ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकिस्तान एअर फोर्स शक्तिशाली आहे

ज्या देशातील नऊ अतिरेकी तळ — तेही आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून 200 किलोमीटर आत — हल्ला होणार हे माहीत असतानाही उध्वस्त करून घेतले गेले असतील, आणि हे कमी की काय म्हणून लाहोरमधील हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणाही नष्ट करुण घेतली असेल, तर अशा देशाच्या वायुदलाला खरंच "शक्तिशाली" म्हणावं लागेल!

ही तर केवळ पहिल्या दिवसाची कामगिरी.

तिसऱ्या दिवशी, नऊ हवाई तळांवर ब्रह्मास्त्रसारख्या nuclear capable क्षेपणास्त्रांचे हल्ले सहन करून घेतले असतील, तर पाक वायुदल केवळ शक्तिशाली नव्हे, तर "महाशक्तिशाली" ठरतं!

आता समजा ह्या कारवाईदरम्यान एखादं राफेल विमान पडलं असेल तर?
शत्रूवर हल्ले करायचे आणि आपल्याला काहीही नुकसान होऊ नये — ही अपेक्षा फक्त एखाद्या हिंदी चित्रपटात किंवा इस्रायल-हमाससारख्या युद्धातच शक्य आहे.

बरं, राफेल पडलं असतं तर, एकाही चॅनेलने त्याचे अवशेष का दाखवले नाहीत?
कदाचित सगळे चॅनेल भाजप समर्थक आहेत, म्हणून त्यांनी बातमी दडपली असेल.
पण सामान्य जनतेने पाकिस्तानी ड्रोनचे अवशेष दाखवले — राफेलचे नाही.
कदाचित त्यांनाही ED ची भीती वाटत असेल.
चिनी सॅटेलाइटने सुद्धा फोटो दाखवले नाहीत — खरंच कमाल आहे!

आता पाकिस्तानने काही दावे केले आहेत —
S-400 उध्वस्त, उधमपूर हवाई अड्डा नष्ट,
ब्रिगेड मुख्यालय उध्वस्त!

ChatGPT! नुसार, भारताच्या एका ब्रिगेड मुख्यालयात सुमारे 3,000 सैनिक असतात.

तरी नशीब असं की, ह्या वेळी भारताने दिलेला तडाखा एवढा जबरदस्त होता की —
उरी आणि बालाकोटच्या वेळेस “हे काही झालंच नाही” असं म्हणणाऱ्या पाकिस्तानी सरकारला आणि पाक प्रेमी जनतेला यावेळी "पुरावे द्या" असं म्हणायला तोंडचं उरल नाही.

भाजपाला विरोध करता करता आपण देश विरोधी भूमिका घेतोय हे काँग्रेसला उरी आणि balakot नंतर समजल्यामुळे ह्या वेळी ते शांत राहिले पण समर्थक ते समर्थकच.

अगदीच अनपेक्षित

https://www.ptinews.com/story/national/PM-s-photo-on-train-ticket-saluti...
PM's photo on train ticket saluting heroes of Operation Sindoor tribute to our soldiers: Railways

पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून आणि नंतर जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून मारल्या गेलेल्यांच्या डेथ सर्टिफिकेट्सवर सुद्धा मोदींचं छायाचित्र द्यायला हवं.

>>> पेहेलगाम घटनेचे मोदीभक्तांना दु:ख नसून आनंदच झाला आहे हे माझे निरिक्षण बरोबर आहे.

मुळात भक्त, मोदी भक्त, अंध भक्त या संज्ञा भयंकर क्रोधातून निर्माण झालेल्या आहेत. तेवढे सोडून देऊ.

हा वरचा आरोप म्हणजे विचार व्यक्त करायला फुकट व्यासपीठावर अत्यंत हीन स्वरूपाचे विधान करणे आहे, जर ते विधान गंभीरपणे केले गेले असेल तर! जर ते गांभीर्याने केले गेले नसेल तर या सदस्याचे कोणतेही विधान गांभीर्याने घेण्याची यापुढे काहीही गरज नाही. येथे एकही माणूस असा नसेल ज्याला त्या हल्ल्यात निरपराध भारतीय नागरिक मेले याचा केवळ 'मोदी सरकारला राजकीय फायदा होऊ शकतो' म्हणून आनंद झाला असेल.

विजय कुलकर्णी यांचे ते विशिष्ट विधान येथील प्रशासनाला मान्य आहे की अमान्य हे कळल्यास बरे होईल.

