Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://youtu.be/SqIE6lj2IGo
https://youtu.be/SqIE6lj2IGo?si=_NS-7iGnIFR9L43-
इन्स्पेक्टर झेंडे - हे झेन्डे म्हणजे चार्ल्स शोभराज ला अटक करणारे. बरा वाटतोय ट्रेलर. निदान टाइम पास असेल.
अंधेरा बरी वाटली तशी. पहिले
अंधेरा बरी वाटली तशी. पहिले चार भाग अतिशय छान वेगाने पुढे जातात, पकड वगैरे घेतात. त्यानंतर मात्र कुठला मार्ग घ्यायचा आहे हे न कळल्यासारखी मालिका काहीशी चाचपडत जाते. सुपरनॅचरल ट्रॅक वाईट नाहीये. पण तो ठिगळ लावल्यासारखा आणि आगापिछा नसताना समोर येतो हे झेपलं नाही.
सध्या बर्याच हॉरर लेबल असलेल्या मालिका शेवटी मनोव्यापाराचे खेळ ठरतात त्या पार्श्वभूमीवर खरोखरच सुपरनॅचरल हॉरर कडे जाण्याचं धाडस दाखवल्याबद्दल मी या मालिकेला मार्क्स दिले आहेत. फक्त ते धाडस नीट साकार करायला हवं होतं इतकंच माझं म्हणणं आहे.
डिप्रेशन किंवा सुपरनॅचरल या दोन्हीपेक्षा साय-फाय स्वरूप दिलं असतं मालिकेला तर खूप चांगली होऊ शकली असती असं वाटतं.
एकदा बघण्याइतपत बरी आहे.
नेफ्लि वर हन्टिंग वाइव्ज
नेफ्लि वर हन्टिंग वाइव्ज पाहिली . बॉस्टन ची एक फॅमिली टेक्सस ला एका स्मॉल टाउन मधे मूव होते आणि त्यातल्या बाई ला टिपिकल टेक्सस ( हन्टिंग करणारे, रिग्रेसिव विचारांचे लोक, अॅबॉर्शन्स, गन्स वगैरे) वातावरणाशी जुळवून घ्यायला अवघड ही वाटतं आणि एक उत्सुकताही असते. त्यांच्यात फिट इन करण्याच्या नादात अचानक त्या सर्कल मधे एक मर्डर केस घडते, त्यानंतरचा स्पायरल होत गेलेला केऑस अशी गोष्ट आहे. भरपूर एक्स रेटेड सीन्स , वॉयलन्स इ. आहे पण बघत गेले की पुढे बघितली जाते अशी कॅटेगरी
स्मॉल टाउन सेट अप च्या नावाखाली काही इल्लॉजिकल किंवा अति सोयिस्कर ट्विस्ट आहेत. फार उच्च वगैरे काही नाही.
आता ब्लॅक ड्व्ज बघते आहे. स्पाय कथा. किआरा नाइटली आहे म्हणुन बघते आहे, ३ भाग झाले. सो फार बरी वाटते आहे.
मंडला मर्डर्स संपवली कालच्या
मंडला मर्डर्स संपवली कालच्या सुट्टीत.
वेगवान होती पण टिपीकल. अरण्यक, असुर टाइप्स...
सुरवीन चावलाचं काम चांगलं होतं. वाणी कपूर पुरषी दिसली नाही हीच तिची अचीव्हमेंट. कु.महाग्रू यात महाग्रू रोल मधेच होती, पण अक्टिंग मधे माती खाल्ली. हिरो बरा होता. रघुवीर यादव, मनु रिषी चढ्ढा फारच कमी दिसले. जमील खान पण अजून चालला असता. 28-30 ऐवजी 35-40 मिनिटांचे भाग हवे होते.
पुढचा सीझन बघेन का नाही माहीत नाही. पोहनकर डोक्यात जाते. चेहेऱ्यावर इतर कुठला भाव नसेल तर बाय डिफॉल्ट खत्रूड भाव असतो तिचा.
