Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१५-२० मिनिटे बघायला मजा येते.
मामला लीगन है (नेतफ्लिक्स).
मामला लीगल है (नेतफ्लिक्स). पहिला भाग छान आहे. वकीलांचं वेगळंच जग. सिनेमातली न्यायालयं आणि खरी न्यायालयं केव्हढा फरक असतो. दिल्लीचं वातावरण काही प्रसंगात छान घेतलंय. काही वकील कायम छत्री का टाकून बसतात, चेंबर कुणाला मिळतं याची उत्तरं मिळाली. वकिली धंद्यातला नेपोटिजम दाखवला आहे. काहीही पार्श्वभूमी नसताना शून्यापासून वकीलीचा "व्यवसाय" , ते ही बड्या वकीलाच्या हाताखाली काम न करता किती अवघड आहे.
असे सर्व मुद्दे अजिबात कंटाळा न येता मांडले आहेत. त्यागी हा एक पूर्णवेळ हिंदी भाषिक गरजेपुरता इंग्रजी उत्तम बोलू शकणारा वकील आहे. पडपडगंज बार असोसिएशनचा तो अध्यक्ष आहे. त्या पोइजिशनचा फायदा त्याला मिळतोय. त्याचं अॅटर्नी जनरल बनायचं स्वप्न आहे, त्यासाठी बडा वकील वाडिया यांना त्याला भेटायचं आहे. पण त्यांच्या जवळ जाण्यासाठी त्याच्याकडे निमित्त नाही. बार असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून तो वर्तमानत्रात वाडीयाची तारीफ करू शकतो, पण वाडीया फक्त इग्रजी वर्तमानपत्रं वाचतात. त्यांच्या पद्धतीचं इंग्रजी जाणणारा कुणी वकील त्याच्या नजरेच्या टप्प्यात नाही. अशातच नव्याने आलेली अन्नया (हॉर्वर्ड मधून लॉ ची डिग्री घेतलेली) त्या कोर्टात आली आहे. तिला वडलांची किंवा आजोबांची पुण्याई नकोय म्हणून शून्यातून प्रॅ़तीस करायचीय. तिला बेंच प्रॉमिस करून वाडियांबद्दल एक लेख लिहून घेऊन तो स्वतःच्या नावाने छापतो .
हे सर्व रवी किशनने छान दाखवलं आहे. पण तो बराचसा सलमान खान सारखा दिसतो आणि बोलण्याची ढबही तशीच होत चालली आहे.
पण तो बराचसा सलमान खान सारखा
पण तो बराचसा सलमान खान सारखा दिसतो आणि बोलण्याची ढबही तशीच होत चालली आहे.>>> रवि किशन इज वे बेटर दॅन सलमान इन अॅक्टिन्ग..
सलमान आता जड दिसतो,वागतो, मन्द हालचाली, चेहर्यावरचा मसलही हलत नाही.
मामला लीगल है सीजन २ नाही आला
मामला लीगल है सीजन २ नाही आला ना अजून..
सीजन एक मस्त होता.. बरेच दिवसांनी इतका दर्जेदार व्यंगात्मक विनोद पाहिल्याचे समाधान मिळाले होते. जसपाल भट्टीची आठवण येत नॉस्टॅल्जिक फिलिंग सुद्धा आलेली
सलमान आता जड दिसतो,वागतो,
सलमान आता जड दिसतो,वागतो, मन्द हालचाली, चेहर्यावरचा मसलही हलत नाही.
>>>>
त्याच्या चेहऱ्यावरचे मसल्स कधी हलायचे? त्याच्या दिग्दर्शकांनीही अशी भलती सलती अपेक्षा ठेवली नसेल.
पण मध्यंतरी त्याला बेल्स पाल्सी झालेली तेव्हापासून त्याचा चेहरा फ्रोझन दिसतो हे खरं आहे.
नुकताच हम आपके है कौन
नुकताच हम आपके है कौन कितव्यांदा तरी पाहिला. यातला सलमान कुठल्याही मुलीच्या दिल की धडकन आहे. तेव्हांचा सडपातळ सलमान आणि आताचा मल्लमान यातला फरक हृदयद्रावक आहे.
सध्या जुनी ‘यन्ग शेल्डन‘
सध्या जुनी ‘यन्ग शेल्डन‘ पुन्हा पहात आहे. कसली मजा येते! तो मुलगा जरा मोठा झाल्यावर पहिली निरागसता कमी झाली होती म्हणुन फक्त तो लहान असतानाचेच पहाणार.
काल नैना मर्डर केस (hotstar)
काल नैना मर्डर केस (hotstar) binge watch केली.
अतिशय उत्तम अभिनय , चांगले संवाद . चांगली रहस्यकथा. सतत वेगवेगळ्या लोकांवर फिरणारी संशयाची सुई.
शेवट अगदी अर्धवट केलायं , दुसर्या सीझनची नांदी.
