Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वा वा
वा वा
इथली अमल कमलदले बघून सुखावलो
नेत्रसुखद सर्व फोटो. माझं
नेत्रसुखद सर्व फोटो. माझं नेहेमीचे वाक्य झालंय हे.
पांढ-या लिलीबाई चे पिवळे
पांढ-या लिलीबाई चे पिवळे परागकण काय सुंदर दिसतायेत
ऋतूराज
लाल कृष्ण कमळ चे बी जगते का मी उटी हून आणले होते पण जगलेच नाही
सावित्रीच्या लेकी,
सावित्रीच्या लेकी,
नाही रुजत बिया. फक्त निळ्याच्या रुजतात असा माझा अनुभव. पण बोटभर जाडीची फांदी जगते.
@ जागुतै
तुमच्याकडे आहे का लाल कृष्ण कमळ?
(No subject)
गृहसंकुलातल्या बागेत उमललेली श्वेत सुमने
कमळाबाई आणि लिलीताई सगळ्या
कमळाबाई आणि लिलीताई सगळ्या नटून थटून आल्या आहेत - कृष्णकमळ, ब्रह्मकमळ, पांढरी लिली, स्पायडर लिली, एक से एक आहेत.
अनिंद्य,
अनिंद्य,
Spider Lily मस्त आहे.
याचा जो पिवळा परागकोश आहे तो त्याच्या देठाला बॉल पेनच्या टोकाला तो बॉल जसा जोडलेला असतो त्याप्रमाणे जोडलेला असतो त्यामुळे ज्या दिशेने हवा येईल तिकडे तो झुकतो. Effective pollination.
It's called versatile anther.
त्यातल्या मधल्या पाढऱ्यां पाकळीला कोरोना म्हणतात.
स्पायडर लिली खूप आहेत
स्पायडर लिली खूप आहेत आमच्याकडे. त्यांच्या pollination च्या माहितीबद्दल आभार @ ऋतुराज
# एक चाफा एकटा
# एक चाफा एकटा
ऋतु, छान माहिती.
ऋतु, छान माहिती.
अनिंद्य, स्पायडर लिली आणि चाफा मस्त.
मस्त फोटो सर्वच.
मस्त फोटो सर्वच.
काल खाली जाऊन आंब्याचे एक रोप लावून आले. मी लावलेले जांब झाड मोठं झालंय, पण ते शेजारच्या फणसाच्या झाडात गुंतून, वरती फांदी वाकली, फणस रोप छोटं होतं, मी फणस आहे ओळखलं नव्हतं (ते मी नव्हतं लावलं) थोड्या अंतरावर लावलं जांब रोप. फणस जास्त जोमाने वाढून वृक्ष झालाय, जांब बिचारे झाकोळले. मी वरची वाकलेली फांदी फणसापासून मोकळी केली, ती कापली, परत जमिनीत लावली. मूळ जांब आता नीट वाढूदे.
@ rmd, थँक्यू
@ rmd, थँक्यू
… रोप जोमाने वाढून वृक्ष झालाय… 👌
आपण लावलेल्या रोपाचा वृक्ष झालेला बघण्यासारखे सुख दुसरे नाही.
ते फणसाच्या झाडाबद्दल लिहिलं,
ते फणसाच्या झाडाबद्दल लिहिलं, ते मी नाही लावलं पण मला रोप ओळखता आलं नाही त्याचं, नाहीतर मी जांब रोप अजून लांब लावलं असतं. मी लावलेले जांब सरळ वाढत होतं पण नंतर ते फणसाच्या फांदीत अडकले, बहुतेक जोरदार वाऱ्यामुळे असेल.
मी कोंब फुटलेल्या काही आठळ्या अशाच फेकलेल्या, पण तिथे नव्हत्या फेकल्या, दुसऱ्या काही ठिकाणी पण त्या रुजल्या नसाव्यात.
बालफणसाची पाने सुंदर डिजायनर
बालफणसाची पाने सुंदर डिजायनर असतात. फणस मोठा झाला की पाने सगळ्या वाढलेल्या माणसांसारखी बोअर होतात आणि दिसतात.
स्पायडर लिलीला बियांसारखे काहीतरी लागते. त्यांच्या रुजणार्या बिया होतात का? मी कायम हिरव्याच पाहिल्यात.
तुमच्याकडे आहे का लाल कृष्ण
तुमच्याकडे आहे का लाल कृष्ण कमळ?>>>>>
लाल कृष्ण कमळ

खायचे पॅशन फ्रुट सोडुन,
खायचे पॅशन फ्रुट सोडुन, (ज्याचे फुल पांढरे असते), इतर कोणाला फळे लागत नाहीत असे वाचले होते. पण मी आणलेल्या एका कृष्णच असलेल्या शोभेच्या कृष्णकमळाला दोन सुंदर फळे लागली होती.
