क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Player of the series

Australia ODI series
Rohit Sharma

Australia T20I series
Abhishek Sharma

Women's World cup
Deepti Sharma

All Sharmas on Fire

शिव्या नाही, पण माझे मत सांगतो.
<<<जो खेळ फक्त पंधरा वीस देश खेळतात, त्यात जिंकल्यावर विश्वविजेतेपद मिळाले?>>>
त्याला काय हरकत आहे? अमेरिका नि कॅनडा हे दोनच देश बेसबॉल खेळतात, तरी त्यांच्या शेवटच्या ७ सामन्यांना world series म्हणतात.
आपणच आपली स्तुति केली नाही तर जगात कुणि करेल याची वाट बघू नका!!

<<हे जनतेचे पैसे वाटताना लाज वाटत नाही का?>>
जनतेला कुणि बंदुकीचा धाक दाखवून, पैसे देऊन, खेळ बघायला या असे म्हणत नाहीत. एकूणच भारतीय जनतेला क्रिकेट आवडते, नि आजकाल भारतीय संघ बरेचदा जिंकतो. मग जे खेळतात म्हणून जिंकतो त्यांना पैसे द्यायला काय हरकत आहे?

क्रिकेट खेळामुळे सरकार सुद्धा बरेच कमावत असेल ना.. त्यातूनच देत असेल जेणे करून या खेळाला अजून प्रोत्साहन मिळेल, अजून खेळला जाईल. याचे मार्केट अजून मोठे होईल आणि सरकारला अजून महसूल मिळेल.

अर्थात मला अर्थशास्त्राचे जास्त समजत नाही. पण असे गणित नसेल, उद्या क्रिकेट हा खेळ बंदच झाला तर त्यात सरकारचे काडीचे नुकसान होणार नाही असे असेल तर माझे मत मागे.

पैसे द्या ना, पण सरकारी का? तेही प्रत्येकी सव्वा दोन कोटी? स्वतःचे द्या की, आधीच संघाला 51 कोटी बक्षीस मिळाले असताना?

आणि कर्णधार तर हरियाणा मध्ये DSP आहे. कधी पोलिसी काम केले असेल? निवृत्तीनंतर सुद्धा करणार नाहीत.

शरदजी, तुमचा राग नेमका कशावर आहे? क्रिकेटवर, क्रिकेटपटुंवर का सरकारवर? तुमच्या रागावण्याला रास्त कारणं असू शकतील, पण ह्या धाग्यावर तुम्हाला योग्य ऑडियन्स मिळणं अवघड आहे.

“निवृत्तीनंतर सुद्धा करणार नाहीत” - हे कशावरून?

“पैसे द्या ना, पण सरकारी का? तेही प्रत्येकी सव्वा दोन कोटी? स्वतःचे द्या की” - सरकार क्रिकेटमधून भरपूर रेव्हेन्यू कमावतं - GST, तिकिटांवरचा टॅक्स, टूरिझम, मिडिया ई. - २०२३ च्या वर्ल्डकपमधून जवळ जवळ $१.४ बिलियन चा रेव्हेन्यू सरकारी तिजोरीत जमा झाल्याचं वाचलं होतं. त्यातून काही भाग खेळ आणि खेळाडूंसाठी वापरला गेला तर त्यात काही गैर नाही.

क्रिकेटरना मिळणाऱ्या धनराशी बद्दल बरेच जणांचा आक्षेप असतो. आक्षेप उचलणारे त्यांच्या पैशावर जळतात वगैरे म्हणायचे नाही कारण आपल्या देशात इतकी आर्थिक विषमता आहे की एखाद्या गटाकडे जास्त पैसे जात असतील तर जेन्युइनली ते खटकतेच.

पण क्रिकेटरना एखादा भ्रष्ट नेता किंवा अश्या नेत्यांचा डोक्यावर हात असलेला भ्रष्ट उद्योगपती यांच्या पंक्तीत बसवू नये असे वाटते.

