Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
महारानी...ऊत्तम आहे
महारानी...ऊत्तम आहे
फॅमिली मॅन 3 संपवली.
फॅमिली मॅन 3 संपवली.
मला तर शेवट नीट समजलाच नाही
असा अर्धवट का ठेवला?
म्हणजे, मेन गोल च साध्य न करता?
खूपच उपकथानके आणि षडयंत्रे यांनी प्रेक्षक जेरीस येतो!
फॅमिली मॅन पहिला सीझन आणि
फॅमिली मॅन पहिला सीझन आणि दुसराही एन्टरटेनिंग होता तसा. म्हणजे विशेषतः इण्टरनॅशनल वैविध्यपूर्ण कन्टेण्ट खूप बघत असाल तर हे अजिबात ग्रेट नाही पण बर्यापैकी करमणू़क आणि चांगले अॅक्टर्स.
सीझन ३ बघायला घेतला आहे. सुरुवात ठीक आहे पण ती निमरत कौर चे कॅरेक्टर फारच चीजी आहे. उगीच सूट घातलेली गूढ बोलणारी बाई, ना आगा ना पिछा. त्या आयएसाय मेजर समीर ला पण तसाच अधांतरी रोल आहे या पूर्ण सीरीज मधे. त्याचे विनाकारण युरोप मधे लेदर जॅकेट घालून फिरताना, फोन वर बोलताना शॉट घेऊन ठेवलेत आणि ते कुठेही वापरतात असा फील आला मला. पहि;या सीझन ला वाटले होते आता काहीतरी मोठे करणार हा, पण तो कुठे जात नाही की येत नाही
कॉमिक सीन्स चांगले आहेत. जयदीप अहलावत आवडला. सुचि चा मला पहिल्या सीझन पासून फार राग येतो तो तसाच आहे. तिची मुलगी ही तशीच आगाऊ अन विनाकराण फणकारलेली आहे. नागालँड चे लँडस्केप फारच सुंदर आहेत!
आता इतकेच. बाकी बघेन पुढचे भाग तेव्हा अपडेट करेन.
वर फर्जी उल्लेख वाचल्यावर,
वर फर्जी उल्लेख वाचल्यावर, ह्याचा दुसरा सिझन यायला हवा आता असं वाटलं. दोन सिझन बास, पुढे नको.
The beast in me चालू केली आहे
The beast in me चालू केली आहे नेफ्लीवर आहे. पहिला भाग छान होता. मिनिसिरीज आहे.
परवा stranger things शेवटच्या सीजनचा पहिला भाग येत आहे. जाम उत्सुकता आहे. मिसिंग यू अमा.
सुचि चा मला पहिल्या सीझन
सुचि चा मला पहिल्या सीझन पासून फार राग येतो तो तसाच आहे. तिची मुलगी ही तशीच आगाऊ अन विनाकराण फणकारलेली आहे. >> थँक्यु. मलापण.
अँकी१, कमांडो बद्दल थँक्स.
नेटफ्लिक्सवर A Man on the Inside चा सिझन२ आला. गोड आहे.
The Girlfriend (प्राइम)
The Girlfriend (प्राइम)
मिनी सीरीज आहे. स्टोरीटेलिंगची जरा वेगळी पद्धत, त्यात सस्पेन्स यामुळे पहिले दोन भाग चांगले वाटले. मग टिपिकल सास-बहू वळणावर (परदेशी ट्रीटमेंटसहित) जायला लागली.
शेवटचे दोन भाग पुन्हा जरा उत्कंठावर्धक झाले.
रॉबिन राइट - सासूचं काम केलंय. ही मला 'सॅन्टा बार्बरा'पासून आवडते. तिच्यासाठीच मालिका बघायला सुरुवात केली खरंतर. (हाऊस ऑफ कार्ड्समधली केव्हिन स्पेसीची बायको)
गर्लफ्रेन्डचं काम करणारी कोणीतरी नवीन वाटली. ती सुद्धा मला आवडली. तिचं ब्रिटिश उच्चारांचं इंग्रजी ऐकायला छान वाटलं.
अशा मालिकांमध्ये पुरुष पात्रं दुय्यम ठेवावीत असा नियम आहे की काय असं वाटतं.
अगदी शेवटचा सीन वरवर नॉर्मल, पण कथानकाला कलाटणी देणारा आहे. त्यामुळे दुसरा सीझन येणार असं दिसतंय.
