Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहुसंख्य लोकांची मते ती केवळ
बहुसंख्य लोकांची मते ती केवळ बहुसंख्य लोकांची आहेत म्हणून ती खरी आहेत असे नसते.
हे मी अमेरिकेतही पाहिले आहे, ९/११ च्या हल्ल्यात सामील असलेले बहुसंख्य तरुण सौदी होते, त्यात एकही इराकी नव्हता, सद्दाम चा तर संबंधही नव्हता, पण war on terror व weapons of mass destruction चा उन्माद मेडियाने ( त्यात न्यूयॉर्क टाईम्स ही आले) पेटवला व सामान्य लोकांना ते खरेच वाटू लागले होते. त्यावेळी 'आपण उगाचाच इराक वर का हल्ला करतोय ?' या प्रश्नाला ' अमेरिकेवर प्रेम नाही वाटतं तुमचं' असे उत्तर येत असे. सगळेच युद्धाला तळहातावर शीर (दुसर्यांचे) घेऊन तयार होते !
celebi प्रमाणे gulermak ला
celebi प्रमाणे gulermak ला देखिल बाहेरचा रस्ता दाखवला जाणार का?
सगळेच युद्धाला तळहातावर शीर
सगळेच युद्धाला तळहातावर शीर (दुसर्यांचे) घेऊन तयार होते !>>>>
सफरचंदे, संत्री वगैरे
सफरचंदे, संत्री वगैरे
weapons of mass destruction
weapons of mass destruction चा उन्माद मेडियाने
>>>> मीडियापेक्षा राजकारणी जास्त दोषी आहेत या केसमध्ये. उदा. टोनी ब्लेअरचे भाषण
गुलरमॅक ही तुर्कीची बांधकाम
गुलरमॅक ही तुर्कीची बांधकाम कंपनी भारतातील अनेक मेट्रो प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. त्यांनी पुणे मेट्रो (पॅकेज १ आणि पॅकेज २) वर काम केले आहे आणि कानपूर मेट्रो आणि सुरत मेट्रोमध्ये देखील सहभागी आहेत. भक्तांना एक प्रश्न - आता पुणे मेट्रोवर पण बहिष्कार टाकणार का?
ही बाई कपिल शर्माचं मार्केट
ही बाई कपिल शर्माचं मार्केट खाणार.

Op सिंदूर दरम्यान turkey
Op सिंदूर दरम्यान turkey पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला. त्याला विरोध किंवा त्यांच्या उत्पादनाला विरोध करणे ही भारतीयांची सहज प्रतिक्रिया आहे. त्यांना भक्त म्हणून फार फार तर आपल्या गुलामगिरीचे दर्शन होईल.
शशी थरूर यांनी भारताची बाजू मांडली म्हणून त्याना पण काँग्रेस मधून विरोध होतोय.
चीनवर बहिष्काराचं नाटक किती
चीनवर बहिष्काराचं नाटक किती दिवस चाललं?
अमेरिकेवर बहिष्कार का नको?
विकु, ते बहुसंख्य लोकांचं मत
विकु, ते बहुसंख्य लोकांचं मत आहे हे कसं कळतं? आपल्या वर्तुळातल्या बहुसंख्य लोकांचं मत म्हणजेच एकंदरित बहुसंख्य लोकांचं मत का?
माहिती युद्धhttps://www
माहिती युद्ध
https://www.economist.com/asia/2025/05/15/chinese-weapons-gave-pakistan-...
https://www.bloomberg.com/news/articles/2025-05-13/success-of-chinese-je...
https://www.businesstoday.in/india/story/india-is-alone-security-analyst...
---
PM Modi likely to meet NDA CMs on May 25 ऑपरेशन सिं दूरची माहिती देण्यासाठी - फक्त एन डी ए का? मोदी फक्त एन डी ए चे पंतप्रधान आहेत की भारताचे?
India to send all-party delegation to brief countries on conflict with Pakistan इथे मात्र ऑल पार्टी.
'जगावेगळी माणसे' जमल्यामुळे व
'जगावेगळी माणसे' जमल्यामुळे व इतरत्र प्राप्त होणाऱ्या वैचारिक हतबलतेमुळे
>>>
ज्या देशाचे अभिनेते नॉनबॉयॉलॉजिकली जन्मले आहेत, त्या देशाच्या प्रजेचं हे असं असं व्हावं हे त्या मानाने काहीच नाही. मला अजून बर्याच अपेक्षा आहेत.
नॉनबायोलॉजिकली म्हणजे
नॉनबायोलॉजिकली म्हणजे इल्लॉजिकली का?
>>> नॉनबायोलॉजिकली म्हणजे
>>> नॉनबायोलॉजिकली म्हणजे इल्लॉजिकली का
नव्हे. काही संज्ञा काहीजण काही विचारघटकांसाठी वेगळ्या जपून ठेवतात व त्या कधीही वापरात येऊ नयेत याची दक्षता घेतात
नाही नाही. अवतार जन्मायचा
नॉनबायोलॉजिकली म्हणजे इल्लॉजिकली का?
>>
नाही नाही. अवतार जन्मायचा म्हणल्यावर केवढी प्रोसेस नि लॉजिक असेल. आपण मंत्रालॉजिकली म्हणू.