>>> पेहेलगाम घटनेचे मोदीभक्तांना दु:ख नसून आनंदच झाला आहे हे माझे निरिक्षण बरोबर आहे.

मुळात भक्त, मोदी भक्त, अंध भक्त या संज्ञा भयंकर क्रोधातून निर्माण झालेल्या आहेत. तेवढे सोडून देऊ.

हा वरचा आरोप म्हणजे विचार व्यक्त करायला फुकट व्यासपीठावर अत्यंत हीन स्वरूपाचे विधान करणे आहे, जर ते विधान गंभीरपणे केले गेले असेल तर! जर ते गांभीर्याने केले गेले नसेल तर या सदस्याचे कोणतेही विधान गांभीर्याने घेण्याची यापुढे काहीही गरज नाही. येथे एकही माणूस असा नसेल ज्याला त्या हल्ल्यात निरपराध भारतीय नागरिक मेले याचा केवळ 'मोदी सरकारला राजकीय फायदा होऊ शकतो' म्हणून आनंद झाला असेल.

विजय कुलकर्णी यांचे ते विशिष्ट विधान येथील प्रशासनाला मान्य आहे की अमान्य हे कळल्यास बरे होईल. >>> बेफिकीर + १

***********************************************
काही लोकांना रिलेव्हंट राहण्यासाठी अशी विधानं करावी लागतात हे यावरून लक्षात येतं.

दोन्ही बाजूंचे राजदूत हैदराबाद येथे शिखर परीषदेत भेटणार असल्याने इथेही सीजफायर व्हावे.

इथे केलेली सर्व विधाने प्रशासनाला मान्य असायलाच हवीत असे आहे का? हिमेश रेशमिया हा सर्वश्रेष्ठ गायक आहे असे विधान मी करेन, ते प्रशासनाला मान्य असायलाच हवे का ? नसेल तर त्यांनी ते काढून टाकावे का ?

इथे केलेली विधाने खोटी आहेत हे सिद्ध करायचा किंवा तसे नमूद करायचा हक्क सर्वांनाच आहे. एखादे विधान आवडले नाही की लगेच प्रशासनाकडे धाव घ्यावी का ?

त्याच्याशी मला काही देणंघेण नाही. आताच्या भारत पाक संघर्षात रोज उठून ते जी विधानं करतात, त्याबद्दल मी बोलतोय.
काय ती गेले काही दिवस मी इथे लिहीत आलोय. तुम्ही मागे जाऊन वाचू शकता.

मुळात दोन देशांच्या मामल्यांत तिसर्‍या देशाने सीझफायर झाल्याची घोषणा करणे हा भारताच्या सार्वभौमिकतेवर घाला आहे, हेच तुमच्यातल्या काहींना कळत नाही किंवा मान्य नाही.

>>> इथे केलेली सर्व विधाने प्रशासनाला मान्य असायलाच हवीत असे आहे का? हिमेश रेशमिया हा सर्वश्रेष्ठ गायक आहे असे विधान मी करेन, ते प्रशासनाला मान्य असायलाच हवे का ? नसेल तर त्यांनी ते काढून टाकावे का ?

तसे नाहीये ते, तितके किरकोळ नाहीये.

तुमच्या विधानाचा अर्थ असा होतो.

बहुमताने व लोकशाही पद्धतीने आणि स्वेच्छेने निवडून आणलेल्या सरकारला पुढेही राजकीय लाभ व्हावा म्हणून हा निरपराध लोकांवरील हल्ला व सव्वीसजणांची हत्या या गोष्टी त्या 'पक्षाला निवडून आणणाऱ्या' सर्वांना आनंददायी वाटत असणार, असे तुमचे विधान आहे.

काय त्या दोनशे, तीनशे सीट्सना मतदान करणाऱ्या लक्षावधी लोकांना तुम्ही अमानवी वृत्तीचे ठरवत आहात.

तुम्ही इथे नसताच की असता ही गोष्ट वेगळी! त्याबद्दल काही म्हणण्याचा अधिकार कोणालाच नाही.

आता तुमचे हे विधान या संकेतस्थळावर जर कायम राहिले तर तर ते authenticate होईल. ते तसे होण्यास प्रशासन राजी आहे की कसे हे येथे फक्त विचारले. ती तक्रार नव्हे. लॉजिकल शंका आहे. याचे कारण असे, की कोणत्याही 'सहृदय' (शब्द ऐकला असेलच) माणसाला कोणीतरी सामान्य माणूस असा मरणे याचा आनंद होत नसतो. निदान इतकेही भान ठेवायचे नसेल तर तुम्ही ज्या कथित भक्तांच्या कथित वृत्तीबाबत लिहिले आहेत त्यापेक्षा तुमची हे लिहितानाची वृत्ती हिणकस व आकसयुक्त आहे असे खेदाने म्हणावे लागेल.