बाकी बघायला काही नसेल, तर ही बघा. पटकथा क्रिस्प आहे. सर्वांचं अॅक्टिंग चांगलं आहे.
पण पाहिली नाही तर फोमो वाटून घेण्याइतकी भारी नाही.
हो मी पाहिली आहे गर्लफ्रेन्ड.
हो मी पाहिली आहे गर्लफ्रेन्ड. सासू - सून एकता कपूर ड्रामा ची आठवण आली होती पण त्यापेक्षा नक्कीच जास्त डार्क आणि थ्रिलिंग होती
फॅमिली मॅन - निमरत कौर चा
फॅमिली मॅन - निमरत कौर चा homeland मधे जसा रोल होता तसा अभिनय केला आहे एकडे ति फिकसर दाखवली आहे. एक भाग वाढवुन सम्पवायाला हवी होती.
जयदीप अहलावत आवडला-> +१
उगा कुठल्या देशावर आरोप न करता कलेक्टिव नावाची एक सन्घटना हे सगळे करते आहे अस दाखुव्न सेफ खेळलेत.
नागालँड चे लँडस्केप फारच सुंदर आहेत.->+१
सेथुपथी चा कैमिओ मस्त आहे.
गेम ऑफ थ्रोन्स अखेर भारतीय
गेम ऑफ थ्रोन्स अखेर भारतीय ओटीटी वर आली आहे.
आठ सीझन्स आहेत. हे बघूनच जीव दडपला. नियमित पाहिली तरी वर्ष लागेल संपवायला.
पहिला सीझन पहिला एपिसोड "विंटर इज कमिंग" ने सुरू झाला आहे. मधूनच सुरूवात झालीय असे वाटले.
ज्यांनी पाहिलीय त्यांच्या पैकी कुणी तरी सांगेल का कि ओरिजिनल सिरीज चं हे एडिटेड रूप आहे का ?
कुठल्या भारतीय ओटीटीवर आली
कुठल्या भारतीय ओटीटीवर आली आहे?
गेम ऑफ थ्रोन्स जिओ हॉट स्टार
गेम ऑफ थ्रोन्स जिओ हॉट स्टार दिसत आहे
कुठल्या भारतीय ओटीटीवर आली
कुठल्या भारतीय ओटीटीवर आली आहे?>>> Hotstar / disney Hotstar वर पूर्वी पासूनच होती की. जिओ नी hotstar घेतल्यापासून Hotstar वरच्या सगळ्या HBO सिरीज तिथे दिसतात.
जाई हॉटस्टार.
जाई हॉटस्टार.
Hotstar / disney Hotstar वर पूर्वी पासूनच होती की. >> गेल्या महीन्यात पोस्टर पाहून क्लिक केलं तर लास्ट वॉच नावाची डॉक्युमेण्टरी किंवा तत्सम काहीतरी होतं. पेड ऑप्शन होता. काल पाहिलं तर फ्री आहे.
पहिला एपिसोड पाहून झाला. भव्यता डोळ्यात साठणारी आहे. स्टोरीटेलिंग लाजवाब आहे. भरमसाठ पात्रं असल्याने लक्षात राहत नाहीत. कोण कुणाचे कोण हे लक्षात ठेवायची सर्कस आहे. फ्रिक्वेन्टली जॉब बदलणार्यांना सुरूवातीला काही दिवस चेहरे ओळखीचे होईपर्यंत गोंधळ उडतो तसे झाले आहे. नावं लक्षात राहत नाही आणि काही चेहरे सारखे वाटतात.
न्युडिटी अनावश्यक वाटली. शेवटचा धक्का सहन झाला नाही. लहान मुलांच्या बाबतीत क्रौर्य नको वाटतं. एकेक तासाचे एपिसोड असल्याने एखादा सिनेमा पाहिल्यासारखंच आहे. रोज एका जागी बसून बघण्याइतकी चांगली स्थिती नाही. पाहिल्याने होत आहे रे आधी पाहिलेचि पाहिजे असे म्हणून हा ढीग उपसायचा (जमेल तिथपर्यंत) असे ठरवले आहे. स्ट्रेंजर थिंग्ज सोडून दिली होती तसे होऊ नये ही ओटीटीदेवी चरणी प्रार्थना !
