Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्पे ऑप आतापर्यंत आवडतो आहे.
स्पे ऑप आतापर्यंत आवडतो आहे.
मागचे भाग न पाहिल्याने अद्याप काही अडले नाही.
प्रकाश राज आणि के के मेनन यांचा अभिनय म्हणजे ट्रीट आहे.
जित्याची खोड, पाताल लोक (२)
जित्याची खोड, पाताल लोक (२)
दोन्ही वेबसीरीजची नावं वाटतात
सोनी-लिव्हवर 'द हण्ट' बघतेय. राजीव गांधी हत्येनंतरचा तपास दाखवलाय. सगळे तपशील माहिती असूनही बघायला मजा येतेय. कास्टिंग चांगलं आहे. दिग्दर्शक - नागेश कुकुनूर.
बहुतांश संवाद तामिळमध्ये आहेत. मोजके हिंदीत आहेत. पण मी ऑडिओ भाषा न बदलता सबटायटल्ससहित बघते. अस्सल वाटतं त्या संवादांच्या आवाजामुळे.
स्पे ऑप संपली.
स्पे ऑप संपली.
इन्टेल थ्रिलर असल्याने नेमक्या वेळी डोकं बाजूला ठेवून पाहिली. थरार , क्लायमॅक्स उत्तम.
The Wednesday नीरज पांडेचाच आहे ना ? त्याचा घाट यात थोडासा आणकाय, २४ मालिकेचा घाट ही नकळत उचलल्यासारखा वाटतो.
फितूर शोधल्यावर बसणारा धक्का अनपेक्षित होता.
बाकीच्या जेम्स बॉण्ड टाईप घटनावळी आहेत. पण गाजलेल्या अनेक घटना असल्याने चटकन रिलेट व्हायला होतं.
मागे जाऊन १.५ सीजन पहायची वेळ आली नाही. स्वतंत्र सीजन म्हणूनच पाहिला.
धन्यवाद अंजु आणि ललिता-प्रीति
धन्यवाद अंजु आणि ललिता-प्रीति - पाताललोक नाही मला अपहरण- २ म्हणायचे होते
चुकून पाताललोक टायिपले 
अपहरण-१ कुठे पहिली होतो आठवत नाही आता ... आणि त्याचा भाग-२ कुठे मिळत नाहीय
ललिता-प्रीति - बरं झालं आयडिया दिलीत ... आताच 'जित्याची खोड' नाव कॉपीराईट करून ठेवतो
नेटफ्लिक्सवर मंडला मर्डर्स
नेटफ्लिक्सवर मंडला मर्डर्स पाहिली. बर्यापैकी खिळवून ठेवणारी गतिमान मालिका आहे. ही सिरीज लौकिकार्थाने हॉरर नाही. पण अश्या काही घटना आहेत ज्या सुपरनॅचरल वाटू शकतात. मी म्हणेन की हे सायफाय, मिस्टरी, आणि थोड्याफार कल्टच्या समजुती/रिलिजन यांचं मिश्रण आहे.
YRF ची सिरीज असल्याने वाणी कपूरची वर्णी लागलेली आहे. पण ती पोलिस असल्याने भावभावना चेहर्यावर दाखवण्याच्या कामातून तिची सुटका झाली आहे. लीड अॅक्टर बरा वाटला. पोलिस शोभला आहे. सुरवीन चावलाची बर्यापैकी मोठी भूमिका आहे आणि तिने ती उत्तम साकारली आहे.
मालिकेची प्रॉडक्शन व्हॅल्यू चांगली वाटली.
मालिकेचा प्लॉट सांगायचा तर इतकंच म्हणेन की चरणादासपूर या गावात खून व्हायला लागतात. प्रत्येक वेळी प्रेताचे काही अवयव गायब असतात. या सगळ्या खुनांना जोडणारं सूत्र शोधून काढायचं आव्हान पोलिसांपुढे असतं. ते खुनी आणि खुनाचं कारण शोधू शकतात का? या शोधातून अजून काय काय बाहेर येतं? चरणदासपूरच्या इतिहासात काय दडलेलं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हळुहळू मिळत जातात.
सिरीज मनोरंजक वाटली. असले मिस्टरी आणि मिस्टिक प्रकार बघायला आवडत असतील तर बघायला हरकत नाही.
मंडला मर्डर्स >> नोट केली.