मला भरपुर वाट पाहायला लावुन ते पिकले व मी सरबत करुन प्यायले. पुढच्या पावसाळ्यात ते गेले.
कधी वाटते फळवाले कृष्णकमळ आणावे पण माबोवरचा लेख आठवतो आणि बेत रद्द होतो
आंबोलीत झाडे टिकवायची हे माझ्यासारख्या आळश्याचे काम नाही. पावसाळ्यात टिकत नाहीत. मी यंदा माझा दोन्ही बाजुचा व्हरांडा फायबर पत्रे लाऊन बंद करुन घेतलाय. १५ दिवस बाहेर उघड्यावर राहुन नुसत्या काड्या राहिलेल्या गुलाबणीला त्यामुळे परत पाने फुटलीत. पुढच्या वर्षी मे मध्येच पत्रे लाऊन घ्यायला हवेत.
पावसाचा मार चुकवण्यसाठी आंबोलीत पावसाळ्यात भिंती खिडक्या दारे यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. माझ्या लहानपणी म्हणजे ५० वर्षांपुर्वी बहुतेकाण्ची मातीची घरे होती. मे च्या पहिल्या दुसर्या आठवड्यात घरे शाकारणे व झापे लावणे या कामांना खुप गती यायची. बहुतेक सगळ्यांचे घरावर नळे असायचे, ते साफ करायचे आणि घराच्या चारी बाजुंना, ते नाही जमले तर निदान पाउस झोडतो-मारतो त्या बाजुंना तरी नारळाच्या झावळ्या बांधत. कसले सुरेख डिझाईन असायचे ते. आंबोलीत नारळ नाहीत त्यामुळे खालुन कोकणातुन झावळ्या आणायच्या, विणायच्या आणि बांधायच्या हे काम असायचे. काही लोक गवताच्या झावळ्या विणायचे. त्यासाठी वेगळे लांब गवत लागते, नाव विसरले. लालसर तांब्याच्या रंगाचे गवत असते, तांबेट का कायतरी म्हणतात. लोकांचे तेव्हा गोठे होते. गोठ्यांची छपरे तर ह्याच गवताची असायची. गवताची झापे लावलेली ही कौलारु बुटकी घरे कसली रम्य बहारदार दिसायची.
_आता सगळ्यांनी चिरे वापरुन घरे बांधलीत त्यामुळे भिंतींना
संरक्षणाची गरज पडत नाही. पण व्हरांडा असेल तर त्याला व दरवाजे खिडक्या यांना मात्र आजही संभाळावे लागते. व्हरांद्यातुन आत पाणी येते. माझी फ्रेंच विंडो व दोन साध्या खिडक्या ह्या मार्याने गंजुन कामातुन गेल्या. यंदा बदलाव्या लागल्या. दहा बारा वर्षे घर राहते नव्हते त्यामुळे ते शाकारले गेले नाही.
आता सगळेजण प्लास्टिक वापरतात. नारळी झावळ्या गेल्या. मी दोन वर्षे प्लॅस्टिक वापरले. पण माझ्या आजुबाजुला घरे नसल्यामुळे वारा भयंकर जोरात असतो, त्याने प्लॅस्टिक फाटुन जायचे. म्हणुन आता पत्रे वापरते. पावसाळ्यानंतर काढायचे आणि निट ठेऊन द्यायचे, पुढल्या वर्षासाठी.
आंबोलीतील पाऊस भारी आहे. पर्यटक झुंबड उडवतात पण आम्ही तो कधी जातोय याची वाट पाहात पाच महिने कसेतरी काढतो. जुन पासुन नॉन स्टोप सुरु आहे.
@ साधना
@ साधना
आंबोलीतील पाऊस झाडे टिकू देत नाही म्हणता पण परिसर तर (फोटो-व्हिडियोत तरी) हिरवाकंच दिसतो. मग नैसर्गिकरित्या तिकडे कोणती झाडे उगवतात - टिकतात ?
जस्ट क्यूरियस
नैसर्गिकरित्या भरपुर जंगली
नैसर्गिकरित्या भरपुर जंगली झाडे आहेत. वेस्टर्न घाट बायोडायवर्सिटीचे आंबोली एक महत्वाचे केंद्र आहे. अंजनी हे एक महत्वाचे झाड, जे मला ओळखता येते. कुसुम आहे आणि अजुन खुप खुप ज्यांची नावे मला माहित नाहीत. महावेलीही खुप आहेत. ती पाच फुट लांब शेंग व चॉकलेटी बी असणारी महावेलही आहे.
