ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

DRDO वरून आठवले, कुरुळकरचे काय झाले? बरीच माहितीदी होती म्हणे पाकिस्तानी महिलेला!

विपक्षी दल और कांग्रेस पार्टी यह कहते हैं कि वे सरकार के साथ खड़े हैं, तो यह उनके आचरण में भी दिखाई देना चाहिए।
यह मैं इसलिए कह रहा हूँ क्योंकि यह स्पष्ट है कि ‘ऑपरेशन सिंदूर’ चल रहा है।
काँग्रेस अवघड प्रश्न विचारेल म्हणून त्यासाठीचा बचाव म्हणून हे वापरले जाईल. म्हणजे प्रश्न विचारायचे नाहीत. तरी शशी थरूर यांनी सिंदूर दरम्यान सरकारचे समर्थन करून सरकारचीच गोची केली आहे. त्यांना आत्ता कोणत्या तोंडाने देशद्रोही म्हणणार. काही गोष्टी बाहेर आल्याचं पाहिजे.

राभू
सर्च वगैरे काही नाही. मी Star Trek चा fan आहे. त्यामध्ये ह्याला Directed Energy Weapons असे म्हणतात. तेव्हाच ही माहिती साठवून ठेवली होती. त्यामुळे लगेच मिळाली.

जर ऑपरेशन सिंदूर अजून संपलं नाहीए, तर - आतंक पर भारत की विजय के प्रतीक #OperationSindoor की सफलताओं को हर शहर, हर गांव तक पहुंचाकर देशवासियों को गर्व से भरेगी #TirangaYatra... - याची काय घाई? >>मोदिबाबा निकले प्रचार करने ! ऑपरेशन सिंदूर ने पाकपेक्षा नितीश कुमारची जास्त x टली असेल .

लोकांना काहीतरी कामांत गुंतवायचे असते. कारभारांतला गलथान पणा बद्दल प्रश्न विचारायला नको म्हणून केलेले ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले ( कारण राजिनाम्याची मागणी नाही , अतिरेकी अजूनही पकडले गेलेले नाहीत याबद्दलही कुणाला प्रश्न पडत नाही).

आता ट्रम्पला मध्यस्थी टाकून युद्धबंदी कुठल्या अटींवर केली यावर चर्चा / प्रश्न नको म्हणून किराण्याचे दुकान उघडले.

आता भारताने अमेरिकेच्या आयातीवरील टेरिफ काढून टाकले अशी ट्रंपने घोषणा केली. मार्केट उसळले. भारताच्या नाड्या ट्रम्पच्या हातात.

@ रानभुली
"वेळ जात नसेल आणि मनोरंजन हवे असेल तर युट्यूबवर कॅपिटल टीव्ही शोधा. मी अशा सर्व चॅनेल्स ला डोन्ट रिकमेंड चॅनल वर क्लिक करते."
😀
मागे लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान 'कॅपिटल टीव्ही' वरचे जे व्हिडिओज पाहिले ऐकले होते ते फारच एकांगी वाटल्याने स्वत:हुन त्याच्या वाट्याला कधीच गेलो नाही. पण मध्यंतरी 'छावा' चित्रपटाच्या निमित्ताने औरंगजेबाची कबर वगैरे सारखे मुद्दे चर्चेत असताना सजेशनमध्ये आलेला त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता.
त्यात रिपोर्टरने चुकुन छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली ऐवजी 'शाहिस्तेखानाने महाराजांची बोटे छाटली' असे म्हंटले होते. त्या व्हिडीओवर दिलेल्या कॉमेंटमध्ये त्या रिपोर्टरची चांगली खरडपट्टी काढली होती आणि डोन्ट रिकमेंड चॅनल वर क्लिक केली होती. पण त्याचा काही उपयोग होतो असे मलातरी वाटत नाही कारण ह्या कॅपिटल टीव्ही सारख्या अति-उजव्या आणि असंख्य भिकारड्या LeLi (LEFT LIBERAL) चॅनल्ससाठी 'डोन्ट रिकमेंड चॅनल' वर क्लिक करुन झाले आहे. पण युट्युब प्रिमियम सबस्क्रिप्शन असुनही काही दिवसांनी परत ते चॅनल्स होम स्क्रीनवर रेकमेंड केले जातात् आणि सजेशन मध्ये त्यांचे व्हिडिओज दिसत रहातात!