कारण ते सचोटीने खेळून आणि लोकांना आनंद देऊन पैसे कमावत असतात. तो पैसा काळा किंवा गैरमार्गाने कमावलेला नसतो किंवा सरकारकडून पात्रता नसताना सवलती उकळून कमावलेला नसतो. जसे वर बक्षीस जाहीर झाले आहे ते देखील सरकारकडे याच स्पर्धेमुळे महसूल म्हणून जमा झालेल्या पैश्याचाच एक छोटासा भाग म्हणून बघितले तर तो सुद्धा त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या वाटणीचाच पैसा झाला.

यात आणखी एक जोडायचे म्हणजे जेव्हा इतर खेळापेक्षा क्रिकेटमध्ये पैसा जास्त असतो असे आपण म्हणतो, जे अर्थात खरेच आहे, पण तेव्हा हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे की या खेळात स्पर्धा सुद्धा तितकीच जीवघेणी असते.

फेफ व ऋन्मेऽऽष, सहमत !
*..दहा कोटी रुपये खिरापत वाटली * - केंद्र व राज्य शासनाच्या बजेटमध्ये खेळांच्या विकासासाठी खास आर्थिक तरतूद असते. शासनाच्या' खेलो इंडिया ' योजनेमुळे अगणित खेळाडू आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करून जागतिक स्तरावरही कौतुकास्पद कामगिरी करत आहेत. देशात क्रीडासंस्कृतीही रुळते आहे. सारांश - खेळाडूंना मिळणारी आर्थिक मदत, पुरस्कार, बक्षिसे इ. ही खिरापत नसून, ती महत्वाच्या क्रिडाधोरणाचा अविभाज्य भाग आहे !!

पण क्रिकेटरना एखादा भ्रष्ट नेता किंवा अश्या नेत्यांचा डोक्यावर हात असलेला भ्रष्ट उद्योगपती यांच्या पंक्तीत बसवू नये असे वाटते.

कारण ते सचोटीने खेळून आणि लोकांना आनंद देऊन पैसे कमावत असतात. तो पैसा काळा किंवा गैरमार्गाने कमावलेला नसतो किंवा सरकारकडून पात्रता नसताना सवलती उकळून कमावलेला नसतो. >> आयडी हॅक झाला का रे तुझा ? आयपील मधे मॅच मधले मोमेंट्स फिक्सिन्ग करतात वगैरे वगैरे लिहिणारा खरा होता कि हा खरा ? Lol

आणि कर्णधार तर हरियाणा मध्ये DSP आहे. कधी पोलिसी काम केले असेल? निवृत्तीनंतर सुद्धा करणार नाहीत. >> सरकारी खात्यांमधे खेळाडूंचा राखीव कोटा असतो. बर्‍याच खात्यांचे संघ - रेल्वे, सर्व्हीस वगैरे बिसिसीआयच्या खाजगी संघांच्या रणजीमधे खेळतात. त्यांनी खेळ खेळंणे अपेक्षित असते. हे फक्त क्रिकेट्पुरतेच नसून हॉकी, कुस्ती, फूटबॉल इत्यादी मधेही चालते.

आयपीएल मध्ये कित्येक क्लायमॅक्स स्क्रिप्टेड असतात हे माझे मत आजही कायम आहे. आणि हे माझेच नाही तर कित्येकांचे मत आहे.
पण याचसोबत मी तेव्हाही हेच म्हणायचो की यात खेळाडूंचा काही दोष नाही.

पण याचसोबत मी तेव्हाही हेच म्हणायचो की यात खेळाडूंचा काही दोष नाही. >> प्रत्यक्ष क्रिकेट खेळणारे त्यात सहभागी असल्याशिवाय क्लायमॅक्स स्क्रिप्टेड कसे होणार नि जर खेळाडू त्यात सामील असतील तर त्यांना क्लीन चीट कशी देतात ह्याबद्दल वाचायला आवडेल. भयंकर स्लिपरी स्लोप आहे हा खेळाडूंसाठी नि तुझ्यासाठीही.

