Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दगडी पाला/एकदांडीच्या फुलांची
दगडी पाला/एकदांडीच्या फुलांची वेणी केली. याचा पाला जखमेवर लावतात. स्टोनसाठी पण इपाय करतात म्हणे.

सुंदर वेणी. अशी पहिल्यांदाच
सुंदर वेणी. अशी पहिल्यांदाच पाहिली.
सुंदर वेणी. अशी पहिल्यांदाच
.
कदंबाची माहिती वाचायला मजा
कदंबाची माहिती वाचायला मजा येतेय.
साधना, गोवा सिरीजची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. मी वाचणारे. हल्लीच मी पोर्तुगालला भेट दिली. तिथल्या Marine museum मध्ये भारत/गोवा याच्या इतिहासाला वाहिलेलं एक मोठ्ठ़ं, संपूर्ण दालन आहे. फार मजा वाटली ते बघायला. आणि मला गोव्याचा इतिहास फार माहिती नाही हे देखील जाणवलं..त्यामुळे ही सिरीज वाचणार आता.
स्निग्धाकडील पाहुणा गोजिरा आहे एकदम.
शाळेतली कविता आठवली.
आज ये अंगणा पाहुणा गोजिरा
ये घरा आमुच्या सोयरा साजिरा
बाबा आमटेंची कविता आहे बहुतेक. आनंदवनात रोपांची मिरवणूक काढून लागवड करत त्यावेळी ही कविता/गाणे म्हणत असे वर्णन आहे.
एकदांडीच्या फुलांची वेणी
एकदांडीच्या फुलांची वेणी = 👌
आनंदवनात रोपांची मिरवणूक…. सो गुड !
या दिवसात वृक्ष दिंडी वगैरे असते शाळांमधून.
रायगड, नक्की वाच.
रायगड, नक्की वाच.
गोव्याचा १५ व्या शतकापासुनचा इतिहास भयाण आहे. पोर्तुगिजांनी गोवेकरांचे जे अमानुष हाल केले ते वाचले की
उर्वरीत भारतावर इंग्रजी अंमल राहिला याबद्दल देवाचे आभार मानावे अशी भावना निर्माण होते. मी गोव्याला अनेकदा जाते, मला जवळ आहे. पण चुकुनही तिथल्या चर्चमध्ये जावेसे वाटत नाही. सगळा इतिहास आठवतो आणि ईच्छाच मरते.
पावसामुळे जास्वंदीला छान बहर
पावसामुळे जास्वंदीला छान बहर आला आहे.

जागू, तुला इथे बघून खूप आनंद
जागू, तुला इथे बघून खूप आनंद झाला.
वेणी सुरेखच..
अशीच बुचाची फुलांची पण वेणी करतात.
धन्यवाद धनवन्ती.
धन्यवाद धनवन्ती.
बुचाची आणि मधुमालतीची पण.
जागू बरेच दिवसांनी दमदार
जागू बरेच दिवसांनी दमदार पदार्पण.
बुचाची आणि मधुमालतीची पण. >>
बुचाची आणि मधुमालतीची पण. >> वेणीचा विषय निघाला आणि गुलबक्षीचा उल्लेख झाला नाही असं कसं चालेल
जागू, छान केलीय वेणी !! अशी
जागू, छान केलीय वेणी !! अशी मधुमालती आणि लटक चमेली ची बघितली आहे.

बिल्डिंग च्या मागे मोकळी जागा आहे , आज तिथे आलेले श्री.व सौ मोर ... !!! सकाळची सुरुवात एकदम happening!!!
अश्विनी मस्त.. उडते मोर
अश्विनी मस्त.. उडते मोर बघस्यला मिळत नाहीत सहसा.
जागु, वेणी मस्तय.
जागू तै, तुला विपू केली आहे.
जागू तै, तुला विपू केली आहे. चेक करशील प्लीज?
श्री.व सौ मोर
श्री.व सौ मोर = 👌
आता पाऊस आला ना, आता त्यांचा रोमांस सुरु
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
अश्विनी मोर सुंदर
rmd मेसेज प्रतिसाद आला का मी
rmd मेसेज प्रतिसाद आला का मी दिलाय.
नसेल तर ईथे लिहीते. आघाड्याची भाजी माठाच्या भाजीसारखी करतात. तेरड्याची मी कधी केली नाही. तरी कोणालातरी विचारुन बघते.
खालील फुल रानटी कृष्णकमळचे आहे. ओसाड जागेत भरपूर फैलावतो. याची फूले लवकर कोमेजतात. पॅशनफ्रुटसारखे दिसले तरी हे पॅशनफ्रुट नाही.

