Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>"फार उलट सुलट बातम्या आहेत,
>>"फार उलट सुलट बातम्या आहेत, आणि फोटोज , व्हिडिओज ना तर काही अर्थ नाही. ए आय जनरेटेड कन्टेन्ट पण खूप येते अहे.
पाक मधे भूकंप झाला , लीकेज झाले वगैरे थिअरीजच आहेत.">>
moneycontrol.com वरच्या बातमीतला हा उतारा...
The NYT report said that India's air-to-surface missile attack on the Nur Khan base became a significant cause for concern for Pakistan as India had almost reached the heart of the country's key nuclear unit.
A US official familiar with Pakistan’s nuclear programme told The New York Times that Pakistan’s deepest fear was of its nuclear command authority being decapitated. "It could have been interpreted as a warning that India could do just that."
ज्या न्युयॉर्क टाईम्सच्या हवाल्याने त्यांनी हे वृत्त दिले आहे त्याच NYT च्या ऑनलाईन एडिशनमध्ये सर्वात आधी भूकंप, लीकेज आणि रेडिएशन स्निफर विमानाबद्दलची बातमी झळकली होती जी आता दिसत नाहिये. २२ तारखेला झलेल्या हल्ल्याची बातमी देताना त्यात मिलिटंट्स असा शब्द वापरल्यावर सरकारी विभागाने खडसावल्यावर पुढे जसा बदल करुन 'टेररिस्ट' हा शब्द वापरावा लागला होता तसाच काहितरी सरकारी दट्ट्या 'क्लासिफाईड इंफॉर्मेशन' प्रसिद्ध केल्याबद्दल अमेरिकन सरकारकडुन आल्याने ती बातमी हटवली असावी किंवा मजकुरात सुधारणा केली असावी बहुतेक. प्रिंट मिडियाच बरा म्हणायचा, एकदा छापुन झाल्यावर त्यात निदान मजकुरात फेरफार, दिलेली बातमीच काढुन टाकणे असले प्रकार तरी करता येत नाहीत!
एकंदरीत देशी काय नी विदेशी काय सगळीच मिडिया हाऊसेस 'भांड' झाली आहेत असंच वाटतंय आता...
हल्ली ना तज्ञांऐवजी
युद्ध म्हणजे रोमँटीक चित्रपट नाही - माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे
आणि हल्ली ना तज्ञांऐवजी स्वयंघोषित प्रतिनिधीच हिरीरीने बाजू मांडतात.
दोघेही भारतीय नागरिकांसाठी
दोघेही भारतीय नागरिकांसाठी विश्वासघातकी. >>>
+1
विश्वासघातकी भाजप असताना आपल्याला पाकसारख्या राष्ट्रांना शत्रू मानायची काय गरज?
छापील पेपरातल्या बातम्या
छापील पेपरातल्या बातम्या त्याच वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर मिळत नाहीत, असा अनुभव नुकताच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी घेतला आहे.
न्यु यॉर्क टाइम्समधल्या मनी कंट्रोलने संदर्भ दिलेल्या बातमी ची लिंक मी https://www.maayboli.com/node/86696?page=11 भारतीय वेळेनुसार १५:२० ला दिली होती. (सबसे तेज हमीच है) द्यायच्या आधी संपूर्ण बातमी वाचली होती. त्यात लीकेजबद्दल वाचल्याचं आठवत नाही. न्युक्लियर वॉर हेड स असलेल्या भागाच्या जवळच हल्ला झाला, आणि त्यामुळे अमेरिका खडबडून जागी झाली हे वाचल्याचं आठवतं. तर आता तीच बातमी वाचायला सब्स्र्काइब करा म्हणताहेत.
२०१४ नंतर मिडियाच काय ,
२०१४ नंतर मिडियाच काय , संसंदेतही रमेश बिधूरी सारख्यांची भीड चेपली गेली आहे. ह्याला जबाबदार कोण?
न्यूयॉर्क टाईम्स वाचायला
न्यूयॉर्क टाईम्स वाचायला नेहमीच सब्स्क्राईब करावं लागतं. तुम्हांला पहिल्यांदा ते न करता वाचता आली हेच आश्चर्य.
या आधी अनेकदा तिथल्या
या आधी अनेकदा तिथल्या बातम्या वाचल्या आहेत.