मंडला मर्डर्स >> नोट केली. बघेन आता.
मंडला मर्डर्स नोट केली आहे.
मंडला मर्डर्स नोट केली आहे. ट्रेलर पाहिला होता. वाणीमुळे पहावे की नाही ठरत नव्हते.
सध्या गेम ऑफ थ्रोन्स जोरात सुरू आहे. साडेतीन सीझन झाले आहेत. ते संपेपर्यंत दुसरा ध्यास नाही. आधीच खूप उशीर झाला आहे. आता धडाधड बघून टाकतेय.
वाणीमुळे पहावे की नाही ठरत
वाणीमुळे पहावे की नाही ठरत नव्हते >>> आमचं पण असंच झालं होतं. पण उत्सुकतेने त्यावर मात केली
शिवाय वाणी सगळा वेळ स्क्रीनवर नाहीये. बरीच पात्रं आहेत. खूप घटना घडत राहतात.
मी पाताललोक दुसरा सीझन जरा
मी पाताललोक दुसरा सीझन जरा उशीरानेच बघितला पण पहिल्य्सारखाच हा ही आवडलाच. नागालँड एकदम भारी दिसतंय.
'बॉश' फॅन्ससाठी त्या पोलीस
'बॉश' फॅन्ससाठी त्या पोलीस युनिव्हर्समधली पुढची सिरीज 'बॅलर्ड' आली आहे. बघायला सुरुवात केली आहे. चांगली वाटतेय.
मला आवडली मंडाला मर्डर्स! तो
मला आवडली मंडाला मर्डर्स! तो मेन अॅक्टर गुल्लक पासून फार आवडलाय. यात पण मस्त काम आहे.
वाणी किती प्रचंड हडकलेली वाटतेय. श्रेया पिळगावकरला चांगले रोल मिळतात हिंदी सिरिज मधे. तिची ती गुलाब वाली हेअरस्टाईल सोनम कपूर कडून कॉपी केली आहे बहुतेक.
एकूणात कुठे लॉजिक शोधायला गेला नाहीत तर मस्त वेळ जाण्यासारखी सिरीज आहे. आदिती पोहनकर नेक्स्ट सिझन मधे भाव खाऊन जाईल वाटतंय.
स्पेशल ऑप्स २ बरी आहे. शुटींग
स्पेशल ऑप्स २ बरी आहे. शुटींग लोकेशन्स मस्त आहेत.
काही लुप होल्स आहेत. अभय एकदम शेवटी येऊन सर्वर रुम उडवतो व नंतर परत गायब. शेवटी भारतात परत जाणार्या लोकांच्यात तो दाखवलेला नाही. तसेच प्रकाश राज ला नक्की का घेतले ते कळले नाही. उगाचच प्रत्येक एपिसोडची लांबी वाढवायला त्याची साईड स्टोरी टाकली आहे. एजंट रुहानाला पण शेवटच्या एपिसोडमध्ये का घेतले आहे ते ही उगाचच वाटते.
सोशल मिडीयावर एक क्लिप पाहिली. त्यात लिहीले होते की स्पेशल ऑप्स २ मध्ये देशद्रोही लोकांची नावे सुब्रह्मण्यम, सुधीर अवस्थी व त्यांच्याविरूद्ध लढणारे भारतीय देशप्रेमी फारूक, रुहाना, अब्बास अली अशी आहेत. हे मुद्दामहून केले आहे.
मंडाला मर्डर्स - ठीकठाक वाटली
मंडाला मर्डर्स - ठीकठाक वाटली. वाणी कपूरला अभिनय येत नाही, श्रीया पि. ला त्याहुन येत नाही. चावला मस्त. ती शेवटी आलेली मुलगी पोहनकर आहे का? ती जेमतेम थोड्यावेळच आहे पण न बोलता तिने दोघींपेक्षा जास्त अभिनय केलाय.
