Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26
हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.
आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680
त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिन्दिया के बाहुबली नावाची
बिन्दिया के बाहुबली नावाची सीरीज आली आहे - मला आयपीवर दिसली, कदाचित प्राइम वर असावी.
कलाकार चांगले आहेत ( रणवीर शोरी, सौरभ शुक्ला, सुशांत सिंग, गोविंद नामदेव, दिब्येन्दू भट्टाचार्य, शिबा चढ्ढा, सीमा बिस्वास ,सई ताम्हनकर, जंत्रीच आहे एकूण. )
पण सुरुवात तरी फार ग्रेट नाही वाटली. म्हणजे अजून तरी टिपिकल बिहारी गाव, बाहुबली कल्चर, जातीय खुन्नस वगैरे असे आहे, पण बघू, अजून एक दोन भाग बघेन.
स्टारकास्ट तर तगडी दिसत आहे.
स्टारकास्ट तर तगडी दिसत आहे. चेक करतो.
(No subject)
Ballard पाहून संपवली.
Ballard पाहून संपवली.
कंटाळा येत असतानाच मध्येच पकड घेते.
पण गुन्हेगारचा उलगडा आणि पुढच्या गोष्टी एकदम anti climax वाटल्या. सीझन 2 ची सोय केली आहे.
बॉशमधली काही पात्र अनपेक्षित समोर येतात.
Sparkle +१
Sparkle +१
बरेच अती दाखवले आहे. इतके.. की मी शेवटपर्यंत आता प्रधानजी हार्ट अटॅक येऊन मरणार आणि सिरीज तिथेच संपणार अशी मनाची तयारी करून टाकली होती. कारण हावभाव तेवढे जास्त केलेत.
ballard चे उरलेले भाग पाहिले.
ballard चे उरलेले भाग पाहिले. शेवटचे २ भाग जरा जास्त घट्ट बांधले आहेत. पुढील सिजन पहाणार.
Ballard >>> माझे अजून २ भाग
Ballard >>> माझे अजून २ भाग बघायचे राहिलेत.
कोल्ड केसेस, एकात एक मिसळलेला तपास, त्यामुळे खूप पात्रं, नावांचे उल्लेख येतात. ट्रॅक ठेवायला अवघड जायला लागलं.
पण बघणार आहे.
बॉश अधेमध्ये इनडिफरन्टली असल्यासारखा येऊन जातो, तिला चार अनुभवी बोल ऐकवतो ते आवडलं.
मंडला मर्डर्स पाहून संपवली.
मंडला मर्डर्स पाहून संपवली. मस्त वेगवान वाटली.
शास्त्रीजीवाल्या एपिसोडमध्ये जरा गूढ , भीती वाटली. तो हिरो गुल्लकमधला अन्नुभैया आहे हे जरा उशीरा कळलं. सुरवीन चावला आवडली. जिमी खानला जरा व्यवस्थित रोल हवा होता.
One time watch नक्कीच आहे.
quantum leap बघते आहे. टाईम
quantum leap बघते आहे. टाईम ट्रॅव्हल वर आहे. मजा येतेय बघायला.
(No subject)
इथे चक्क पंचायत ४ वर चर्चा
इथे चक्क पंचायत ४ वर चर्चा नाही? पंचायत ३ वर २ पाने भरले होते माबोवर!
पंचायत ४ फार आवडली, ३ चे पाहिले २ भाग पाहून सोडली होती, पण ३ आणी ४ लगोलग पाहिली, ( मध्ये विरंगुळा म्हणून मिर्झापूर ३ पाहिली)
इलेक्शन खरोखर उत्कंठावर्धक होते, विनोदचा हम गरीब है गद्दार नही वाला डायलॉग इपिक होता, मध्यंतरी मलाही वाटले होते की सरपंचाने स्वतवरच गोळी झाडली आहे पण तसे नव्हते. भूषणने छान चाली खेळल्या, शेवटी त्याचा विनोदला फोन येतो तेव्हा विनोदची रिएक्शन भारी होती, तो धक्का मलाही बसला! शेवटची प्रधानाची रिएक्शन बरोबर वाटली, कारण त्याचा गावात असलेला दबदबा सुरुवातीच्या अनेक भागात दिसला होता! एकंदरीत पंचायत ३ चा कलंक पंचायत ४ ने धुवून काढला!
