Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Alstonia scholaris
Alstonia scholaris (Apocynaceae), Alston या वनस्पती शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ. व scholaris हे याच्या वापरामुळे.
संस्कृत नाव:सप्तछद, सप्तपर्ण
इंग्रजी नाव: Blackboard tree, Indian devil tree
याच्या खोडाच्या फळ्या बनवतात. याच्या खोडापासून पूर्वी फळ्याच्या व पाटीच्या कडा बनवत, तसेच पेंसिलीही बनवत म्हणून याचे नाव स्कॉलर. याच्या सालीचा वापर आयुर्वेदात ज्वरघ्न म्हणून व त्वचारोगात करतात. पश्चिम भारतात काही भागात या झाडावर सैतानाचा वास असतो असे मानतात. त्यामुळेच याला सैतानाचे झाड असेही नाव आहे.
रामायणात व कालिदासाच्या काव्यात देखील याचे वर्णन आढळते.
शांतिनिकेतन मध्ये म्हणे अजूनही दीक्षान्त सभारंभात स्नातकांना सप्तपर्णी ची फांदी दिली जाते. याच झाडाखाली म्हणे रविंद्रनाथांनी गीतांजली लिहीली होती.
नाही म प्रदेश
नाही म प्रदेश
फारच सुंदर धागा आहे. धनश्री
फारच सुंदर धागा आहे. धनश्री ने सांगितला तेव्हा मिळाला.
वा फ्लॉवर शोचे फोटो बघून मस्त
वा फ्लॉवर शोचे फोटो बघून मस्त वाटले.
साधना, खंड्याच्या घरांचे फोटो भारी.
धन्यवाद
धन्यवाद
सेंट लुईस च्या बोटॅनिकल
सेंट लुईस च्या बोटॅनिकल गार्डन मध्ये घेतलेले काही फोटो.
ही अशी बेल सारखी/ उलटी टांगलेली फुले पहिल्यांदाच बघितलेली.
इकडे जागेची मुबलकता असल्याने कितीतरी एकर्स वर ही पसरलेली आहे.
त्यांनी रेनफोरेस्ट, वाळवंट असे काही बंदिस्त विभाग केले आहेत त्यात प्रत्येकी त्या प्रकारची झाडे, झुडपे वाढवली आहेत.
त्याव्यतिरिक्त जापनीज गार्डन, Herb गार्डन ही आहेत.
सगळ्यात आवडलं ते म्हणजे तिकडचं तळ..
तुम्ही त्या भागात गेला असाल, वेळ असेल तर ३-५ तास घालवायला चांगली जागा ...
Bears' breech ( Google वरून नाव मिळालं)

---


---
साधारण लिली पण रंग इतका मनमोहक होता ...
---
रेन फॉरेस्ट मध्ये मोठ्या पानांची झाडे आढळतात ... एक निरीक्षण.
---

दुसऱ्या धाग्यावरून इकडे पेस्ट केलं.
अरे वा धागा परत जागा झाला.
अरे वा धागा परत जागा झाला. मस्त. बुचाच्या फुलांचा सिझन सुरू झाला. बर्याच ठिकाणी फुलांचा सडा पडलेला दिसायला लागला.
साधना, जयु, छन्दीफन्दी
साधना, जयु, छन्दीफन्दी
खूप सुंदर फोटोज् !
… बुचाच्या फुलांचा सिझन सुरू
… बुचाच्या फुलांचा सिझन सुरू झाला.…
येस्स. मी मागे लिहिले होते , बुचाचा सीझन कार्तिक मासात. आता घमघमाट वाढता राहिल त्याचा. ❤
… बुचाच्या फुलांचा सिझन सुरू
… बुचाच्या फुलांचा सिझन सुरू झाला.…
हो ना, आत्ताच कासारवाडी, फुगेवाडी मेट्रो स्टेशनच्या बाहेर भरभरून फुललेली बुचाची झाडे पाहिली
सर्व फोटो आहाहा. हा धागा
सर्व फोटो आहाहा. हा धागा वरती आलेला बघून बरं वाटतं.
बुचाला मी गगनजाई म्हणते. मोसम सुरू झाला असेल तर जुन्या एरियात आयरे रोडवर, पाटकर शाळेजवळ जायला हवं एकदा. बालपणातील असंख्य आठवणी आहेत, सोबत आईही आठवते. मैत्रिणीबरोबर जाऊन आणलेली फुलं आई छान गुंफून द्यायची.
बुच - फार फॉन्ड आठवणी आहेत
बुच - फार फॉन्ड आठवणी आहेत शाळेतल्या. मी खूप फुले गोळा करुन वरती गच्चीवर जात असे. खाली मुली फुले गोळा करायला थांबलेल्या असत. टपकन एखादे फूल पडाले की जाउन उचलित असत. माझा छंद एकच - एक एक फूल वरुन टाकायचे व खाली मुलींची उडलेली धांदल बघायची
फूलही गिरक्या घेत उतरतं असं दगड टाकल्यासारखं पडत नाही.
धन्यवाद For flower show
धन्यवाद
For flower show photos likes.
बुचाच्या फुलांचा वास आवडतो , सप्तपर्णीचा अजिबात नाही आवडत. डोकं दुखतं .
छन्दीफन्दी , पहिल्या फोटोतली फुले शंकरोबाच्या फुलांसारखी दिसतायत , छत्री घेऊन बसल्या सारखी.
बुचाच्या फुलांचा गंध माझाही
बुचाच्या फुलांचा गंध माझाही फेव्ह.
BTW बुचाला हैदराबादी/ दक्कनीत “नीम चमेली” म्हणतात. उर्दूतही सेम.
झाडाचे नीम(कडूलिंब) आणि फुलांचे चमेलीशी (सुगंधामुळे) असलेले साधर्म्य हे कारण असावे.
बुच माझ्या जवळचा .. मानसिक
बुच माझ्या जवळचा .. मानसिक आणि भौतिक दोन्ही स्तरांवर कारण आवारात दारातच आहेत दुशीकडे दोन बुच.