काही गोष्टी खटकल्या --
जय आणि त्याच्या कामाला पार झाकोळून टाकलयं. त़ो काहीतरी experience घेऊनच ACP बनला असेल ना
नयनाच character प्रचंड विरोधाभासी आहे.
नयनाच्या background च्या मानाने कॉलेज फारच hifi दाखवलयं
आणखी काही गोष्टी आहेत , ज्या out of place वाटल्या.
झॉम्बी सिरीज फॅन्स करता:
झॉम्बी सिरीज फॅन्स करता:
द वॉकिंग डेड चे बरेच स्पिन-ऑफ्स निघाले आहेत. त्यातले एक दोन पाहून बघितले होते पण खूप खिळवून ठेवले नाही. पण सहज त्यातील "डॅरील डिक्सन" वाली सिरीज लावली आणि पहिला एपिसोड फार भारी निघाला. पुढे बघायची उत्सुकता आहे आता. वॉकिंग डेड आवडली असेल तर ही सुद्धा आवडेल (नेफि)
टॉप बॉय - नेफि. लंडनमधल्या
टॉप बॉय - नेफि. लंडनमधल्या ड्रग ट्रेड मधे शिरलेल्या आणि त्यातून बहुधा वर येणार्या एकाची कहाणी आहे असे वरवर माहितीवरून वाटते. २-३ भाग पाहिले. चांगले वाटतात पण खूप ग्रिम आहे. दोन वेगवेगळ्या व्यक्तींची स्टोरी सुरू आहे. रेटिंग खूप चांगले आहे असे दिसते.
Harlan Coben's Lazarus ,
Harlan Coben's Lazarus , प्राईमवर. चांगलाच गुंता आहे. मला याच्या मालिका नेहमीच आवडतात. ही पण उत्कृष्ट नाही तरीही आवडली.
झी 5 वर 'बाई तुझ्यापायी'
झी 5 वर 'बाई तुझ्यापायी' नावाची वेबसीरिज बघायला सुरुवात केली आहे. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी. मूळ तमिळ मालिकेवर आधारित आहे. दोन एपिसोड्स बघितले. विभावरी दीक्षित, साजिरी जोशी, क्षिती जोग या तिघी ओळखीच्या कलाकार आहेत. एकदम आवडली. १९९० साल दाखवलं आहे. एका गावात अशी प्रथा असते की मुलीला पाळी आली की तिचं लग्न लावून द्यायचं. तसं केलं नाही तर गावदेवीचा कोप होतो. लग्न झालं की अर्थात शिक्षण बंद. अहिल्याला (साजिरी जोशी) पुढे शिकायची इच्छा असते. त्यामुळे तिला जरी पाळी आली तरी ती ते लपवून ठेवते. इथपर्यंत कथा आली आहे. आत्तापर्यंत तरी ए्कदम एंगेजिंग वाटत आहे. अभिनय, संवाद चांगले आहेत.
कालच त्याचा ट्रेलर पाहिला.
कालच त्याचा ट्रेलर पाहिला. इंटरेस्टिंग वाटला. धन्यवाद रेको बद्दल वावे.
आज पुढचेपण सगळे एपिसोड्स
आज पुढचेपण सगळे एपिसोड्स बघितले. एकूण सात आहेत.
पुढे पुढे जरा काही अनरिअलिस्टिक प्रसंग आहेत. पण विषयाची एकूण हाताळणी, अभिनय, दिलेला संदेश यासाठी बाकी काही खटकणाऱ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं.
मुलगी वयात आल्यावर समारंभ करण्याची पद्धत दक्षिण भारतात बघितली आहे. महाराष्ट्रात काही भागांमध्ये असते का? असेल तर मला माहिती नव्हती.
एक नवीन ॲप आहे प्लेस्टोरवर
एक नवीन ॲप आहे प्लेस्टोरवर Netflix नावाचं तिकडे पण चांगल्या वेब सिरीज आहेत.
एक नवीन ॲप आहे प्लेस्टोरवर
एक नवीन ॲप आहे प्लेस्टोरवर Netflix नावाचं तिकडे पण चांगल्या वेब सिरीज आहेत.
>>> थँक्स .. बघायला हवे हे ऍप .. फ्री आहे का?
फ्री नाही. दीडशे रुपये भरायला
फ्री नाही. दीडशे रुपये भरायला लागतात पण वेबसिरीज मस्त आहेत.
Harlan Coben's Lazarus >>>
Harlan Coben's Lazarus >>> रेको साठी धन्यवाद सुनीधी .
शनिवार्/रविवार बघून संपवली . ६ एपिसोड्स आहेत . Harlan Coben ची बरीच पुस्तकं वाचली आहेत . ईथे सिरीज पण बघितल्या आहेत , पन काही फारच कंटाळवाण्या होत्या .
