Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<<आर्या, मी बघायला सुरुवात
<<<आर्या, मी बघायला सुरुवात केली आहे . त्यावेळच्या एपिसोडना वारांची नावे दिली आहेत<<<
येस...मी ही रात्रभर पाहुन एका दमात संपवली.
हिम्मत नेहमीप्रमाणे आवडला. शेवटचे काही शॉट्स भारी वाटले.
क्लायमॅक्सला मारामारी खुप वेळ चालेल , फारुख आणी अभयला खुप ठिकाणी प्रतिकार होइल असे वाटले होते. एवढ्या गुप्त ठिकाणी असलेल्या ठिकाणावर तशीच सिक्युरिटी असेल असे वाटले. पण काहीच नाही.
>> क्लायमॅक्सला मारामारी खुप
>> क्लायमॅक्सला मारामारी खुप वेळ चालेल , फारुख आणी अभयला खुप ठिकाणी प्रतिकार होइल असे वाटले होते. एवढ्या गुप्त ठिकाणी असलेल्या ठिकाणावर तशीच सिक्युरिटी असेल असे वाटले. पण काहीच नाही.
स्पेशल ऑप्स चा शेवट अगदीच गंडला आहे. बहुतेक त्यांच्या मॅ नेजर ने कुच बी कर्के आट एपिसोड मे सिरिज खतम कर डालो, अपुन्के पास इतनाहिच बजेट है असं सांगितलं असावं. के के मेनन ला देखील चटपटीत असे संवाद नाहीत. तो एक हम लोग चु** के लिये काम करते है सोडला तर. बाकी के के मेनन मुळे मालिका थोडी सुसह्य झाली इतकच.
स्पेशल ऑप्स बघून संपवली .
स्पेशल ऑप्स बघून संपवली . nothing impressive .
अविनाश आणि जुही ईतके बावळट कसे काय असू शकतात . रुहानीची एक्स्पर्टीज काय होती ? तिला मुद्दामून का बोलावलं ?
फारूख मात्र आवडला . हिम्मत त्याला पुरेपुर ओळखून आहे .
S1 आणि S1.5 च्या मानाने हा सीजन एकदम फिक्का आहे . कुठेही , अरे आता काय होईल ? म्हणून तुम्ही अलर्ट होत नाहीत . हिम्मत तीन (की दोन ) मोबाईल फोन्स घेउन सगळे ऑपरेश्न पार पाडतो .
आता Dept Q राहीली आहे ती पूर्ण करते .
Mistry पाहिली राम कपूरची
Mistry पाहिली राम कपूरची
बरी आहे
Character developement आणि ऍक्टर चांगले आहेत.
काही ठिकाणी अचाट वाटते.
आरमान मिस्त्री एक ex पोलिस ऑफिसर आहे
Ocd असलेला
त्याचा एक past आहे
आणि मुंबई पोलिसांना consultant म्हणून service देतो.
3 की 4 वेगवेगळ्या केस आहेत आणि समांतर पणे त्याच्या पत्नीच्या मृत्यूचे गूढ देखील सोडावयचं आहे त्याला.
काही वेळा बघताना mentalist आठवली मला.
क्राइम सीरीज मधे डीटेक्टिव
क्राइम सीरीज मधे डीटेक्टिव काहीतरी विक्षिप्त वगैरे दाखवला नाही , पोलिस ऑफिसर डिवोर्स्ड, अॅडिक्शन इश्यूज असलेला दाखवला नाही तर फाउल होतो ! mentalist चे माहित नाही पण मिस्त्री "Monk" ची सेम टु सेम कॉपी आहे.
हो. हा मेल असेल आणि
मग बायोलॉजिकल आई बापांचं स्टीमी सीन तोंडी लावायला येईलच.
बाप पोलिस असेल तर आई डिस्ट्रिक्ट अटर्नी. त्यात डिटेक्टिव्ह सार्जंट ... डीएस... अर्थात तुम्ही ओळखलं असेल हा ब्रिटिश ड्रामा आहे... तर मग मंडेन आई-मुलाचे सीन येतीलच. मग त्यात गेला बाजार ऑलिव्हिया कोलमन, इड्रिस अल्बा, इंदिरा वर्मा, डेव्हिड टेनंट असे ब्रिटिश लोक असतील तर त्यांना सगळं माफ!