@ उदय
>>"आपण त्यांच्या कमांड सेंटरची तोडफोड , हानी केली असण्याची शक्यता ( केवळ शक्यताच) आहे. पण त्यांच्या आण्विक शस्त्रागाराला हात लावणार नाही. Big no no. कारण धोका भारताला (च) आहे. ते आपले शेजारी आहेत हे सत्य कुणी बदलू शकत नाही.">>

+१
पाकिस्तानविषयी कुठलीच खात्री नाही पण भारताकडुन तरी (१९८८ साली स्वाक्षर्‍या होउन १९९१ सालापासुन अंमलात आलेल्या) Agreement on the Prohibition of Attack Against Nuclear Installations and Facilities between India and Pakistan ह्या द्विपक्षीय कराराचे जाणुन-बुजुन उल्लंघन होईल असे वाटत नाही.

@ मानव पृथ्वीकर
"आता माझ्याकडून हा विषय समाप्ती."
😀
ह्या धागाचर्चेला आता राजकिय वळण लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसु लागल्याने चर्चा सहभागाच्या दृष्टीने माझ्यासाठीही हा विषय समाप्त झाल्यातच जमा आहे. परंतु 'चर्चासंन्यास' घेण्याआधी तुमच्या आधिच्या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक सातशी सहमत असल्याने त्या विषयी काल समोर आलेली 'डर्टी बॉम्बची' एक शक्यता तेवढी मांडावी म्हणतो...

>>"७. तेव्हा जर रेडिएशन लिकेज खरेच असेल तर त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे अण्वस्त्र हलवताना झालेला अपघात ही।सुद्धा एक शक्यता आहे. असे असेल तर पाकिस्तान ते नक्कीच लपवणार.">>

सहमत आहे!
काल एका संरक्षण तज्ज्ञांनी रेडिएशन लिकेजच्या संदर्भात कुठलाही दावा न करता अशाच प्रकारची एक 'शक्यता' वर्तवली आहे जी विचारात घेण्यासारखी आहे. त्यांच्या अंदाजे...
"पाकिस्तानने दहशतवाद्यांकडून भारत आणि अफगाणिस्तानात वापर करण्यासाठी जे 'डर्टी बॉम्ब्स' तयार केले होते त्यांचा साठा किराना हिल्सच्या 'सुरक्षित' परिसरात केला होता, आणि ह्याची माहिती भारतासहित इस्राएल, अमेरिका, चीन आणि अन्य प्रगत देशांच्या गुप्तचर खात्यांकडे आधीपासूनच होती.
भारताकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांची व्याप्ती वाढत चालल्यामुळे अथवा अन्य कुठल्या कारणासाठी हा साठा दुसरीकडे हलवताना अपघाताने किंवा कर्मधर्मसंयोगाने भारताच्या हल्ल्यात त्यातल्या एक किंवा अधिक बॉम्ब्सचा स्फोट होऊन किरणोत्सर्ग झाला असावा."

