क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

https://www.facebook.com/share/v/1GatHsL6eP/

येत्या गुवाहाटी कसोटीत आधी टी ब्रेक आणि नंतर लंच ब्रेक.
योग्य नियम. वर्षानुवर्षे हा प्रश्न पडायचा..

आजचा पहिला विजय आला
ऋषभ पंतची 90 धावांची खेळी आणि आठव्या विकेटसाठी 60+ नाबाद पार्टनरशिप यांनी आफ्रिका विरुद्ध ए संघाचा सामना जिंकवला.

SA A vs India A, 1st unofficial Test
South Africa A tour of India

SA-A 309 & 199
IND-A 234 & 277/7
India A won by 3 wickets

आज शफालीचा दिवस आहे.
जीवदान सुद्धा मिळाले आहे.
टॉस हरलो.. थोडी चिंता वाटलेली.
पण आताचा स्कोअर छान आहे. 25 ओवर 151-1
325-350 पर्यंत जातात का बघूया..

रिचा घोष आधी पाठवायची ट्रिक मिस केली. आणि शेवटपर्यंत दोन्ही एंड ने मारत नव्हते. दिप्ती शतकासाठी खेळल्यासारखे खेळत होती.
एकंदरीत इतकेच टारगेट डोक्यात असावे.
325 असते तर रिचा घोषला अमनजोत जागी पाठवले असते. 325 च्या नादात 275 किंवा त्याहून कमी वर नको थांबायला हाच विचार असावा. सेफ खेळलो आपण असे वाटते. आता हे चूक की बरोबर हे आपले स्पिनर ठरवतील.
पण 25 ओवर असताना 151–1 असताना 325 अपेक्षा होती.

स्पिन नाही होत आहे. स्लो फार नाहीये. थोडे खेळले तर पेस सोबत ऍडजस्ट होते. दव पडले तर तो फॅक्टर सुद्धा जाईल. आफ्रिकेची बॅटिंग डेप्थ मोठी आहे पण या स्पर्धेत त्यांनी दोन लोएस्ट स्कोअर सुद्धा टाकले आहेत. अगदी 100 आत बाद झाले आहेत. त्यामुळे काही तर्क करणे अवघड आहे. बघूया.. बोटे दुमडून बसूया आता

शफाली
दिवस आहे आज
दुसरी विकेट काढली

123-4 !!(

156-5 !

207-5

जिंकल्या आपल्या पोरी .. बदाम बदाम बदाम...
फटाके वाजवून आलो आहोत.. योगायोग बघा आज तुळशीचे लग्न सुद्धा होते.
आता आईसक्रीम पार्टी होणार आहे
मागे आफ्रिकेलाच हरवून ट्वेंटी वर्ल्डकप जिंकलो होतो तसाच आणि तितकाच आनंद अनुभवतो आहे...

जबरदस्त विजय! तुफान विजिगीषु वृत्ती! वेल डन, टीम इंडिया!!

शफालीचं स्वप्नवत पुनरागमन! वर्षभर टीममधे पुनरागमनासाठी झगडणारी, एका आठवड्यापूर्वी डोमेस्टिक टी२० खेळणारी, प्रतिका रावल ला झालेल्या दुर्दैवी दुखापतीमुळे अचानक संघात परतते आणि वर्ल्डकप फायनलचा सामनावीर पुरस्कार पटकावते. असली विरळा स्क्रिप्ट्स नियतीच लिहू जाणे!

*असली विरळा स्क्रिप्ट्स नियतीच लिहू जाणे!* वेल सेड !!!! हेच मुझुमदार यालाही लागू होते; स्वतःची योग्यता पुन्हा पुन्हा सिद्ध करूनही ज्याला भारतीय संघात स्थान मिळू शकलं नाही , त्याच्या मार्गदर्शनामुळे ह्या संघाला विश्व चषक मिळावा ! Poetic justice !!
ह्या पोरींचे तंत्र व मानसिकता कमालीची होती ! जवळ जवळ गूड लेंथ असलेला चेंडू जाग्यावर उभं राहून स्ट्रेट बॅटने परफेक्ट स्ट्रेट सिक्सर !!
महिला संघाच्या सामन्याला पाठींबा द्यायला भरगच्च स्टेडियम असणं, हे देखील खूप आनंददायी लक्षण !!
पुन्हा अभिनंदन !!

