क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दोन दिवसात नाही पाच सेशन म्हणा.. पण केवळ त्या आधारावर पीच वाईट कोणी म्हटले नाही. ते तर फक्त निरीक्षण नोंदवले आहे. खेळपट्टी का रुचली नाही ते काल सांगितले आहेच. पटले नसेल तरी काही हरकत नाही.

आणि हेड ने जे केले ते अफाट होतेच. पण आज पीच सुधारण्याची शक्यता मी नोंदवली होतीच. तो अंदाज मला होताच. झालेही तसेच.

आता, ११० ओवरमध्ये ३० विकेट पडल्यावर खेळपट्टीतून ती मदत निघून जाणे हे काही स्पोर्टिंग विकेटचे लक्षण नाही म्हणू शकतो असे मला वाटते.

यॉर्करचा मुद्दा कळला नाही ते ओके. आता उदाहरणासाठी फुलटॉस घ्या. चांगल्या खेळपट्टी वर फलंदाज आक्रमक खेळत असेल तर फुलटॉस चा फुल टोल वसूल होतो.
पण तेच गोलंदाज धार्जिणी विकेट असेल तर फलंदाज बचावात्मक खेळत असतो आणि फुलटॉस सुद्धा जपून मारला जातो.

त्यामुळे फुलटोस यॉर्कर या बॉल मागे खेळपट्टीचा हात नसला तरी फलंदाज कुठल्या माईंड सेट ने खेळत आहे, किंवा पिचनुसार काय ऍडजेस्टमेंट करून खेळत आहे याने फरक पडतो.

शुभरात्री

अरे हो आपला सामना राहिलाच. शेवटच्या सत्रात चार विकेट मिळाल्याने जरा जीवात जीव आला आहे. खेळपट्टी चांगली आहे. आपण ४००–५०० मारू शकतो असे वाटत तरी आहे. त्या आधी त्यांना ३२५–३५० मध्ये गुंडाळूया. किमान १००-१२५ लीड घेऊन चौथ्या डावात जाणे उत्तम. सध्याची आपली परिस्थिती पाहता हे सोपे नाहीये. पण अपेक्षा हिच आहे.

वर जे आकडे घेतले त्यांचे कोणी टेन्शन घेऊ नका. कारण तो विनिंग फॉर्म्युला सांगितला आहे. अंदाज नाही. पण तसेच झाले तर आनंदच होईन आणि तो व्यक्त करेनच.

शुभ रात्री Happy

विकेटलेस सेशन.. ब्युटी ऑफ टेस्ट क्रिकेट
फक्त आज सुट्टीचा दिवस आपली फलंदाजी बघायचा प्लान होता तो फिस्कटला

यॉर्करचा मुद्दा कळला नाही ते ओके. >> मूळात मी यॉर्करवर बाद झाला ते फलंदाजाचे तंत्र कमकुवत असण्याच्या मुद्द्याला अनुशंगाने लिहिले होते. तो त्या इनिंगमधला दुसरा बॉल होता. पहिला बॉल स्टंपबाहेर होता तो चेस केला होता. पिच कसे असणार आहे हे कळण्याइतपतही अंदाज आला असेल असे वाटत नाहि. तू सामना बघितला नाहिस नि मी बघितला आहे हा जमिन अस्मानाचा फरक आहे. हायलाईट्स बघून निरीक्षण करणे नि त्यावरून सामना बघितल्याबरोबर वाद घालणे हे अतिशय धारिष्टाचे आहे.

कसोटीच्या पहिल्याच दिवशी दुसऱ्याच चेंडूवर यॉर्करमुळे कोणी गडबडत असेल तर त्यामागे सरप्राइज एलिमेंट हा मोठा फॅक्टर असतो.
अश्या गोष्टी अनुभवाने आणि लॉजिकने माहीत असतात. लाईव्ह सामना बघायची गरज नसते.

असो, मुळात खेळपट्टी कशी होती हा वाद आहे.

स्मिथ लावुशान जो रूट हे सारे कमकुवत तंत्राचे फलंदाज पाहिले दीड दिवस चाचपडत होते ज्यात खेळपट्टीचा काही हात नव्हता. Highlights मध्ये सुद्धा बरेच चेंडू तोंडावर आदळलेले पाहिले.
दीड दिवसानंतर मात्र हेड याने आपल्या भक्कम तंत्राने धुमाकूळ घातला पण यातही खेळपट्टीचा काही हात नव्हता. ती पूर्ण दोन दिवस एकसमान होती. इंग्लिश गोलंदाज पहिल्या डावात तीस चाळीस ओवर टाकून थकले होते ज्यामुळे त्यांची धार अचानक नाहीशी झाली.

