Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
“त्यावेळेस सिगरेट पीत पीत
“त्यावेळेस सिगरेट पीत पीत कोणीतरी स्क्रिप्टेड कसोटी सामान्या विषयी बोलत होत” > त्याशिवाय इतकी इत्यंभूत माहिती असणं शक्यच नाही. >>
माझा अंदाज बरोबर आला तरी मी नव्हतो हा तो. आधीच सांगून ठेवतो.
मी कालच म्हणालो होतो काय होउ शकते ते 
किवीज च्या सिरीजचा पॅटर्न परत रिपीट होतोय कि काय ? गंभीर म्हणतो कि पहिल्या दिवसापासून टर्न होणे हा प्रॉब्लेम नाहीये. ते बरोबर आहे पण अन ईव्हन बाउन्सचे काय ? दोन्ही संघांच्या बॉलिंगमधे त्यामूळे पॅरिटी येते हे लक्षात येत नाहि का ? very disappointing !
“ ऑलराऊंडर्स ची फौज घेऊन
“ ऑलराऊंडर्स ची फौज घेऊन खेळणं टी 20 मधे चालतं, टेस्ट मधे नाही.” - टेस्ट क्रिकेट स्पेशलिस्ट प्लेयर्सचा खेळ आहे, पार्ट टायमर्सचा नाही. ऑल-राऊंडर (टेस्टमधे) असा हवा कि जो वेळप्रसंगी बॅटिंग किंवा बॉलिंग पैकी कुठल्याही एका स्किलसेटवर मॅच जिंकून देऊ शकेल.
विकेट तयार करण्यावर पण थोडं बोलायला हवं. इतकी अंडर-प्रिपेअर्ड विकेट टीम मॅनेजमेंटने मागून घेतली होती हे अविश्वसनीय आहे. त्यात परत गंभीरने ‘सॉलिड डिफेन्स, टेक्निक आणि टेंपरामेंट असेल तर रन्स काढणं अशक्य नव्हतं’ असं म्हटलंय. तसं असेल तर ह्या कॅटेगरीत बसू शकणारे फारच कमी लोक टीममधे का निवडले होते? एक राहूल, गिल आणि अजून नवखा असलेला जुरेल सोडून कुणाकडे ह्या तिन्ही क्वालिटीज गंभीरला दिसल्या? ग्रेग चॅपेल ने जे इरफान पठाण चं केलं तेच गंभीर सुंदरचं करणार असं दिसतंय.
कोणाला आठवत असल्यास,
कोणाला आठवत असल्यास,
गेल्या सीझनमध्ये आफ्रिकेला सोपा ड्रॉ मिळाला म्हणून ते जिंकले असे काही जण बोलत होते. तेव्हाही मी आफ्रिकेला आणि त्यांच्या कॅप्टनला सपोर्ट केला होता. आताही त्यांनी आधी पाकिस्तानच्या फिरकीचे जाळे तोडले आणि आज आपल्याला धूळ चारली. विश्वास सार्थ ठरवला
यजमान संघाला कांहीशा
यजमान संघाला कांहीशा फायदेशीर ठरणाऱ्या विकेट असणं/करणं व कसोटी क्रिकेटचाच पचका करणाऱ्या विकेट असणं/ करणं, यातला फरक दिवसेंदिवस आपण अधिकाधिक विसरत आहोत !!!
संघात काही दोष नव्हता.
संघात काही दोष नव्हता. खेळपट्टी खराब नसती तर आपण फेवरेट असतो.
पुजाराची एक मुलाखत आहे. त्यात त्याने म्हटले आहे की जर खेळपट्टी अशीच बनवून जिंकायचे होते तर डावपेच, शॉट सिलेक्शन, खेळायचा अप्रोच सुद्धा तसाच हवा होता ज्याची तयारी दिसली नाही.
अंतिम निकालात काही धावांचा फरक होता. जर गिल दोन इनिंग खेळला असता तर कदाचित तो सुद्धा नसता. किंवा आपली फलंदाजी पहिली असती तरी नसता. थोडक्यात दोन्ही संघ एकाच दर्जाचे खेळले. पण आपण आपल्या घरात खेळत असल्याने आपल्याला त्याचा एडवांटेज उचलायला हवा होता जो आपण अशी खेळपट्टी बनवून घालवला
"यजमान संघाला कांहीशा
"यजमान संघाला कांहीशा फायदेशीर ठरणाऱ्या विकेट असणं/करणं व कसोटी क्रिकेटचाच पचका करणाऱ्या विकेट असणं/ करणं, यातला फरक दिवसेंदिवस आपण अधिकाधिक विसरत आहोत " - सहमत.