स्पॉयलर अलर्ट
मला वाटलं की दिल्लीत गोळी लागून पण हिरो मारत नाही याचा उल्लेख आला म्हणजे वरदान वालं ट्रम्प कार्ड तेंव्हा यूज झालं. पण ते फक्त त्याला अलौकिक ठरवण्यासाठी लिबर्टी म्हणून होतं अन् ट्रम्प कार्ड क्लायमॅक्स संपवायला आलं हे पाहून बोर झालं.
यापेक्षा क्लायमॅक्स मधे अजून काहीतरी वेगळं बघायला आवडलं असतं. पण बहुदा डेडलाइन जवळ आल्यावर क्लायमॅक्स ला MVP ची पाटी टाकली क्रिएटिव्ह टीम नी...
तसंच त्या व्यंकट ला मारलं त्याचं पुढे काहीच झालं नाही.
म्हणजे पोलिसांना / CIB ला बॉडी मिळणं वगैरे...
या धाग्यावर बरेच दिवस फिरकणंच
या धाग्यावर बरेच दिवस फिरकणंच झालं नाही.
सारे जहां से अच्छा नेटफ्लिक्सवर पाहिली. एंगेजिंग आहे. काहीच नसेल पाहण्यासारखं तर बघू शकता.
नाहीत बघितली तरी चालेल.
प्रतिक गांधी, , रजत कपूर , अनुप सोनी असे चांगले कलाकार आहेत. इंदिरा गांधींचं कॅरेक्टर उभी केलेली अवंतिका अकेरकर मराठी आहे असं वाटत नाही. सर्वात जोरदार काम आहे ते पाकिस्तानचा आय एस आय ऑफीसर मुर्तुझा चं कॅरेक्टर उभं केलेल्या सनी हिंदुजाचं. कृतिका (कि क्रितिका कामरा) ने पाकिस्तानी संपादक छान उभी केली आहे. ती पाकिस्तानी वाटते.
प्रत्येक कॅरेक्टर सहज वाटावं अशी ट्रीटमेंट आहे. सगळे एजंटस मानवी आहेत. पण प्लॉट खूप शिळा वाटला. आणि दर दोन वेबसिरीज मधली एक स्पाय स्टोरी असल्याने आता तोच तोच पणा येत चालला आहे. शिवाय जो शेवट आहे तो कधी ऐकलेला नाही. बाकी घटना अनेक वेळा अनेक सिनेमा, वेबसिरीज मधे पाहून झालेल्या आहेत.
जर काल्पनिकच असेल तर प्रत्येक वेळी इंदिरा गांधी या इंदिरा गांधीच दाखवायची काय गरज ? दाखवायची ना एखादी नवनवीन साड्या नेसणारी दीपिका बिपिका,. तसंच दर वेळी रॉ म्हटलं कि रामनाथ कावच कशाला ? सत्य कथा असते तेव्हा घेतात स्वातंत्र्य आणि नसेल तेव्हां खरी पात्रं.
आधी रॉ शी संबंधित पुस्तकं वाचताना आर एन काव हे नाव इतक्या वेळा वाचलंय कि अजीर्ण झालंय. गोविंदाला घ्या आणि कॉमेडी दाखवा. तेव्हढाच बदल.
दुपैया पाहिली. मस्त हलकीफुलकी
दुपैया पाहिली. मस्त हलकीफुलकी आहे. काही विनोद ओढून ताणून घडवून आणल्यासारखे वाटतात. एका कथेतून बऱ्याच सामाजिक समस्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय.