असे असेल तर सोडूया विषय आता..

भारत 122–7
ज्या प्रकारे बाद होत आहेत ते दुर्दैवी आहे. फलंदाजीची समस्या आहे.

राहुल भारतात खेळताना संघात स्थान डीझर्व करत नाही असे नेहमी वाटते. पण सध्या वासरात लंगडी गाय शहाणी आहे.

साई सुदर्शन खरेच तिसऱ्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज आहे का वशिल्याची एन्ट्री याचा विचार पडतो. आजच शॉट बघून तर नक्कीच.

ज्युरेलला चौथ्या क्रमांकावर निव्वळ फलंदाज म्हणून संधी मिळते. फॉर्म बघून तात्पुरता निर्णय घेणे ठीक पण लाँग टर्म विचार करता स्पिन भारी खेळणारा अय्यर बाजूला फेकला जातो.

पंतने निराश केले. आज अर्धशतक होईपर्यंत वेगळ्या एप्रोचची गरज होती जो त्याने आधीही काही वेळा दाखवला आहे.

रेड्डी भारतात खेळताना निव्वळ फलंदाज म्हणून संघात जागा कशी मिळवू शकतो? त्या उलट ती जागा भरायला एखाद्या सरफराजला पुरेशी संधी मिळत नाहीत.

गेल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर येणारा सुंदर या सामन्यात आठव्या क्रमांकावर येतो. म्हणजे इथे तो फुकट जाणार.. आणि आधीचे काही फॅब फोर आहेत अशातला भाग नाही.

चुम्मा ची कर्णधार म्हणून अत्यंत वाईट कामगिरी आणि फलंदाज म्हणून सुद्धा अत्यंत सुमार कामगिरी

आता तरी गंभीर ची हकालपट्टी व्हायला हवी... फॉरेन कोच च हवा... भारतात जे spin चांगले खेळतात त्यांना घ्यायला हवे.. गायकवाड, सर्फराज, अय्यर, वगैरे...

Sadha manus
वरच्या दोनी पोस्टला अनुमोदन.
काय करायचे, सर ऐकायका तयार नाहीत ना.

केशवकूल माझ्या पोस्ट मध्ये काय वेगळे लिहिले आहे?

असो,
फलंदाजीत साई, ज्युरेल, रेड्डी हे प्रॉपर फलंदाज म्हणून खेळत असतील तर आपणच निर्माण केलेली समस्या आहे.
यात एक गिल येईल म्हणा. इतर दोन जागा अय्यर सरफराज सारखे प्लेअर पुन्हा आणायला हवेत. आणि नवीन तयार करायला हवेत.

गोलंदाजीत मात्र आश्विनची एक मोठी पोकळी तयार झाली आहे. आकडे काढले तरी लक्षात येईल की त्याने विकेट काढणे आपण किती गृहीत धरत होतो.

मुळात खेळपट्टी कशी होती हा वाद आहे. >> हिरिरीने वाद घालण्याअगोदर सामना बघणे जरुरी आहे एव्हढीच माफक अपेक्षा आहे. ते होणे नाही हेही माहित आहे. नुसत्या अनुभवाने आणि लॉजिकने कळले असते तर लोक लाईव्ह सामना बघत नसते.

आता तरी गंभीर ची हकालपट्टी व्हायला हवी... फॉरेन कोच च हवा... >> फॉरेन कोचचे माहित नव्हती पण गंभीर किमान टेस्ट साठी तरी कोच नकोय. पूर्ण अनाकलनीय डावपेच ! स्वतःच्या शक्तिस्थलांपेक्षा पर्सीव्ह्ड नोशन्स वर सगळे ठरतेय असे वाटते. साई नि रेड्डी दोघेही हा सामना कसे खेळले राव ?

आज कुलदीप यादव जरी नाईट वॉचमन म्हणून पाठवला असला तरी उद्या तोच त्यांचा घाम काढून आपला ड्रॉ चा आत्मविश्वास वाढवायची शक्यता आहे.

८० षटके किमान. ८ विकेट्स बाकी.

व्हाईटवॉश नक्की.

खेळपट्टीवर उभं रहायची क्षमताच नाहीये या भारतीय संघात.

२०२७ पर्यंत गंभीरच आहे कोच. २०२८-३० च्या टेस्ट चॅंपियनशिपची तयारी करायला घ्यायला हवी बीसीसीआयने.

ह्या वेळच्या शेड्युलमधे कठीणच आहे भारताचं फायनल खेळणं.

आज कुलदीप यादव जरी नाईट वॉचमन म्हणून पाठवला असला >> तुझ्या जीभेवर काळा तीळ असावा अशी आशा करूया Happy प्रामाणिकपणे संपूर्ण टीम अतिशय निरुत्साही वाटते आहे.

