Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रमडला मम.
रमडला मम.
कदंब की डाली पे सुभग हिंडोले,
कदंब की डाली पे सुभग हिंडोले, लागे रेशम डोर .. झूला झूलें नंदकिशोर..> कुठे ऐकायला मिळेल? >> रायगड, youtube वर झमक झुकी आयी बदरीया काली by अश्विनी भिडे देशपांडे असं सर्च करा. सापडेल
झमक झुकी आई बदरिया…
झमक झुकी आई बदरिया…
बरोबर स्निग्धा, यातच आहे पुढे कदंब की डारी आणि सुभग हिंडोला.
ही कजरी डॉ अमिता सेन यांच्या आवाजात जास्त आवडते. असावी जालावर. सुनना पडेगा.
आजतर खरच आहे बदरिया आणि पाऊस. निसर्गाचे विभ्रम
हा आज आमच्याकडे आलेला अनाहूत
हा आज आमच्याकडे आलेला अनाहूत पाहुणा
हा आज आमच्याकडे आलेला अनाहूत
हा आज आमच्याकडे आलेला अनाहूत पाहुणा
(No subject)
ही कजरी डॉ अमिता सेन यांच्या
ही कजरी डॉ अमिता सेन यांच्या आवाजात जास्त आवडते. >> link असेल तर द्या please
स्निग्धा , खूप छान आहे पाहुणा
स्निग्धा , खूप छान आहे पाहुणा... आता तो रोज येईल त्याच वेळेला. त्याला ओली लाल मिरची पण देऊन बघा. आवडता खाऊ त्याचा.
नक्कीच
नक्कीच
कदंब म्हणजे नीव का? थोडी आंबट
कदंब म्हणजे नीव का? थोडी आंबट गोड फळं असतात तो.
नीवच बहुतेक किंवा त्याचा भाऊ,
नीवच बहुतेक किंवा त्याचा भाऊ, दिनेशदा यांनी नि ग च्या कुठल्यातरी भागात कदंब म्हणजे नीव लिहिल्याचे, वाचल्याचं आठवतंय.
माहेरी कळंबुशीत नीव भरपूर खाल्लेत, कच्चे असताना तिखट मीठ लाऊन खायला खूप मजा येते, आवडतात, तेव्हा आंबट चव असते, पिकल्यावरचे माहिती नाहीत. डोंबिवलीत काही ठिकाणी नीव आहेत.
गोव्याचा राज्यवृक्ष वगैरे आहे का हा, कारण त्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्टला कदंबा नाव आहे.
स्निग्धा मस्त पाहुणा.
अंजु, मलाही आधी तुझ्यासारखेच
अंजु, मलाही आधी तुझ्यासारखेच वाटले होते.
पण कदंब हे गोव्यावर राज्य करणार्या घराण्याचे नाव आहे.
नाव आहे. त्यांनी १० वे ते १४ वे अशी ४ शतके गोव्यावर राज्य केले. हे खुप मोठे घराणे होते, कित्येक शतके कोकण व कर्नाटक यांच्या आधिपत्याखाली होता. त्यातुनच गोव्याचे कदंब ही एक शाखा निघाली.
गोवा राज्य परिवहन मंडळाला या घराण्यावरुन कदंब
ट्रान्स्पोर्ट कॉर्प नाव दिले आहे.
अनिंद्य , मस्त आलाय फोटो !!
अनिंद्य , मस्त आलाय फोटो !!
माझ्या एका कदंब च्या फोटोवरून बरीच चांगली चर्चा चालू आहे इथे ! माहितीमध्ये भर पडते आहे. स्निग्धा , छान आहे पाहुणा .
स्निग्धा, क्यूट पाहुणा! फोटो
स्निग्धा, क्यूट पाहुणा! फोटो फारच छान आलाय
ओहह साधना, थँक्स, चांगली
ओहह साधना, थँक्स, चांगली माहिती दिलीस. खरोखर मला कदंब वृक्ष वाटलेला.