हे फोनवरून वाचलं होतं आणि लिंक मला आयती मिळाली होती.
मी पण वाचलेलं आहे न्यूयॉर्क
मी पण वाचलेलं आहे न्यूयॉर्क टाईम्स.
नंदादेवी इथल्या एका सीक्रेट ऑपरेशन्स बद्दलची बातमी / लेख इथेच मिळाला होता. बहुतेक जुन्या बातम्या वाचता येत असतील.
>>"न्यूयॉर्क टाईम्स वाचायला
>>"न्यूयॉर्क टाईम्स वाचायला नेहमीच सब्स्क्राईब करावं लागतं. तुम्हांला पहिल्यांदा ते न करता वाचता आली हेच आश्चर्य.">>
हो... पण,
"Create a free account, or log in.
Gain access to limited free articles, news alerts, select newsletters, podcasts and some daily games."
हा एक साधा सोपा असा अधिकृत पण मर्यादीत वापराचा पर्याय आहे आणि दुसरा ब्राउझर मध्ये Inspect / Web Developer Tools आदी वापरुन थोडा गोलमाल करुन वाचण्याचा किचकट असा अनधिकृत पर्यायही आहे 😀
अर्थात भरत हे असा काही गोलमाल करुन बातम्या वाचत असतील असे मलातरी अजिबात वाटत नाही, बहुतेक त्यांनी limited free articles, news alerts, select newsletters साठीचा पहिला पर्याय निवडला असावा असा अंदाज! त्यामुळे चु.भु.दे.घे.
वर्ड्ल सोडवण्यासाठी न्यु
वर्ड्ल सोडवण्यासाठी न्यु यॉर्क टाइम्सवर नाव नोंदवलेलं आहे. पैसे भरत नाही. त्यामुळे कदाचित डेस्क टॉपवरून बातमी वाचता आली नसेल. बघू पुढे कधीतरी
---------
कालचं तीन + एक - सशस्त्रदल प्रमुखांचं प्रेस ब्रिफिंग. बघायला आता वेळ मिळाला.
https://x.com/SpokespersonMoD/status/1921853833459732594
पण न्यूक्लिअर रेडिएशन लिकेज
पण न्यूक्लिअर रेडिएशन लिकेज हे फार मोठं आणि गुंतागुंतीचं प्रकरण असतं ना? असं सहज दाबून ठेवता येतं? म्हणजे अमेरिका आणि पाकिस्तान ते आपापसात ठेवून दाबून ठेवताहेत?
आणि पाकिस्तानात भूकंप ५ मे ला दोन, १० मे ला दोन आणि आज एक असे दिसत आहेत.
जे US DOE चे N111SZ विमान रावळपिंडीला दिसलं असं म्हंटलय ते अमेरिकेने पाकिस्तानला २०१० मध्ये दिलं, त्याचं लायसन्स रिन्यू करावं लागतं असंही वाचनात आलंय.
"आता भारत उघडपणे आपण न्यूक्स साईटवर हल्ला केला हे का कबूल करेल , आणि पाकिस्तान आपली नाचक्की होईल म्हणुन कबूल करणारच नाही" असं म्हणुन आपण त्यांचा न्यूक्स साईटसना टारगेट केलेच होते आणि बहुतेक न्यूक्स नष्ट केले, रेडिएशन लिकेज झालेच आहे असे मानू शकतो.
आपले जे या ऑपरेशनचे अथवा आधीपासून जे धोरण आहे त्यात न्यूक्लिअर रेडिएशन मुळे होणारी हानी बसते का बघा एकदा.
संजय भावे, एखादी न्यूज
संजय भावे, एखादी न्यूज वाचायची असल्यास ते टायटल घेऊन गुगल केल्यास इतरत्र (साईट्स) वाचता येते. अगदी न्यूयॉर्क टाईम्सच वाचायला हवा असं काही नाही. मसाला साधारण सगळीकडे सेमच असतो.
