Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मोठा करमळ.
मोठा करमळ.
Elephant apple.
याच्या लोणच्याच्या रेसिपी पहा .
मुंबईत आहेत काही झाडे. राणी बागेत आहे.
याचे फुल खूप मोठे असते
याचे फुल खूप मोठे असते>>>
याचे फुल खूप मोठे असते>>>
आणि खुप सुंदर…..
बिचारे ब्रिटिश फळांच्या बाबतीत कायम उपेक्षित. अॅपल सोडुन इतर कोणतेही फळ त्यांनी ऐकलेही नाही. त्यामुळे इतर फळे नजरेला पडल्यावर नाव काय द्यायचे सुचेना. मग कस्टर्ड अॅपल, पाईन अॅपल, एलेफंट अॅपल वगैरेचा जन्म झाला..
हो ऋतुराज
हो ऋतुराज
मोठी करमळ
ह्याच्या फुलाविषयी दिनेशदानी सांगितले होते
ते जेव्हा फुलले असे कळल्यावर मी कोल्हापूर मधील मित्राला सांगून त्याच्याही मित्राकरवी फोटो मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा डिजिटल कॅमेरे आता सारखे नव्हते.
माझ्याकडे ज्यावेळी कॅमेरा आला तेव्हा कोपुत गेल्यावर आवर्जून ते झाड शोधून ह्या फळाचा फोटो मिळाला.
झकासराव करमळ मस्तच
झकासराव करमळ मस्तच
काल फुललेली कॅकटस ची फुले ज्याला सगळे ब्रह्मकमळ नावाने ओळखतात

शेंदरी
शेंदरी

मे -जून मधे triplets झालेले
मे -जून मधे triplets झालेले बुलबुल आई-बाबा बरेच दिवस रेंगाळले. मग पिल्ले मोठी होउन training sessions वगैरे झाले आणि ते कुटुंब उडून गेले.
मागच्या आठवड्यात यावर्षीचे दुसरे बुलबुल बाळांतपण सुद्धा नीट पार पडून आई-बाबा आणि दोन्ही बेबीज् सकुशल उडून गेल्या.
दणदणीत celebration चा मूड होता घरात. आता थोडे दिवस झाले तरी अजून टेरेस सुनी वाटते आहे.
# Songs of Hunger
# My Terrace
# My Random Clicks
सुप्रभात
सुप्रभात
खोटी ब्रह्मकमळे आणि शेंदरी मस्तच...
अनिंद्य,
दोन्ही बाळंतपणे सुखरूप पार पडली वाचून छान वाटले.
# Songs of Hunger>>>> so cute
सगळ्या गप्पा फोटो मस्त...
सगळ्या गप्पा फोटो मस्त... अनिंद्य, सगळं सुखरूप पार पडलं म्हणून सेलिब्रेशनचा मूड हे अगदीच समजू शकते. जीवो जीवस्य जीवनम् हे माहित असलं तरी पचवणं कठीण जातं. फोटो छान आलाय.
ब्रह्मकमळ आणि शेंदरी ही मस्त फोटो.