गावात रस्त्यांवर व इतरत्र ढिगांनी अंजनी, जांभुळ (अगदी
बारिक ते १ इण्ची पर्यंत) , जंगली जाम, अष्ट (पिंपळासारखी पाने पण पिंपळ नाही), पेरु, निर्गुंडी, कढीपत्याचे वृक्ष, बहावा इत्यादी दिसतात. पेरु तर पावलापावलावर आहेत. उन्हाळ्यात इतके पेरु लागतात की झाडांखाली खच पडतो. शिकेकाई व कोकम पण भरपुर. हिरडे व बेहडे भरपुर आहेत पण आवळे कमी व झुडपासारखे आहेत, आवळ्याला सहसा इथे फळ लागलेले पाहिले नाही. वारस पण पाहिलाय.
वड पिंपळ आंबा औषधालाही नाही. तुरळक फणस आहेत. १५ किमी लांब रुंद गावात एखादा फळ न लागणारा आंबा चुकुन सापडेलही पण माड्/नारळ एकही नाही. कित्येकांनी प्रयत्न करुन रोपे फुकट घालवली. भेरले माड मात्र भरपुर आहेत. हे कसे काय माहित नाही. दोन्ही पामच पण एक अजिबात रुजत नाही आणि एक जागोजागी दिसतो. कडुनिंब तर कोकणात दुर्मिळच, आंबोलीत कुठुन येणार.
पण आपण हे सगळे अंगणात लावत नाही ना. तिथे गुलाब चाफा मोगरा जास्वंद अबोली वगैरे लावतो.
मी मुंबईहुन माझा तिथला खजिना आणला होता. तो सगळा जरी गेला तरी आश्चर्य म्हणजे रायटिया रिलिगिओसा या झाडाला आंबोली प्रचंड आवडली. मी त्याला जमिनीत लावले आणि तो चक्क चार पावसाळे तगला. पानेही झडत नाहीत. पण त्याला खालुन फुटवे आले नाहीत. कुंडीत असताना फुटवा आलेला. रानजाईला पण खुप आवडले इथे. पण या वर्षी माझ्या दुर्लक्षामुळे ती गेली. अबोली कशीबशी तग धरते. फ्रंजिपानी चाफा लावलेला त्याने तर पावसाच्या पहिल्या महिन्यातच हाय खाल्ली. मलबेरी उर्फ तुती खुप भराभर वाढते. ती आहे अंगणात. मुंबईहुन दोन बहावे आणले होते त्यातला अंगणातला गेला पण शेतात लावलेला आहे. लिंबु टिकतात. कुंडीत वाढलेला शेतात लावलाय, तो सुरेख वाढतोय. इथे अंगणात दोन आहेत. ते
बिचारे उन्हाळ्यात चार पावले चालतात आणि पावसाळ्यात तिन पावले मागे येतात. बेचक्याबेचक्यात फुले येणारी बोगनवेल मुंबईहुन आणलेली, तिचेही तसेच आहे. पण तीच शेजार्यांकडे
मात्र जरा बरी वाढतेय. माझ्या अंगणात भर म्हणुन दगड टाकुन वर माती टाकलीय. बहुतेक खाली मुळाला दगड लागला तर झाड मरत असावे. दोन बहावे आपोआप बिया पडुन आले होते. त्यातला एक सात फुट वाढुन अचानक गेला. दुसरा आहे.
इथे लोकल झाडे पावसात टिकतात, बाहेरुन आणलेली टिकत नाहीत हे निरिक्षण. लालभडक गावठी गुलाब सगळ्यांच्या अंगणात आहेत. ते टिकतात आणि कलमे राम म्हणतात
पेरु बॉलसारखे गोल गरगरीत एक इन्ची आणि आतुन गुलाबी लाल, तेही स्किनपासुनच असे आहेत. पण बिया खुप असतात. शेतात एक झाड आहे त्याला मात्र क्रिकेट बॉल इतके मोठे लागतात. गेल्या आठवड्यात दोन तयार होत होते, जरा कडक होते म्हणुन मी तोडले नाही आणि दोन दिवसात दोन्ही फुटुन खाली पडले होते.
जीव हळहळला पण जाउदे, पक्ष्यांना या दिवसात काय खायला मिळणार. मी त्यांचे पेरुही खाल्ले तर कसे होणार असा विचार केला. त्या पेरुची मी गुटी कलमे बांधणार इतका भारी पेरु आहे. आंबोलीत पांढरे पेरु नाहीतच, सगळे गुलाबी व चविष्ट.
थँक्यू विस्तृत प्रतिसादाबद्दल
थँक्यू विस्तृत प्रतिसादाबद्दल. पेरूंबद्दल वाचून हेवा वाटला.
साधना, दोन्ही पोस्ट्स छान
साधना, दोन्ही पोस्ट्स छान आहेत. फर्स्ट हँड माहिती.