चार एपिसोडस बघून झाले. वाटलं
चार एपिसोडस बघून झाले. वाटलं नव्हतं.
बरेच प्रश्न उभे राहतात पण त्यांची उत्तरं संबंधितांना मिळत नाहीत. हा काळ कोणता आहे आणि कुठल्या भागात कथानक घडतंय हे समजत नाहीये. बाहुबली सारखं काल्पनिक आहे कि इतिहासाचा संदर्भ आहे ? तसे असेल तर गॉट फॉर डमीज सारखी पूर्वतयारी करावी लागेल. मस्त वेबसिरीज आहे. एच बी ओ ला सॅल्युट !
Family man3 बघून संपवला.
Family man3 बघून संपवला. अगदीच टाकावू नाही वाटला पण पहिल्या दोन सीझन्सपेक्षा फिका वाटला. मला निमरीत कौर आवडली. जुगल हंसराज surprise होता.
ध्रीती आणि सुचि डोक्यात जातात.
मुळचा बिहारी वाटणारा , हरियानवी accentमध्ये बोलणारा नागालॉंण्डचा मोठा drug dealer , उर्दू बोलणारा चायनीज , तमिळ बोलणारा नागा अशी वैविध्यता आहे.
JIO Hotstar वर All her fault
JIO Hotstar वर All her fault बघतयं का कोणी ??
(My fault , your fault , our fault या famous seriesशी अजिबात संबंध नाहीये)
Thriller आहे . मी आता सुरुवात केलीय , gripping आहे.
दिल्ली क्राइमचा सिझन २ बघितला
दिल्ली क्राइमचा सिझन ३ बघितला, आधिचे सिझन बघितलेले नाहित..चान्गला घेतलाय.हुमा कुरेशी बडी दिदीच कॅरेक्टर एकदम स्पॉट ऑन, तिच्या एकदरित टॉम बॉइश पर्सलितीटीला सुट होइल असा हरयाणवी अॅक्सेन्ट..सगळ छान जमुन आलय..सगळ्याच्या भुमिका चान्गल्या असल्या तरी शेफाली छाया अगदी दगडी चेहरा करुन वावरते..त्यात करारीपणा अजिबात जाणवत नाही..यामागे आधिच्या सिझनची काही बॅकग्राउन्ड असेल तर ठीक आहे.
नेफिवर "विक्टोरिया" सिरीज
नेफिवर "व्हिक्टोरिया" सिरीज चांगली आहे. आत्तापर्यंत अगदी सुरूवात बघितली आहे. तरूण व्हिक्टोरियाचे काम करणारी अॅक्ट्रेस चांगली वाटते. पण रूफस सीवेल मस्त आहे. तो मिश्किल कामे/ लाइट रोल जबरी करतो असे दिसते. यात अगदी लाइट रोल नाही पण त्याने लॉर्ड मेलबर्न - तेव्हाचा इंग्लंडचा पंतप्रधान - या कॅरेक्टरचे काम केले आहे. बाकी कोणी लोक ओळखीचे दिसत नाहीत. रूफस सीवेला डिप्लोमॅट सिरीज च्या आधी मी "द मॅन इन द हाय कॅसल" मधे पाहिले. तेथे त्याचा रोल गंभीर आहे (त्या सिरीजबद्दलही रेको)
व्हिक्टोरिया राणीचे बरेचसे फोटो हे एकदम खूसट बुढ्ढी टाइप आहेत. त्यामुळे ती कधी तरूण असेल असे वाटले नव्हते
विंबल्डन वाली राणी का ?
विंबल्डन वाली राणी का ?
गेम ऑफ थ्रोन्स सलग पाहता येणं अवघड आहे. दुसरा सीझन जास्त स्लो आहे. प्रत्येक एपिसोड एकसारखा झाला आहे. थोडं इकडचं, थोडं तिकडचं, मग खलिसीचं काय झालं, वॉलच्या रक्षकांचं काय झालं, रॉबचं काय झालं हे क्रमाने येत राहतं. ज्या पात्राशी मैत्री होऊ लागते ते मरतं. स्टार्कचा धाकटा मुलगा मासूम मधल्या जुगल हंसराजची आठवण करून देतो. त्याला खरंच मारलं का ? काय गरज होती ?