ब्लॅक डव्ज - नेफ्लि. - सीरीज
ब्लॅक डव्ज - नेफ्लि. - सीरीज फारशी झेपली नाही. ब्लॅक डव्ज नावाची ब्रिटन मधली सिक्रेट संघटना, "माहितीच्या बिझिनेस" मधे असते , म्हणजे मोठमोठ्या राजकीय, कॉर्पोरेट इ. सीक्रेट्स माहित करून घेऊन योग्य बिडर ला विकण्याचा धंदा. त्यांनी बर्याच मोठ्या प्लेसेस मधे आपली लोक पेरलेली असतात. त्यातली एक डीफेन्स सेक्रेटरीची बायको. अजून एक कॉन्ट्रॅक्ट किलर कम कवर अप/क्लीन अप स्पेशालिस्ट. एक त्यांची बॉस असा मुख्य कॅरेक्टर सेट अप आहे. सुरुवात लंडन मधे चायनीज अँबेसेडरचा खून/ अपघात आणि त्याची मुलगी गायब होणे इथून होते. मग वेगवेगळ्या पार्टीज ने आपापल्या कारणांसाठी त्यामागच्या व्यक्ती चा माग काढणे , एकमेकांना मारण्याचा प्रयत्न वगैरे.
सुरुवात इन्टरेस्टिंग पण नंतर बरेच अनबिलिव्हेबल योगायोग , अ. आणि अ. स्टोरीलाइन आणि मोठे लूपहोल्स आहेत. उदा. मेलेल्या हाय प्रोफाइल व्यक्तीचा फोन कोणत्याही पात्राने सहज कुठेही ऑन करणे, त्यावरून मेसेज पाठवणे तरी पण त्यावरून पोलिस त्या व्यक्तीला ट्रॅक न करणे! हे फारच बेसिक वाटते.
लेटर हाफ मधे आता काहीतरी फायनली ट्विस्ट होणार असे वाटता वाटता गुंडाळली.
किआरा नाइटली आवडते मला. तिचे आणि मेन लीड्स चे काम चांगले आहे. ६ च भागाची सीरीज असल्यामुळे बोअर तर झाली नाही, पूर्ण बघितली - पण हाती फारसे लागत नाही.
सारे जहाँ से अच्छा रोज नेफि
सारे जहाँ से अच्छा रोज नेफि समोर पहिली दाखवत आहे. पण अजून पाहिली नाही.
"हंटिंग वाइव्ह्ज" (नेफि) पहिला भाग थोडा पाहून कंटाळून सोडून दिली होती. पण काल पुन्हा पुढे पाहिली आणि चांगली एंगेजिंग झाली. चौथ्या की पाचव्या भागावर आहे आता. चांगली आहे.
सारे जहाँसे अच्छा बरी आहे. मी
सारे जहाँसे अच्छा बरी आहे. मी बरीचशी बघितली. शेवटचा एक एपिसोड राहिला तो राहिलाच.
सारे जहाँसे अच्छा >>>>
सारे जहाँसे अच्छा >>>> सुरवातीला बरी वाटली नंतर मात्र कंटाळा आला. Plot शिळा आहेच आणि काही गोष्टी इतक्या सहजपणे घडतात की अगदी "ए नाय रे नाय " म्हणावसं वाटतं. आपण काय काम करतो ते स्प ष्ट सांगता येत नाही हे ठीक आहे पण कुठे बदली होणार आहे हे पण तो बायकोला सांगत नाही. विष्णुवर संशय असुनही मुर्तझा त्याच्यावर पाळत ठेवत नाही. लपून पाठवले जाणारे संदेश decode करायला माणसं आहेत पण विष्णु बॉससोबत उघड उघड गप्पा मारतो . तो रशियन की फ्रेंच मुलीचा plot उगाचच वाटला. फातिमा आवडली पण तोपर्यंत मालिकेत interest राहिला नव्हता. आणखी बर्याच लहान लहान गोष्टी आवडल्या नाहीत.
सध्या FISK आणि Thursday murder club आलटून पालटून बघते आहे.
दर वेळी रॉ म्हटलं कि रामनाथ
दर वेळी रॉ म्हटलं कि रामनाथ कावच कशाला
>>> आपल्या हयातीत लिजंड बनण्याचं भाग्य लाभलेल्या माणसाचं नाव घेतलं की कथानकात ऑथेंटीसिटी येईल असा लेखकाला वाटलं असेल. कारण बऱ्याचश्या हेरांची व हेरखात्याची कामगिरी फारशी समोर येत नाही. तेच त्यांचं यश असतं.
