Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मानव पृथ्वीकर यांचा जो मोठा
मानव पृथ्वीकर यांचा जो मोठा प्रतिसाद आहे तो आवडला.
माध्यमांवर इंदिरा गांधी व मोदी ही तुलना केली जात आहे. दोन्हीवेळच्या परिस्थितीत खूप फरक असल्याने अशी तुलना केली जाऊ नये असे वाटते.
JNU चा निर्णय चांगला वाटला.
बलुचिस्तान व चटगाव याबाबत उत्सुकता आहे.
(खरा हादरा ट्रम्प ला तर बसला नाही ना, असे वाटते)
तातोबांनी धमकी देऊन तह घडवून
तातोबांनी धमकी देऊन तह घडवून आणला या डेव्हलपिंग स्टोरीचं काय होतंय?
आजवर मोदीभक्तांसाठी मोदी- ट्रंप हे दोघेही दैवत होते. हरिहर, रामकृष्ण काय हवी ती नावं घ्या. ट्रंपसमर्थक बिडेनबद्दल जे बोलायचे तेच मोदीसमर्थक ट्रंपबद्दल बोलताहेत.
बरेच दिवसांनी भरभरून हसलात,
बरेच दिवसांनी भरभरून हसलात, बरे वाटले.
राज मी जे बोलतो आहे ते
राज मी जे बोलतो आहे ते भारताने किराणा न्यूक्लिअर स्टोरेज फॅसिलिटीवर हल्ला करून तिथले न्यूक्लिअर वेपन्स नष्ट केले, त्यामुळे भूकंपा सारख्या सिस्मिक लहरी निर्माण झाल्या ज्याला भूकंप म्हणताहेत, आता तिथे रेडिएशन होते आहे, इत्यादि दाव्याबद्दल.
टॉम कूपर म्हणतोय आपण पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कमांड ऑथोरीटी हेडक्वार्टर्सच्या अगदी जवळ आणि मुशफ एअर बेसला आणि न्यूक्स स्टोरेज फॅसिलिटी पासून न्यूक्स एअर बेसवर आणता येऊ नयेत म्हणुन फॅसिलिटी एन्ट्रन्स जवळ स्ट्राईक केले. यावरून आम्ही तुम्हाला न्यूक्लिअर वेपन्स डागण्यापासून रोखु शकतो असे आपण दाखवले आणि पाकिस्तान पूर्ण डिफेन्सलेस झाल्याने त्याला सिझफायरला गत्यंतर नव्हते असे त्याचे म्हणणे आहे. यातील बहुतेक काल भरत यांच्या NYT च्या पोस्टमध्ये पण आहे.
पुढे टॉम कूपर तो म्हणतो "Indian generals are not the kinds who will play with such facilities. They will not order to shoot missile wildly in that direction. No body is going to do that. This would be worse than gambling actually."
त्याची फर्स्टपोस्टवरील ही मुलाखत बघा. मी व्हिडीओ लिंक 10:30 पासुन लावलीय वरील संदर्भासाठी.
मानव , < न्यूक्स स्टोरेज
मानव , < न्यूक्स स्टोरेज फॅसिलिटी पासून न्यूक्स एअर बेसवर आणता येऊ नयेत > याबाबत एक सुधारणा
न्यु यॉर्क टाइम्सच्या बातमीत म्हटलंय की पाकिस्तानकडे १७०+ न्युक्लियर वॉर हेड्स आहेत. ही देशभर विखुरलेली आहेत.
The base is a key installation, one of the central transport hubs for Pakistan’s military and the home to the air refueling capability that would keep Pakistani fighters aloft. But it is also just a short distance from the headquarters of Pakistan’s Strategic Plans Division, which oversees and protects the country’s nuclear arsenal, now believed to include about 170 or more warheads. The warheads themselves are presumed to be spread around the country. One former American official long familiar with Pakistan’s nuclear program noted on Saturday that Pakistan’s deepest fear is of its nuclear command authority being decapitated. The missile strike on Nur Khan could have been interpreted, the former official said, as a warning that India could do just that.
बोल्ड केलेल्या यंत्रणा नष्ट झाल्या की काही काळ तरी न्युक्लिअर वॉर हेड्स वापरणे अशक्य किंवा कठीण , असा अर्थ मी लावला.