पंचायत ४ बरेच जणांना आवडली
पंचायत ४ बरेच जणांना आवडली नाही कारण जॉनर थोडा बदललेला भासला. लोकं वेगळ्या अपेक्षेने जेवायला बसले आणि वेगळे ताट समोर आले असे झाले असावे. मनाची पाटी कोरी करून बघणे गरजेचे. अर्थात पंचायत एक दोन शी तुलना केली नाही तर स्वतंत्रपणे मला बघायला आवडला हा सीजन. स्पेशली दोन्ही कडच्या ग्रे शेड मधील फरक यावेळी कमी केला हे आवडले.
कोणी नेफीवरची FISK पाहत का
कोणी नेफीवरची FISK पाहत का इथे ? नवीन तिसरा सीजन आला आहे. ज्यांना ऑफिस TV शो आवडला होता त्यांना आवडेल कदाचित.
कोणी युटूब वरची 'Metro Park' पाहत का? मला जाम आवडत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या गुजराती कुटुंबावर आहे. हिंदीमध्ये आहे.
नेफीवरची FISK >>> मी पाहिलेत
नेफीवरची FISK >>> मी पाहिलेत २ सीझन्स . मला सार्कॅजम आणि डार्क कॉमेडी आवडतात त्यामुळे हे आवडले होते.
आत्ता नविन सीझन आलाय का? मला वाटले आधीच ३ होते.
इथे 'सारे जहॉ से अच्छा!' वर
इथे 'सारे जहॉ से अच्छा!' वर चर्चा झाली का?
चांगली वाटली. भारत आणि पाकिस्तान न्युक्लिअर रेस बद्दल आहे. मी शेवटचा भाग नाही बघितला. पण जे बघितलं ते आवडलं.
आत्ता नविन सीझन आलाय का? मला
आत्ता नविन सीझन आलाय का? मला वाटले आधीच ३ होते. >>>> भारतात तरी काल तिसरा सीजन रिलीज केलाय त्यांनी. दोन एपिसोड पाहिले. छान आहेत.
यावेळी कपिल शर्मा शो मध्ये
यावेळी कपिल शर्मा शो मध्ये सुनील ग्रोव्हर ने साकारलेले गुलझारसाब जबरदस्त होते.
स्टॅंडिंग ओवेशन परफॉर्मन्स होता.
तो ओव्हर ऑल एपिसोड सुद्धा खूप चांगला होता.
बाकी तो सुनील ग्रोव्हर कमाल आहे! कॉमेडीमध्ये त्याचा जो अभिनय, जी वेगवेगळी बेरिंग असते.. फारच उच्च दर्जाचा कलाकार आहे.
अंधेरा पाहिलीय का कुणी ? काय
अंधेरा पाहिलीय का कुणी ? काय रेको द्याल ?
अन्धेरा पाहून झाली. पहिले ४-५
अन्धेरा पाहून झाली. पहिले ४-५ भाग चांगली वाटली,
.
.
.
.
स्पॉयलर
.
.
.
अंधेरा म्हणजे खरं तर डीप्रेशन, फार्मा कंपनीचे इल्लीगल ट्रायल्स असे काहीसे कथानक वाटले आधी पण नंतर फार कै च्या कै भरकटली. तो ट्रॅक सुपरनॅचरल कडे नेला ते अजिबात झेपले नाही.
.
.
>>> अंधेरा म्हणजे खरं तर
>>> अंधेरा म्हणजे खरं तर डीप्रेशन, फार्मा कंपनीचे इल्लीगल ट्रायल्स असे काहीसे कथानक वाटले आधी पण नंतर फार कै च्या कै भरकटली
) देऊन ठेवली आहे.
हो, त्यात पुढच्या सीझनची नॉट-सो-सटल हिंट (धमकीच म्हणायला हवं
फिस्क थोडी पाहिली आहे. मजेदार
फिस्क थोडी पाहिली आहे. मजेदार वाटली होती. मेट्रो पार्कचा बहुधा पहिला भाग थोडा पाहिला होता. तीच सिरीज का नक्की लक्षात नाही. इमिग्रण्ट कुटुंब अमेरिकेत नव्याने येते वगैरे होते.
