Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कपिल शर्मा शो , लेटेस्टसंजय
कपिल शर्मा शो , लेटेस्ट
संजय दत्त आणि सुनील शेट्टी आलेला शो मस्त आहे.
म्हणजे बाकी फालतू कॉमेडी सोडा, पुढे ढकला..
पण सुनील शेट्टीने किस्से मस्त सांगितले. ते आवर्जून बघा.
मी त्याला एव्हरेज अँक्टर समजायचो, म्हणजे आहे सुद्धा तसा तो अभिनयात जेमतेम. पण त्याची किस्से टेलिंग स्टाईल भारी आहे. मी फॅन झालो
सोडून दिली कॉल माय बॉलीवूड
सोडून दिली कॉल माय बॉलीवूड एजंट. पुन्हा पुन्हा तेच प्रसंग येत राहतात. अशा मालिकात एलजीबीटीक्यू /एखादं पात्र सायकिक हे न्यू नॉर्मल होत चाललं आहे.
एलजीबीटीक्यू सगळीकडे असतात.
एलजीबीटीक्यू सगळीकडे असतात. बॉलीवूडमध्ये ते उघडपणे आपली ओळख देतात, देऊ शकतात म्हणून तिथे जास्त आढळतात, इकडचे तिकडचे डावललेले तिथे जमा होतात. जर मालिकेच्या नावातच बॉलीवूड आहे तर न दाखवलेले खटकले असते
बॉलीवूडला जाणं येणं नसल्याने
बॉलीवूडला जाणं येणं नसल्याने काही कल्पना नाही.
ते आले लक्षात
ते आले लक्षात
म्हणून माहिती पुरवली
जाई - बघून झाला वेन्स्डे चा
जाई - बघून झाला वेन्स्डे चा सीझन. मी तरी एन्जॉय केला हा पण! टीन हायस्कूल ड्रामा, मॅजिक, डार्क सीक्रेट्स, मर्डर प्लॉट्स, मिस्टरी, व्हॉट कॅन गो राँग!! मला मजा आली.
.
.
***** स्पॉयलर्स*********
.
.
लेडी गागाचा कॅमिओ वॉज अ सरप्राइज आणि "डेड डान्स" साँग जबरदस्त !! ते गाणे फार आवडले. आणि ते चक्क अॅग्नेस आणि इनिड ने केलेय. मागच्या सीझन चा वेन्स्डे चा तो डान्स पण हिट झाला होता. अॅग्नेस चे कॅरेक्टर क्यूट आहे. इनिड इतकेच आवडले.
डेड प्रिन्सिपल वीम्स ची रीएन्ट्री हे अजून एक सरप्राइज, मला आवडले. "थींग" ची बॅक स्टोरी पण भारी. एकूण या सीझन मधे भरपूर पावरफुल कॅरेक्टर्स आणि बर्याच इन्टरेस्टिंग स्टोरीलाइन्स आल्या आहेत. सगळ्यांना जस्टिस करायला अजून एपिसोड हवे होते असे वाटले. किंवा पुढच्या सीझन मधे ते ट्रॅक्स कन्टिन्यू करायला पाहिजेत.
.
.
.**** समाप्त*****
बॉलीवूडला जाणं येणं नसल्याने
बॉलीवूडला जाणं येणं नसल्याने काही कल्पना नाही.
कपिल शर्मा शो , लेटेस्ट
कपिल शर्मा शो , लेटेस्ट
संजय दत्त आणि सुनील शेट्टी आलेला शो मस्त आहे.>.... पाहिला
संजय दत्त कडे काही कम्युनिकेशन स्किल नाही अजिबात. काहीतरीच बोलत होता ना शेंडा ना बुडखा!
सुनिल शेट्टी जे बोलत होता तेच रिपीट केलं त्याने १-२ वेळा.
जे मी केलं त्याचं काही रिग्रेट नाही म्हणे.. विचित्रच वाटलं ऐकायला.
असो सुनिल शेट्टी रॉकिंग आहे एकदम! आजोबा आहे कोण म्हणेल
आता जास्त हँडसम दिसतोय पूर्वीपेक्षा!
येस मैत्रेयी. मस्त होत दुसरा
येस मैत्रेयी. मस्त होत दुसरा सीझन. लेडी गागाच गाण तर एकदम सरप्राइज.. प्रोफेसर डोर्टच बावळत ते व्हिलन रुपांतरण चपखल आहे. मला सगळ्यात wednesday च इनिड मध्ये रूपांतर झालं तो भाग गमतीशीर वाटला. काळ्या कपड्यात असणारी wednesday रंग बेरंगी कपड्यात नाचकाम करते आहे हे बघणे कल्पनातीत.
कॅथरीन झिटा जॉन्स पहिल्या सिझनमध्ये एवढी प्रभावी वाटली नव्हती रोल कमी होता त्यामुळे. या सीझनमध्ये चांगल काम केलं आहे . wednesday चा भाऊ pugsly नावाप्रमाणेच पागला वाटतो . कास्टिंग पॅरफेक्ट जमले आहे त्याचे .