बाय द वे, त्यांचं नाव रामेश्वर नाथ काव आहे.
माझे मन +१
माझे मन +१
ब्लॅक डव्ज् साठी मैत्रेयीला
ब्लॅक डव्ज् साठी मैत्रेयीला अनुमोदन.
इथे कोणी wednesday सिरीज बघत
इथे कोणी wednesday सिरीज बघत नाही का ? हॉरर प्लस ब्लैक कॉमेडी प्लस सूपर नेचरल अशी मिक्स भेळ आहे .
हाफ CA दोन्ही एपिसोड बिंज वॉच
हाफ CA दोन्ही एपिसोड बिंज वॉच केले.
संपूर्ण प्रोसेसमधून गेलेले असल्याने सगळंच रिलेट करू शकले.
पण दुसऱ्या सिझनचा शेवट अगदीच विचित्रपणे केला आहे.
किंवा माझेच मन तयार नव्हते sad ending बघायला.
कदाचित तिसरा सिझन येणार असावा.
wednesday सिरीज पहिला सिझन
wednesday सिरीज पहिला सिझन छान होता ( तशा सिरीज आवडत असतील तर )
दुसऱ्या मध्ये पहिल्या काही एपिसोड मध्ये जरा violance किंवा विकृत पणा जास्त वाटला ( म्हणजे एज कॅटेगरी नुसार थोडा जास्त ) पुढचे एपिसोड बघायचे आहेत.
सारे जहाँसे अच्छा >>>>
सारे जहाँसे अच्छा >>>> सुरवातीला बरी वाटली नंतर मात्र कंटाळा आला. Plot शिळा आहेच आणि काही गोष्टी इतक्या सहजपणे घडतात +++
हे लोक एकमेकांना फोनवर सरळ नावाने बोलावतात. कुठेही कोणालाही भेटतात. फोनवर इतक्या उघडपणे बोलत असताना मोर्स कोड चे मशीन कशाला उगाच ठेवताय असं वाटून गेलं.
बाकीच्या अशा मुव्ही किंवा सिरीज पेक्षा वेगळेपणा म्हणजे पाकिस्तानी मिलिटरी किंवा एजंट अती मूर्ख दाखवले नाहीयेत.
पण पाकिस्तान मधल्या कोणीच बायका कुठेही बुरखा वापरताना दाखवल्या नाहीत. मॉडर्न कपडे घालून देखील वावरतात. भावाच्या मित्रांसमोर बिना बुरखा किंवा डोक्यावर ओढणी न घेता वावरतात. ते सगळे जरा विचित्र वाटले.
शेवटी घडलेली घटना खरी आहे का नाही हे कळलं नाही. म्हणजे खऱ्यावर आधारित सिरीज आहे की पूर्ण काल्पनिक आहे.
इंदिरा गांधी बऱ्यापैकी खऱ्या वाटतात ( मागे कुठेतरी त्या फातिमा सना ने रोल केला होता तेव्हा फार वैताग आलेला तिला बघायला आणि मान वाकडी करून बोललेले ऐकायला. त्यात ती अक्षरशः बावळट वाटत होती )
मागे कुठेतरी त्या फातिमा सना
मागे कुठेतरी त्या फातिमा सना ने रोल केला होता तेव्हा फार वैताग आलेला तिला बघायला आणि मान वाकडी करून बोललेले ऐकायला. त्यात ती अक्षरशः बावळट वाटत होती
>>> 'सॅम बहादूर'मध्ये....रागच आला होता. बॉडी लँग्वेज इतकी वीक होती.
गणपतीत sacred games सीजन एक
गणपतीत sacred games सीजन एक पाहिला.
बहुधा नेटफ्लेक्स सुरुवातीच्या काळातील सिरीज. तेव्हा नेटफ्लिक्स नसल्याने आणि नंतर त्यात काहीतरी शिवीगाळ, सेक्स आणि नवाजुद्दीन आहे हे समजल्याने काहीतरी कळकट मळकट असणार म्हणून आजवर बघितली नव्हती.