मस्त झाला सामना. आफ्रिकी कप्तान सामना जिंकून देऊ शकली असती पण अंतीम सामन्याचा दबाव तिच्यावरही जाणवला.

भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन!

काल संपूर्ण समारंभ संपेपर्यंत टीव्ही पहात बसलो सलग ११ तास.

आधी कांगारुंसोबतची टी२० पाहिली मग पावसाने ही मॅच उशिरा सुरु केली त्यामुळे पुरुषांची मॅचही पुर्ण पाहता आली.

BCCI चे केवळ ICC वरच नाही तर देखिल देखिल नियंत्रण आहे. Wink

When Sachin and Kambli stitched that 664 run partnership which made them overnight stars a certain Amol Mazumdar waited for 2 days with his pads on for his chance. What he didn't know was that this would go on for 2 decades because even after raking up more than 11 thousand first class runs he never got the chance to don the blue jersey. Now he has headed a team that has won a WC. This is straight up a Bollywood level script ...
https://x.com/Prithvi10_/status/1985056815391093032

काल संपूर्ण समारंभ संपेपर्यंत टीव्ही पहात बसलो सलग ११ तास.
/>>>>>

मी ऋषभ पंत मुळे सकाळची इंडिया आफ्रिका ए संघाची कसोटी सुद्धा पाहिली.

तिन्हीत विजय साजरा केला Happy

मी क्रिकेटबद्दल तुझ्याशी बोलतो म्हणून मला ब्रेक - अपची धमकी देणारी तू, कालपासून माझ्याशी क्रिकेटशिवाय दुसरं कांहीच बोलत नाहीं आहेस !!varndvesh.JPG

Proud
पण हे बरेच आहे.. बायका पोरींना क्रिकेटची गोडी लागणे
आणि हे खरेच होत आहे.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या कामगिरीचे फोटो व्हॉट्सॲप स्टेटस वर लावायचो तेव्हा कुठली मुलगी मुद्दाम ते स्टेटस लाइक करायची नाही.. पण आता गेल्या दोन्ही विजयात दणादण लाईक येत आहेत मुलींचे.
आणि हे एका अर्थी योग्य किंबहुना स्वाभाविकच आहे

काल पोरी ज्या काय खेळल्या त्याला तोड न्हवती. आता पुढचे २५-३०- ४०- ५० वर्षे परत aus आणि eng मध्ये जुंपणार. परत हा क्षण जीवनात यायचे चांसेस फार कमी म्हणून सारख्या हायलाइट्स बघत होतो पण मन भरलं नाही. सकाळी उठलो आणि विचार केला प्रत्यक्षात मॅच बघितली नाही पण आपण तसं घडवून आणू शकतो. मग काय मी शेजारीपाजारी जाऊन कालच्या मॅचचं आणि पोरींचं कौतुक करायला लागलो. त्याचा परिणाम असा झाला की आजूबाजूच्या काकू मावश्या आज्या जोशात आल्या आणि क्रिकेट बॅट बॉल घेऊन मैदानावर गेल्या. काही बायका निळ्या ड्रेसमध्ये तर काही हिरव्या ड्रेसमध्ये आल्या होत्या. आता पंचाईत अशी झाली की सगळ्याच इंडिया टीममध्ये खेळायला आल्या होत्या त्यामुळे भारतात २० प्लेअर आणि आफ्रिकेत मोजून ३-४ खेळायला तयार झाल्या. ज्या तीन चार जणी तिकडून खेळायला तयार झाल्या त्या जास्त गोऱ्या होत्या आणि स्वतःला फॉरेनर समजत होत्या. त्यांचे नवरे मात्र रबाडा, बऊमा वैगरे होते. मग मी शेवटी मध्यस्थी केली आणि कसेतरी दोन गट पाडले. मग जी काय मॅच सुरू झाली की ज्याचे नाव ते. अगदी हुबेहूब कालच्या मॅचसारखीच. एकीने अमानज्योत बनून डाय मारून कॅच पकडली, एकीने ठाकूर बनून जोरात समोरच्या बाईवर बॉल मारला, तिने पोलार्ड बनून जोरात बॅट आपटली, एकीने शेवटची कॅच पकडल्यावर बॉल खिशात ठेवला आणि पळायला लागली. जिचा बॉल होता तिला वाटलं ही बॉल चोर आहे म्हणून तिच्या पाठीवर पळायला लागली, फुल धमाल मजा मस्ती.