अमित फार चपखल आहे.
अमित
फार चपखल आहे.
हुलू वर "द रूकी" पुन्हा पाहायला सुरूवात केली. त्यातले काही रील्स फेबुवर पाहिले व इंटरेस्टिंग वाटले.
अॅपल टीव्हीवर "Your Friends and Neighbors" ही जॉन हॅम, अमॅण्डा पीट व ऑलिव्हिया मन यांचे प्रमुख रोल असलेली एक सिरीज आली आहे. मॅड मेन मधला जॉन हॅमचा रोल आवडत असल्याने एक भाग पाहिला. इथे तो बर्यापैकी वेगळ्या रोल मधे आहे. थीम इण्टरेस्टिंग आहे. बरीच "लाइट" वाटते सिरीज. पण पुन्हा तोच इतर सिरीजसारखा प्रॉब्लेम - पहिला भाग बघितल्यावर इतकी उत्सुकता वाटत नाही की आवर्जून पुढे लावावी. कोणी पाहिली असल्यास सांगा.
वेब सिरीज नाही, पण योग्य धागा
वेब सिरीज नाही, पण योग्य धागा माहित नसल्याने इथेच लिहितो.
नेफ्लिवर वीर दासचा नवा स्टॅंडअप आला आहे. तो मस्त आहे. वीर दास आवडतोच.
झरना आंटीचा (झरना गर्ग) पण आला आहे. तो मात्र कंटाळवाणा आहे. म्हणजे कोणी अजिबात बघितलं नसेल तर आवडले, पण तेच आणि तेच आणि तेच विनोद आहेत. तिच्या त्याच त्याच सेट्सचा कंटाळा आला आता. परवा तिची सीबीसीवर मुलाखत ही थोडीशी ऐकली. सगळी शोधून ऐकायची आहे. पण फारच मंडेन बोलत होती असं वाटलं मला.
अमित, तुझी 'मंडेन'ची व्याप्ती
अमित, तुझी 'मंडेन'ची व्याप्ती वाढत चालली आहे.
आज मंडे आहे ना!
आज मंडे आहे ना!
मग मंडे-न का म्हणतोस?
मग मंडे-न का म्हणतोस?
मी मराठवाडा किंवा विदर्भातला
मी मराठवाडा किंवा विदर्भातला नाही.... नाहीतर.....
अमितव वेब सिरीजचा पटकथा लेखक
अमितव वेब सिरीजचा पटकथा लेखक म्हणून तुला स्कोप आहे भरपूर…..
अमित, एक नंबर
अमित, एक नंबर
मला वाचताना 'बॉश' आठवली.
तरी 'बॉश' माझी आवडीची आहे
माधव, मिट्टी सिरीज मी सुद्धा इश्वाक सिंगमुळे बघायला सुरू केली. पण जाहिरातींनी वैतागले. एकच एपिसोड पाहून सोडून दिली.
क्राइम सीरीज मधे डीटेक्टिव
क्राइम सीरीज मधे डीटेक्टिव काहीतरी विक्षिप्त वगैरे दाखवला नाही , पोलिस ऑफिसर डिवोर्स्ड, अॅडिक्शन इश्यूज असलेला दाखवला नाही तर फाउल होतो. > >> अगदी. भरीस भर तो उद्धट, कायदा नियम न मानणारा असा कुरुप वेडे पिल्लू असायलाच हवा.
एकदम परफेक्ट अमित. बऱ्याच
एकदम परफेक्ट अमित. बऱ्याच सिरीज आठवल्या.
बॉश मला पण आवडली होती. बॉश
बॉश मला पण आवडली होती. बॉश लिगसी विशेष आवडली नाही.
मॉंक पहिल्यांदा पाहिली तेव्हा आवडली होती. मध्यंतरी परत पहायचा प्रयत्न केला तर कंटाळा आला.
नेफ्लिवर वीर दासचा नवा
नेफ्लिवर वीर दासचा नवा स्टॅंडअप आला आहे. तो मस्त आहे. वीर दास आवडतोच. >> Mumbai, London, New York वाला का? मस्त आहे. मराठी translation भारी आहे
मार्वल वाला जोक पण.