वर्ड्ल सोडवण्यासाठी न्यु
वर्ड्ल सोडवण्यासाठी न्यु यॉर्क टाइम्सवर नाव नोंदवलेलं आहे. पैसे भरत नाही. त्यामुळे कदाचित डेस्क टॉपवरून बातमी वाचता आली नसेल. बघू पुढे कधीतरी>>>>
https://www.removepaywall.com/search?url=https://www.nytimes.com/2025/05/10/us/politics/trump-india-pakistan-nuclear.html
सॉरी .. मी न्यूयॉर्क टाईम्स
सॉरी .. मी न्यूयॉर्क टाईम्स सबस्क्राईब केलेला आहे हे आत्ता लक्षात आलं.
कधी केलेला आठवत नाही.
आचार्य प्रशांत म्हणून एक आहेत
आचार्य प्रशांत म्हणून एक आहेत. खालील व्हिडिओमध्ये एकूणच सद्यस्थितीबद्दलचं (तसेच न्युक्लीअर रॅडिएशन्सच्या परिणामांबद्दलचं) त्यांचं भाष्य विचार करण्यासारखं आहे.
https://m.youtube.com/watch?v=jBIVQIy9Q4s
ही कथा असती तर या लिंक्सचा
ही कथा असती तर या लिंक्सचा वापर केला असता. पण ...
https://www.aircharterservice.co.in/about-us/news-features/blog/rushing-...
https://thecommunemag.com/egyptian-plane-with-boron-us-plane-checking-ra...
आम्ही किराणा हिल्सवार हल्ला
आम्ही किराणा हिल्सवार हल्ला केलाच नाही असे एअरमार्शल ए. के. भारती ह्यांनी सांगितले आहे. मग रेडिएशनचा प्रश्नच उद्भवत नाही. कशाला अमेरिकेच्या माध्यमांवर विश्वास ठेवायचा?
न्यूक्लिअर रेडिएशन लिकेज>>>
न्यूक्लिअर रेडिएशन लिकेज>>> म्हणजे काय? reactor म्हधून रेडिएशन होत असते हे समजते. पण अण्वस्त्राम्धून लीकेज? हे प्रथमच ऐकतो आहे.
किराना हिल्स
https://en.wikipedia.org/wiki/Kirana_Hills_Site
हे विकिचे पान आहे हे जरा वाचा. हे किती कॉम्प्लीकेतेड आहे त्याची कल्पना येईल.
मेरे प्यारे देशवासियो ...
मेरे प्यारे देशवासियो ...
मोदीनी भरमसाठ केलेल्या
मोदीनी भरमसाठ केलेल्या विदेशयंत्रांचे फलित म्हणून भारतासोबत एकही देश उभा राहिला नाही. (इस्रायल वगळता)
न्यूक्लिअर रेडिएशन लिकेज>>>
न्यूक्लिअर रेडिएशन लिकेज>>> म्हणजे काय?>>
स्टोअर केलेल्या न्यूक्लिअर बॉम्ब्सवर मिसाईल्स डागले तर त्याचे न्यूकिलर एक्स्लोजन (फ्युजन/फिशन) तर होणार नाही पण मिसाईल इतर वार हेड्स यांच्या एक्सप्लोजन मुळे शिल्डिंग मटेरियल फुटून न्यूक्लिअर मटेरीयल इतस्ततः विखुरले गेले. म्हणजे असे समजा. तर पर्यावरणात होणारे रेडिएशन (लिकेज). तर यातून किती हानी होईल हे किती आणि किती मोठे न्यूक्स होते यावर अवलंबून राहील. पण यांचा दावा आहे त्या नॉन न्यूकिलर एक्सप्लोजन मुळे दोन भूकंप झाले!
म्हणजे विचार करा केकू किती रेडिएशन होईल ते.
आणि तुमची पुढली कथा यावर लिहा.
ती अजून रम्य करण्यासाठी पाकने अतिरेकी तळांवर हल्ला होणार हे माहीत असल्याने आणि भारत लगेच तरी कुठे हल्ला नक्कीच करणार नाही, तर आपल्या न्यूक्स साईट्सवर असे समजून त्यांना किराणा हिल्समध्ये लपवले होते, पण आपल्याला हे ठाऊक होते आणि नेमका तिथेच हल्ला केला आणि सगळ्यांचा एका क्षणात खातमा अशी भर सुद्धा घालू शकता.
युद्धविराम हा धक्का
युद्धविराम हा धक्का पचवण्यासाठी हे ( implant fake news) करणे आवश्यक होते.