प्रत्यक्ष न्युक हेड्स क्षेपणास्त्रे वापरून नष्ट केली तर त्याचे परिणाम काय होतील हे कुठे लिहिलं गेलं आहे का? (आताच्या संदर्भातच असं नाही, इन जनरल )
मुलाखत उद्या बघतो.
या प्रश्नालगत दिलेली लिंक
या प्रश्नालगत दिलेली लिंक हास्यास्पद आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन फेक होतं अशी ती बातमी आहे, कारण पाकिस्तान ऑफिशियल कबुली कधीहि देणार नाहि. >>>
त्या लिंक मधे असेच म्हटलेले आहे कि जे पत्र फिरवले जात आहे ते फेक आहे. ज्या पत्राचा आधार घेतला आहे तेच अस्तित्वात नाही असा याचा सोपा आणि सरळ अर्थ होतो.
ऑफिशियल कबुली देईल कि नाही हा प्रश्न इथे कुठून आला ? देणार नाही हे माहिती असताना असं लेटर फिरवणे हे संशयाला जागा करणार नाही का ?
राभू
...
International Atomic Energy
International Atomic Energy Agency (IAEA)
https://timesofindia.indiatimes.com/city/dehradun/iaea-denies-radiation-...
आत्तापर्यंतच्या अनेक
आत्तापर्यंतच्या अनेक विश्लेषणामध्ये हा लेख दोन्ही बाजुंचा लेखाजोखा अतिशय संयमित आणि संतुलित पद्धतीने मांडत आहे.
https://www.brookings.edu/articles/lessons-for-the-next-india-pakistan-war/
भारताच्या दृष्टिकोनातून कोणीही पाकिस्तानचा पहेलगाम हल्य्यात सहभाग होता कि नाही हा प्रश्न सुद्धा विचारत नाहीत आणि सर्वजण पाकिस्तानचा सहभाग आहेच, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, हे धरूनच चालत आहेत हा एक महत्वाचा बदल आहे.
परंतु इंदिरा गांधींच्या कणखर
परंतु इंदिरा गांधींच्या कणखर आणि धूर्त नेतृत्वासमोर अमेरिका नमली आणि ७वे आरमार माघारी गेले.
https://en.wikipedia.org/wiki/Task_Force_74
The second Task Force 74 was assembled from the U.S. Navy's Seventh Fleet that was deployed to the Bay of Bengal by the Nixon administration in December 1971 during the Indo-Pakistani War. The fleet was sent to intimidate Indian forces at the height of the conflict.[1][2] The Soviet Union, which was actively backing Indian actions both politically and militarily during the war responded by deploying two groups of cruisers and destroyers as well as a submarine armed with nuclear warheads in response to the American military presence in the area.[3] From 18 December 1971 to 7 January 1972, the Soviet Navy trailed the American fleet throughout the Indian Ocean. The task force number is now used by the U.S. Seventh Fleet's submarine force.
मोदींची इंदिरा गांधींशी
मोदींची इंदिरा गांधींशी केलेली तुलना अयोग्य आहे कारण आजची परिस्थिती त्यावेळच्या परिस्थितीपेक्षा वेगळी आहे हे मान्य.
मुद्दा हा आहे की मोदी विरोधी पक्षात असताना असे हल्ले झाले तर आम्ही यंव करू, त्यंव करू अशा गर्जना करत असत, आता ट्रंप च्या दटावणी नंतर सीझ फायर ला मान्यता दिली तेव्हा नकळत तुलाना होणे सहज आहे. या हल्ल्याची नैतिक जबाबदारी अजूनही कुणी घेतलेली नाही. ते कोण होते, आता ते कुठे आहेत वगिरे प्रश्न मागे पडले.
>> ... इत्यादि दाव्याबद्दल.<<
>> ... इत्यादि दाव्याबद्दल.<<
एक सलग क्लिप ज्यात नुक्लियर आर्सनल वर हल्ला आणि लिकेज झाल्याची बातमी दिलेली आहे, ती बघितल्याशिवाय बहुतेक तुमचं समाधान होणार नाहि. असो.
