वेबसिरीज - ४

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26

हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.

आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680

त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी, Peacock वर काही पहाण्यासारखं आहे का? महिनाभर घ्यायचा विचार आहे.

बरेच आहे. महिनाभर घेतले तर बघण्यासारखे नक्की मिळेल. यलोस्टोन ही एक सिरीज चांगली आहे. अजून एक दोन आहेत. चेक करून सांगतो. "Those About To Die" ही पण चांगली आहे.

"जुरासिक" चाहत्यांकरता सगळे चित्रपट आहेत त्या फ्रँचायझी मधले. जुरासिक पार्क पासून ते या वर्षीच्या "रिबर्थ" पर्यंत.

डायनिंग विथ कपूर्स
नावाप्रमाणेच खाणं पिणं, पेज थ्री पार्ट्या वगैरे सुरूवातीलाच आहे. आपले नातेवाईक एक वेळ माहिती नसले तरी चालतील, पण कपूर खानदानातले सदस्य माहिती नसतील तर तुम्ही भारतीय नाहीत. करीश्मा कपूर दोन वेळा इंडीयन आयडॉल मधे आली होती. कपूर खानदानाबद्दल ती अभिमानाने बोलते, पण तो कुठे तरी गर्व वाटतो. एकदा म्हणाली होती कि "मै ऐसे रीच और प्रेस्टिजियस फॅमिली को बिलाँग करती हुं , इसलिए को स्टार अनकंफर्टेबल महसूस करते थे ".

रणधीर कपूरची बहीण आणि रणधीर कपूर जुळे असल्याप्रमाणे सारखे दिसतात. दोघांचे आवाजही सेम आहेत. सोयर्‍यांमधे फक्त सैफ अली खान माहिती आहे. कुणाल खेमू अजून दिसला नाही. प्रेम चोप्रा, प्रेम नाथ यांचे फॅमिली मेंबर्स काही माहिती नाहीत.
कपूर फँमिली म्हणजे फक्त राज कपूरची फॅमिली वाटते. गेल्या काही वर्षांपासून शशी कपूर, शम्मी कपूरचे वारस काही दिसत नाहीत. बहुतेक शशी कपूरची मुलं इथे नाहीत. शम्मीचा एकुलता एक मुलगा फ्लॉप असल्याने लाईमलाईट पासून दूर असतो म्हणून असे.
अरमान कोहली पण यांचा नातेवाईक आहे का ?
पेज थ्री टॉपिक मधे इंटरेस्ट असेल तर आदर्श शो आहे.

दिल्ली क्राइम सीझन ३ पहिला . बेबी फलक केस आणि ह्यूमन ट्रांफिकिंगवर आधारित आहे. आधीच्या दोन्ही भागाप्रमाणेच हा भाग ही आवडला. दिल्लीच्या एम्स मध्ये एक दोन वर्षाच्या मुलीला जखमी अवस्थेत सोडून देण्यात येत . त्याच्या तपास करत असतानाच स्त्रियांच्या तस्करीचा प्रकार उघडकीस येतो . अंगावर येणारी दृश्ये या भागात नाहीत पण सिरीजची ट्रीटमेंट अस्वस्थ करणारी आहे. दिल्लीच्या पडत असलेल्या करड्या धुक्याचा रंग सिरीजमध्ये आहे. काही प्रसंगात डोळे पाणावतात विशेषत बेबी फलक आणि तिच्या कुटुंबाची पुर्नभेट होते तेव्हा . मानवी तस्करीचा विषय हाताळताना कुठेही भडकपणा जाणवत नाही पण त्याच वेळी एपिसोड संपताना हुरहुर लागून राहते
सगळ्याच कलाकारांची काम उल्लेखनीय आहेत. शेफाली छाया, रसिका दुग्गल नेहमीप्रमाणेच छान काम करतात. बडी दीदी झालेली हुमा कुरेशीचा अभिनय पण जमला आहे. विशेष उल्लेख कल्याणीच्या छोट्या भूमिकेत असणाऱ्या मीता वशिष्ठचा करावा लागेल. त्या पात्राच बेरकीपणा तिने अचूक दाखवला आहे. राजेश तेलंग आणि इतर कलाकारांनी कामे चोख केली आहेत.

बऱ्याच दिवसांनी बिंज वॉचिंग करून सिरीज पहिली ही आणि आवडली.

फॅमिली मॅन चा तिसरा सीझन आला आहे.
मस्त आहे.
मुख्य म्हणजे, नागालँड च्या पार्श्वभूमीवर हिट झालेली आधीची वेब सीरिज पाताल लोक आणि जयदीप अहलावत इथेही असल्याने एकदम कनेक्टेड, खरे वाटत राहते

हो जयदीप आहे वाचलं कुठेतरी.