Win win situation.
मोदीनी भरमसाठ केलेल्या
मोदीनी भरमसाठ केलेल्या विदेशयंत्रांचे फलित म्हणून भारतासोबत एकही देश उभा राहिला नाही. (इस्रायल वगळता)>>>> १०० पेक्षा जास्त देश फिरले आहेत श्री श्री श्री मोदीजी. त्यांना इतके पुरस्कार मिळाले आहेत की ठेवायला वेगळे म्युझियम उभारावे लागेल. डंका तर इतका वाजला होता की कान फुटायची वेळ आली होती.
>>काहितरी सरकारी दट्ट्या
>>काहितरी सरकारी दट्ट्या 'क्लासिफाईड इंफॉर्मेशन' प्रसिद्ध केल्याबद्दल<<
शक्यता नाकारता येत नाहि. एस्पेशियली, सिचुएशन डिएस्कलेट करण्याचे प्रयत्न सुरु असताना जनमानसात पॅनिक क्रिएट होण्याआधीच परिस्थितीवर ताबा मिळवावा आणि त्यानंतरंच माहिती बाहेर रिलीज करावी - हा त्यामागचा विचार असावा..
अमेरेकेचं स्निफर आणि इजिप्तचं कार्गो पाकिस्तानात उतरले याचा ठोस पुरावा आहे. आता इथल्या काहिंचा हि दोन्हि विमानं गोट्या खेळायला गेली असतील असा समज होउ शकतो. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करुया...
>>काहितरी सरकारी दट्ट्या
डपो
मोदी म्हणताहेत वि स्टॉप्ड
मोदी म्हणताहेत वि स्टॉप्ड ओनली व्हेन पाकिस्तान प्लीडेड... एवढा अप्पर हँड होता / आहे तर, अजून वाटाघाटी आणि मागण्या पूर्ण करून घ्यायला पाहिजे, नाहीतर ते तळ उद्धवस्थ करून काय फायदा नाही कारण असे तळ परत तयार होतील..
मानव तुम्ही माझे लेग पुलिंग
मानव तुम्ही माझे लेग पुलिंग करत आहात हे समजतंय. पण मी सिरीअसली विचारतोय. नुक्लिअर प्लांट/ फासिलीटी बिल्डिंग डिझाईनचे काही नॉर्म्स आहेत. त्यात मिसाईल/ बॉम्ब ह्यांच्या धोक्याचा विचार केला जातो. मला वाटते की महत्वाचे भाग निरनिराळ्या जागी ठेवलेले असतात. ऐन वेळी ते असेम्बल करून मिसाईल/ बॉम्बर विमानात लोड केले जात असावेत.
तसेच ४ रिश्टर स्केल चा भूकंप म्हणजे साधी गोष्ट नाही.
असे काही आक्रीत झाले असेल तर ते लपवता येणे अवघड आहे.
शस्त्रसंधी ही पाकिस्तानने
शस्त्रसंधी ही पाकिस्तानने नव्हे तर त्याला युद्धसामग्री पुरवणाऱ्या देशांनी घ्यायला लावली आहे. सध्या भारताच्या संरक्षण प्रणालीच्या ताकदीचा अंदाज घेतला गेला आहे. आता पाकिस्तानला अधिक सुरक्षित युद्धसामग्री पुरवली जाईल. खासकरून चीनकडून. परत पाकिस्तानने हल्ला केल्यास भारताच्या संरक्षण प्रणालीचे नुकसान करता येईल का ह्याची चाचपणी केली जाईल. त्यात यश आले तर चीनच्या भारतविरोधी कुरापती वाढतील. भारताची अर्थव्यवस्था
खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला जाईल.
Donald Trump : जर शस्त्रसंधी
Donald Trump : जर शस्त्रसंधी केली नाही तर व्यापार थांबवणार, भारत-पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर युद्ध थांबलं; ट्रम्प यांचा दावा
ट्रम्प तात्या पण गोट्या खेळतोय का?
ऐन वेळी ते असेम्बल करून
ऐन वेळी ते असेम्बल करून मिसाईल/ बॉम्बर विमानात लोड केले जात असावेत
हो ऐनवेळी जोडणी केली जाते.
Pages