कदंब नेहमी सरळ वाढतो.
कदंब नेहमी सरळ वाढतो. जमिनीला ९० डिग्रीत त्याचे ऊंच गगनाला भिडू इच्छिणारे खोड व बुंधा आणि बुंध्याला समांतर फांद्या. कृष्णाला बसायला किती सुरक्षित. कदाचित कृष्णबाळ पडु नये म्हणुन कदंबाने आपल्या फांद्या समांतर ठेवल्या असाव्यात
कदंबात अजुन एक प्रकार आहे जो शांकलीने सांगितला होता. निगच्या मागच्या भागात उल्लेख आहे. वेडावाकडा वाढणारा कदंबही असतो. तिने त्याचे नाव सांगितले होते, कुब्जाकदंब किंवा असेच काही. आता आठवत नाही. पुण्यात एक दोन झाडे आहेत याची. शांकलीने जागा सांगितलेली, मी पुणे भेटीत पाहिलेली.
अंजु गोव्यावर एक सुरेख लेखमाला इथे होती. वेळ असल्यस वाच.
https://www.maayboli.com/node/24981
Something more @ कदंब :
Something more @ कदंब :
बंगालमधे दरवर्षी भाद्रपदातल्या कृष्ण एकादशीला “कदंबोत्सव” साजरा होतो. कदंबाचे नवीन रोप लाऊन, आधीच असलेल्या कदंबवृक्षाला फुले वाहून, गीत-नृत्यादी कार्यक्रमांनी हा उत्सव करतात. टागोरांच्या शांतिनिकेतनात तर मोठा देखणा उत्सव असतो.
BTW, कदंबाला बंगालीत “शिशुपाल” आणि “हलीप्रिय” ही अधिकची नावे आहेत आणि कदंब हा अमर वृक्ष (दीर्घायु असल्याने) असल्याच्या लोककथा प्रचलित आहेत.
शिशुपाल? आणि कृष्णएकादशीला
शिशुपाल? आणि कृष्णएकादशीला त्याची लागवड करतात?
काय हा विरोधाभास!!!
पण एकुण हा उत्सव भावला. असेच करायला हवे सर्व वृक्षांच्या बाबत.
विरोधाभास मोठाच आहे, म्हणूनच
“शिशुपाल” नावातला विरोधाभास मोठाच आहे, म्हणूनच सांगावेसे वाटले 🙂
वृक्षांना मनोरम कथा-कहाण्यांशी जोडून त्यांना दैवी गुण प्रदान करणे आपल्या पुराणकथालेखकांनी भरपूर केलेय.
२७ नक्षत्रं आणि प्रत्येकाचा एक प्रियवर वृक्ष अशा कहाण्या आहेत. कृत्तिकेचा जसा औदुंबर तसा शततारका-शतभिषेचा कदंब.
ऋतुराज, सामो अधिक सांगू शकतील. वेटिंग
अनिंद्य, उंबर-रंग मस्तच.
अनिंद्य, उंबर-रंग मस्तच. मागच्या पानावरची जपा ही सुंदर. ती तुरेविरहीत आहे का? मला तरी त्या फोटोत जास्वंदीची ओळख असलेला तुरा दिसला नाही.
कदंबाचे फोटो मस्तच. पण ते कदंबाला झोके बांधणं थोडसं अशक्यप्राय वाटते. एकतर उंचावर त्याला मोठ्या, जाड फांद्या असल्याचे कधी पाहिले नाहीये आणि थोड्याश्या वार्याने पण त्याच्या फांद्या मोडलेल्या बघितल्या आहेत. त्यामुळे झोका बांधणे अवघड वाटतेय.
आता 'झमकी झुकी' चा उल्लेख झालाच आहे तर अनुराधा कुबेर यांनी गायलेली तीच कजरी पण सुंदर आहे. पण अश्विनीताईंच्या पेशकशीत एक वेगळीच मजा आहे. लहानपणी एक वाक्यप्रयोग ऐकला होता 'लयीशी खेळणे'. आधी अनुराधा कुबेर यांची कजरी ऐका आणि नंतर अश्विनीताईंची. लयीशी खेळणे म्हणजे काय त्याचा साक्षात अनुभव येतो. आता अमिता सेन यांची पण ऐकावी लागेल.