पात्रांची गर्दी झाल्याने पुन्हा पहिला सीझन पहिला एपिसोड पाहिला. पहिल्यांदा किंग मेल्याचा सीन बघूनही हा कोण मेला ते समजलं नव्हतं. आता कळलं. अजूनही काही पात्रं कुठून आली हे पुन्हा मागे जाऊन पहावे लागणार आहे. नाती लक्षात राहत नाहीत. ज्यांनी सीझन बाय सीझन पाहिली त्यांचा इंटरेस्ट टिकून राहिला असणार. ब्रेक घेईन आता.
All her Fault - Hotstar
All her Fault - Hotstar
मरिसा आपल्या ५ वर्शाच्या मुलाला "playdate" वरून न्यायला येते . ज्या घरी ती येते तिथे एक म्हातारी स्त्री एकटीच राहात असते. आपला मुलगा ईथे नाही , जिच्याशी आपण मित्राची आई - जेनी म्हणून चॅट करत होतो , तिचा फोन लागत नाहीये , जेनीचा मुलगा जेकब हा तिसर्याच मुलाकडे खेळायला गेलायं हे कळल्यावर , मरीसाच्या पायाखालची जमिन सरकते . थोडक्यात तिचा मुलगा मायलो याच अपहरण झालयं हे कळतं.
हळूहळू कथा पुढे सरकते . अनेक पात्र आहेत . मरीसाचा नवरा पीटर , त्याचा भाउ ब्रायन , बहिण लिआ , मरीसाचा बिझनेस पार्टनर केविन , जेनी , तिचा नवरा रिची , सुरुवातीची म्हातारी एस्टर, मायलो आणि जेकब दोघांच्या नॅनीज - अॅना आणि केरी , तपास करणारा डिटेक्टीव्ह अल्कारज आणि बरेच.प्रत्येक पात्राची एक backstory आहे आणि ती कथेचा भाग आहे.
मायलोच्या अपहरणाला मरीसा स्वतःला जबाब्दार मानते . मुळातच "All her Fault" याचे बरेच कंगोरे आहेत कथेत आणि her ही एकच व्यक्ती नाहीये . बर्याचजणी आहेत.
काही काही सीन्स फार सुन्दर आहेत . अल्काझर आणि मरीसा तिच्या घरी भेटतात तेन्व्हा आपली दु:ख एकमेकाना सांगतात तो प्रसंग , जेनी आणि मरीसा ज्या प्रकारे मैत्रिणी बनतात , जेनी ज्या प्द्धतीने हळूहळू मरीसाचा आधार बनते . टीव्ही ईंटर्व्युच्या अगोदर घरात जे काही रामायण घडतं त्याअगोदर आणि त्यावेळी मरीसाचा उद्रेक .
अलकारज , आतापर्यन्त बघितलेल्या पोलिस डिटेक्टीवपेक्शा वेगळा आहे . he is one of the best . पण he is HUMAN
खासगी आयुश्यातली परिस्थीती त्याने स्वीकारली आहे , तो कुढत बसत नाही . अगदी शान्त डोक्याने विचार करणारा , क्वचितच भडकणारा .
गुन्ह्याचा तपास तो लॉजिकली विचार करून लावतो , उगाचच तुक्के मारत नाही की हिरोगिरि करत नाही .
कथेत अनेक वळणं येत राहतात , संशयाची सुई प्रत्येकावर येउन थांबते . आरोप-प्रत्यारोप , dirty laundry.
कथेचा उलगडा कोणाला anticlimax वाटू शकतो . आता झालं , संपली गोष्ट असं वाटेपर्यन्त गोष्ट वेगळं वळणं घेते.
मरीसाचा सुरुवातीचा मुर्खपणा दुर्लक्षीत केला तर सिरिज एक्दम सही आहे .
मानवी भावभावनांची गुन्तागुन्त , super woman बनू पाहणार्या आईची धडपड , how people gaslight others , कसे अनोळखी मित्र बनतात आणि जवळच्या लोकांना कधी कधी तुम्ही ओळखू शकत नाही . every emotion in the story is true.