नुन्क्लियर आर्सनलवर हल्ला झाला हे तरी तुम्हाला मान्य आहे हे धरुन चालल्यास तुम्हाला माहित असेल कि नुक्लियर वॉरहेड्स स्टोरेज मधे देखील डिटेक्ट होउ शकेल इतक्या प्रमाणात रेडिएशन एमिट करतात (इंट्रिंसिक आयनाय्झिंग रेडिएशन); बिकॉज युरेनियम, प्लुटोनियम आर काँन्स्टंटली डिकेइंग अँड एमिटिंग रेडिएशन रिगार्डलेस ऑफ वेदर दे आर गेटिंग रेडि फॉर डिलिवरी ऑर केप्ट इन स्टोरेज. आता त्या स्टोरेज फॅसिलिटिवरच्या हल्ल्यामुळे वॉरहेड्स एक्स्पोज झाल्याची शक्यता तुम्हाला मान्य आहे का? असल्यास, दॅट इज ए रूट कॉज ऑफ द लिकेज..
याउप्पर मी एक्स्प्लनेशन देउ शकणार नाहि. मी वर म्हटल्या प्रमाणे, हॅव सम पेशंस. ट्रुथ विल कम आउट.. सूनर ऑर लेटर...
या हल्ल्याची नैतिक जबाबदारी
या हल्ल्याची नैतिक जबाबदारी अजूनही कुणी घेतलेली नाही. ते कोण होते, आता ते कुठे आहेत वगिरे प्रश्न मागे पडले.>>>
ऑपरेशन केलार https://www.youtube.com/watch?v=v7FfL234dIs
नुन्क्लियर आर्सनलवर हल्ला
नुन्क्लियर आर्सनलवर हल्ला झाला हे तरी तुम्हाला मान्य आहे हे धरुन चालल्यास >> भारताने असा दावा केला आहे का ? एअर फोर्सचे अधिकारी खोटं का बोलतील ?
तुम्हाला माहित असेल कि नुक्लियर वॉरहेड्स स्टोरेज मधे देखील डिटेक्ट होउ शकेल इतक्या प्रमाणात रेडिएशन एमिट करतात >> International Atomic Energy Agency (IAEA) ची लिंक वर दिलेली आहे, ती तुम्ही पाहिली असेल किंवा पाहणार असाल तर या वाक्याचा फेरविचार कराल.
https://www.aljazeera.com
https://www.aljazeera.com/opinions/2025/5/13/indias-new-normal-of-perpet...
युद्धाचे साइड इफेक्ट्स.
चाकमकी अजून थोडे दिवस चालू
चाकमकी अजून थोडे दिवस चालू राहिल्या असत्या तर भारतात नक्कीच युद्धविरोधी आंदोलन चालू झाली असती.
मित्रहो हे सगळे वाचून मला असे
मित्रहो हे सगळे वाचून मला असे वाटायला लागले आहे की आपण अणुउद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. तेव्हा असे काही घडले तर आपला बचाव कसा करायचा? हे वाचून ठेवा . उपयोगी आहे.
https://www.wikihow.com/Survive-a-Nuclear-Attack
IAEA: No radiation leak or
IAEA: No radiation leak or release from any nuclear facility in Pakistan
यांचं स्पष्टीकरण आल्यावर त्यातही कॉन्स्पिरसी थिअरी, पडद्यामागच्या गोष्टी असलं काय काय मांडता येईल. पण ज्यांना सध्या वावड्याच म्हणता येतंय त्यावर इतरांचा वेळ वाया का घालवायचा?
---
thomas piggott ची प्रेस कॉन्फरन्स पाहिली. कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरात आमचे ते हे वसु धैव कुटुंबकम ठोकून देतात तसं हा president trump is a peacemaker and dealmaker असं सांगत होता. मह त्त्वाच्या मुद्द्यांना बगल दिली. प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन म्हणे. मग बाकीचं तरी पब्लिक कशाला केलं?
रेडियेशन लीकची खिचडी शिजवण्यापेक्षा यावर बोला.
IAEA ची बातमी रानभुली यांनी
IAEA ची बातमी रानभुली यांनी दिलेली आता पाहिली. तरीही तुणतुणं चालूच आहे.
हॅव सम पेशंस. ट्रुथ विल कम
नुन्क्लियर आर्सनलवर हल्ला झाला हे तरी तुम्हाला मान्य आहे हे >>
तुम्ही मी लिहिलेले वाचलेच नाही असे दिसतेय. असो.