हे असं स्वतः च्या समाधानासाठी निष्कर्ष काढणं योग्य नाही. IPL स्क्रिपटेड असेल तर खेळाडू प्रामाणिक नाहीत नक्कीच ते भ्रष्टाचारी आहेत. दुसऱ्याच्या संगण्यावरून match फिक्स करत आहेत म्हणजेच गैरमार्गाने पैसा कमवत आहेत.
काहीही माहिती नसताना खेळाडूंवर असं आरोप करणं चुकीचं आहे.

लहानपणी कोणी WWF बघायचे का?
ते खरे असते की खोटे यावरून आमच्याकडे इतके तावातावाने वाद व्हायचे.
पण अखेरपर्यंत ते खरे होते की खोटे या वादात एकही बाजू ठामपणे जिंकली नाही.

आता समजूया ते खोटे होते. म्हणजे तेव्हा ते खरे वाटणाऱ्या काही जणांना आज ते खोटे असायचे असे वाटू लागले आहे. पण त्याने कोणाचे काही नुकसान झाले नाही. विश्वासघात झाला नाही. लहानपणी ज्यांनी त्याला खरे समजून मजा करायची ती केलीच. त्यातल्या खेळाडूंनी आपल्याला फसवले आणि गैरमार्गाने पैसे कमावले असेही त्यांना वाटत नाही.

आयपीएल सुद्धा अशीच एक सर्कस आहे. तुमच्या माझ्या मनोरंजनासाठी एकूणच ती स्पर्धा आहे ज्यात ते खेळाडू खेळतात. मग त्यातले काही भाग स्क्रिप्ट आहे की नाही याने काय फरक पडतो. ज्याला सारे काही जेन्युइन वाटत असेल त्याने तसे समजून आनंद घ्यावा.

फिक्सिंग म्हणजे अझर जडेजा. ज्यांनी पैश्यासाठी आपल्या संघाला हरवले. आपल्या देशाला हरवले.

उद्या एखाद्या भारतीय कुस्तीपटूने पैसे खाऊन भारताला ऑलिंपिक मध्ये हरवले तर त्याची तुलना स्क्रिप्टेड WWF सोबत कशी करू शकता.

कित्येक रियालिटी गेम शो, आणि इंटरव्यू जे प्रेक्षकांना खरे आहेत असे भासवले जाते ते खोटे असतात असेही माझे मत आहे. अर्थात त्याचेही माझ्याकडे काही पुरावे नाहीत. शोधायची गरज सुद्धा भासत नाही. पण त्यामुळे मी कलाकारांच्या चारित्र्यावर संशय घेतो असे तुम्हाला म्हणायचे असल्यास तुम्ही म्हणू शकता. माझी हरकत नाही Happy

लहानपणी कोणाला WWE खरं वाटत असेल काही चुकीच नाही, पण मोठेपणी पण खरं वाटायला नाही पाहिजे.
मुळात WWE, शो ची तुलना IPL बरोबर नाही होऊ शकत. WWE स्क्रिपटेड आहे हे काही सीक्रेट नाही.
फ़िक्सिन्ग हे फ़िक्सिन्गच आहे मग ते आंतरराष्ट्रीय सामन्यात केलं कांय किंवा IPL किंवा राणजी सामन्यात केलं कांय.

Scripted असणे आणि मॅच फिक्सिंग दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.

कोण बनेगा करोडपती चे सेलिब्रिटी एपिसोड scripted असतात म्हणून कोणी अमिताभला फासावर नाही चढवणार आणि ते scripted आहेत हे ते कधी स्वतःहून कबूल सुद्धा करत नाहीत.

हेच कित्येक रियालिटी शोला सुद्धा लागू.
बरेचदा कोणाला जिंकवायचे आहे हे ते आर्थिक गणित साधून ठरवतात.