फॅमिली मॅनचा मी बघण्याचा मुहुर्त कधी लागणार काय माहीती. अजून पंचायत बघायची आहे. मधे हाऊस ऑफ ड्रॅगन सुरु केलेली, पहीला भाग बघितला, नंतर विसरले. चला आता पहीली ती संपवायला हवी नंतर पंचायत, मग फॅमिली मॅन. एक मराठी वेबसिरीज पौर्णिमेचा फेराही बघायची आहे, युट्युबवर आहे.

मरगळ झटकून हे सर्व बघण्यासाठी इथे लिहून ठेवते. अमुक बघून पूर्ण झाली, आता ही बघतेय असं इथे लिहायला आनंद वाटेल. आजपासून हाऊस ऑफ ड्रॅगन पुढे बघेन असा निर्धार करते म्हणजे बघून होईल.

जाई +1
दिल्ली क्राईम 3 केस माहीत असली तरी सिरीज खिळवून ठेवते शबनम चा शोध ,बडी दीदी कोण ,सिमरन चं काय होणार ,हे सीन गुंतवून ठेवतात तीनही लेडी पोलीसांची कामं उत्तम झाली आहेत स्पेशली रसिका दुग्गल ,फक्त पोलिसांची पर्सनल लाईफ नेहमीप्रमाणे दाखवलीय त्याबद्दल कधीतरी पॉझिटीव्ह छान दाखवा असं म्हणावसं वाटतं. पण पोलिसांची रिऍलिटी तशीच आहे खरंतर ,खडतर. हुमा कुरेशी आवडते महाराणी नंतर इथेही जबरदस्त रोल आहे.कल्याणी खरच भाव खाऊन जाते मस्त सीन आहेत तिचे. वरती लिहिलंय तशी अंगावर येणारी दृश्य नाहीत पण काही सीन अस्वस्थ करून जातात पण शेवट चा फोटो वाला सीन आवडला. मीपण बिंज वॉच केली आवडली.

फॅमिली मॅन खुप आवडती आहे पण समहाउ मला तिसरा सिझन तुटक तुटक वाटला..नविन बरेच कलाकार आणल्याने बर्‍याच फ्रन्टवर एकाच वेळेस बरच काही चालु आहे पण ते कनेक्ट होत नाही त्यामुळे विस्कळीत वाटल..इन्टेसिटी कमी वाटली.
शेवटचा भाग बघायचाय अजुन!!
नुकतिच आल्याने अजुन लिहित नाही पण श्रीकान्त तिवारीला अनडिव्हाडेड अ‍ॅटेशन मिळायच तस इथे झाल नाही..त्याला अ‍ॅक्शन आणी स्र्किनटाइम कमी आहे अस वाटत.
बाकी नागालॅन्ड सुन्दर आहे..जयदिप अहलावत जेव्हा जेव्हा येतो तेव्हा पडदा व्यापुन उरतो.
निर्मित कौर ठिकठाक.

निर्मित कौर शोभली नाही. घट्ट ड्रेसेस व हाय हील्समधे अवघडलेली वाटली. संवादफेकपण त्या रोलला हवी तशी बेदरकार जमली नाही तिला. चार भाग पाहुन झालेत. आवडत आहे अजुन तरी. अहलावतला साकारात्मक भुमिकेत पहायला आवडते. तो नकारत्मक भुमिका पण भारी करतो पण सभ्यच दिसतो (म्हणजे चेहर्‍यावरचे भाव).

Family man बंडल आणि सेन्सलेस. मनोज वाजपेयीने पाट्या टाकल्यात. जयदीपने त्याला झोकाळून टाकलाय. PM आणि तीचे सल्लागार सगळेच बकवास. विकेंड वाया गेला.

PM आणि तीचे सल्लागार सगळेच बकवास.>>> त्याना आधिच्या सिझनपेक्षा जास्त महत्व देवुन धोन्डा पाडून घेतलाय...सगळ हास्यास्पद वाटत बघताना.
मनोज वाजपेयीपेक्षा राज आणि डिकेने पाट्ञा टाकल्यात अस वाटतय..४ वर्श लावुन एकदमच निराशाजनक कामगिरी..एकही मिनिटाचा थरार नाही.

अरेरे!
मनोज वाजपयी आवडतोच, पण फॅमिली मॅन-१ फार काही ग्रेट वाटली नव्हती. त्यामुळे दुसरा सीझन पाहिला नाही. जयदीप अहलावतमुळे तिसरा सीझन बघावा म्हणत होते, पण आता पुन्हा प्रश्न पडलाय.

