राणी जळू
पक्षी
पुस्तक जैत रे जैत
लेखक जयवंत दळवी
पुढचं अक्षर अ

नाव अस्मिता
गाव आंबेगाव
फळ आंबा
फुल अबोली
प्राणी अजगर
पक्षी
पुस्तक आठवणीतील आठवणी
लेखक अंबरीश मिश्रा

पुढचं अक्षर ब

नाव - बबन
गाव - बदलापूर
फळ - बोरे
फुल - बकुळ
प्राणी - बोका
पक्षी - बदक
पुस्तक - बनगरवाडी
लेखक - बाबा पदमनजी मुळे

'अ' घ्या

नाव - अंजली
गाव - आसनगाव
फळ - अननस
फुल - अनंत
प्राणी - अज
पक्षी - नाही येत
पुस्तक - अथांग
लेखक - अरविंद गोखले

पुढचं अक्षर

नाव - पूर्णा
गाव - पाली
फळ - पपनस
फुल - प्राजक्त
प्राणी - पाल
पक्षी - पाकोळी
पुस्तक - प्राईड & प्रिज्युडाइस
लेखक - प्रह्लाद केशव अत्रे

'त' घ्या

नाव - तारिणी
गाव - तुर्भे
फळ - तोतापुरी, टोमॅटो
फुल - तगर
प्राणी - टर्की
पक्षी - तितली
पुस्तक - तो मी नव्हेच !
लेखक - टागोर,

नाव तारा
गाव तारापूर
फळ ताडगोळा
फूल तगर
प्राणी तरस
पक्षी तितर
पुस्तक तुंबाड चे खोत
लेखक विजय तेंडुलकर
कोणता ही घ्या अक्षर

नाव - राधा
गाव - रंकाळा
फळ - रामफळ
फूल - रातराणी
प्राणी - राणीमाशी
पक्षी - राघू
पुस्तक - रक्तरेखा
लेखक - रावसाहेब कसबे

'ड/द' घ्या

नाव डिंपल
गाव डोंबिवली
फळ डाळिंब
फुल डेलिया
प्राणी डॉल्फिन
पक्षी डोमकावळा
पुस्तक डोंबिवलीचा इतिहास
लेखक डार्विन

अक्षर घ्या हवं ते

नाव - विशाखा
गाव - वाराणसी
फळ - वाल
फुल - ???????????
प्राणी - वानर
पक्षी - वटवट्या
पुस्तक - वह एक और मन ( हे कवितांचे पुस्तक माझ्याकडे आहे पण फार उर्दू भाषा आहे.)
लेखक - व्यंकटेश माडगूळकर

'न' घ्या

नाव - नंदिनी
गाव - नारायणगाव
फळ - नारिंग
फुल - नेवाळी
प्राणी - नाग
पक्षी - नाचण
पुस्तक - not without my daughter
लेखक - नीरजा

च घ्या

नाव - चंद्रमुखी
गाव - चिंचवड
फळ - चिकू (की चिक्कू) ........ लहानपणी मुलीला चिक्या म्हणायचे Happy
फुल - चमेली
प्राणी - चतुर
पक्षी - चकोर
पुस्तक - चांदोबा
लेखक - चिं वि जोशी

'ल' घ्या

नाव लीना
गाव लातूर
फळ लिची
फुल लिली
प्राणी लांडगा
पक्षी लेडिबर्ड
पुस्तक लहानपण देगा देवा
लेखक लक्ष्मीबाई टिळक
कोणत ही घ्या.

नाव - शारदा
गाव - शीव
फळ - शहाळे
फुल - शाल्मली
प्राणी - शार्क
पक्षी - शहामृग
पुस्तक - शाळा
लेखक - शेक्स्पिअर

'ग' घ्या.

पुस्तकांची नावे कळतायत.
नॉट विदाऊट माय डॉटर - झेपणार नाही, वाचवणार नाही म्हणुन वाचलेले नाही. भयानक आहे. तो विषय/ परिस्थिती.
तुंबाडचे खोत फार पूर्वी (लहानपणी) वाचलेले आहे. आवडल्याचे स्मरते पण कळण्याचे तितकेसे वय नव्हते.

नाव - गणेश
गाव - गारगोटी
फळ - गाजर
फूल - येत नाही
प्राणी - गज
पक्षी - गिधाड
पुस्तक - गारंबीचा बापू
लेखक - ग. त्र्यं. माडखोलकर

क घ्या.

नाव - कमल
गाव - कुर्ला
फळ - काकडी
फूल - कमळ
प्राणी - कांगारु
पक्षी - कोकिळा
पुस्तक - कृष्णकिनारा
लेखक - कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर

'स' घ्या

ममो, गुलाब इतके साधे नाव मला आठवले नाही Happy
ए आय ची सवय झाल्याने, मेंदूला ताण देणे कमी कमी झालेले आहे. हे भयंकर लक्षण आहे.

ए आय ची सवय झाल्याने, मेंदूला ताण देणे कमी कमी झालेले आहे. > होय झालं आहे तसंच. काही आठवलं नाही की विचार न करता मोबाईल कडे जातो हात.

नाव सायली
गाव सातारा
फळ संत्र
फुल सायली
प्राणी ससा
पक्षी ससाणा
पुस्तक समिधा
लेखक साने गुरुजी.
कोणत ही घ्या.

Pages