हॅव सम पेशंस. ट्रुथ विल कम आउट.. सूनर ऑर लेटर...>> बरं बुवा. तुम्ही म्हणता तर तसं.
रानभुली आता तरी मान्य करा
रानभुली आता तरी मान्य करा हल्ला झाला होता.
कुठलाही डिटेक्टर न वापरता मी १०० % खात्रीने सांगतो कि त्या जागेवर intrinsic ionizing radiation आहेत. हे म्हणजे एखाद्याचा हात बघायचा, थोडा विचार करुन खात्रीने ठोकायचे , "तुमच्या घरांत आधीच्या पिढीमधे कुणाला तरी गुडघे दुखी होती... ". आठवा.... आठवा.
अवांतर-
युरेनियम हे किरोणोत्सारी आहे पण सर्वात महत्वाचे त्याचे half life T1/2 आहे ( १०० अॅटम असतील तर T1/2 काळानंतर ५० रहातील).
नैसर्गिक रितीने आढळणार्या युरेनियम मधे ३ प्रकार isotopes आहेत, U-२३८ ( ९९.२७ % ), U-२३५ (०.०७१ %), U-२३4 (०.००५%) . कंसात त्यांचे abundance ( किती प्रमाणांत आहे ) चे आकडे आहेत. एखादा पदार्थ किरोत्सारी आहे आणि T1/2 मोठा असला तर त्यामधून बाहेर येणारा किरोत्सार हा तुलनेने तेव्हढाही घातक नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Isotopes_of_uranium
माझ्या शेजारी युरेनियम - २३८ चे १००० अॅटम्स आहेत. ४४६०००००० वर्षानंतर, त्यांची संख्या ५०० झालेली असणार. म्हणजे ५०० वेळा एक अल्फा पार्टिकल बाहेर आला. हा अल्फा पार्टीकल हवेमधे तर < १ cm मधेच नष्ट होतो. युरेनियमची -२३८ ची विघटन साखळी (decay chain) येथे दिसेल.
https://www.maayboli.com/node/69159
enriched युरेनियम ( युरेनियम २३५ चे प्रमाण जास्त असते - हे मिळविण्यासाठीच सर्वांचा खटाटोप असतो ) असेल तर त्याची साखळी पण नेट वर सहज मिळते. T1/2 = 703 million years.
निसर्गामधे ionizing radiation सगळीकडेच आहे ( background radiation म्हणू या ). ते एखाद्या स्थळी मिळाले यामुळे काही निष्कर्ष काढता येणार नाही. आधी किती होते, नंतर किती आहे , जगांतल्या इतर स्थळांची सरासरी किती आहे हे पण बघायला हवे.
अवांतर समाप्त
रेडियेशन लीक झालं नसेल किंवा
रेडियेशन लीक झालं नसेल किंवा नाहीच झालं. पण कदाचित असं असेल का की भारताने पाकच्या िअर मिसाईल स्टोरेज जवळ हल्ला केला असेल आणि म्हणून पाक ने घाबरून इतर देशांना मध्यस्तीची गळ घातली असेल?
उदय
उदय
फार छान माहिती.
पण आम्हाला आता दुसरी खिचडी पाहिजे आहे.
युरेनियमचा, प्लुटोनियम चा भला
युरेनियमचा, प्लुटोनियम चा भला मोठा साठा आहे. काही कारणाने ( स्फोट झाला आहे ) तो विखुरला गेला असेल तरी बाहेरच्या जगाला कसे कळणार आहे? दहा किलो मिटर आंत काही गडबड झाली असेल तर बाहेर समजणे महाकठिण आहे. रेडिएशन हे सगळीकडे ( ३६० degree ) जाणार. दहा कि मी आंत जाणारा , एक मोठा वर्तुळाकार पाईप आहे असे गृहित धरले तरी रेडिएशन बाहेर वर कसे / किती येणार आहे, बहुतेक सर्व रेडिएकशन आंतमधे भिंती मधे शोषले जाणार, १००० वेळा reflect होत बाहेर वर काय येणार आहे ?.
थर्मल neutron ( < ०.०२५ eV) आदळल्यास युरेनियमचे विघटन होते.... मग चेन रिअॅक्शन... आणि हेच सर्वांना टाळायचे आहे.