जबरदस्त विजय! तुफान विजिगीषु वृत्ती! वेल डन, टीम इंडिया!! >> +१ दिवस सार्थक झाला.

*असली विरळा स्क्रिप्ट्स नियतीच लिहू जाणे!* वेल सेड !!!! हेच मुझुमदार यालाही लागू होते; स्वतःची योग्यता पुन्हा पुन्हा सिद्ध करूनही ज्याला भारतीय संघात स्थान मिळू शकलं नाही , त्याच्या मार्गदर्शनामुळे ह्या संघाला विश्व चषक मिळावा ! Poetic justice !! >> +१

अमोल नि हरमनप्रीत ह्यांच्यासाठी मनापासून बरे वाटले.

भारत नि आफ्रिका दोन्ही बर्‍यापैकी तरूण संघ आहेत. ऑस्ट्रेलिया लाईफटाईम मेंबर आहे. ह्या तीन संघांमधे येते २-३ वर्षे मस्त चुरस असणार आहे.

तुम्हाला सांगितले कि तुम्हाला एक वन डे टीम निवडायची आहे - प्रत्येक ओळीमधला कोणीही एक प्लेयर घेऊ शकता. कोण निवडाल ?

१. सचिन्/ गोवर/ झहीर अब्बास/ बाबर आझम/ अमला/ रोहित
२. गूच/ संगकारा/ हसी / जयसूर्या / धोनी
३. मार्टीन क्रो/ क्लूसनर / गिल्ख्रिस्ट/ सईद अन्वर / गेल

.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.

.
.
.
.
.

.
.
.
.
.

.
.
.
.
.

.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.

.
.
.
.
.

.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.

.

हे ठरवलेत कि इथे जाऊन त्यांचे हायेस्ट रेटींग्स बघा Happy
https://www.relianceiccrankings.com/alltime/odi/batting/

जो खेळ फक्त पंधरा वीस देश खेळतात, त्यात जिंकल्यावर विश्वविजेतेपद मिळाले?
बरं संघ खासगी आहे, भारतीय सरकारी संघ नाही.
दहा कोटी रुपये खिरापत वाटली देवा भाऊने. आधीच एकावन्न कोटी बक्षीस मिळाले असताना. काय कारण?
हे जनतेचे पैसे वाटताना लाज वाटत नाही का?
आणि हे मी स्मृती मानधना माझी गाववाली असताना लिहितोय.
आता द्या शिव्या मला.

*जो खेळ फक्त पंधरा वीस देश खेळतात,..... आता द्या शिव्या मला * -
मला वाटतं, शिव्या देण्याच्या जागतिक स्पर्धेत जो देश जिंकेल, फक्त त्याच देशाला विश्वविजेता म्हणवून घ्यायचा अधिकार आहे; कारण, जगातल्या सर्व देशात खेळला जाणारा बहुधा तो एकच खेळ असावा !! Wink

Pages