सध्याच्या काळात मुख्यप्रवाहातील माध्यमांवर आणि सोशल मीडियावर स्वयंघोषित 'तज्ज्ञांचे' अक्षरशः पेव फुटले आहे. त्यातल्या काहींनी 'मोसाद' आणि 'रॉ'ने संयुक्तरित्या एक कोवर्ट ऑपरेशन राबवून किराना हिल्स इथला पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा उद्धवस्त केल्याने रेडिएशन लिकेज झाल्याचे सांगण्यापर्यंतही मजल मारली आहे 😂. त्यामुळे 'डर्टी बॉम्ब' बद्दल मला अगदीच बालवाडी कॅटेगरीतली माहिती असल्याने ह्या तद्न्यांनी वर्तवलेल्या शक्यतेत किती 'दम' आहे ते तपासून बघण्यासाठी ChatGPT ची मदत घेतल्यावर भरपूर आणि सविस्तर माहिती मिळाली, पण प्रतिसादाची (आधीच जास्त झालेली) लांबी नियंत्रणात ठेवण्यासाठी ती सगळी इथे देणे शक्य नाही. त्यामुळे 'Nuclear Regulatory Commission (NRC): Fact Sheet on Dirty Bombs' मधले दोन उतारे खाली देत आहे.

"A "dirty bomb" is one type of a "radiological dispersal device" (RDD) that combines a conventional explosive, such as dynamite, with radioactive material. The terms dirty bomb and RDD are often used interchangeably in the media. Most RDDs would not release enough radiation to kill people or cause severe illness - the conventional explosive itself would be more harmful to individuals than the radioactive material. However, depending on the scenario, an RDD explosion could create fear and panic, contaminate property, and require potentially costly cleanup. Making prompt, accurate information available to the public could prevent the panic sought by terrorists.

A dirty bomb is in no way similar to a nuclear weapon or nuclear bomb. A nuclear bomb creates an explosion that is millions of times more powerful than that of a dirty bomb. The cloud of radiation from a nuclear bomb could spread tens to hundreds of square miles, whereas a dirty bomb's radiation could be dispersed within a few blocks or miles of the explosion. A dirty bomb is not a "Weapon of Mass Destruction" but a "Weapon of Mass Disruption," where contamination and anxiety are the terrorists' major objectives."

बाकी शस्त्रसंधीची जी काही कारणे पुढे कधीतरी समोर येतील तेव्हा येतील, पण आता ह्या विषयावर विचार्/चर्चा करण्यात वेळ वाया न घालवण्याचा पक्का निर्धार केला आहे 😀

आम्ही किराणा हिल्सवार हल्ला केलाच नाही असे एअरमार्शल ए. के. भारती ह्यांनी सांगितले आहे. मग रेडिएशनचा प्रश्नच उद्भवत नाही. कशाला अमेरिकेच्या माध्यमांवर विश्वास ठेवायचा?

Submitted by आग्या१९९० on 12 May, 2025 - 19:07
आपल्याच माणसावर माबोकरांचा विश्वास नाही.

LIVE: State Dept Briefing on India-Pakistan, Tariffs, & US Foreign Policy | Tommy Pigott

Bangladesh's Legal Advisor Met LeT Operative Harun Izhar
https://www.youtube.com/live/WcqlZGIUy1E?si=zhFcgPQYRsUbDFcK&t=3316
Pakistan and terror infrastructure
Neclear radiation
PAkistan welcoming and Modi not welcoming US initiative
Israeli made drones used by India
https://www.youtube.com/live/WcqlZGIUy1E?si=DfFP22DBF8oszwFK&t=3456

या प्रवक्त्याला जास्त काय बोलायची पॉवर नाय हे समजू शकतं. पण कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, ते रोचक आहे.
त्या प्रेस ब्रीफिंगचं भारत पाकिस्तानपुरतं transcript
https://www.newagebd.net/post/south-asia/264918/us-wants-pakistan-india-...

India Wins On Battlefield, Loses Global Narrative | Sky News Journalist Yalda Hakim Interview | N18G
https://www.youtube.com/watch?v=TQ3RxwyrknI

पाकिस्तानचे मंत्री वेस्टर्न मीडियामध्ये इंटरव्ह्यु देताना दिसतात आणि भारताचे नाही, हा मी आधी मांडलेला मुद्दा याही मुलाखतीत आला आहे. भाजप सरकारचा फोकस भारतीय जनतेवर आणि विरोधकांवर टीका करण्यात आहे.

भाजप सरकारचा फोकस भारतीय जनतेवर आणि विरोधकांवर टीका करण्यात आहे. >> मोदीवर फोकस ठेवायचा आहे असं म्हणा की !

