निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>फिक्कट गुलाबी गुलाब
बेबी पिंक Happy
सर्वच फोटो काय एकसे बढकर एक आहेत. व्हिज्युअल ट्रीट.

रंग आणि रुप दोघातही खूप देखणी व्हरायटी असते ती. हलका सुवास पण असतो > हलकासा सुवास पण आहे गावठी गुलाबाला असतो तसा.

किट्टु,
असाण्याची फळे आहेत का ती?

Screenshot_20260303_182521_Google.jpg
@ऋतुराज
गुगल लेन्सवर हे सापडलं

आज मी पहिल्यांदा एक फळ पाहिले आणि मला वाटले ते किट्टुने टाकलेल्या फोटोतलेच आहे. आता फोटो पाहिल्यावर लक्षात आले ते हे नव्हे. मी उद्या फोटो देते इथे, आमच्या ग्रामपंचायतीच्या दारात आहे. धामण्/फालसाची मावसबहिण असावी. पिकलेली फळे पिठुळ व गोड होती. पण घोस लागले होते, पिकल्यावर चनामना बोराचा रंग आला होता.

किट्टुने टाकलेले bridelia stipularis आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Bridelia_stipularis

IMG_20260515_224035.jpg

दोन फोटो वेगवेगळ्या मोबाईलवरून काढलेले.

IMG-20260515-WA0022.jpg

मोगरा हसला आणि फुलला.

वर्ष दीड वर्षांपूर्वी वरून कोणीतरी छाटणी केली, एक रोप माझ्या गोकर्ण वेलीत अडकले, मी ते असंच खोचून ठेवलं. सहा महिन्यांपूर्वी तो वेल खूप वाढायला लागला आणि महिन्याभरापूर्वी सर्व गळून सुकून गेलं, मला वाटलं झालं, आता काही येणार नाही, रुसलं रोप माझ्यावर. अचानकपणे काही दिवसांपूर्वी पालवी फुटली आणि आता एक फुल फुललं .

मी याला वेल मोगरा समजतेय पण जाणकारांनी सांगावं की जाई, जुई वगैरे आहे का, की मदनबाण आहे.

वाई ला नाना फडणवीस यांच्या वाड्याबाहेरील गोरख चिंच झाड .... असे नाव का कळले नाही. तिथे माहिती लिहिलेली होती म्हणून नाव कळले .
IMG_20260622_082235.jpg

गोरख चिण्च म्हणजे आफ्रिकन बाओबाब. हा वृक्ष आफ्रिकेतुन बहुतेक जगभर पसरला असावा. आपल्याकडेही याचे पुरातन वृक्ष आहेत. २००-३०० वर्षे म्हणजे याचे सामान्य आयुष्य. आपल्या राणीबागेत आहेत याची झाडे. खुप सुण्दर दिसतो, भला मोठा जाड बुंधा आणि निमुळते वर गेलेले टोक. याला खुप सुंदर फुले येतात. फळ आज पहिल्यांदा पाहिले. बिया बहुतेक खात असावेत. आपल्याइथे असेच उगवलेले पण पाहिलेत. आमच्या बेलापुर कॉलनीतल्या झोपडपट्टीत एक झाड होते. नंतर बहुतेक तोडले असावे.

हो साधना , खूपच मोठा बुंधा होता झाडाचा. विशेष म्हणजे त्याची माहिती लिहिली होती त्यात याला ' भुताचे झाड ' असेही म्हणतात असे कळले.

याला ' भुताचे झाड ' असेही म्हणतात असे कळले.>>>

हे मात्र तिथे चुकीचे लिहिलेय. भुताचे झाड हा खिताब कहांडोळ
किंवा कांडोळ ह्या झाडाला मिळालाय. थंडीत ह्याची पुर्ण पानगळ होते आणि याचे पांढरे अंग गुलाबीसर होते. रात्रीच्या चंद्रप्रकाशात हे चमकायला लागते आणि त्या दिव्य पर्णहिन फांद्या अशा हलतात जणु भुत वेगाने हात हलवत आपल्यामागे लागलेय. मी पाहिलेय Happy

फार आवडतो मला हा वृक्ष... पुणे युनिव्हर्सिटी मध्ये एक आहे. वाळवीमुळे कदाचित, काही वर्षांपूर्वी उन्मळून पडला. अतिशय दुःख झालं. पण काही मुळं जमीन धरून होती. नशिबानं तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याला तसाच पडून राहू दिला. नवी पालवी फुटली आणि नव्या जोमानं फांद्या वाढल्या. कधी गेलो तर त्याची विचारपूस करून आशिर्वाद नक्की घेऊन येतो. आपटे रोड च्या जवळ एक आहे, पण तो एकदम तरणाबांड वाटतो. वाईचा फार वयोवृद्ध आणि प्रचंड आहे. स्वदेस चित्रपटातल्या पंचायतीच्या सीन मध्ये बघितला तेव्हा याचं दर्शन घ्यायला, माहिती काढत वाईला पोहोचलो होतो.

9b051689-6eda-4786-94dc-156ca49f36dd.jpeg

# सोनसकाळ
# आवडता कोपरा
# Slow Sundays

थँक्यू साधना.

निसर्ग धागा सुस्त पडलाय.

निसर्गप्रेमी चैतन्य परत आणतील ही अपेक्षा.

IMG_6856.jpeg

वरिल फोटो परवा काढला. जुन मध्ये असे निळे आभाळ आणि पांढरे ढग आंबोलीत माझ्या हयातीत तरी बघितले नव्हते.

आता पडतोय पण. वर आदल्या दिवशी लावलेला नाचणा दिसतोय. मधला हिरवा पट्टा अजुन न लावलेल्या नाचण्याची नर्सरी.

Pages