तुझा मेसेज मिळाला गं. जस्ट
तुझा मेसेज मिळाला गं. जस्ट रिप्लाय केला तुला
थॅंक्यू जागूतै!
रानटी कृष्णकमळ पहिल्यांदा पाहिलं. काय सुंदर फूल आहे! वास कृष्णकमळासारखाच असतो का?
नाही खुप कमी अगदी मंद वास
नाही खुप कमी अगदी मंद वास असतो.
तेरड्याच्या पानांची भाजी पण माठासारखीच करतात असे समजले.
याला कृष्णकमल का म्हणायचे?
याला कृष्णकमल का म्हणायचे?
शुभ्र कमळ का नाही ??
मला शुभ्र नाही दिसत. गुलाबी
मला शुभ्र नाही दिसत. गुलाबी दिसतंय, लवेंडरकडे जाणारे.
रानटी गोडवा आहे त्या फुलात, सुरेख फिकट गुलाबी कलर आहे का, म्हणजे मला तसा दिसतोय.
शंभर कौरव, मधले पाच पांडव आणि एकदम मध्ये कृष्ण अशी रचना कृष्णकमळाची असते म्हणून कृष्णकमळ असं आम्हाला लहानपणी सांगायचे.
अन्जू अगदी तन्तोतन्त बरोबर.
अन्जू अगदी तन्तोतन्त बरोबर. त्याच्या रचनेमुळेच त्याला कृष्णकमळ म्हणायचे आणि फिकटगुलाबी रंग आहे.
अगं कसलं गोड फूल आहे.. शुभ्र
अगं कसलं गोड फूल आहे.. शुभ्र कृष्णकमल
श्री व सौ मोर सुंदरच
श्री व सौ मोर सुंदरच
कृष्णकमळ ही सुंदर. रंग खासच. माझ्या ताईकडे लाल रंगाची आहे.
रानटी कृष्ण कमळ मस्त !! खरे
रानटी कृष्ण कमळ मस्त !! खरे तर रानटी म्हणणे जीवावर येते आहे . कारण रंग सुरेख आहे त्याचा ! जागू , तुझ्यामुळे नवनवीन फुले माहिती होतात .
रानटी कृष्ण कमळ मस्त !! खरे
रानटी कृष्ण कमळ मस्त !! खरे तर रानटी म्हणणे जीवावर येते आहे . कारण रंग सुरेख आहे त्याचा ! जागू , तुझ्यामुळे नवनवीन फुले माहिती होतात .
आपण चांगला अर्थ घेऊया ना
आपण चांगला अर्थ घेऊया ना रानटी म्हणजे रानात वाढणारे.
जांभळी जास्वंद
जांभळी जास्वंद

सही आहे, मला असा
सही आहे, मला असा गुलाबीमिश्रीत जांभळा रंग जास्त आवडतो, निळ्याकडे झुकतो जांभळा त्यापेक्षा.
रानटी म्हणजे रानगोडवा.
मोर मोरनी क्युट. लिहायचं राहिलेलं.
जागू वेणी व कृष्ण कमळ मस्त च
जागू वेणी व कृष्ण कमळ मस्त च दिसतेय. जांभळं जास्वंद पहिल बघितले.

मोर दुरून छान दिसतात. गावी बरेच बघितले आहेत. पण कालच क्रोएशिया मधल्या Lokrum आयलंड वर पुष्कळ मोर व लांडोर फिरत होते ते बघण्याच योग आला. आपल्याकडे कोंबड्या फिरतात तसे अगदी जवळून भटकत होते. अगदी बीच वर पण.
Pages