मैत्रेयी
मैत्रेयी
हो monk चा remake आहे
मेंटलिस्ट ह्यासाठी आठवली की
तिथेही बारीक निरीक्षण करणारा, अचूक मेमरी असलेला सायकीक काम केलेला हिरो, त्याची पत्नी गेलीय म्हणजे खून झालाय मुलगी देखील, आणि हा समांतरपणे त्या रेड जॉन चा शोध घेत असतो, प्रसंगी स्वतःला धोक्यात टाकतो, त्याची बॉस किंवा स्टेशन इंचार्ज एक स्त्री इथेही तसेच.
नेफ्लिवर untamed पाहिली. थोडी
नेफ्लिवर untamed पाहिली. थोडी स्लो आहे. पण मला आवडली. Yosemite national park मधे शुट केली आहे. मस्त visuals आहेत. एकदा बघायला पाहिजे हे पार्क.
. Yosemite national park मधे
. Yosemite national park मधे शुट केली आहे. मस्त visuals आहेत. एकदा बघायला पाहिजे हे पार्क.>>> योसेमाइट अवश्य बघा, कितीही वेळा बघितल तरी मन भरत नाहि पण ही सिरिज कॅनडात शुट केली आहे अस नेट सान्गतय.
The story is happening in
The story is happening in Yosemite national park. It may be shot in Canada.
कॅलिफोर्नियाला तसंही कॅनडात
कॅलिफोर्नियाला तसंही कॅनडात विलीन व्हायचं म्हणतच होते. कायनात काय च्या मनात तेच दिसतंय.
पाताल लोक (२) - पहिल्यापेक्षा
पाताल लोक (२) - पहिल्यापेक्षा जास्त आवडला. हाथीराम आणि अन्सारीची केमिस्ट्री भारी आहे.
-- पाताल लोक (२) कुठे पाहायला मिळेल?
स्पेशल ऑपस् मध्ये पहिल्या
स्पेशल ऑपस् मध्ये पहिल्या एपिसोडमध्ये ते हवाला पेमेंट आणि कोऑर्डिनेटस् चा काय गोंधळ होतो नक्की?
दुसरा एपिसोड बघतेय पण सीरिज विशेष पकड घेत नाहीये.
गोंधळ नाही होत पण त्यांचे
गोंधळ नाही होत पण त्यांचे डार्क वेब वरच्या माणसाशी कॉन्वर्सेशन हॅक होऊन दुसर्या पार्टीने आधीच ऐकल्याने ते परस्पर मधेच इन्टरसेप्ट केले जाते. मी पुढे नाही बघितले. बोअर च झाले.
<<<<. स्पॉयलर अलर्ट>>>> .
<<<<. स्पॉयलर अलर्ट>>>> .
मधली पार्टी हॅक करून दुसरे कोऑर्डिनेटस् पाठवते हिम्मतच्या माणसाला. आणि तिकडे आपला माणूस पाठवून पैसे कलेक्ट करते. ते कळालं. पण अविनाश त्या ओरिजनल कोऑर्डिनेटस् वर नजर ठेवून कसा असतो? त्याला पण बदललेले कोऑर्डिनेटस्च माहिती असणार ना?
<<< अलर्ट खतम>>>
हॉटस्टारवर परत मागे जाऊन सीन बघणे अत्यंत त्रासदायक आहे. इतक्या जाहिराती असतात की काय बघत होतो तेच विसरायला होतं.
***स्पॉयलर अलर्ट***
***स्पॉयलर अलर्ट***
>>त्याला पण बदललेले कोऑर्डिनेटस्च माहिती असणार ना?<<
इतका विचार भारतीय वेबसिरीज बाबतीत करायचा नाहि, मग ती नीरज पांडेची असली तरीहि..
असे भरपुर होल्स आहेत. ढोलकियाला व्यवस्थित झिपटाय बांधली जात नाहि (मला आधी वाटलं कि यातहि काहि गेम असेल), १०-१२ गार्डसना लिलया लोळवणारा अभय, अगदि स्वस्त्यात मारला जातो (परत जिवंत होतो) इ. या चूका कथानक पुढे सरकायला मदत करतात असं समजुन आपण गप्प बसावं...
***स्पॉयलर अलर्ट***
डपो
जित्याची खोड, पाताललोक सिझन 2
जित्याची खोड, पाताललोक सिझन 2, प्राईमवर आहे भारतात.
Pages