खूप छान फोटो आहे...
खूप छान फोटो आहे...
हेमाताई आहाहा, लकी आहात.
हेमाताई आहाहा, लकी आहात.
आवारात दारातच आहेत बुचाची
आवारात दारातच आहेत बुचाची झाडं ..
वा. सुगंध पोचला फोटोतूनच.
धनवंती , अंजू अनिंद्य ..
धनवंती , अंजू अनिंद्य .. धन्यवाद
काय सुरेख फोटो आहेत.
काय सुरेख फोटो आहेत.
ममो, नशिबवान आहात.
अगदी लहानपणी म्हणजे 2 री
अगदी लहानपणी म्हणजे 2 री पर्यंत वसईला ज्या वाड्यात रहात होतो तिथे दारात 2 झाडं होती. तेव्हापासूनची मैत्री आहे.
ममो, बुचाचा वास (श्लेष
ममो, बुचाचा वास (श्लेष अभिप्रेत) मस्तच.
तुमचा बुचाच्या वेणीचा फोटो अजून लक्षात आहे
बुचाचा वास श्लेष फारच भारी
बुचाचा वास श्लेष फारच भारी माधव, खूपच आवडला.
तुमचा बुचाच्या वेणीचा फोटो अजून लक्षात आहे >> कमाल आहे माधव तुमची. मनःपुर्वक धन्यवाद त्यासाठी.
इथे ही दाखवते तो फोटो.

सुंदर!
सुंदर!
आहाहा किती गोड.
आहाहा किती गोड.
फार गोड, तेजस्वी फोटो.
फार गोड, तेजस्वी फोटो. दिव्यासोबत छान मांडणी.
आहाहा हेमा.. किती सुंदर वेणी
आहाहा हेमा.. किती सुंदर वेणी आणि किती सुंदर फोटो..
मलाही आकाशनिम खुप आवडतो. काय जबरदस्त सुगंध आहे ह्या फुलांना. पाँडीचेरीच्या मदरना ही फुले खुप आवडत असे कुठेतरी वाचले होते. ही फुले पाहिली की त्यांचीच आठवण होते.
सुंदर वेणी ममो. अलगद लहानपणात
सुंदर वेणी ममो. अलगद लहानपणात नेऊन सोडलंत. शाळेत असतांना सुट्टीच्या दिवशी वाड्यात जाऊन फुलं आणून वेणी करून ती माळायची हौस होती.
वेणी साठी धन्यवाद.
वेणी साठी धन्यवाद.
फुलांची डेखं नीट दिसावी म्हणून असा फोटो मी मुद्दाम काढला आहे. माधव ह्यांनी ते अचूक टिपलं होतं आणि लिहिलं होतं डेखांचं सौंदर्य अप्रतिम दिसतंय. त्यासाठी माधव ह्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.
एक वर्ष ह्या फोटोच कोलाज करून एक जानेवारीला सगळ्यांना पाठवलं होतं. तेव्हा ही छान वाटलं फोटो बघून असे अनेक पर्सनल मेसेज आले होते, काही ना फोटो इतका आवडला की त्यांनी तोच फोटो एक जानेवारीच्या शुभेच्छांसाठी निवडला होता. असो.
Millingtonia is named for Sir
Millingtonia is named for Sir Thomas Millington who was an inspiration to Carl Linnaeus the Younger who first described the genus
माझ्या सोसायटीच्या दाराशी दोन भली मोठी झाडे आहेत.
त्याच्या फुलाचा सडा पडलेला असतो. त्यातून हळुवारपणे वाट काढणे महाकर्म कठीण.
शाळेतही =रमणबाग= बरीच होती, तेव्हा त्या फुलांचा हार करायला शिकलो होतो. आता नाही जमणार.
Pages