(Nothing personal, I had to mention it because you left no alternative).

>>> एखादे विधान आवडले नाही की लगेच प्रशासनाकडे धाव घ्यावी का

ते अतिरेकी आणि त्यांचे पाठीराखे सोडून फक्त एक माणूस असा सांगा जो हा हल्ला झाल्याबद्दल खासगीततरी आनंद व्यक्त करेल. तुमचे हे विधान या संकेतस्थळाला मान्य असलेले विधान आहे का हे जाणून घेणे आजच्या अति संवेदनशील परिस्थितीत रास्त आहे असे वाटले म्हणून ते सर्वांसमक्ष विचारले.

'विधान आवडले नाही' म्हणून 'प्रशासनाकडे धाव घेतली' असे काहीही नाही.

>> ते अतिरेकी आणि त्यांचे पाठीराखे सोडून फक्त एक माणूस असा सांगा जो हा हल्ला झाल्याबद्दल खासगीततरी आनंद व्यक्त करेल

पुलवामा नंतर चे अर्णब गोस्वामीच व्हात्सआप चाट बाहेर आले होते, ते आठवले.

“पेहेलगाम घटनेचे मोदीभक्तांना दु:ख नसून आनंदच झाला आहे हे माझे निरिक्षण बरोबर आहे.”
>>>
हे एंगेजमेंट फार्मिंगसाठी केलेले विधान आहे. त्याला तेवढेच महत्व द्यावे.

“पेहेलगाम घटनेचे मोदीभक्तांना दु:ख नसून आनंदच झाला आहे हे माझे निरिक्षण बरोबर आहे.”>>> मला तर वाटतं अश्या निरीक्षकालाच ह्या गोष्टीचा आनंद झाला असेल.. म्हणुन अशी विधानं इथे होवु शकतात..

मुळात भक्त, मोदी भक्त, अंध भक्त या संज्ञा भयंकर क्रोधातून निर्माण झालेल्या आहेत## सही है! पप्पू, भक्तांडू, लिंब्रांडू ह्या संज्ञा कोणावरच्या प्रेमापोटी तयार केल्या गेल्या?हवंतर 100 करोड की विधवा, दीदी ओ दीदी, कटवे हे सगळं देखिल जोडायला हरकत नसावी.

याबाबत मला शंका विचारायचीच होती, ते मूळ विधान करणाऱ्यांना!

की:

'मोदींभक्तांना आनंद झाला आहे हे माझे निरीक्षण बरोबर आहे'

यात:

मोदीभक्त म्हणजे खालीलपैकी कोण?

■ मोदी ज्या मतदारसंघातून निवडून आले तेथील त्यांना मतदान करणारे?

■ मोदी ज्या भाजप पक्षाचे सांसदीय नेतृत्व करतात त्या पक्षाच्या सर्व आमदार, खासदारांना मतदान करणारे?

■ या संकेतस्थळावर जे मोदी किंवा भाजप यांच्या निर्णयांचे समर्थन करतात ते?

यापैकी कोणत्या घटकाला आनंद झाल्याचे स्वतःचेच निरीक्षण बरोबर आहे असे हे स्वतःच म्हणत आहेत?

Tapan Kumar Deka, the chief of Intelligence Bureau (IB), was on Tuesday given one-year extension till June 2026, according to a Personnel Ministry order.
Appointed as the IB chief for two years in 2022.

—In 2024, the tenure of Deka was extended till June 2025.

Considered an expert in ‘operations’ especially in Jammu and Kashmir as well as in the Northeast region