हो पहिल्या दोन सिझन्सच्या पुढे तिसरा सिझन अजिबातच प्रभावी नाही. मवा थकलेला, म्हातारा दिसतो. जेकेला आधीपेक्षा जास्त जाड, शुचि आधीपेक्षा बरीच स्लिम दिसली पण ते एकवेळ ठिके.
मवाच्या कुटुंबावर अचानक दाक्षिणात्य प्रभाव पडल्यासारखं वाटलं, त्या ध्रितीला अर्थव आधीच्या सिझन्समध्ये अक्का वगैरे म्हणायचा का?
स्पॉयलर ----

मवा फॅमिलीला सुरक्षेच्या कारणासाठी असले तरी स्वतःसोबत पार नागालँडला नेण्याची रिस्क कशाला घेतो? वर तिथे गेल्यावर कायम त्यांच्यासोबत राहू शकतो का, तर नाहीच. उलट आणखी त्यांना धोक्यात घालतो असे वाटले. त्यापेक्षा त्यांना तो दुसरीकडे सिक्रेट सुरक्षित जागी हलवतो व स्वतः मिशनसाठी नागालँडला जातो असे चालले असते ना?
बाकी पण बर्‍याच गोष्टी अ आणि अ, कैच्याकैच दाखवल्यात. अचानक बरोब्बर सेतुपती काय भेटतो न काय न काय. लूज एंड ठेवलाय त्यामुळे सिजन ४ येणार नक्की.

नागलँडचा टूरिजम वाढणार बहुतेक, खूपच सुंदर दिसत आहे. जयदीप अहलावत मात्र मस्त. खरंतर शेवटपर्यंत त्याच्यासाठीच बघावीशी वाटली सिरीज.

फॅमिली मॅन-१ फार काही ग्रेट वाटली नव्हती.>>>> ओह्ह माय गॉड ल.प्री :O असे काही वाचायला मिळेल असे कधी नव्हते वाटले. Sad असो एकेकाची आवड!

मला फॅमॅ & पाताल लोक देजाऊ होत चाल्लय, हाथिराम & बायको, नागालँड तिघ> आहेत ह्यात. Happy मी ५व्या एपि.वर आहे.
जैदीप बाप माणुस आहे अभिनयात & मवा एकदम टक्कर! पाट्या टाकलेल्या मला तरी वाटल्या नाहीत. मी अनू ला मीस करतेय.. फॅमिली मॅन चे तिचे निरिक्षण मस्त असायचे.
ध्रितीला अर्थव आधीच्या सिझन्समध्ये अक्का वगैरे म्हणायचा का?>>> हो. आता डी किंवा दे म्हणतोय Wink
मवा म्हातारा दिसतोय बरोबरच आहेना मग. इतक्या स्ट्रेस असलेल्या कामात माणुस असाच दिसत असणार. आणि ४ वर्षात आपण ही अजून म्हातारे झालोय Wink

दुसरा सीझन पाहिला नाही. >>> पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग जास्त आवडला मला. तिसरा बघायचा नाही ते ठरवा पण दुसरा बघायला काहीच हरकत नाही.

मिट्टी एक नई पहचान सिरिज पाहिली.
आवडली.
शहरातून खेड्यात जाऊन शेती करणाऱ्या युवकाची कथा.

>>> मनोज वाजपयी आवडतोच, पण फॅमिली मॅन-१ फार काही ग्रेट वाटली नव्हती
सेम हिअर! ठीकठाकच होती.

"पहले के बाद दूसरा अभी नहीं, और तीसरा कभी नहीं" - ही सुप्रसिद्ध सर्कारी जाहिरात आठवली फॅमिली मॅनच्या सीझन्स बद्दल वाचून Happy

मी पहिला सीझन पाहिला आहे. तो बघणेबल होता. पुढे नाही पाहिलेली अजून.

फॅमिली मॅन बाबत केके मेननच्या स्पेशल ऑप्स सारखे झाले असे इथले प्रतिसाद बघून वाटते.
आधीचे सीजन इतके आवडलेले की त्याच्याही लेटेस्ट सीजनमधील पहिलाच एपिसोड अतर्क्य बघून पुढे सोडूनच दिले होते.
तरी त्यामानाने फॅमिली मॅन बरेच जण पूर्ण करत आहेत.
तितपत ओके असेल तर कधीतरी बघेन फुरसतमध्ये..

मी पहिला सीझन पाहिला आहे. तो बघणेबल होता. पुढे नाही पाहिलेली अजून.>> दुसरा अवश्य बघ.
सामन्थाने फार मस्त काम केलय..छोटा पॅकेट बडा धमाका!

या सिझनच्या ३ र्या भागापर्यत व्यवस्थित बिल्ड अप आहे पुढे सगळा पत्त्याचा बन्गला कोसळावा तस तितर पितर!! काहिच घडत नाही फक्त वेगवेगळ्या स्टोर्‍या इन्ट्रोड्युस होतात..शेवट तर इतका बन्डल केलाय.

फा Biggrin

फॅमिली मॅन 3 बिंज वॉच केली
पहिल्या दोन च्या मानानी फारच साधारण. त्यात पाताल लोक टेम्प्लेट चा बऱ्यापैकी इन्फ्लुएन्स वाटला.
फर्जी मधे श्रीकांत नी मायकेल ची मदत केली होती, त्यामुळे इथे मायकेल नसता तर फाऊल झाला असता

Pages