संजय दत्त कडे काही
संजय दत्त कडे काही कम्युनिकेशन स्किल नाही अजिबात. काहीतरीच बोलत होता ना शेंडा ना बुडखा!
>>>>
हा हा.. हो.
बहुधा व्यसनांमुळे तशी अवस्था झाली असावी. अन्यथा तसे नसावा तो असेही वाटले.
असो सुनिल शेट्टी रॉकिंग आहे एकदम! आजोबा आहे कोण म्हणेल Wink आता जास्त हँडसम दिसतोय पूर्वीपेक्षा!
>>>>
अगदीच +७८६ तरुण असताना चम्या दिसायचा तो. असे होते बरेच लोकांबाबत. नंतर रुबाबदार दिसू लागतात.
अक्षयकुमारला जशी प्रसिद्धी मिळते तशी याला पीआर प्रसिद्धी नाही पण याचा फिटनेस जबरदस्त आहे. फिल्म इंडस्ट्रीत बरेच जण याच्याकडून जिम आणि वर्कआऊट बाबत टिप्स घेतात असे मागे एका शो मध्ये ऐकले होते.
रानभुली बॉलिवूड कमेंट
रानभुली बॉलिवूड कमेंट
अक्षयकुमारला जशी प्रसिद्धी
अक्षयकुमारला जशी प्रसिद्धी मिळते तशी याला पीआर प्रसिद्धी नाही पण याचा फिटनेस जबरदस्त आहे>>>>>> खरं..
जिओ हॉटस्टारवर ‘बॅंड ऑफ
जिओ हॉटस्टारवर ‘बॅंड ऑफ ब्रदर्स’ पहायला सुरूवात केली आहे. जुनी आहे. दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित विषय आणि स्टीव्हन स्पीलबर्ग नाही म्हणून जरा आश्चर्य वाटत होते, तेवढ्यात स्पीलबर्ग आणि टॉम हॅंक्सचं नाव प्रोड्युसर म्हणून दिसले. टॉम हॅंक्सने टेलीप्ले लिहिला आहे.
सगळ्यात सरप्रायजिंग गोष्ट म्हणजे ‘रॉस’. पॅराट्रुपर्सची कंपनी लीड करणाऱ्या काहीश्या कडक, इनसिक्युअर आणि मीन लेफ्टनंटच्या रोलमध्ये दिसला. फ्रेंडसमधल्या काहीश्या वेंधळ्या प्रोफेसर कॅरॅक्टरपेक्षा अत्यंत वेगळे कॅरॅक्टर त्याने उत्तम केले आहे. अर्थात डी डे पूर्वीच त्याची गच्छंती झालेली आहे. नंतरच्या एपिसोडमध्ये त्याचा काही रोल आहे का माहित नाही.
शंका होतीच, पण फायनली someone
शंका होतीच, पण फायनली someone is coming out of closet!
नंतरच्या एपिसोडमध्ये त्याचा
नंतरच्या एपिसोडमध्ये त्याचा काही रोल आहे का माहित नाही.>>> एकदम शेवटच्या पार्ट मध्ये, विंटर्स सोबत, भारी आहे तो सिन
स्पॉयलर देत नाही
ही सगळी रियल स्टोरी आहे, पुस्तकही आहे
थँक यू आशुचॅम्प
थँक यू आशुचॅम्प
माम, छान पोस्ट. लिस्ट मधे
माम, छान पोस्ट. लिस्ट मधे टाकून ठवलंय.
दीप्स, अन्जु
दीप्स, अन्जु
सुनिल शेट्टि बद्दल ७० चा
सुनिल शेट्टि बद्दल +१ ७० चा अजिबातच वाटत नाहिये.
अक्षय कुमार एक्तिव्ह आहे मुव्हित त्यामुळे पी आर वैगरे सगळ असणारच...( पी आर पैसे घेतात ) सु. शेट्टि तेवढा अॅक्तिव्ह नाहिये.
Do You Wanna Partner - अमेझॉन
Do You Wanna Partner - अमेझॉन प्राइम बद्दल चांगलं वाचायला मिळतंय.
हंटिंग वाइव्ज आवडली नव्हती पण
हंटिंग वाइव्ज आवडली नव्हती पण रहस्य असल्याने पाहिली होती. वाह्यात सीन्सवर फार वेळ घालवला की कंटाळा येतो तसंच इथं झालं. उगा फास्टफॉरवर्ड करत रहावं लागतं.
प्राईमवर ‘गर्लफ्रेन्ड’ म्हणुन मालिका सुरु केली आहे. एक भाग झाला. अजुनतरी आवडली आहे व फारवेळा फा. फॉ. करावं लागलं नाही. नायिकेचा चेहरा फारफार ओळखीचा वाटतो. पण कोणासारखा ते अजुनही आठवले नाही.