ह्याच बरोबरीनं, भारतीय फलंदाज इतरांपेक्षा फिरकी गोलंदाजी जास्त चांगली खेळतात ही पारंपारिक विचारसरणी सुद्धा फोल ठरतेय. मुळात डोमेस्टिक सर्किटमधे दर्जेदार स्पिनर्स फारसे नाहीत. त्यामुळे कदाचित स्पोर्टिंग - सुरूवातीला फास्ट बॉलर्सना साथ देणारी, हळू हळू ब्रेक होत स्पिनर्सना साथ देणारी - सर्वांना समान संधी देणारी विकेट कदाचित जास्त फायदेशीर ठरू शकेल.
बॅक टू इडन गार्डन्स - जर फिरकीला साथ देणारी, अन-इव्हन बाऊन्स असणारी विकेट बनवायचीच होती, तर अश्या विकेटवर खेळू शकतील (पोटेन्शियली) अश्या प्रॉपर बॅट्समेनना बाहेर बसवून, सुंदर सारख्या बॅटिंग करू शकणार्या ऑफ-स्पिनरला (ज्याने पूर्ण मॅचमधे फक्त १ ओव्हर टाकली) टीममधे खेळवण्यात काहीच लॉजिक नव्हतं (मॅच सुरू व्हायच्या आधी टीम निवडली तेव्हा... हाईंडसाईटमधे त्याने ३०-३१ रन्स केले ह्याला अर्थ नाही).
सुंदर मला साई सुदर्शन पेक्षा
सुंदर मला साई सुदर्शन पेक्षा टेक्निकली जास्त परफेक्ट खेळाडू वाटतो या कसोटी फॉरमॅटमध्ये. बरेच आधीपासूनचे मत आहे.
सुंदर मला साई सुदर्शन पेक्षा
सुंदर मला साई सुदर्शन पेक्षा टेक्निकली जास्त परफेक्ट खेळाडू वाटतो या कसोटी फॉरमॅटमध्ये. >> +१.
सुरूवातीला फास्ट बॉलर्सना साथ देणारी, हळू हळू ब्रेक होत स्पिनर्सना साथ देणारी - >> आपल्याकडे बुमरा, कुलदिप नि जाडेजा असे ३ टॉप बॉलर्स असताना तरी हे नक्की बरोबर आहे.
आज गवसकर म्हणतात, ' विकेटला
आज गवसकर म्हणतात, ' विकेटला दोष देण्यात अर्थ नाही. देशांतर्गत स्पर्धांसाठी अशा विकेट असतातच पण आपले कसोटी खेळाडू त्या स्पर्धा खेळत नाहीत, हा खरा दोष आहे ! - '
मुद्दा आपल्या कसोटी खेळाडूपुरता ठीक आहे. पण, देशांतर्गत स्पर्धांसाठी व आंतरराष्ट्रीय कसोटी सामान्यांसाठी बनवल्या जाणाऱ्या विकेट यांच्या दर्जात खूप फरक आहे व असलाच पाहीजे, हे देखील प्रथम अधोरेखित नको का करायला ? -
अहो, तुम्ही हल्ली रेल्वे स्टेशनावरच्या स्टॉलचा चहा घेत नाहीं, म्हणूनच आता तुम्हाला माझ्या हातचा चहा घेववत नाही !

आज दोन वर्षे झाली...
आज दोन वर्षे झाली...
खडा हू आज भी वही...
भाऊ मी थोडेसे पुढे नेऊन
भाऊ मी थोडेसे पुढे नेऊन म्हणेन कि देशांतर्गत स्पर्धांमधून येणारा पेशन्स बिल्ड होत नाहिये. किती तरी रणजी सामने ३ दिवसांमधे आटोपत आहेत नि एकतर्फी होत आहेत त्यावरून एकंदर दर्जाची पण शंका येतेय आता.
खरंय, असमीजी !
खरंय, असामीजी !
लोकांना उचल बॅट, हण आणि धाव
लोकांना उचल बॅट, हण आणि धाव असा बेसबॉलसारखा खेळ जास्त आवडतो म्हणून सगळेच तसे खेळतात.खेळाडूंना सुद्धा तेच आवडते.