Scripted असणे आणि मॅच फिक्सिंग दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. >> WWE स्क्रिपटेड आहे हे त्या खेळामधे इंगेज असणार्‍यांना ऑफिशियली माहित असते . आयपील Scripted आहे हा तुझा दावा आहे. हे असे ओपनली नाही हे तूही मान्य करशील. ओपन्ली नसेल तर ते फिक्सिंगच होते. बराच फरक पडतो. स्लिपरी स्लोप ह्याबद्दलच म्हटले होते. इथे जेव्हढा अधिक बोलशील तेव्हढा अधिक काँट्रॅडिक्ट करत जाशील. तोवर पुढची मॅच सुरू होईतो निवांत शा.खा. धाग्यावर राहा.

पुढचा सामना कधी सुरू होतोय याची वाटच बघतोय.
ऋषभ पंतची फलंदाजी मिस करतोय बरेच काळ..
दोन सामन्यात एक तरी चुम्मा खेळी येईलच त्याची असे भारत अ संघाचे सामने बघून वाटत आहे.

*दोन सामन्यात एक तरी चुम्मा खेळी येईलच * - जरा जुरेलची पण खेळी पाहून घ्या, चुम्माची खेळी बघून तृप्त झाल्यावर !! Wink

जुरेल बाबत तर मी इंग्लड दौऱ्यात देखील म्हटले होते की त्याला पंत संघात असताना शुद्ध प्रॉपर फलंदाज म्हणून खेळवायला हरकत नाही. अध्येमध्ये कीपिंग सुद्धा करत जाईल. पाच सामन्यांच्या मालिकेत पंतचे वर्क लोड बॅलन्स होईल. जो आपला कसोटीत एक मुख्य फलंदाज आहे.

साई सुदर्शन, रेड्डी, नायर झाल्यास भारतात खेळताना राहुल हे काही फार तगडे मिडल ऑर्डर फलंदाज नाही की आपली जागा डीझर्व करणारे नाहीत. जे ज्युरेल तिथे जागा मिळवू शकत नव्हता.

आता त्यानेच आपले खणखणीत वाजवल्याने
येत्या कसोटीत पंत ज्युरेल एकत्र बघायला मिळतील असे वाटत आहेत.

शाळेमधे असताना संस्कृतमधे अहम् शब्द " अहम्, आवाम्, वयम्" असा सगळ्या वचनांमधे नि विभक्तींमधे का शिकवत असा प्रश्न नेहमी पडलेला असे. त्याचे उत्तर हल्ली उलगडायला लागले आहे. Happy

जरा जुरेलची पण खेळी पाहून घ्या >> येस्स. खरच द्रूष्ट लागण्याएव्हढा मॅचुअर इनिंग खेळतोय. म्हणजे तसा तो आधी पण अधे-मधे वाटायचा पण धावा होत नव्हत्या. आता त्याही होउ लागल्यामूळे जास्त जाणवतेय. जुरेलला तिसर्‍या क्रमांकावर कायम करायला हवे. त्याचे टेक्निक पण इतरांपेक्षा उजवे वाटते.

पण याचसोबत मी तेव्हाही हेच म्हणायचो की यात खेळाडूंचा काही दोष नाही.
>>
याच न्यायानं ड्रिंक ॲन्ड ड्राईव्ह चं खापर हे दारू विकणाऱ्यावर फोडशील, का बनवणाऱ्यावर, का कच्चा माल उगवणाऱ्यावर??
पिणाऱ्याचा काहीच दोष नाही ना...

पण मुळात मी कोणालाच दोष देत नाहीये
आयपीएल रंगत वाढवायला कुठे कुठे स्क्रिप्टेड करणे इज ओके टू मी

*..इज ओके टू मी* - पण इथे स्क्रिप्टेड चालतं असं कळल्यावर सर्वच खेळाची खरी रंगत निघून जाते,
इज नॉट ओके टू मी !!

गंमत हा वेगळा मुद्दा झाला.
वर चर्चा तो गुन्हा आहे की नाही यावर चालू आहे.