जिओ हॉटस्टारवर ‘चेर्नोबिल’
जिओ हॉटस्टारवर ‘चेर्नोबिल’ पाहते आहे. त्या अपघातापासून सिरीज सुरू होते आणि मग कम्युनिझमला पोलादी पडदा का म्हणतात याचा प्रत्यय येत जातो. परीस्थितीच्या आकलनात झालेल्या किंवा ओव्हरकॉन्फिडन्सपायी एकामागोमाग केलेल्या चुका, डिनायल, वाढत गेलेले प्रश्न, जैविक नुकसान आणि बळीचा बकरा शोधण्याची आतुरता यातलं काही इतर राज्यव्यवस्थांत होणार नाही असं नाही. भोपाळ दूर्घटना, कोविडच्या उपाययोजना वगैरे त्याची उदाहरणं आहेत. पण किमान स्वतःच्या जीवनमरणाचे निर्णय घ्यायची संधी लोकांना मिळेल अशी आशा आहे.
रेडिए़शनचे परीणाम प्रत्य़क्ष दाखवलेत त्यापेक्षा सुचक प्रसंग जास्त इफेक्टिव्ह वाटतात.
चेर्नोबिल फार आवडलेली!
चेर्नोबिल फार आवडलेली!
चेर्नोबिल - मलाही आवडली होती.
चेर्नोबिल - मलाही आवडली होती.
दुसर्या कोव्हिड लाटेत पाहिली होती. नवरा कोव्हिडपायी हॉस्पिटलमध्ये आणि मी घरात एकटी आणि क्वारंटाइन अशा सिच्युएशनमध्ये पाहिल्याने आणखीच गडद परिणाम झाला होता.
मंडला मर्डर्स बघितली .
मंडला मर्डर्स बघितली . बऱ्यापैकी एंगेजिंग आहे . शेवटला दुसऱ्या सिझनची सोय करून ठेवलेली आहे . अदिती पोहणकर नेक्स्ट महामुनी असेल अंदाज आहे. वाणी कपूर ठीक काम करते. अमितवच्या अनलिसिस प्रमाणे नेटफ्लिक्समध्ये पोलिस मंडळींना दुःखद पास्ट असतो तो वाणी कपूरचा देखील आहे . जिमी खानचे पात्र नीट एस्टेब्लिश झाले नाही त्यामुळे गंभीर विदूषक इतकाच फील येतो. विक्रम, अन्यना वगैरे पण कामे चोख पार पाडली आहेत
मालिका बघताना अँजल आणि डेमॉन्स च्या प्लॉटची थोडी आठवण येते पण ते तितापतच. वन टाइम वॉच आहे.
नवरा कोव्हिडपायी
नवरा कोव्हिडपायी हॉस्पिटलमध्ये आणि मी घरात एकटी आणि क्वारंटाइन अशा सिच्युएशनमध्ये पाहिल्याने आणखीच गडद परिणाम झाला होता.
>>>>
बाप रे! नक्कीच अशा वेळी बघण्यासारखी सिरीज नाही.
पण माझा फुल रेको. ही चुकवू नका.
झी५ वर "बकैती" नावाची फॅमिली
झी५ वर "बकैती" नावाची फॅमिली कॉमेडी आली आहे. पंचायत ई आवडणार्यांना आवडेल. मिर्झापूरचे फेमस कपल - राजेश तेलंग आणि शीबा चढ्ढा इथेही आहेत. पण हा सेटअप हलकाफुलका आहे. मी एक एपिसोड बघितला. अगदी आवर्जून पुढे बघावी इतका इंटरेस्ट वाटला नाही. पण चेक करा. अशा सिरीज आवडत असतील तर ही सुद्धा आवडेल.
टेड लासो (अॅपल टीव्ही) चे काही भाग मी तुकड्यातुकड्यांत पाहिले होते पण सलग फार नाही. आता पहिल्यापासून पाहतोय. आवडत आहेच. काही संवाद, काही लाइन्स अफलातून धमाल आहेत.
झी५ वर "बकैती" नावाची फॅमिली
झी५ वर "बकैती" नावाची फॅमिली कॉमेडी आली आहे. पंचायत ई आवडणार्यांना आवडेल. मिर्झापूरचे फेमस कपल - राजेश तेलंग आणि शीबा चढ्ढा इथेही आहेत. पण हा सेटअप हलकाफुलका आहे. मी एक एपिसोड बघितला. अगदी आवर्जून पुढे बघावी इतका इंटरेस्ट वाटला नाही. पण चेक करा. अशा सिरीज आवडत असतील तर ही सुद्धा आवडेल.>>>>
एक सिरीज हिट झाली की त्याच प्रकारच्या दहा सिरीज येतात. हे म्हणजे गल्लीत एकीने ब्लाऊज शिवायचा बिझनेस सुरू केला की अख्खी गल्ली ब्लाऊज शिवायला लागते तसं आहे.