(ते एक मध्येच आले म्हणून एडिट केलं. नाहीतर मायबोलीवर एडिट करण्याइतकी अटीतटी कधी येत असेल असं वाटत नाही. )
Seriously , don't understand,
Seriously , don't understand, why so personal, always
>>> आपण मंत्रालॉजिकली म्हणू
>>> आपण मंत्रालॉजिकली म्हणू
काय तुम्ही म्हणाल तसं. 'अभि-नेते' हे आवडण्यात आलेलं आहे बाकी!
अपौरुषेय
अपौरुषेय
हा शब्द कसा आहे?
म्हणजे जसे वेद हे अपौरुषेय मानले जातात.
हे बघा, आम्ही अकरावी पासून
हे बघा, आम्ही अकरावी पासून बायोलॉजी सोडलं, आणि व्होकेशनल सब्जेक्ट निवडला.
म्हणजे आम्ही नॉनबायोलॉजीकल झालो की नाही?
यात काय इल्लॉजिकल किंवा मंत्रालॉजिकल आहे?
अपौरुषेय
अपौरुषेय
>>>
ऑप्शनल धडे एकदम अभ्यासाला घेताय. थांबा जरा.
मानव तुम्ही मानव असून बायोलॉजी सोडलं? नॉनबायोलॉजिकल वाल्यांनी काय काय सोडायचं मग. थांबा जरा विचार कराय पायजे. युद्ध परिस्थितीत शांत डोक्याने वागावं.
यंत्रमानव म्हणावे का?
यंत्रमानव म्हणावे का?
>>> मानव तुम्ही मानव असून
>>> मानव तुम्ही मानव असून बायोलॉजी सोडलं?

>>> यंत्रमानव म्हणावे का?
मंत्रमानव ना?
नाही नाही हो . ओके.
नाही नाही हो . ओके.
मंत्र म्हणजे programming असे असेल तर ठीक आहे. जास्त नाही लिहित.
मंत्र म्हणजे programming
मंत्र म्हणजे programming
>>
अहो सुख दु:ख म्हणजे जीवनातलं बायनरी कोड- असं सांगणारे नरोत्तम आहेत इथं. हिंजवडीत ऑफिसंही येतील त्यांची आता.
सध्या तुम्ही कुठचीही पॉसिबिलिटी रूल-आऊट करू नका. यात काय संधी मिळतेय का ते बघा उलट. मार्केट मोठं आहे. युद्धकाळ आहे. युद्धकाळ आहे असं मानणारे आहेत. युद्धकाळ आहे असं नुसतं म्हणणारे आहेत. युद्धकाळ आहे असं पटवणारे आहेत. युद्धकाळ आहे असं स्वतःशी घोकणारे आहेत. डोंट वरी.
न्यू यॉर्क टाईम्सच्या
न्यू यॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमधे सॅटेलाईट इमेजच्या सहाय्याने असे म्हटले आहे कि दोन्ही देशांनी जेव्हढे मोठे दावे केले तितके नुकसान दोन्हीही देशांचे झालेले नाही.
https://www.nytimes.com/interactive/2025/05/14/world/asia/india-pakistan...
After New York Times, Washington Post analysis of Indian strikes on Pakistan show extent of damage
Read more At:
https://www.aninews.in/news/world/us/after-new-york-times-washington-pos...
रानभुली, New York Times आणि
रानभुली, New York Times आणि Washington Post दोन्ही भारताच्या बाबतीत पक्षपाती आहेत.भाराताबद्दलच्या बातम्या एकांगी असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी भाररतीय लष्कराने केलेल्या व्यक्तव्यांवर मी जास्त विश्वास ठेवेन.
विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे
विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हा इथे प्रश्न नाही.
विदेशी मीडीयात काय रिपोर्टिंग आहे याची माहिती घेणे हा उद्देश आहे.
युद्ध सुरू.
युद्ध सुरू.
माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध अमुचे सुरू
जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू
वरचे फोटो पाहता असं जाणवतं की
वरचे फोटो पाहता असं जाणवतं की आपले हल्ले अत्यंत अचूक (precision) होते. एअर फोर्सच्या धावपट्टीची (runway) रुंदी किती असते हे माहीत नाही, पण जर क्षेपणास्त्र काही फूट इकडे-तिकडे पडली असती, तर तो हल्ला अपयशी ठरला असं म्हणावं लागलं असतं.
आपण त्यांच्या तीन हँगर्सवर क्षेपणास्त्र डागली, पण त्या वेळी तिथे किती विमाने उभी होती, किती नष्ट झाली हे पाकिस्तान कधीच उघड करणार नाही.
सामान्य जनतेमध्ये (मायबोलीवर
सामान्य जनतेमध्ये (मायबोलीवर सगळेच असामान्य आहेत, त्यांना लागू नाही) आता युद्धाबद्दल उत्सुकता ,उन्माद ओसरला आहे. पण फुंकर मारून मारून त्याला धुगधुगी आणायचे काम मोदी, भाजप आणि गोदी मीडिया करत आहे असे दिसतेय.
Pages