रंग अडेनिअमचे
रंग अडेनिअमचे
आता 'झमकी झुकी' चा उल्लेख
आता 'झमकी झुकी' चा उल्लेख झालाच आहे तर अनुराधा कुबेर यांनी गायलेली तीच कजरी पण सुंदर आहे >> link please please
स्निग्धा, ही घ्या लिंक.
स्निग्धा, ही घ्या लिंक.
https://www.jiosaavn.com/song/jhoola-jhamaka-jhuki-ayi/Qz5bYTh9dHs
… जास्वंदीची ओळख असलेला तुरा
… जास्वंदीची ओळख असलेला तुरा दिसला नाही...
हो, बिनतुरा होता तो.
अडेनिअम रंग सुंदर आहेत. लो मेंटेनंस म्हणून छान असतात बागप्रेमींसाठी
फोटो कोलाज सुंदर केले आहे
साधना, नक्की वाचेन. विशाल
साधना, नक्की वाचेन. विशाल वगैरे होता का टीममध्ये, पुसट आठवतंय, लिंक न उघडता विचारतेय.
माधव, सुरेख फोटो.
>>>>>२७ नक्षत्रं आणि
>>>>>२७ नक्षत्रं आणि प्रत्येकाचा एक प्रियवर वृक्ष अशा कहाण्या आहेत. कृत्तिकेचा जसा औदुंबर तसा शततारका-शतभिषेचा कदंब. ऋतुराज, सामो अधिक सांगू शकतील. वेटिंग
अरेच्च्या हे माहीत नव्हते अनिंद्य. कृत्तिकेचा औदुंबरा अहे का? कृत्तिका फार सुडौल, सुघड शररीरयष्टी असलेले असतात म्हणे. कार्तिकस्वामी सर्वात देखणा देव ना. याच नक्षत्रावरचा.
बाकी वृक्षांचे माहीत नव्हते.
मुंबईत नक्षत्रवने उभारलीत.
मुंबईत नक्षत्रवने उभारलीत. आता किती शिल्लक आहेत माहिती
नाही. माझ्याऑऑफिसातही एक होते. २७ बाळझाडे लावलेली
साधारण ५००-६०० फुट जागेत. झाडे पाहात ऑफिसात भटकत असताना दिसलेली. दोन वर्षांनी मला परत कधीतरी आठवले आणि परत गेले पाहायला. बोर्ड गायब होते आणि काही झाडेही गायब होती. तिथे नक्षत्रवनच नव्हते असे आठवतेय, झाडे होती पण वेगळ्या प्रकारे मांडलेली. माळी बदलला असावा आणि त्याला नक्षत्रवन आवडले नसावे.
मला ऑफिसाची हल्ली खुप आठवण येते. अहं, गैरसमज करुन घेऊ नका. तिथल्या लोकांची नाही तर झाडांची आठवण खुपच येते. आता गेले की सगळ्यांना भेटावे लागणार.
माधव, खूप सुंदर. खूप खूप
माधव, खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद
@ नक्षत्रवने
@ नक्षत्रवने
होय. मधे ती एक टूम निघाली होती. कितीतरी जागी फलक लाऊन वगैरे माहिती लिहायचे.
झाडे किती जगली कुणास ठाऊक
निगकर्स बिझी शेड्युलमुळे काही
निगकर्स बिझी शेड्युलमुळे काही दिवस इथे येउ शकले नाही साॅरी.
माझी आठवण काढली होथी इथे हा मेसेज मला मिळाला ब-याच जणांकडून. मागची पाने चाळली आणि काय सुरेख माहितीपूर्ण गप्पा चालल्या आहेत अगदी पूर्वीसारख्या. फार बरे वाटले.
Pages