बाकी काहीहि कारणे सांगा - खेळपट्टी, सिलेक्शन, हवा - त्याचा परिणाम दोन्ही संघांवर तसाच होतो.
शिवाय गळ्याशी येइल इतके क्रिकेट चालू आहे - काही जिंकणार, काही हरणार. त्याच हे आता कुणालाच काही वाटत नाही - गल्ला जमला की नाही तेव्हढेच बघायचे.
*....म्हणून सगळेच तसे खेळतात
*....म्हणून सगळेच तसे खेळतात.खेळाडूंना सुद्धा तेच आवडते.* -
' कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट ' असं सगळेच - खेळाडू सुद्धा - नेहमी म्हणत असतात , म्हणून विकेट, तंत्रशुद्ध खेळाबद्दल बोलावं लागतं; सगळ्यांनाच उचल बॅट आणि हाण खरंच आवडतं असेल, तर ' जे जो वांछील, तें तो लाहो ' हे तर आहेच !
बेसबॉलचा विषय निघालाच आहे
बेसबॉलचा विषय निघालाच आहे म्हणून, कुणीही न मागता दिलेलं एक माझं मत - दोन्ही खेळ खेळलोय, पाहिले आहेत. क्रिकेटमधे असलेली कल्पकता, त्यातून येणारी अनिश्चितता आणि त्यातून निर्माण होणारी रोचकता ह्या तुलनेत बेसबॉल फारच ब्लँड वाटतो मला. क्रिकेटची मॅच ऐवजी हायलाईट्स खेळले तर जसं वाटेल, तसं बेसबॉल वाटतं. मायनर लीग मॅचेस मधे बेसबॉल सोडून, मधल्या वेळेत होणार्या इतर स्पर्धा आणि नंतरचं फायरवर्क्स हे जास्त मनोरंजक वाटतं.
बेसबॉल हा खेळापेक्षा बाकीच्या
बेसबॉल हा खेळापेक्षा बाकीच्या टाईमपास पेक्षा अधिक योग्य वाटतो
ह्याउलट अमेरिकन फूटबॉल भयंकर काँप्लिकेटेड गेम वाटतो नुसता फिजिकलीच नाही तर मेंटलीही.
गौहाटीला गिलच्या जागी कोण
गौहाटीला गिलच्या जागी कोण खेळवणार हे कुतूहलाचे असणार आहे. रेड्डी आला तर अर्धवट किंवा अजून रेडी नसलेल्या ऑल राऊंडरचा प्रयोग सुरू राहतोय असे म्हणायचे. बहुधा हीच दिशा भावी संघांकडे असेल असे धरायचे. रणजीमधून फिरकी चांंगला खेळणार कोणी तरी - सर्फराज/ मयांक/ स्मरन/ पड्डीकल असा शॉर्ट सर्कीट होण्याची शक्यता जवळजवळ नाहिच आहे ( अशा प्रकारे बॉलर उचलला गेल्याचे उदाहरण आठवते - नदीमला लखनौला खेळावलेले नि तो मॅन ऑफ द मॅच झाला होता. सौरव कुमारला फास्ट ट्रॅक केलेले पण खेळवले नव्हते शास्त्री कोहलीच्या काळात. पण बॅटसमनला असे आणलेले आठवत नाही) बाकी पड्डीकल किंवा साई बद्दल टेस्ट मधे चॅलेंजिंग फिरकी खेळण्याबाबत फारसे सांगता येत नाही.
<<क्रिकेटमधे असलेली कल्पकता,
<<क्रिकेटमधे असलेली कल्पकता, त्यातून येणारी अनिश्चितता आणि त्यातून निर्माण होणारी रोचकता ह्या तुलनेत बेसबॉल फारच ब्लँड वाटतो>>
अनुमोदन. पण क्रिकेट बघायला जाणार्यांपैली कितीजणांना ते बारकावे कळतात? ५० टक्क्याहून जास्त लोज आपले हाणा नि छक्के मारा हेच बघायला येतात.
लिमिटेड टेस्ट सेंटर्स
लिमिटेड टेस्ट सेंटर्स आयडेंटिफाय करून तिथे स्पेसिफिक टा इप च्या विकेट्स डेव्हलप करून येणाऱ्या टीम च्या वीकनेस् हेरून त्यांना न झेपणाऱ्या कॅटेगरी च्या ठिकाणी कसोटी सामने ठेवावेत, आपली टीम निवडताना पिचेस कशी आहेत त्याच्या प्रमाणे स्पेशालिस्ट खेळाडू निवडावेत. म्हणजे होम अडवांटेज पूर्ण वापरता येईल.
