Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जागू, जोरदार पुनरागमन! ते
जागू, जोरदार पुनरागमन! ते पांढरे कृष्णकमळ आणि जांभळी जास्वंद, दोन्ही दुर्मिळ प्रकार !
Water lily/कुमुद
Water lily/कुमुद

कुमुदिनी
कुमुद / कुमुदिनी = 👌
नभ उतरू आलं ….
नभ उतरू आलं ….
मित्राच्या farm house मधून दिसणारा नजारा.

आता विकांतीचे दोन दिवस इथेच - पाऊस नाही आला तरी ठीक, आला तर त्याहून ठीक.
कुमुद सुंदरच!
कुमुद सुंदरच!
काय रमणीय देखावा आहे, अनिंद्य! दोन दिवस इथे राहणार असाल तर मजा आहे न काय
(No subject)
कुमुद / कुमुदिनी -
कुमुद / कुमुदिनी -
कुमुदिनी हे वेगळे फुल आहे. कमळाच्या तळ्यात अगदी लहान पांढरी पाणफुले येतात त्याला कुमुदिनी म्हणतात असे वाचलेय. कुमुदिनी पाहिलीत सुद्धा.
कुडाळातील पाट परुळे गावातल्या तलावाचा एक विडिओ सहा सात वर्षांपुर्वी खुप फेमस झाला होता. आम्ही मुद्दाम तो तलाव पाहायला गेलो होतो. तो तलाव कुमुदिनी फुलांनी भरला होता.
ऋतुराज - कंफर्म करा हो. माझ्या डोक्यातले वायरिंग कधी कधी बिघडते आणि वडाची साल वांग्याला लावली जाते
श्रद्धा नेकलेस मस्त आहे.
श्रद्धा नेकलेस मस्त आहे.
तू म्हणतेस म्हणजे तसेच असेल
तू म्हणतेस म्हणजे तसेच असेल साधना. फोटो मिळाला कधी तर टाक कुमुदिनीचा.
कुमुद आणि कुमुदिनी फरक स्पष्ट
कुमुद आणि कुमुदिनी फरक स्पष्ट करणारे फोटो बघायला आवडेल. 👍
रंग माझा वेगळा
रंग माझा वेगळा
ह्या रंगछटेची फुले मला फक्त दोनदा दिसलीत, पैकी एकदा हा फोटो काढला.
छान गुलाबी रंग आहे. या फुलाचे
छान गुलाबी रंग आहे. या फुलाचे नाव विसरले मी. याची चपट्या वाटाण्याच्या शेंगासारखी फळे खायला खूप पोपट येतात. त्यांच्या तापावर / पोटदुखीवर उपाय म्हणून खातात . माझ्याकडे फोटो होता काढलेला पोपट शेंगा खातानाचा. शोधायला पाहिजे.
छान फोटो.. ह्यांना आम्ही
छान फोटो.. ह्यांना आम्ही शंकासूर किंवा रासतुरा म्हणतो.
शंकासूर म्हणतो आम्हीही.
शंकासूर म्हणतो आम्हीही.
लाल फुले असतात मोस्टली, अशी गडद गुलाबी मलातरी दिसली नाहीत फार.
संकेश्वर म्हणतो आम्ही, सातारा
संकेश्वर म्हणतो आम्ही, सातारा सांगली भागात.
काय सुंदर रंग आहे संकासुराचा!
काय सुंदर रंग आहे संकासुराचा! याला राजतुरा नाव पण ऐकलं आहे.
या रंगाला काय म्हणतात मराठीत? शेडकार्डवर पंच कलरशी जवळचा वाटतोय.
या रंगाला काय म्हणतात ? …
या रंगाला काय म्हणतात ? …
गुलबक्षी रंग ? Not sure.
गुलाबी शंकासूर मस्तच. अनिंद्य
गुलाबी शंकासूर मस्तच. अनिंद्य, तुमच्यामुळे शंकासूराची ही अनोखी छटा बघायला मिळालॉ.
मस्त आहे.
मस्त आहे.
अहाहा ....
अहाहा ....
किती सुंदर फोटो आणि पोस्ट.
कसे आहात निगकर?
माझा सगळ्यात आवडता धागा मी कसा मिसला
अनिंद्य, सर्वरंगी उंबर एकच फोटोत मस्तच.
स्निग्धा, तुमच्याकडचा पाहुणा आवडला.