आपण त्यांच्या कमांड सेंटरची तोडफोड , हानी केली असण्याची शक्यता ( केवळ शक्यताच) आहे. पण त्यांच्या आण्विक शस्त्रागाराला हात लावणार नाही. Big no no. कारण धोका भारताला (च) आहे. ते आपले शेजारी आहेत हे सत्य कुणी बदलू शकत नाही.
पाकच्या नाकांत दम आणायला अण्विक शस्त्रागारावर हल्ला करायची अवशक्ताही नाही. एखाद्या झोपड्याला ( सॉरी टेररिस्ट कॅम्प ) पाडण्यासाठी २५ कोटी रुपयांचे ब्रम्होस वापरण्याची गरज नाही. इतर अनेक उपाय आहेत जे आपण सहजपणे करु शकतो, त्यांचे कंबरडेही मोडते, वर त्यांच्या सामान्य नागरिकांना इजाही पोहोचत नाही, आपल्या कडेही काही side effect होत नाही.
पुन्हा एकदा..
पुन्हा एकदा..
मागे काही कारणाने रेडिएशन बद्दल वाचले होते. पाकिस्तानने स्ट्रॅटेजी म्हणून न्यूक वेपन्स बॉर्डरपासून शंभर किमीच्या जवळ ठेवले आहेत असा उल्लेख आहे. म्हणजे भारताने मिसाईल्सने ते उडवले तरी भारतात सुद्धा त्याचा फटका बसू शकतो.
ती काल्पनिक कथा असूनही तोकड्या माहिती वर तो तपशील घालायला हात धजावत नव्हते. त्यात वाऱ्याचा उल्लेख होता. त्याचा प्रभाव कसा पडतो हे माहीत नाही. कथेत सुद्धा आपण असे ठोकून देऊ शकत नाही.
इथे बिनधास्त काहीही ठोकून देणे चालते. आणि आमचे म्हणणे खोडून काढले कि कुटुंबावर हल्ला. परराष्ट्र सचिव ही सुटले नाहीत.
कॅपिटल टीव्ही वर तर तुर्किये वर थोरियम हल्ला झाला आहे आणि अझरबैजान वर भारताच्या जुन्या सोविएत मधल्या कुठला तरी मुस्लिम देशातल्या तळावरून सीक्रेट लेजर वेपनचा हल्ला झाला आहे. हे वेपन राखीव होते. पाकिस्तानने त्याच्या भीतीने सीजफायर केलं ही चौथी थिअरी.
विशेष म्हणजे डीआरडीओ च्या अधिकाऱ्यांनाच या वेपनची माहिती नाही.
वेळ जात नसेल आणि मनोरंजन हवे असेल तर युट्यूबवर कॅपिटल टीव्ही शोधा. मी अशा सर्व चॅनेल्स ला डोन्ट रिकमेंड चॅनल वर क्लिक करते.
विशेष म्हणजे डीआरडीओ च्या
विशेष म्हणजे डीआरडीओ च्या अधिकाऱ्यांनाच या वेपनची माहिती नाही.>>>
https://theprint.in/defence/star-wars-tech-drdo-showcases-30-kw-laser-ba...
<रेडियेशन लीक झालं नसेल किंवा
<रेडियेशन लीक झालं नसेल किंवा नाहीच झालं. पण कदाचित असं असेल का की भारताने पाकच्या िअर मिसाईल स्टोरेज जवळ हल्ला केला असेल आणि म्हणून पाक ने घाबरून इतर देशांना मध्यस्तीची गळ घातली असेल?> रात्रीचे चांदणे , पॉइंट आहे हं. आतापर्यंत हा मुद्दा इथे कोणालाच लक्षात आला नव्हता किंवा सुचला नव्हता.
उदय धन्यवाद.
<<<त्यात वाऱ्याचा उल्लेख होता. त्याचा प्रभाव कसा पडतो हे माहीत नाही.>> स्फोट झाल्यावर न्यूक्लिअर मटेरीयल धूलिकण होऊन इतर धूलिकणांसोबत आसमंतात पसरते आणि मग हळुहळु खाली येउ लागते . याला न्यूक्लिअर फॉलआउट म्हणतात. हवेचा जोर दिशा जिकडे जास्त असेल त्या दिशेने ते जास्त पसरेल.