ह्या वेळच्या शेड्युलमधे कठीणच आहे भारताचं फायनल खेळणं. >> हा सामना अनिर्णित राहिला तरी पुढची सिरीज किवीज विरुद्ध तिथेच आहे त्यामूळे काही चमत्कार झाला तरच. पुढची होम सिरीज आहे पण तीला किती गृहित धरता येईल हे आता सांगता येत नाही.

प्रामाणिकपणे संपूर्ण टीम अतिशय निरुत्साही वाटते आहे.
>>>>>>

जडेजा म्हणाला आहे की उद्या आम्ही खेळून काढले तर तो एक विजय असेल.
जर हे फक्त बोलण्यापुरते नसून तेच डोक्यात ठेवून खेळले तरच ते घडू शकते.
अन्यथा मालिका आधीच हरल्याने पडलेल्या खांद्याने आले तर गेला सामना..

कुलदीप पहिल्या डावात चांगला खेळला होता आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे बाद झाल्यावर जसे निराश होऊन गेला ते आवडले होते. म्हणजे आपल्या विकेटवर प्राइज टॅग लावून खेळत होता. तेच तो उद्या करणार आणि हेच महत्वाचे. त्यात यश मिळेल की नाही ही पुढची गोष्ट. कारण फलंदाज बाद व्हायला एक चेंडू पुरतो.

डावखुरे फलंदाज खूप झालेत तरी सुंदर आणि जडेजा यांना थोडे वर खेळताना बघायला आवडेल.

सध्या आपली स्थिती अशी आहे की न्यूझीलंडला न्यूझीलंड मध्ये जाऊन हरवणे सोपे आहे पण ऑस्ट्रेलियाला भारतात हरवणे अवघड.
अजून एक अवे सिरीज लंकेत आहे. ते सुद्धा आता फिरकीवर नाचवतील अशी स्थिती आहे.

गंभीरबद्दल एक जबरदस्त कमेंट वाचला कि जर कामसूत्र गंभीरने लिहिलेले असते तर त्याचे प्रत्येक पान भारतीय खेळाडूंनी वेगवेगळ्या पोझीशन वर खेळण्याबद्दल असते Lol आज कुलदिप ला सुंदर किंवा साईच्या जागी तीन वर बघून तसेच वाटले.

आज कुलदीप यादव जरी नाईट वॉचमन म्हणून पाठवला असला तरी उद्या तोच त्यांचा घाम काढून आपला ड्रॉ चा आत्मविश्वास वाढवायची शक्यता आहे.
>>
काय वेळ आली आहे आपल्या संघावर
इतर कोणीही सोडून एका प्युअर बॉलर कडून असलेल्या बॅटिंग अपेक्षांवर चर्चा होतेय...

*एका प्युअर बॉलर कडून असलेल्या बॅटिंग अपेक्षांवर चर्चा होतेय...* - खरं असलं तरीही कुलदीपवर कांहींस अन्यायकारक म्हणता येईल. खेळलेल्या प्रत्येक सामन्यात तो अतिशय जिगरीने फलंदाजी करतोच व तीही तंत्रशुद्ध म्हणण्याइतपत चांगलीही करतो.

मधल्या काळात रहाणे, पुजारा, कोहली अशी दिग्गज मिडल ऑर्डर फेल जात असताना आपली फलंदाजी पंत, जडेजा, सुंदर, ठाकूर, कधीतरी शमी बुमराह यांची खेळी यावरच अवलंबून असायची.

कुलदीपची हारमर समोर स्लिप मध्ये ईजी कॅच.
पण थांबा.. मार्करम जज करायला लेट झाला आणि बोटाला चाटून गेली.

गेला कुलदीप
घुसला चेंडू
८३.३ ओवर शिल्लक ७ विकेट हातात

सेम ओव्हरमध्ये गेला ज्युरेल
८३ ओवर शिल्लक ६ विकेट हातात

सुंदर पुढे पाठवायला हवा होता ज्युरेल आधी
तो आणि जडेजा ७ आणि ८ व्या क्रमांकावर येणार आता. त्यातही रेडी पुढे पाठवला तर अजून मागे.
पुढे मैदानावर जे होईल ते होईल पण प्लेअरचा फॉर्म आणि क्लास कळत नाही का यांना.. दिवसाची सुरुवात महत्वाची होती

पंत ने पुढे येऊन सिक्स मारला.
गरज नव्हती पण तेवढेच मनोरंजन
सुट्टी टाकली आहे.

एक तासाचा खेळ झाला.
साई कधीही बाद होऊ शकेल असा खेळत असून बाद झाला नाही हे विशेष

Pages