आज बाल्कनीतून Swinhoe's white
आज बाल्कनीतून Swinhoe's white eye ( चष्मेवाला ) पक्षी आणि त्याची पिल्लं दिसली. पिल्लांना भरवतानाचा त्याचा छोटासा व्हिडिओ/शॉर्ट घेतला आहे त्याची लिंक -
https://youtube.com/shorts/F_QH-hAvTzs?si=MJaMwL0Tjq3h_An8
सुप्रभात निगकर
सुप्रभात निगकर
# एक चाफा एकटा >>>> एकटा कुठे तुम्ही आहात की
आपण लावलेल्या रोपाचा वृक्ष झालेला बघण्यासारखे सुख दुसरे नाही.>>> खरच.
साधनाताई,
तुम्हाला कामाचा चांगलाच उरक आहे.
एकदा यायचे आहे आंबोलीला. आता बऱ्याच ट्रेल असतात. पावसाळी. Amphibian and Reptile trails.
Malabar Gliding Frog मुख्य आकर्षण.
मस्त माहिती दिलीत झाडांची.
महावेलीही खुप आहेत. ती पाच फुट लांब शेंग व चॉकलेटी बी असणारी महावेलही आहे.>>>>> गारंबी (Entada) का?
त्याच्या बिया आहेत माझ्याकडे. त्या रुजवण महाकठीण.
आज बाल्कनीतून Swinhoe's white eye ( चष्मेवाला ) पक्षी आणि त्याची पिल्लं दिसली. >>>> rmd, कसला गोड व्हिडिओ आहे. खूप भारी. चष्मेवाल्याची पिल्ले पहिल्यांदा पाहिली.
Amphibian and Reptile trails.
Amphibian and Reptile trails.
Malabar Gliding Frog मुख्य आकर्षण>>>>
आज रात्री जातेय. आजवर गेले नाही जळवांच्या भितीने. या सिजनमध्ये अद्याप स्वतःला वाचवलेले आहे. रात्री बघु काय होते
ग्यायडिंग फ्रॉग व्हिसलिंग वुड्सच्या दारात होते तिथे भरपुर पाहिले होते. कार्टुन दिसतात अगदी.
आंबोलीला या नक्की, ज्यांना जमते त्यां सगळ्यांनी या. या दिवसात स्वर्ग अवतरलाय.
कुमुदमाझ्याकडे फोटो आहे
कुमुदमाझ्याकडे फोटो आहे
चेक करतो आणि टाकतो
इथे फार छान फोटो आणि माहिती मिळते
हेच कुमुद का ऋतुराज?
हेच कुमुद का ऋतुराज?
2011 साली गेलो होतो
तेव्हाचा फोटो
इतके फोटो काढलेले की कॅमेरा बॅटरी संपली होती
हा फोटो बॅटरी मरताना काढलेला त्यामुळे झूम करून काढता येत नव्हता.
लेन्स झूम करताना कॅमेरा मान टाकत होता.
त्यावेळी ही फार शिल्लक नव्हती फुलं.
कमी होती.
त्या तळ्यातच आहे.
साधनाताई , छान सविस्तर लिहिलं
साधनाताई , छान सविस्तर लिहिलं आहे.
आज घरी येतांना एका ठिकाणी जॅकरांदाला नवीन पालवी आणि चक्क फुलं दिसली.
साधना अगदी चित्रदर्शी वर्णन
साधना अगदी चित्रदर्शी वर्णन दोन्ही पोस्टमध्ये.
Swinhoe's white eye (
Swinhoe's white eye ( चष्मेवाला ) पक्षी + बेबीज्
= 😍
झकासराव,
झकासराव,
हो हेच कुमुद.
तुमच्या पिंचि जवळ डूडूळगाव आहे.
तिथे सतीश गदिया म्हणून एक अवलिया आहेत. त्यांनी भारतातील नव्हे कदाचित जगातील सर्व कमळ आणि वॉटर लिलींचे सुंदर उद्यान बनवले आहे. मी आणि मायबोलीकर जिप्सी कितीतरी दिवसांपासून तो बेत आखत आहोत. तुम्ही कधी जमल्यास जाऊन या.
स्निग्धा, आता फुले? लेट करंट असेल.
असंही जॅकरांदा पुण्यात फुलतो. मुंबईत मोजून दोन तीन झाडे पाहिली आहेत. दमट वातावरण मानवत नाही त्याला.
मी आणि मायबोलीकर जिप्सी
मी आणि मायबोलीकर जिप्सी कितीतरी दिवसांपासून तो बेत आखत आहोत. >>>>
हाहा… मी २०१७ला जाऊन आले. तेव्हा नुसती कमळे होती. आणि खुप मोठे प्लॅन होते. आता त्याचे ते मोठे प्लॅन प्रत्यक्षात उतरलेत.
त्याची स्टोरी सांगितली त्याने. बोबडा बोलतो पण येडा एकदम. ध्यास घेतलेले लोक असेच असतात म्हणा.
Pages