रोटेशन पॉलिसी ही विनिंग फॉर्म्युला मधे असूच शकत नाही...
तिकडे अॅशेसमध्ये एका दिवसात
तिकडे अॅशेसमध्ये एका दिवसात १९ गडी बाद झाले.
अॅशेस च्या सुरूवातीच्या
अॅशेस च्या सुरूवातीच्या ओव्हर्स बघायला मजा आली. नेव्हर डिसपॉईंट्स !
हायलाईट बघायला मजा आली.
हायलाईट बघायला मजा आली.
स्टोक्सच्या विकेटसमध्ये मात्र तितकी मजा नव्हती.
अर्थात वेगवान गोलंदाजी बघायला मजा येत असली तरी काही बॉल बेकार उसळत होते आणि शेकोट्या बसत होत्या. स्मिथ लावुशान सारखे फलंदाज सुद्धा मार खात होते. पहिल्याच दिवसात १९ विकेट ही काही कसोटीसाठी आदर्श स्थिती नाही. पण हे गोरांच्या देशात घडत असल्याने काही बोलायची सोय नाही
बाऊन्स कंसिस्टंट होता नि
बाऊन्स कंसिस्टंट होता नि विकेट पेसी होती. हा मोठा फरक आहे रे. फलंदाजांना ते हाताळता येत नसेल तर पंचाईत आहे.
बॉल खाली राहत नव्हता पण
बॉल खाली राहत नव्हता पण म्हणून बाऊन्स कन्सिस्टंट होता असे म्हणू शकत नाही. काही बॉल गुड लेंथ वरून जास्त उसळत होते. अंगावर झेलावे लागत होते.
दोन टॉपचे कसोटी संघाचे फलंदाज ते देखील सेना देशाचे जर पेस आणि बाऊन्स हॅण्डल करू शकत नसतील तर खेळपट्टीला दोष द्यायला हरकत नाही. बघायला छान वाटतात असे गोळी सारखे सुटणारे बॉल पण क्लासिकल फलंदाज प्रॉपर क्रिकेटींग शॉट खेळू शकत नसतील तर परिपूर्ण क्रिकेट बघितल्याचा आनंद येत नाही.
त्याहून जास्त मला असे अंदाज चुकवून उसळणारे चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांची काळजी वाटते. इट्स नॉट बॅटल फिल्ड
काही बॉल गुड लेंथ वरून जास्त
काही बॉल गुड लेंथ वरून जास्त उसळत होते. अंगावर झेलावे लागत होते. >> गुड लेंथ वरून बॉल किती उसळणार हे प्रेडिक्टबल कधीच नसते. त्याच स्पॉट वरून बॉलर कशा ट्रॅजेक्टरी मधे नि किती स्पीड ने बॉल सोडतो त्यावरही ते बदलू शकते. ह्याउलट बॉल नेहमी उसळत होता हे मह्त्वाचे आहे. हेच जर कधी बॉल उसळण्याऐवजी खाली राहिला असता नि कधी उसळला असता तर पिचला नक्कीच दोष दिला असता.
आर्चरचा दुसरा बॉल ऑलमोस्ट यॉर्कर होता तो खेळताना सलामीचा फलंदाज जमिनीवर होता ह्यात फलंदाजांचे वैगुण्य दिसते. दोन्हीकडून बॉलिंग क्लास नि रीलेंटलेस होती . कार्स नि आर्चर च्या होस्टाईल स्पेलनंतर तुलनेने स्लो वाटणार्या स्टोकसला अंडर एस्टीमेट करून डोमिनेट करायच्या प्रयत्नाअमधे मिडविकेटला दोन विकेट्स गेल्या ते बघ.
वाकाचे पिच नेहमी असेच कॅरी असलेले असते नि खूप सूर्य आला नाही तर असेच राहते. पण पीक समर्मधे क्रॅक जाऊन डेंजरस होते. तसे अजून झालेले नाहिये.
यॉर्कर वर जेव्हा एखादा फलंदाज
यॉर्कर वर जेव्हा एखादा फलंदाज गडबडतो त्यात खेळपट्टीचा काय हात असे म्हटले तरी ते तसे नसते. कारण खेळपट्टीनुसार फलंदाज आपला अप्रोच बदलून खेळत असतो त्यामुळे सेम यॉर्कर वेगवेगळ्या खेळपट्टीवर त्या फलंदाजाची वेगवेगळ्या प्रकारे धांदल उडवू शकतो.