आर्यन खान ची डेब्यु
आर्यन खान ची डेब्यु डायरेक्टरल सिरिज बघायला सुरवात केलीये.. २ भाग बघितलेत..चकचकित आहे पण
टिपिकल बॉलीवुड मसाला आवडत(भिडणार काही नाहिये फारस ) असेल तर आवडेल...केजोला बर्यापैकी रोल आहे..राघव ज्युएल पण धमाल काम करतोय..हा पोरगा अफाट आहे.
हिरोच काम केलेला आणी राघव भाउच वाटतात काहिवेळेस.,मेन लिड चान्गला आहे.
बॉबी देओल तरुणपणी फ्लॉप गेला आणी आता चमकतोय..
बाकी शाखा मुळे असेल पण सिरिज सपेपर्यत बहुधा आक्खी इन्डस्ट्रिच हजेरि लावुन जाइल बहुधा..नावातच बॉलिवुड असल्याने ते अपेक्षित होतच.
चकाचक शोरुम बाकी कटेन्ट ओके ओके.
समीर वानखेडेचं कॅरेक्टर पण
समीर वानखेडेचं कॅरेक्टर पण आहे
समीर वानखेडेचं कॅरेक्टर पण
समीर वानखेडेचं कॅरेक्टर पण आहे>>> हो हो! बराच सिमिलर दिसणारा शोधलाय.
प्राइम वरून लवकरच जाणार अशा
प्राइम वरून लवकरच जाणार अशा टायटल खाली "द मॉर्निंग शो" नावाची सीरीज दिसली, जेनिफर अॅनिस्टन, स्टीव कॅरेल, रीस विदरस्पून अशी मोठी नावं बघून पहायला घेतली.
नावांवरून वाटले त्याप्रमाणे कॉमेडी नसून ड्रामा सीरीज आहे. "द मॉर्निंग शो" हा एका लीडिंग चॅनल चा शो. त्याचे हाय प्रोफाइल होस्ट जे. अॅ. आणि स्टी. कॅ., अचानक सेक्शुअल ह्रॅसमेन्ट च्या आरोपांमुळे चॅनल स्टीव ला तडका फडकी फायर करतं . स्टीव च्या मते सर्व संबंधितांच्या संमतीने झालेलं होतं आणि आता त्या असिस्टन्ट्स स्टन्ट करताहेत. चॅनल मोठ्या स्कँडल मधे सापडते,को होस्ट ला फायर केल्यामुळे जेनिफर ही अवघड पोझिशन मधे येते. चॅनल हेड आपल्य रेटिंग्ज च्या आणि नवा होस्ट शोधण्याच्या काळजीत, आणि जेनिफर ला त्यात से हवा आहे. त्यात चॅनल ला एक रिमोट स्मॉल टाउन मधे लोकल चॅनल वर काम करणारी आणि वेगळ्याच कारणामुळे व्हायरल झालेली रीस विदरस्पून सापडते.
२ भाग बघून झालेत. १ तासाचे एपिसोड्स आहेत, सो फार एकदम इन्टरेस्टिंग आहे.
भारतात "द मॉर्निंग शो" प्राइम
भारतात "द मॉर्निंग शो" अॅपलटीव्ही वर आहे. बरेच सिनेमा आणि वेबसिरीज प्राइम वरून इतर प्लॅटफॉर्म वर हलवतात त्याचे सबस्क्रिपशन घेण्याकरता.
प्राईमवर ‘गर्लफ्रेन्ड’ म्हणुन
प्राईमवर ‘गर्लफ्रेन्ड’ म्हणुन मालिका सुरु केली आहे. एक भाग झाला. अजुनतरी आवडली आहे व फारवेळा फा. फॉ. करावं लागलं नाही. नायिकेचा चेहरा फारफार ओळखीचा वाटतो. पण कोणासारखा ते अजुनही आठवले नाही.>>>>>> मी बघितली ही सिरीज. आवडली मला.
पेनेलुप क्रुझ सारखी दिसते आय थिंक.
गर्लफ्रेन्ड >>>> मी पहिला
गर्लफ्रेन्ड >>>> मी पहिला भाग थोडा पाहिला.. पण पुढे बघावं की नाही कळलं नाही. सायको थ्रिलर आहे ना ? की कॅटफाईट ?
हो माझी झाली बघून
हो माझी झाली बघून गर्ल्फ्रेन्ड . चांगली आहे, थ्रिलर आहे, नुस्ताच टिपिकल सासू सून कॉल्न्फ्लिक्ट नाहीये, त्यापेक्षा बेटर वाटली. दर एपिसोड काही भाग आईच्या नजरेतून आणि काही प्रेयसीच्या, त्यामुळे मेन्टली आपलाही लंबक कन्फ्युज्ड राहतो ( कोण जास्त डार्क) दॅट वाज फन!
गर्लफ्रेंड नावाचा मराठी
गर्लफ्रेंड नावाचा मराठी पिक्चर सुद्धा आहे
अमेय वाघ आणि सई ताम्हणकर
थोडक्यात सांगायचे तर त्यात दोघांचे कॅरेक्टर जरा हटके आहे
मचिकवावर हलवतो ही पोस्ट
Pages