ललिता-प्रीति, बलार्ड बघितली तुझी पोस्ट वाचून. छान आहे.
मध्येच एकदम jerry edger ला एका सीनमध्ये पाहून bosch. परत पाहावी असं वाटलं.
सध्या blue bloods बघतेय परत.
गल्लीत एकीने ब्लाऊज शिवायचा
गल्लीत एकीने ब्लाऊज शिवायचा बिझनेस सुरू केला की अख्खी गल्ली ब्लाऊज शिवायला लागते तसं आहे >>>
यामधेही मध्यमवर्गीय लाइफ, हलकेफुलके विनोद वगैरे सगळे आहे. चांगली असावी. मला पंचायतचा पहिला सीझन खूप आवडला होता. पण समहाऊ अजून पुढे पाहिलेली नाही. तशीच ही सुद्धा पहिला भाग पाहिल्यावर पुढे अजून आवर्जून पाहावी इतका इंटरेस्ट आलेला नाही. या सिरीयल्स मधे इंटरेस्ट कमी आहे असे नाही, त्या जॉनरामधेच सध्या कमी आहे. एखादा चांगला जमलेला एपिसोड पाहिला तर परत येईलही.
Ted lasso is one of the best
Ted lasso is one of the best series ever!
स्पेशल ऑप्स बघायला सुरूवात
स्पेशल ऑप्स बघायला सुरूवात केली पण पकाऊ वाटली. उगीच स्टाईलिश वगैरे करण्याच्या प्रयत्नात नुसतीच घटनांची जंत्री येत राहते. टिपिकल बॉस, टिपिकल धक्के, कूल हिरो, त्याची मित्र (हा बहुतेक मरणार कारण नुकतीच त्याला बायको प्रेग्नन्ट असल्याची खबर लागलीये. मग हिरो आणि याची बायको एकत्र येणार सिलसिला टाईप. पण नीला आसमां खो गया म्हणणारी इथे फितूर आहे.). इथवर आल्यावर मी धीर सोडला. मरो ती सिरीज.
मी मागेही लिहिलं होतं -
मी मागेही लिहिलं होतं - मॅगपाय मर्डर्स आणि मूनफ्लॉवर मर्डर्स नक्की बघा लोक्स. भारतात सोनी लिव वर आहेत.
मला पंचायतचा पहिला सीझन खूप
मला पंचायतचा पहिला सीझन खूप आवडला होता. पण समहाऊ अजून पुढे पाहिलेली नाही. >>> रियली ?पुढचे सिझन बघुनच टाक मग..पुढचे २ सिझन तरी नक्किच आवडतिल तुला.
पंचायत सीजन 4 मध्ये निवडणूक
पंचायत सीजन 4 मध्ये निवडणूक हरल्यानंतर प्रधानजी ची रिअँक्शन थोडी जास्तच dramatic दाखवली आहे. थोडा कंट्रोल गेला directors चा. त्यात त्याची बायको आधी काम केलं असतं तर हे झालं नसतं म्हणते ते ही अस्थानी वाटलं.
Bosch ने जितके खिळवुन ठेवले
Bosch ने जितके खिळवुन ठेवले होते तितके ballard ने ठेवले नाही. अर्धी झाली पाहुन. उरलेली आता पुन्हा मूड आला की पहाणार.
Bosch ने जितके खिळवुन ठेवले
Bosch ने जितके खिळवुन ठेवले होते तितके ballard ने ठेवले नाही >>>
पण तरी उरलेले भाग बघणार आहे.
हो!
माझे ३ एपिसोड्स पाहून झाले. नंतर ४-५ दिवस बघायला अजिबात वेळ झाला नाही. तर अजिबात आठवणही आली नाही त्याची.
Big little lies खूप पूर्वी
Big little lies खूप पूर्वी बघितली होती. Main theam लक्षात होती फक्त. नुकतच ते पुस्तक मिळालं. रहस्य माहित असून सुद्धा पुस्तकाने खिळवून ठेवलं होतं. म्हणून पुन्हा सिरीज बघायला सुरवात केली.
काय वाट लावलीय सगळ्या कॅरेक्टर्स ची सिरीज मधे. त्यांचे स्वभावच बदललेत.
Pages