Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Do you wanna partner! नावाची
Do you wanna partner! नावाची सिरीज प्राईमवर आली आहे. नीरज कबी, जावेद जाफरी, तमन्ना भाटिया, डायना पेंटी, आयेशा रजा, श्वेता तिवारी, नकुल मेहता ( स्टार प्लस वरील निळ्या डोळ्यांचा देशी गोरा साहेब) आहेत.
तमन्ना आणि डायना जॉब गेल्याने/ सोडावा लागल्याने - कॉर्पोरेट कल्चर/ मेल डॉमिनन्सला वैतागून आपापली भट्टी टाकायचे ठरवतात. तमन्नाच्या बाबांची बिअरची रेसिपी शोधून, ब्रुअरी/ बिअर बिझनेस मधे उडी मारायची ठरवतात. मधे मधे काय अडचणी येतात वगैरे आहे. खास करून बायकांनी या धंद्यात येऊ नये, दोघीच दोघी, एवढ्या महत्त्वाकांक्षा चांगल्या घरातील मुलींना कशासाठी अशा थोड्या व बऱ्याच क्रिंज वाटणाऱ्या गमतीजमती आहेत. श्वेता तिवारी गॅंगस्टर आहे. नीरज कबी बिझनेस आयडिया चोरून श्रीमंत होऊन बसलेला धूर्त बिझनेसमन आहे, सुरवातीला याचा कैच्याकै 'तांबडी चांबडी चमकते बघा- लक लक लक लक' वर वेडावाकडा नाच आहे. मजेदार वाटला. मन रमते पाहताना, खूप दर्जेदार नाही पण पाहावीशी वाटतेय. टिपी आहे, मन एकाग्र करावे लागत नाही. बिअरचा फॉर्म्युला शोधणं, ब्रुअरीचा धंदा सांभाळून दिल्लीत जम बसवणं, बंगाली पार्श्वभूमी, चकाचक ऑफिसेस, सुंदर आणि आधुनिक वाटणाऱ्या नायिका - काहीबाही आहे. टिपी हवा असेल तर पाहून बघा. फारशा शिव्या आणि इंटिमेट दृश्यं नाहीत. मला फारच क्लीन वाटली सिरीज.
एकिकडे मॉर्निंग शो चालू आहे
एकिकडे मॉर्निंग शो चालू आहे आणि अधे मधे काम करताना सिरियसली न बघण्याचे कन्टेन्ट म्हणून बा**स ऑफ बॉलिवुड चे २ भाग बघितले.
टिपिकल एक मिडलक्लास मुलगा बॉलिवुड मधे यायच्या प्रयत्नात असणे. पण तिथे नेपोटिजम विरुद्ध लढावे लागणे इ. बॉलिवुड चे स्टिरिओटाइप चे स्पूफ करण्याचा प्रयत्न असावा पण ते कॅरिकेचर जास्त झालेले आहे. जोक्स, एकूण ट्रीटमेन्ट बघता इट हॅज केजो रिटन ऑल ओवर इट. बॉलिवुड च्या सिंबाला (आर्यन ला ) मदत म्हणून भरपूर बॉलिवुड ए लिस्टर्स नी "सलाम साब" करत हजेर्या लावल्यात. एकूण क्रिन्ज कन्टेन्ट. नाही बघणार मोस्टली पुढे.
स्कॅम 92 हर्षद मेहता संपवली.
स्कॅम 92 हर्षद मेहता संपवली.
एकदम कडक आहे. हर्षद मेहता म्हटले की आता तो प्रतीक गांधीच आठवणार.
आता स्कॅम 2003 तेलगी बघायची आहे.
पण मध्ये थोडा चेंज म्हणून दुसरे काहीतरी हलकेफुलके टाइमपास शोधत होतो.
गुल्लक बद्दल बरेच ऐकून होतो म्हणून ती शोधून सुरू केली. वाईट अशी नाहीये पण ओल्ड फॅशन आहे. दूरदर्शन काळात आवडली असती. पण आता पहिला एपिसोड तसा चांगला वाटूनही पटकन दुसरा बघावा असे वाटले नाही.
तेवढ्यात BA***DS of Bollywood बद्दल चांगले वाचले एक ठिकाणी म्हणून ती बघायला घेतली आणि पहिलाच एपिसोड बघून मूड फ्रेश झाला.
फुल मसाला टाईप स्टोरी आणि तशीच प्रेझेंट केली आहे.
शिव्या जरा जास्त आहेत. पण तरी संवाद मस्त आहेत.
एपिसोड संपतानाचा डायलॉग सितारे तो बहोत होते है पर आसमान एक ही होता है... पंच होता.
अजून बघतो पुढे कशी निघतेय..
बाकी तो राघव ज्यूयाल मस्त काम करतो.
आर्यन खान ची डेब्यु
आर्यन खान ची डेब्यु डायरेक्टरल सिरिज >>> आशा आहे त्यानेच डायरेक्ट केली असेल. नाही पहाणार म्हणा.
गर्लफ्रेंड मलाही आवडली. ती नायिका एका विशिष्ठ बाजुकडुन किंवा तिच्या नजरेची स्टाईल कोणासारखी वाटली ते आठवले, हसु नका. ‘मुक्ता बर्वे‘.
मॉर्निंग शो मी पण सुरु केली प्राईमवर. मस्त आहे. ५वा भाग चालु आहे पहिल्या सिझनचा. सगळी पात्रे आवडली. दोन्ही बाया तर आवडतातच.
Pages