इमिग्रण्ट कुटुंब अमेरिकेत
इमिग्रण्ट कुटुंब अमेरिकेत नव्याने येते वगैरे होते. >> ती वेगळी, प्रदीप्स ऑफ पिट्स्बर्ग म्हणतो आहेस का? त्यात ती कॉमेडियन सिंधू व्ही आहे.
मेट्रो पार्क मधे नव्याने आलेले इमिग्रन्ट्स नाहीत. अमेरिकत सेटल्ड देसी फॅमिलीज चे स्टोरिओटाइप्स अशीच थीम आहे पण.
फिस्क भारी आहे ! नवीन सिझन
फिस्क भारी आहे ! नवीन सिझन बघायची उत्सुकता आहे.
'इमिली इन पॅरिस'चा नवा सिझन डिसेंबरमध्ये येणार म्हणे.
'माय लाईफ विथ वॉल्टर बॉईज' नावाची एक 'सिली' मालिका आहे. त्याचा पण दुसरा सिझन येणारे.. पहिल्याचा पहिला भाग मी उगीच पाहिला आणि मग पूर्ण सिझनच बघितला..
पंचायत सिझन ४ नाही आवडला. त्या मालिकेचा जॉनराच चेंज झाला असं वाटला ह्या सिझनमध्ये.
ती वेगळी, प्रदीप्स ऑफ
ती वेगळी, प्रदीप्स ऑफ पिट्स्बर्ग म्हणतो आहेस का? >>> हो हो आठवले - बरोबर, तीच. आणि हे ही आठवले की मेट्रो पार्कही थोडी पाहिली आहे
'माय लाईफ विथ वॉल्टर बॉईज' नावाची एक 'सिली' मालिका आहे. त्याचा पण दुसरा सिझन येणारे.. पहिल्याचा पहिला भाग मी उगीच पाहिला आणि मग पूर्ण सिझनच बघितला >>> पराग - एंगेजिंग आहे का? नेफिवर की कोठेतरी समोर येत आहे सारखी.
Your Friends and Neighbors
Your Friends and Neighbors
apple वरच्या सगळ्या ओरिजिनल सिरीज फाउंडेशन सोडल्यास चांगल्या आहेत. टेड लासो सगळ्यात बेस्ट आहे पण इतर देखील चांगल्या आहेत. त्यांचा कोडा चित्रपटही चांगला आहे. म्हणजे apple पॉलिश असलेला rounded कॉर्नरचा गरीबपट, तरीही चांगला वाटतो.
मित्रहो disney plus वरची
मित्रहो disney plus वरची कोणती सिरीज छान आह?
स्टार वॉर्स सर्व पाहिले.
FX ची bear ही एक जबराट सिरीज पण पाहिली.
अजून कोणत्या असतील तर सांगावे.
पंचायत 4 बघायची आहे.
पंचायत 4 बघायची आहे.
FX ची bear ही एक जबराट सिरीज
FX ची bear ही एक जबराट सिरीज पण पाहिली
>>> बेअर चांगली आहे का? वेगळा विषय म्हणून मी बघायला सुरुवात केली होती. १-२ एपिसोड्स पाहिले, बहुतेक एकच पाहिलाय, पण पुढे बघितली गेली नाही, खरं.
पण ती अजून विश-लिस्टीतून काढून टाकाविशीही वाटलेली नाही.
बेअर मला खुपच आवडली . सुपर्ब
बेअर मला खुपच आवडली . सुपर्ब acting. एकन्दरीतच खूप मस्त.
>>यावेळी कपिल शर्मा शो मध्ये
>>यावेळी कपिल शर्मा शो मध्ये सुनील ग्रोव्हर ने साकारलेले गुलझारसाब जबरदस्त होते.
अनुमोदन. मस्तच केलाय त्याने फुल्जार
सुनील ग्रोव्हर अमेझिंग आहे. तो अगदी कौन बनेगा चंपू चे छोटे एपिसोड्स करत असल्यापासून त्याला फॉलो करतोय.
Pages