पण नुकतेच त्याचा एक सीन कुठेतरी पाहिला आणि समजले की त्यात सैफ आणि जितेंद्र जोशी सुद्धा आहेत. तो सीन सुद्धा छान वाटला म्हणून बघायला घेतली.
जे आधी वाटत होते तशीही आहे आणि जे तो सीन बघून वाटला तशीही आहे.
पण ओव्हरऑल उत्कंठावर्धक आहे. जपून बघावी लागते.
महत्त्वाचे म्हणजे बालपण हिंदू-मुस्लीम मिश्र एरियात आणि मुंबईत गॅंगवॉर चालायची त्या जमान्यात गेल्याने काही गोष्टी रिलेट होतात.ज्या गोष्टी चार लोकांना नवीन वाटू शकतात त्या माझ्यासाठी जुन्या आहेत. त्यावर आधारित घटनेत काय दाखवतात हे जाणून घ्यायच्या लालसेपोटी उत्सुकता टिकून आहे.
मीही वेन्स्डे -२ बघायला
मीही वेन्स्डे -२ बघायला घेतली आहे. पहिला सीझन आवडला होता. जेना ऑर्टेगा मस्त काम करते.
ज्या गोष्टी चार लोकांना नवीन
ज्या गोष्टी चार लोकांना नवीन वाटू शकतात त्या माझ्यासाठी जुन्या आहेत. >> तुम जिस स्कूलमे पढते हो उसके हेडमास्टर हम है वाला फील आला एकदम.
मी संपवला wednesday २ सीझन.
मी संपवला wednesday २ सीझन. मैत्रेयी, तुमची बघून झाल्यावर अधिक लिहीन .
तूर्तास तिसऱ्या सिझनची सोय करून ठेवलेली आहे इतकेच .
अरे लिही लिही. मी नंतर वाचेन,
अरे लिही लिही. मी नंतर वाचेन, तसंही माझी उद्यापर्यत संपेलच
Sacred Games सीजन २ संपवला.
Sacred Games सीजन २ संपवला. दोन दिवस सलग बघून..
आणि डोक्याला भुंगा.. शेवटी बॉम्ब डीफुज होतो की नाही..
गूगल केले तर लोकांनी दोन्ही बाजूनी शेकडो थिअरी मांडल्या होत्या.
पण त्याची गरज नव्हती
कारण जर मुंबई आजही आहे तर अर्थातच बॉम्ब डीफुज झाला असणारच हे उघड आहे
Sacred game याच नावाचं पुस्तक
Sacred game याच नावाचं पुस्तक आहे बघ kindle वर. त्यावर आधारित आहे ही सिरीज
पाहिली हंटिंग वाइव्ज पूर्ण.
पाहिली हंटिंग वाइव्ज पूर्ण. चांगली आहे. ग्रिपिंग वाटली शेवटपर्यंत. शेवटी थ्रिलर कोशंट वाढवायला खूप ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. आणि शेवट थोडा लूजच वाटला.
बाकी लूज एण्ड्स बरेच आहेत. गव्हर्नरपदाकरता जो उमेदवार लढणार आहे त्याच्या बायकोचे पूर्वीचे दिवस, तो इतिहास जनरल पब्लिकला माहीत नसेल हे अशक्य वाटते. कारण तिचे पूर्वायुष्य तेथून फार लांब नसलेल्या ठिकाणचे असते. अशी व्यक्ती एकदा प्रकाशात आली (कॅम्पेन सुरू झाल्यावर) की किमान काही लोक तरी तिला ओळखतील. दुसरे म्हणजे तिच्या मैत्रिणी दाखवल्या आहेत त्या मूळच्या त्या धनिक/सत्ताधारी सर्कलमधल्या दाखवल्या आहेत. हिचे उपरेपण त्यांना अजिबात समजत नाही असे दाखवले आहे. तेथेही लॉजिक ताणले आहे.