तरी गमतीचे म्हणाल तर सगळेच स्क्रिप्टेड नसते. ते शक्यच नाही. किंवा मोठ्या प्रमाणावर सुद्धा शक्य नाही. किंबहुना त्याची गरज सुद्धा नाही. जिथे खराखुरा थरार आहे असे मला जाणवते तिथे मला मजा येते. जिथे समजते अरे हे तर काहीही पब्लिकला उल्लू बनवणे चालू आहे तेव्हा गंमत येत नाही. ज्यांना ठाम विश्वास आहे की यात काही काळेबेरे असूच शकत नाही त्यांना कायम मजा येईलच Happy

असो..
कसोटी मालिका सुरू झाली आहे
त्यावर फोकस करूया

उद्या चुम्मा येईल फलंदाजीला.
पण त्या आधी आज गोलंदाजांनी धमाल उडवलेली दिसत आहे. सामन्याची क्षणचित्र संध्याकाळी घरी गेल्यावर बघेन तेव्हा काय ते समजेल.

वैभव ४२ चेंडू १४४ धावा
नुसता राडा घालत आहे. आताच हे तर पुढे काय.
येत्या काळात हा भन्नाट विक्रम रचणार आहे.
म्हणजे वर्ल्ड क्लास बॉलरनी पुढेमागे याचे काही दोष हेरले तरी हा इतर एवरेज बॉलरना जबरदस्त धुणार हे नक्की.

"संस्कृतमधे अहम् शब्द " अहम्, आवाम्, वयम्" असा सगळ्या वचनांमधे नि विभक्तींमधे का शिकवत असा प्रश्न नेहमी पडलेला असे." - Lol

"सगळेच स्क्रिप्टेड नसते." - अशी सोयीची इंटेग्रिटी असते, ही कमाल आहे. खरं तर कधी कधी फार मोह होतो कि लॉ एन्फोर्समेंटला कळवावं कि इथे मायबोलीवर एक नुसता टीव्ही बघून मॅच फिक्सिंग ओळखणारा तज्ञ आहे. असंख्य वेळा त्याने तसा दावा केलाय. बघा, तुमच्या तपासकार्यात काही उपयोग होतो का त्याचा. Happy

भारताच्या टीम सिलेक्शनबद्दल मला नेमकं काय वाटतं ते ठरवता आलेलं नाहीये. होम कंडीशन्समधे हा प्रयोग कदाचित चालूनही जाईल - यशस्वीसुद्धा ठरेल. काल बुमराह ने कमाल केली. दुसरीकडून सिराज चेंडूला खत समजून फवारणी करायच्या मूडमधे असताना, इतकी शिस्तबद्ध आणि भेदक बॉलिंग करणं, खरच कमालीचं होतं. कुलदीप पण मस्त खेळला. पिच मेकिंगची जबाबदारी बहुदा स्टेट ट्रान्सपोर्ट कडे असावी असं वाटावं इतकं जेमतेम काम केलंय.

खरं तर कधी कधी फार मोह होतो कि लॉ एन्फोर्समेंटला कळवावं कि इथे मायबोलीवर एक नुसता टीव्ही बघून मॅच फिक्सिंग ओळखणारा तज्ञ आहे. >> Lol वरच तज्ञ व्यक्तीने ती पब्लिक मधे येत नाही हे अतिशय नकळत सूचित केले आहे हे लक्षात आले का ? स्क्रिप्टेड गम्मत म्हणे ! माय फूट !

भारताच्या टीम सिलेक्शनबद्दल मला नेमकं काय वाटतं ते ठरवता आलेलं नाहीये. >> हो ! किवीज च्या मालिकेचा धसका घेऊन अन एव्हन बाउन्स असलेले पिच ठेवलेय का ? अक्षर एकदम कसा काय घुसला ह्या लाईनप मधे ? घुसला तोसुद्धा असा कि जाडेजा नि सुंदरच्या आधी बॉलिंग करून गेला. सुंदर ने तीन वर शतक काढून हि जागा आपली करून टाकली तर धमाल होईल Happy

Pages