Lazarus आवडली . मानसिक गुन्ता कमालीचा आहे . लाझ सारखा आपलाही गोंधळ व्हायला लागतो - खर काय खोट काय . windmill of your mind , गाणं एकदम चपलख आहे . शेवटचा अंदाज येतो , पण ज्या नोटवर संपली -- खतरनाक !
The Witcher चा चौथा season
The Witcher चा चौथा season नेटफ्लिक्सवर बघितला. Henry Cavill (सुपरमॅन) ने आधीच घोषणा केल्यामुळे या season पासून Witcher चे पात्र Liam Hemsworth (थॉरचा भाऊ) हा अभिनेता साकारत आहे. Henry Cavill ने दर्शकांच्या अपेक्षा इतक्या उंचीवर नेऊन ठेवल्यामुळे बिचाऱ्या Liam Hemsworth ला तुलनेचा रोष पत्करावा लागणार, कदाचित अजून २-३ season नंतर Liam ला दर्शक Witcher म्हणून स्वीकारतील.
अंतू बर्व्यांच्या शब्दात सांगायचे तर पहिल्यासारखी मज्जा नाही आता
ज्या नोटवर संपली -- खतरनाक >>
ज्या नोटवर संपली -- खतरनाक >> होय स्वस्ती.
Prime -- The Girlfriend बघतेय
Prime -- The Girlfriend बघतेय.
एका श्रीमंत घरातील मुलगा , आपल्या नवीन girlfriend - चेरी - ला भेटवायला घेऊन येतो. त्याची आई लॉरा मुलाबद्दल प्रचंड possessive आहे.
पहिल्या भेटीतच , चेरी दिसते तशी नाही आहे , काहीतरी गडबड आहे असं लॉराला वाटतं.
मग जसजशी गोष्ट पुढे सरकते , त्याचे दोन versions पुढे येतात . एक लॉरा च्या द्रुष्टीने एक चेरीच्या.
Format आवडला. प्रत्येक versionमध्ये एकीचा POV बरोबर वाटतो.
पहिले तीन एपिसोडस् interesting वाटले. मग एका वळणानंतर कथा सामान्य होतेयं. पुढे बघते.
zee5 वर बाई तुझ्यापाई पाहिली
zee5 वर बाई तुझ्यापाई पाहिली ठीक ठाक वाटली...
पंकज कपूर ची थोडे दूर थोडे पास आवडली....
सध्या netflix var दिल्ली क्राइम ३ बघतेय...
कोणी बघतेय का
zee5 वर बाई तुझ्यापाई पाहिली
zee5 वर बाई तुझ्यापाई पाहिली ठीक ठाक वाटली...
पंकज कपूर ची थोडे दूर थोडे पास आवडली....
सध्या netflix var दिल्ली क्राइम ३ बघतेय...
कोणी बघतेय का
The Sinner - Netflix
The Sinner - Netflix
मालिका जुनीच आहे. सायको थ्रीलर (सायकॉलॉजी जास्त, थ्रील कमी) मालिका आहे. ४ सिझन्स आहेत - प्रत्येक सिझनमध्ये वेगवेगळी कथा आहे. पहिले दोन सिझन्स चांगले आहेत पण तिसरा भन्नाट आहे. पहिले १-२ एपिसोड्स कंटाळवाणे वाटू शकतात कारण अशा मनःस्थितीशी आपला कधी सामना झालेला नसतो - प्रत्यक्षात नाही अणि सिनेमातून वगैरेही नाही. पण तिसर्या एपिसोडपासून मी कनेक्ट होऊ शकलो आणि मग खूपच आवडला तो सिझन.
मी 'द बीस्ट इन मी' पाहायला
मी 'द बीस्ट इन मी' पाहायला सुरुवात केली काल नेटफ्लिक्सवर. क्लेअर डेन्स आवडते मला, आणि यात आमचा ब्रेकिंग बॅडमधला माइक दिसला. सुरुवात तरी आवडली आहे.
स्वाती मॉडर्न फॅमिली मधला
स्वाती मॉडर्न फॅमिली मधला माइक चा कॅमिओ पाहिला का? त्यात एकदम फ्लॅमबॉयण्ट कॅरेक्टर होते
ब्रेबॅ माइकच्या टोटली उलटे.
हो हो, जेचा भाऊ की कझिन ना?
हो हो, जेचा भाऊ की कझिन ना?
हो
हो
मी 'द बीस्ट इन मी>>>>> तिसर्
मी 'द बीस्ट इन मी>>>>> तिसर्या एपिसोडवर आहे मी पण. चांगली आहे. स्टीव्ह फार गोड आहे. ते सिंक आणि बाथटब मधलं ब्राऊन पाण्याचा काही संदर्भ आहे का पुढे?
'द बीस्ट इन मी' जबरदस्त. नाईल
'द बीस्ट इन मी' जबरदस्त. नाईल जबरदस्त. अॅगी झालेली पण जबरदस्त. (अंजली१२, संबंध नाही).
Pages