काल मुलाचा मुलगा गॅलरीत बसून वेफर्स खात होता. मी पण तिथेच होते. तेवढ्यात एक कावळा आला आणि ग्रिल वर बसला म्हणून एक वेफर त्याला ही घातला. त्याने चोचीत पकडला आणि समोरच्या पत्र्यावर जाऊन बसला. कुडूम कुडूम खायला कावळ्यांना फार आवडत पण तरी न खाता चोचीत खूप वेळ धरून होता. मग त्याने पावसाच्या पाण्यात तो वेफर बुडवला आणि मऊ करून खायला सुरुवात केली.
सगळं खाऊन झाल्यावर काव काव करायला लागला मला वाटलं आणखी मागतोय असं पण तेवढ्यात एक कावळा त्याच्याजवळ आला. स्वतः न खाता आपल्या गालात आणि गळ्यात धरून ठेवलेला तो मऊ वेफर सगळा त्याच्या पिल्लाला भरवला. वेफरचा लगदा पिल्लाच्या चोचीत जाताना आम्ही बघितला. भरवून झाल्यावर दोघे ही उडून गेले. पिल्लू तसं उडू शकत होत. हे त्याचं पिल्लू आहे हे त्याने वेफर भरवल्यामुळे समजलं नाहीतर नॉर्मल कावळा वाटला असता एवढं मोठ पिल्लू होतं. एकदा उडायला शिकल्यावर पिल्लाकडे बघत नसतील कावळे असा माझा समज होता पण काल वेगळच बघायला मिळालं.
वा गं मस्तच दृष्य पाहायला
वा गं मस्तच दृष्य पाहायला मिळालं.. नातवाला ते दिसलं हे जास्त महत्वाचं. नाहीतर असले काही त्यांना फक्त नॅ जॉ मध्येच दिसातचे.
नातवाला ते दिसलं हे जास्त
नातवाला ते दिसलं हे जास्त महत्वाचं. नाहीतर असले काही त्यांना फक्त नॅ जॉ मध्येच दिसातचे. >> हो ना, त्याला पण खूप मजा वाटली. आई ऑफिसमधून घरी आल्यावर अगदी रंगवून रंगवून तिला पण ही गोष्ट सांगितली.
ऋतुराज, मनीमोहोर थँक्यू !
ऋतुराज, मनीमोहोर
थँक्यू !
पक्ष्यांनी त्यांच्या लहानग्यांना भरवण्याचे सोहळे याही वर्षी खूपदा बघायला- अनुभवायला मिळाले,
Such a blessing 😍
झकासराव, फोटो एकदम झकास..
झकासराव, फोटो एकदम झकास..
ऋतुराज, माहिती भारी आहे, करमळ च्या फुल आणि फळासारखी.
साधना, तुझे लॉजिक पटलेच एकदम, सगळीकडे apple apple, काय करणार, त्यांच्याकडे शब्दच कमी ना मराठीपेक्षा
बाकी फुले पण एकदम मस्त मस्त...
Mamo, निरीक्षण छान लिहिले आहे.
(No subject)
लॅपटॉप हाती आल्यावर फोटो लहान
लॅपटॉप हाती आल्यावर फोटो लहान करुन टाकणे सोपे झालेय.
पिवळा चाफा. हा बहुतेक घारापुरीला काढलाय.
सफेद कुडा:
सफेद कुड्याच्या शेंगा:

काळा कुडा:
सकु आणि काकु बेलापुरच्या एका टेकडीवरचे आहेत. बहुतेक द्रोणागिरी टेकडी असावी. मी, जिप्सी, जागू गेलो होतो. २०१७.
लॅपटॉप हाती आल्यावर फोटो लहान
हे फोटो कुलाबा गार्डन मधले आहेत, मी व जिप्सी गेलो होतो.
१. हे खरेतर चेंडूफळ आहे. बॅडमिंटन बॉल ट्री चे फळ , पार्किया. पण ह्याचा फोटो पाहता याला गोल्फ बॉल फळ म्हणायला हवे :
२. निवडूंग
३. ह्याचे नाव विसरले.
४. ही फळे बहुतेक वरच्या झाडाचीच असावितः
साधना विपू पहा प्लिज.
साधना विपू पहा प्लिज.
लालबाग फ्लॉवर शो २०२५ बंगलोर
लालबाग फ्लॉवर शो २०२५ बंगलोर.





Lalbagh Flower Show 2025 Bangalore .
Theme : The patriotism of the valiant freedom fighters, Rani Chennamma and Sangolli Rayanna .
1.
2.
3.
4.
5.
(No subject)
6.





7.
8.
9.
10.
(No subject)
11.





12.
13.
14.
15.
मी आणि साधना यांनी मिनी गटग केले लालबागेत .
छान फोटो आहेत.
छान फोटो आहेत.
>>>>मी आणि साधना यांनी मिनी गटग केले लालबागेत . Happy
अरे मस्त मस्त.
फारच सुंदर फोटो आहेत, जयु.
फारच सुंदर फोटो आहेत, जयु.
खूप मोठ आहे लालबाग.
माझ्या वहिनीचे माहेर काळसे
माझ्या वहिनीचे माहेर काळसे-धामापुर. गणपतीच्या चौथ्या दिवशी तिच्या माहेरी गेलो होतो. वर्षभर घर बंद असते, गणपतीत गजबजते आणि सगळे नातलगही येतात. तर तिच्या दारातच समोरच्या घराची भिंत आहे. त्यात दरवर्षी एक खंड्या घर बांधतो. त्याने पाडलेल्या भिंतीतल्या भोकांना कंटाळून शेजार्यांनी भोके बुजवली तर हा पठ्ठ्या बाजुला परत भोक पाडतो. ते शेजारीही मुंबैत राहतात. त्या परिसरात गणपती सोडला तर अन्य वेळी शांतता असते, आजुबाजुला उंच झाडे आणि पाच मिनिटांवर ओढा. खंड्याला राहायला अगदी फाईव स्टार जागा.
खाली बघा त्याने वेगवेगळ्या वर्षी पाडलेली भोके. उजव्या हाताला बुजवलेली भोके दिसताहेत. ज्या भोकाबाहेर शिट दिसतेय ते या वर्षीचे भोक. इथला खंड्या बहुतेक पाईड खंड्या आहे, काळापांढरा असतो तो. खुप वेळ वाट पाहुनही तो आला नाही पण आम्ही आत जेवायला गेल्यावर चटकन येऊन गेला. आणि पिल्ले इतकी हुशार की भोकाबाहेर बुड काढुन शिटतात आणि परत आत जातात. त्यांचे शिटणारे बुड एकदा दिसले.
घरात घाण करायची नाही हा आईने काढलेला वटहुकुम पाळतात. 
क्लोजप
खंडोबा भारीच! मातीची भिंत आहे
खंडोबा भारीच! मातीची भिंत आहे का?
खंड्या तलावाच्या कडेच्या वगैरे मातीच्या बांधात बीळ करतो ना एरवी? ही भिंतही त्याला तशीच वाटली असेल.
यावर्षी मी फ्लॉवर शो ला नाही गेले. नेहमी जातेच असं नाही, पण बऱ्याच वेळा गेले आहे. छानच असतो.
जयु, फ्लॉवर शॉ चे फोटो अगदी
जयु, फ्लॉवर शॉ चे फोटो अगदी मस्तच आहेत.
हे खालचे म्हणे माकडाचे ब्रश
फुलल्यावर असे दिसते. काय रंगवतो मेला देव जाणे. स्वत:चे तोंड रंगवत असणार नक्कीच. रंगात साम्य आहे.
हो वावे, मातीची भिंत आहे.
हो वावे, मातीची भिंत आहे. कोकणात अजुन आहेत बरीच मातीची घरे. नवी पिढी अवतरली की मातीच्या जागी सिमेंट येते, वर पत्रे टाकले जातात आणि गरम होते म्हणुन ओरड मारत बसतात
खंड्याचे घर मस्त आणि monkey
खंड्याचे घर मस्त आणि monkey brush vine सुद्धा.
सध्या सातवीण/ सप्तपर्णी फुलली
सध्या सातवीण/ सप्तपर्णी फुलली आहे सगळीकडे.
मादक वास सुटलाय.
बरेच जणांना याचा त्रास होतो.
हो. मला आवडतो सातविणीचा
हो. मला आवडतो सातविणीचा सुवास. थोडा दालचिनी+जायफळ एकत्रित केल्यासारखा आहे.
बर्याच जणांना त्रास होतो असे बोलुच नका. ज्यांना होत नाही त्यांनाही व्हायला लागतो आणि झाडांची कत्तल करण्यात परिणीती होते.
अर्रे आजच आमच्या ओफिसात एक
अर्रे आजच आमच्या ओफिसात एक मुलगी जॉइन झालीय - तिचे नाव सप्तपर्णा
बंगाली आहे का?
बंगाली आहे का?
Pages