यातल्या पोलिसांपैकी एक सालाझार नावाचे स्त्री कॅरेक्टर आहे. तिचा स्क्रीन प्रेझेन्स जबरी आहे. मात्र तिलाही शेवटी काही खास काम नाही. नाहीतर सुरूवातीला पेरलेली अशी पात्रे असतात की जी शेवटी सगळा पिक्चर/सिरीज खाऊन जातात, तशी वाटली होती ती. याचे पुढे सीझन्स आहेत का कल्पना नाही.
प्रिती विराज, ओके.. आणि
प्रिती विराज, ओके.. आणि धन्यवाद
तरीच पटकथा इतकी गुंतागुंतीची तरीही घट्ट बांधली गेलेली आहे. वेबसीरीजच न्याय देते, चित्रपट असता तर अवघड होते.
बाई दवे,
तिथे शेवट काय दाखवला होता हे शोधले
प्राईम वर accused नावाची २
प्राईम वर accused नावाची २ सीझनची सिरीज आहे. पहिल्या सीजनमधील काही भाग पहिले, काही भाग अगदी अंगावर आले.
प्रत्येक भागात, एका सामान्य व्यक्तीला असाधारण परिस्थितीत अडकवल्याचे दाखवले जाते कारण एका चुकीच्या वळणामुळे दुसरे वळण येते आणि मागे जाण्यासाठी खूप उशीर होतो.
कॉल माय एजंट बॉलीवूड कुणी
कॉल माय एजंट बॉलीवूड कुणी पाहिलीय का ?
दिया मिर्झा आहे त्यात.
कॉल माय एजंट न बॉलीवूड सुरू
कॉल माय एजंट बॉलीवूड सुरू केलीय. आधी कुणी लिहीले असेल तर माफ करा. माझ्या पाहण्यात नाही आले.
एकदम अनोळखी जग, वेगळा विषय. कलाकारांची फौज आहे. रजत कपूर, दिया मिर्झा, सोनी राजदान, टिनू आनंद आणि लिलिट दुबे हे ओळखीचे चेहरे आहेत. बाकिचे पाहिल्यासारखे वाटणारे. पण छान कामं आहेत. दोन एपिसोड झालेत.
बॉलिवूडच्या स्टार्स चे मॅनेजर्स असतात ( पूर्वी एजंट म्हणत होते बहुतेक) हे माहिती होतं. पण असं एक ऑफीस ( कंपनी) जिथे असे एजंट रिक्रूट केले जातात ( लॉ फर्म सारखे) आणि प्रत्येक एजंटचे क्लायंटस ठरलेले असतात, त्यातून त्या फर्मचा बिझनेस होतो. ही रेप्युटेड संस्था आहे म्हणजे प्रत्येक एजंट चांगलाच असणार. यांच्यात आपसात सुद्धा स्पर्धा आहे. एकमेकांच्या प्रोजेक्टसच्या स्क्रीप्ट्स चोरून पाहणे, कॉण्ट्रॅक्ट्स वर नजर ठेवणे वगैरे इथे चालतं. असं काही असतं हेच माहिती नाही. त्यामुळं एक बरं आहे, उगीच खुसपटं काढताच येणार नाहीत
प्रेक्षकांना माहितीपासून दूर ठेवलं कि उत्तम कलाकृती बनत असतात.
टिनू आनंदच्या श्रद्धांजली सभेत इला अरूण आणि लिलिट दुबेची कॅटफाईट क्लास १ त्याच सभेत फराह खान दोनच वाक्यं बोलते ,
"अॅक्च्युअली मुझे लगता था कि वो दो साल पहलेही मर गये थे, लेकीन अॅच्युअली अब दो साल जादा जी गये "
जॅकी श्रॉफ , अक्षरा हसन आणि सारिका, नंदीता दास पण आल्यात. पूर्ण पेज थ्री वातावरण आहे. आतापर्यंत कंटाळा नाही आला.
सारिका आणि तिच्या मुलींमधे विसंवाद असल्याचं ऐकून होते पण यात दोघी थेटच बोलल्यात. म्हणजे "कथेच्या" अनुषंगाने. पेज ३ च्या गप्पा यात सहज आल्यात.
Pages