उदय धन्यवाद विस्तृत माहिती करता.
रेडिओऍक्टिव्ह एलिमेंट आहे म्हणजे त्याचे नॉन रेडिओऍक्टिव्ह एलिमेंटमध्ये पूर्ण विघटन होई पर्यंत रेडिएशन होत राहणार.
इथे रेडिएशन लिकेज म्हणजे (न्यूक्सवर हल्ला अथवा अपघात यामुळे विखुरले जाऊन) घातक प्रमाणात पर्यावरणात होणारे रेडिएशन लिक गृहीत धरले आहे आणि IAEA ची बातमीही त्याच संदर्भात आहे.
रेडिएशन आतल्या सगळ्या शिल्ड्स तोडून बाहेर कसे येईल यावरही आधी लिहून झालंय. सगळं रिपीट होत आहे.
बाकी यावरुन आठवलं मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, नंतर विपु करेन.
आता माझ्याकडून हा विषय समाप्ती.
केकू किती पटकन सर्च देऊ शकतात
मानव थॅंक्स अ लॉट. उपयोग होईल या माहितीचा.
केकू किती पटकन सर्च देऊ शकतात ना? ती लिंक उघडली नाही.
डीआरडीओ कडून कुठलेही वेपन तिन्ही फोर्सेस कडे जाणे आणि ते तैनात होणे ही खूप मोठी प्रोसेस आहे. हे टप्पे पूर्ण होईपर्यंत त्या वेपनचा वापर होत नाही. डीआरडीओ स्वतः युद्धात सहभागी होत नाही. एकदा का टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर झाली कि डीआरडीओ त्या वेपनवरची आपली मालकी सोडून देत असते..
अझरबैजान वर हल्ला करण्यासाठी ते सर्विस मधे तैनात असले पाहिजे. ज्या अर्थी डीआरडीओ त्याचं प्रदर्शन करतं त्या अर्थी वेपन अद्याप डीआरडीओ कडेच आहे.
ही माहिती त्या लिंकवर असेल तर पाहीन.. नाही तर फीड मधे सगळं रिलेटेड कंटेट येऊ लागतं.
भाजप प्रवक्ता सुधांशु
भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी 9:52 PM · May 14, 2025
विपक्षी दल और कांग्रेस पार्टी यह कहते हैं कि वे सरकार के साथ खड़े हैं, तो यह उनके आचरण में भी दिखाई देना चाहिए। यदि आप साथ हैं तो मनसा, वाचा, कर्मणा के साथ दिखिए। वाचा अर्थात् बोलने के लिए समर्थन और कर्म कुछ और यह मन में संदेह उत्पन्न करता है।
यह मैं इसलिए कह रहा हूँ क्योंकि यह स्पष्ट है कि ‘ऑपरेशन सिंदूर’ चल रहा है। किसी भी प्रकार का ‘युद्धविराम’ शब्द प्रयोग नहीं किया गया है यह ऑपरेशनल ब्रेक है, यानी एक अल्पविराम। ऐसे में, जब during the course of operation सवाल उठते हैं, तो यह नियत पर संदेह पैदा करता है।
पूर्णविराम आने दीजिए। उस समय यदि आप किसी भी प्रकार का विचार रखते हैं अथवा संसद के सत्र की बात करते हैं, तो वह बात समझी जा सकती है।
परंतु during the course of operation अगर यह प्रश्न उठाया जाता है, तो यह प्रश्न उठता है कि सरकार को समर्थन देने की बात कांग्रेस का मुख है या मुखौटा ?
यदि ईमानदारी से देश के साथ हैं तो इस समय ऐसी अनावश्यक और अवांछित बातों को उठाने से बचने का प्रयास करना चाहिए
जर ऑपरेशन सिंदूर अजून संपलं नाहीए, तर - आतंक पर भारत की विजय के प्रतीक #OperationSindoor की सफलताओं को हर शहर, हर गांव तक पहुंचाकर देशवासियों को गर्व से भरेगी #TirangaYatra... - याची काय घाई?
https://x.com/BJP4India/status/1922328484405232096
या यात्रा १३ ते २३ मे या काळात निघताहेत.
Pages