प्रत्येक नक्षत्राचा एक नक्षत्रवृक्ष असतो. माहीम निसर्ग उद्यान येथे नक्षत्र उद्यान आहे. चांगल मेन्टेन आहे.
शरदिनी डहाणूकर यावर लोकप्रभेत लिहित. त्यावर बरीच पुस्तके आहेत. राशी वृक्ष, आराध्य वृक्ष इत्यादी.
माधव, अडेनियम आवडले. सुंदर. पिवळ्या रंगाचे खास करून. मला द्या याच्या बिया.
जागुताई, एकदांडीच्या फुलांची वेणी मस्तच. रेल्वे ट्रॅकवर माजली आहेत ही फुले.
जांभळी जास्वंद रंग एकदम तजेलदार.
श्रद्धा, नीरा नदीचा नेकलेस व्ह्यू मस्तच.
कुमुद/ कुमुदिनी
हा सगळा घोळ आपल्या साहित्यात घालून ठेवला आहे.
वॉटर लिली म्हणजे सगळ्या Nymphaea स्पेसिस त्यांना कुमुद/ कुमुदिनी म्हटले जाते. काही जण यांनाच कमळ म्हणतात पण अस्सल कमळ/ पद्म म्हणजे Nelumbo स्पेसिस.
कुमुद
Nymphoides indica
कास पठारावर फक्त या फुलांनी भरलेले एक तळे आहे.
मध्यभागी पिवळसर आणि बारीक पांढऱ्या पाकळ्यांना केसाळ झालर.
कुमुदिनी
Nymphoides hydrophylla
त्याच तळ्यात आणखी एक बारीक पाकळ्यांची जात आढळते पण याच्या पाकळ्यांना केसाळ झालर नसते.
कुमुद/ कुमुदिनी दोन्ही वॉटर लिली प्रकारात मोडतात.
शंकासुर मस्त याला Peacock Flower पण म्हणतात.
भगवा, पिवळा आणि तुमच्या फोटोत असणारा गुलाबी रंग. हा रंग जरा विरळा.
ह्याची झुडपे कंपाऊंडला लावायला मस्त. हायवेवर divider वर लावलेली असतात.
हायवेवर divider वर लावलेली
हायवेवर divider वर लावलेली असतात.…
होय. फुलांचा रंग लाल-पिवळा असलेली 👍
कुमुद-कुमुदिनी स्पष्टीकरणाबद्दल आभार.
ऋतुराज, धन्यवाद. मी सुदैवाने
ऋतुराज, धन्यवाद. मी सुदैवाने कमळ, लिली, कुमुद व कुमुदिनी चारही पाहिल्यात.
.
.
मंडळी नमस्कार, मागच्या पानावर सांगितलं होतं ते माझ्या ताईकडच लाल कृष्णकमळ
ऋतुराज, छान माहिती दिली आहे.
ऋतुराज, छान माहिती दिली आहे.
आठवले, आम्हीपण संकेश्वर म्हणतो गुलाबी फुलाच्या झाडाला .
स्निग्धा खूप सुंदर रंग आणि फुल.
लाल कृष्णकमळ
लाल कृष्णकमळ = 👌
याचं रोप किती मोठं होतं ? म्हणजे कुंडीत लावलेल्या रोपाला फुले येतात का ?
स्निग्धा, हा जरा वेगळा रंग
स्निग्धा, हा जरा वेगळा रंग आहे. सुंदर.
हा घ्या लाल कृष्णकमळ झब्बू...
ठाण्याच्या दत्ताजी साळवी
ठाण्याच्या दत्ताजी साळवी उद्यानात सहा रंगांची कृष्ण कमळे होती. आता माहीत नाही.
गेल्या आठवड्यात आमच्याकडे
गेल्या आठवड्यात आमच्याकडे फुललेले (खोटे) ब्रह्म कमळ

कृष्ण काय ब्रह्म काय...
कृष्ण काय ब्रह्म काय... कमळांची लयलूट आहे इथे. मस्त!!!
ऋतुराज, हे माझ्याकडून.
ऋतुराज, हे माझ्याकडून. गेल्या आठवडय़ात एकदम 5 फुलं फुलली होती. तुमच्या कृष्णकमळाचा रंग जास्त गडद आहे आणि रचना थोडी वेगळी आहे.
अनिंद्य, कृष्णकमळची वेल असते आणि कुंडीत सहज वाढते. हा फोटो कुंडीतल्या वेलीवरच्या फुलांचाच आहे
आणि ही लिलीबाई
Pages