Karoline Leavitt
@karolineleavitt
Trump White House Press Secretary

This morning at breakfast in Doha, my waiter told me to thank President Trump for him.

I asked him why.

He told me he is from Kashmir, and he has been unable to return home in recent weeks due to the India-Pakistan conflict.
But he was just notified that he’s now able to return, thanks to the ceasefire mediated by President Trump,
@VP
&
@SecRubio
. He said President Trump is not receiving enough credit for literally preventing a nuclear war — and he is right!

President Trump inherited so many conflicts around the globe, and he is tackling them one at a time.

This historic trip to the Middle East has marked a significant turn in U.S. foreign policy in the region that will finally usher the Golden Age of the Middle East!

Peace, through strength, is being restored!

पाकिस्तान मध्ये 12 ते 15 एप्रिल च्या दरम्यान सुद्धा 5.8 रीस्टर्स स्केल वरती भूकंप झाला होता. तो एरियाच भूकंपप्रवण क्षेत्र आहे.
तेव्हा भूकंपाचे कारणच भारताने केलेला हल्ला हे नरोवा कुंजरवो सारख वाटतय.

>>हॅव सम पेशंस. ट्रुथ विल कम आउट.. सूनर ऑर लेटर...>> बरं बुवा. तुम्ही म्हणता तर तसं.<<
भारत/पाकिस्तान या दोघांनी नुक हल्ला/लिकेजचा दावा ऑफिशियली फेटाळल्याने (काहि अनुत्तरीत प्रश्नांसह) या विषयावरील चर्चेला विराम द्यायला हरकत नाहि. एका थेट प्रश्नावर व्हाहाने घेतलेली "नरो वा कुंजरोवा" भूमिका मात्र संभ्रमात पाडते. असो..

अमेरिकेच्या सौजन्याने प्रसिद्ध झालेलं नॅरेटिव (नो नूक लीक) सगळ्यांच्या गळी उतरलेलं आहे, साधारण २००३ मधल्या "वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स" सारखं. या पार्श्वभूमीवर सत्य खरोखर बाहेर आलंय कि कधीहि बाहेर येणार नाहि याचा विचार प्रत्येकाने आपापल्या वैचारीक क्षमतेवर करावा...

https://www.uniindia.com/we-informed-pakistan-before-launching-operation...
ऑपरेशन सिंदूर हाती घेण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानला कळवलं होतं आम्ही पाकिस्तान आणि पी ओ के मधील दहशतवादी तळांवर हल्ला करू -
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

तात्या आता क्रेडिट घ्यायचं फेटाळतोय म्हणे. यु टर्न घेण्यात हा त्याच्या परम मित्राच्याही दोन पावलं पुढे आहे

US approves $304 million missile sale to Turkey as ties warm up
आपलं बघा

सामान्यांना तुर्की वर बॉयकॉट करायला सांगत आहेत आणि तिकडे राष्ट्रीय बिझनेसमन अझरबैजान सोबत बिसनेस डील करतोय.

आमच्या एका बिझिनेस ग्रुपवर तुर्कीला बॉयकॉट करा म्हणून मेसेज आला. चीनच्या उत्पादनावर का नाही, असा प्रतिप्रश्न केल्यावर ती व्यक्ती अजून फिरकली नाहीये. बहुधा चीनमध्ये उत्पादन ना होणाऱ्या वस्तू त्याला गवसत नसाव्यात

फार्स विथ द डिफरंस
थोडे वाचले. पण मला वाटतंय की वेळ काढून शांतपणे वाचायला पाहीजे. वाचणार.