आंतरराष्ट्रीय राजकारणावर चांगला अभ्यास करावा असं मला फार वाटू लागलं आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकीस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यानंतर मी काही अंदाज मांडले होते.
१. २०१४ पासून बदललेल्या विदेशनीतीचा परिणाम म्हणून सगळे देश आपल्या बाजूने उभे राहतील. पाकिस्तान एकटा पडेल.
२. दोन्ही देशांतील शस्त्रसंधीसाठी अमेरिका पुढाकार घेईल. मित्र डोलांड पाकिस्तानच्या अध्यक्षांना अमेरिकेत बोलवून त्यांच्या प्रेससमोर “you don’t dictate us what to do”, “you don’t have the cards”, असे खडे बोल सुनावेल.
३. त्यानंतर आपण शस्त्रसंधी करू, पण त्या बदल्यात अनेक अटी पाकिस्तानकडून मान्य करवून घेऊ. त्यात एखादी अट ही पाकिस्तान त्यांचा काश्मीरवरचा हक्क सोडेल, ही असेल.
४. पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत, कर्ज बंद होईल. किमान काही महिने डिले तरी होईल.
५. त्यानंतर जगासमोर बाजू मांडण्यासाठी पाकिस्तान एक शिष्टमंडळ नेमेल. त्यातील नेते जगभर फिरून आमचा दहशतवादावर नक्की काय स्टॅंड आहे, हे सगळ्यांना पटवून सांगतील.
.
.
पण माझे हे अंदाज चुकले आहेत.
कदाचित अतिशय तुटपुंजा अभ्यास, फेसबुक/इंस्टावर केवळ रील बघण्यात वेळ घालवल्यामुळे माझं आकलन चुकलं असावं.
तुमच्या माहितीत कोणी इंटरनेशनल पॉलिटिक्सचा तज्ज्ञ असेल, तर सांगा. त्याला/तिला फॉलो करतो.

अपूर्व कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट

मोती श्री?! Lol
‘कुंभी श्री’ नरकात धाडा अशांना! Proud

युद्ध किंवा कोणताही संरक्षणविषयक बाबतीत ज्याला माहिती आहे तो / ती काहीही बोलणार नाही. बोलत असेल तर ती व्यक्ती त्या पदावरून लागलीच उचलली जाईल. जे आपण ऐकतो ते आपल्याला ठरवून ऐकवलेले असते. त्यावरून वादावादी करणे व्यर्थ आहे. एक सजग नागरिक म्हणून अशा गोष्टींकडे लक्ष न देणे हेच आपले परम कर्तव्य आहे.

ह्याचा अर्थ असा नाही की कुणी कुणाला प्रश्न विचारू नयेत. काही गोष्टी लपून रहात नाहीत. आणि काही प्रश्न विचारणे हा आपला हक्क आहे. उदा. पहलगामचे अतिरेकी पकडले का?

भरत तुमचा अभ्यास चांगलाच आहे. त्यामुळे तुम्ही काय शिकवणी वगैरे लावू नका. बिनधास्त इंस्टा रील्स बघा. आवडली तर आम्हांला पण पाठवा.

बाकी मित्र डोलांडविषयी—-
आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणीही पर्मनंट मित्र नसतो. अमेरीकेसारखा पॉवरफुल देश तर नक्कीच नाही. बरेच देश ट्रान्झॅक्शनल डिप्लोमसी करतात व त्यांच्या तत्कालिन फायद्याला अनुसरून करतात. आणि या सगळ्यात मित्र डोलंड ‘बुल इन चायना शॉप’एवढ्या नजाकतीने वावरतो.
अमेरीकेन डिफेन्स इंडस्ट्रीचा थोडा फार फायदा होऊ देणे यापलीकडे मित्राने पाकिस्तानला सर्वस्वी ह्युमिलिएट होऊ न देऊन काय अचिव्ह केले याबाबत शंकाच आहे.
माबोवरील स्वघोषित तज्ञांसारखी त्याला आपल्या मतांबद्दल प्रचंड खात्री असल्याने त्याच्या मते त्याने होऊ घातलेले न्युक्लीअर वॉर थांबवले व तो स्वतःला नोबेल पीस प्राईज वर्दी समजतो हे बाजूला ठेवू.

आपणही आता ट्रान्झॅक्शनल डिप्लोमसी करतो व जाहिररित्या करतो. रशिया युक्रेन युद्धात आपण युक्रेन गटात जाऊन रशियन नॅचरल रिसोर्सेसवर बंदी जाहिर केली नाही हे युक्रेन व त्याला सपोर्ट करणाऱ्या बऱ्याच (विशेषतः युरोपिअन) देशांना पटलेले नाही.

आता कळलं ट्रम्प आपल्या विश्वगुरुला त्रास का देतोय. House of representatives ला US Congress म्हणतात. Congress एक सभागृह कंट्रोल करतंय आणि ट्रम्पला आपल्या विश्वगुरुला त्रास द्यायला मजबूर करत आहे. विश्वास बसत नसेल तर अर्णब ला विचारा Happy Happy Happy Happy

Pages