सुचि चा मला पहिल्या सीझन
सुचि चा मला पहिल्या सीझन पासून फार राग येतो तो तसाच आहे. तिची मुलगी ही तशीच आगाऊ अन विनाकराण फणकारलेली आहे. नागालँड चे लँडस्केप फारच सुंदर आहेत!>+1 स्वस्ति, तमिळ बोलणारा नागा >भारीच निरीक्षण
द बॉईज (अमेझॉन प्राईम, genre
द बॉईज (अमेझॉन प्राईम, genre anti-superhero, anti-establishment https://en.wikipedia.org/wiki/The_Boys_(TV_series)) पाचवा आणि फायनल सीझन एप्रिल ८ ला येणार आहे https://youtu.be/Fv0leN8TmR8?si=dnqjvxucCngRPJT_
अद्याप पाहिली नसेल आणि उत्सुकता असेल तर पहिल्या सीझन चा ट्रेलर https://youtu.be/5SKP1_F7ReE?si=UNz6Kb4vL_xd2xOP
जेफ्री एप्स्टीन वर असलेली
जेफ्री एप्स्टीन वर असलेली डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर आहे. जेफ्री एप्स्टीन - अ फिल्दी रीच या नावाने.
काही काही गोष्टींची माहिती न ठेवलेलीच बरी. पण हे प्रकरण किती धक्कादायक आहे ! मागे असं वाटलेलं कि आपल्याला आता कशाचाही धक्का बसणार नाही. पण नाही..
अमेरिकन न्यायव्यवस्थेला एक मजाक* बनवून ठेवणारा व्यक्ती, मी टू कँपेन ज्याच्यामुळे सुरू झालं तो व्यक्ती आणि जगातल्या सर्व श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींची संपत्ती मॅनेज करणारा व्यक्ती आज सर्वांना ठाऊक आहे तो निराळ्याच कारणाने.
डॉक्युमेंटरी खर्या व्यक्ती, घटना यावर आधारीत आहेत. पुढचे भाग पहायचे आहेत.
* योग्य मराठी शब्द सुचवा प्लीज.
नेटफ्लीक्सवर Beast in me
नेटफ्लीक्सवर Beast in me बघतेय, सस्पेन्स थ्रीलर आहे. आवडतेय, एकदम पकड घेतलीय.
Beast in me मस्त आहे.
Beast in me मस्त आहे.
नेटफ्लीक्सवर Beast in me
नेटफ्लीक्सवर Beast in me बघतेय, सस्पेन्स थ्रीलर आहे. आवडतेय, एकदम पकड घेतलीय.>>>> + १
four more shots चा चवथा सिझन
four more shots चा चवथा सिझन आलाय. पहिले दोन सिझन बरे वाटले होते. तिसरा बोअर झाला. चवथ्याचा पहिलाच एपिसोड बोअर झाला.
त्याच चार बायका आणि तेच तेच त्यांचे प्रॉब्लेम. प्रत्येकवेळी दारू पिणे आणि सेक्स वर बोलणे याशिवाय या ही सिझन मध्ये काही असेल असे वाटत नाही.
उशिराने का होईना फॅमिली मॅन ३
उशिराने का होईना फॅमिली मॅन ३ बघितला .... दुसऱ्या भागातील हॉस्पिटल बोरिवलीचे करूणा हॉस्पिटल आहे .
Apple टीव्ही वरची slow horses
Apple टीव्ही वरची slow horses कुणी बघतय का? मी पहिला सीझन खूप आधी पहिला होता. आता apple टीव्ही चे subscription मिळाल्याने पुढचे सीझन बघितले. मजा आलीं
एक दुर्लक्षित टीम MI5 ची ज्यात जे लोक प्रामाणिक पणाने आणि प्रोटोकॉल न पाळता काम करतात आणि वरिष्ठांची हांजी हांजी करत नाहीत अश्यांना तिकडे टाकतात. त्या टीमचा बॉस पण असाच असतो...आपल्या सहकाऱ्यांशी कधीही नीट न बोलणारा पण त्यांची काळजी घेणारा..त्यांना सरकारी व्यवस्थेपासून वाचवणारा , प्रचंड फील्ड वर्क अनुभव असणारा बॉस Garry Oldman ने खूप भारी काम केलंय. आणि स्पाय इंटेलिजन्स सिरीज असल्यामुळे सगळ गुडी गुडी नसून ...काही वेळेस सहकाऱ्यांना पण गमवाव लागत. डार्क humour आणि प्रचंड थ्रिलिंग (अर्थात हे माझे मत) असलेली ही सिरीज चुकवू नका. 5 सीझन उपलब्ध आहेत.
Pages