Radiation? What’s a little radiation?
The Doctor, Doctor Who, “The Twin Dilemma”
zzzzzzzzzzzzzzzzzzzzz
A day without electromagnetic radiation is like a day without sunshine.
===Anonymous

<तात्या आता क्रेडिट घ्यायचं फेटाळतोय म्हणे. > नाही. ताजं वाक्य आहे - "I don't wanna say I did but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, अजून तरी माघार घेत नाहीए.
------
ऑपरेशन सिंदूरच्या कव्हरेजसाठी अश्विनी वैष्णव यांनी मीडियाचे आभार मानले.
आता भाजपने एक ट्वीट केलंय
https://x.com/BJP4India/status/1922516564026524061
पाकिस्तान कभी नहीं सुधरेगा और हो सकता है कि युद्ध भी हो, लेकिन क्या ऐसे लड़ेगा भारत?

ऐसे भारत विरोधी तत्वों को पहचानिए, जिन्होंने #OperationSindoor के समय अपने देश, देश की मीडिया और देश की सेना का मजाक बनाया था…

हमारे जवान तो जंग के लिए तैयार हैं, लेकिन क्या आप मन से तैयार हैं?

देखिए, ये रिपोर्ट...
टाइम्स नाउ नवभारतच्या सुशांत सिन्हाचा व्हिडियो आहे.

इथे तो फेक न्युज पसरवण्याला इन्फर्मेशन वॉर म्हणतोय आणि त्याला नावं ठेवणार्‍यांवरच दोषारोप करतोय.

याचा अर्थ सरळ आहे - या फेक न्युज भाजपच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या आशीर्वादानेच पसरवल्या जात होत्या.

या फेक न्युजचा एक टारगेट ऑडियन्स आहे. तो मग हीच मीडिया काँग्रेसला तुर्कस्थानबद्दल प्रश्न विचारते त्याच्या क्लिपा फिरवतात.

बरं. तुर्कस्थान काय पहिल्यांदा भारताच्या विरोधात गेला नाही. काश्मीरबद्दलचे घटनेचे कलम ३७० रद्द केले तेव्हाही त्यांनी आक्षेप घेतला होता. तरीही २०२३ मध्ये Celebi सोबत अदाणीने जॉइंट व्हेंचर्स केलीच.

तुर्कस्थानबद्दल बोलणारे हे लोक पाकिस्तानमध्ये दहशतवादाला जन्म देणार्‍या आणि आता त्याला आय एम एफ कर्ज देणार्‍या , भारत पाकिस्तानला एकाच पातळीवर मोजणार्‍या अमेरिकेबद्दल काही बोलणार नाहीत.

काहीच्या काहीच बातम्या दाखवणाऱ्या मीडियाला नावे ठेवणारे आपण सगळेच भारत विरोधी तत्वे ठरलो आहोत... Lol
(त्यातील आपण काही आधी पासूनच होतो ती गोष्ट वेगळी Wink )

मोदी विरोधी = भारत विरोधी. रेडिएशन लीकेज थियरी आपण लॉजिकली नाकारली. तरीही मोदी विरोधाचं लेबल लागलंच. यावरून मोदी समर्थक लॉजिकली विचार करू शकत नाहीत, हे आपोआप सिद्ध होते. Wink

टीव्ही वाहिन्या, फेसबुक, पेपर, काही मायबोली-बाह्य निरीक्षक व सर्वसाधारपणे सामान्य मानली जाणारी माणसे या सर्वांची मते आणि मायबोलीवरील अभ्यासकांची मते ही अश्या राजकीय विषयांवर पूर्णतः विरुद्ध असतात.

ही अश्या राजकीय विषयांवर पूर्णतः विरुद्ध असतात.
>>>>

राजकीय मतांबाबत कल्पना नाही पण इतर कित्येक बाबतीत भिन्न असल्याचा अनुभव आहे.
मायबोली हे वेगळेच जग आहे असे बरेचदा वाटते.
हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

>>> मायबोली हे वेगळेच जग आहे असे बरेचदा वाटते.
हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

'जगावेगळी माणसे' जमल्यामुळे व इतरत्र प्राप्त होणाऱ्या वैचारिक हतबलतेमुळे त्यांचा मौल्यवान वेळ ते येथे खर्ची घालत असल्यामुळे तसे वाटत असेल.

Pages