स्टोक्स बाबत देखील त्याला मारण्यात किंवा डॉमिनेट करण्याच्या नादात विकेट गेल्या म्हणण्यापेक्षा अवघड खेळपट्टीवर बदलत्या बॉलरनुसार ऍडजेस्टमेंट करणे आणखीन अवघड जाते त्यामुळे हे झाले असण्याची शक्यता जास्त वाटते. अर्थात मी पूर्ण सामना नाही तर फक्त हायलाइट्स पाहिल्या आहेत. त्यामुळे खात्रीने नाही म्हणू शकत.
फलंदाजाच्या तंत्राबद्दल म्हणाल तर बॉल वर खाली राहणाऱ्या खेळपट्टीवर सुद्धा शेवटपर्यंत बॉलवरील नजर हटवू नका आणि बॉल वरखाली जिथे राहील तिथे लास्ट मॉमेंटला बॅट घेऊन जा मग तुम्ही बाद होणे शक्यच नाही असे म्हणू शकतो. पण हे मानवी क्षमतांच्या पलीकडे आहे.
एक्स्ट्रा बाउन्स आणि पेस असलेल्या खेळपट्टीवर किंवा एक्स्ट्रा स्विंग आणि सिम असलेल्या खेळपट्टीवर म्हणा, काहीसे असेच होते. फलंदाजी मानवी क्षमतेच्या पलीकडे जाऊ लागते. उद्या कोणी आणखी वेगळ्या मटेरियलचे पीच बनवेल ज्यावर सीजन बॉल पडताच पिंगपोंग बॉल सारखा उसळेल आणि तंत्र वापरून खेळा म्हणतील त्याला काही अर्थ नाही.
पण विकेटपेक्षाही मला जीवाचा धोका जास्त वाटतो. काल काही बॉल फार वाईट पद्धतीने हेल्मेटवर आदळताना पाहिले.
हेच आता पीच आज किंचित शांत होऊन ३००–४०० धावा होण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि तसे झाल्यास बॅट आणि बॉलचे चांगले कॉन्टेस्ट बघायला मिळेल
आपला सामना सुरू
आपला सामना सुरू
आज चुम्मा कर्णधार
कर्णधार बदलला पण टॉस हरणे कायम.
साई आणि रेड्डी संघात आला.
गिल अक्षर गेला.
रेड्डीचा सुद्धा काहीतरी जॅक आहे वाटते जे त्याला भारतात सुद्धा प्रॉपर फलंदाज म्हणून कसोटी खेळायची संधी मिळते.
पहिली कॅच ड्रॉप
पहिली कॅच ड्रॉप
राहुल. सोपा होता. स्लिप कॅच. मार्करमला ४ वर जीवदान
हेच आता पीच आज किंचित शांत
हेच आता पीच आज किंचित शांत होऊन ३००–४०० धावा होण्याची सुद्धा शक्यता आहे.
>>>>>
हे इंग्लंडसाठी म्हटलेले.. ऑस्ट्रेलियाने फायदा उचलला
२९ ओवर २०५–२ टारगेट चेस केले.
दोन दिवसात कसोटी संपली
१४१.१ ओव्हरचा खेळ झाला फक्त
म्हणजे ५ पेक्षा कमी सेशन
अर्थात मी पूर्ण सामना नाही तर
अर्थात मी पूर्ण सामना नाही तर फक्त हायलाइट्स पाहिल्या आहेत. त्यामुळे खात्रीने नाही म्हणू शकत. >> मी बघितलाय तेंव्हा
"यॉर्कर वर जेव्हा एखादा फलंदाज गडबडतो त्यात खेळपट्टीचा काय हात असे म्हटले तरी ते तसे नसते." खर तर इथेच पुढचे वाचणे थांबवायला हवे होते हे त्रिवार मान्य आहे. (पण जित्याची खोड) यॉर्करचा अर्थ साऊथ मुंबईमधल्या गल्ली क्रिकेट मधे वेगळा असू शकतो ह्याची जाणीव आहे. हेडच्या आजच्या बॅटींग वरून मुद्दा अधोरेखित झाला असेल अशी वायफळ अपेक्षा अजिबात धरत नाही.
दोन दिवसांमधे कसोटी संपणे म्हणजे पिच वाईट असले पाहिजे वगैरे गृहितकांवर काय कप्पाळ बोलणार ?
Pages