ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिअर्स मॉर्गन बघतेय. मुळात बरखा आणि रणवीर अलाबादियाला का आणलं असावं भारताच्या बाजूने बोलायला हा प्रश्न पडला.
हिना रब्बानी आणि दुसरा कोण शहजाद ह्यांना तोंड आहे दाखवायला आणि पाकिस्तानला निष्पाप म्हणून रिप्रेझेंट करायला ह्याचं कौतुक वाटलं. ब्रेनवॉशचं बाळकडू किती मुरलंय हे दिसतंय.

अडाणीचे शेअर्स पडू नये म्हणून भारताने अमेरिकेला मध्येपाडून शस्त्रसंधी केली असे आज व्हॉट्सअप समूहात वाचले, खखो मोदी जाणोत!

तिला नेहमी भाजपा समर्थकांकडून पाकिस्तानी एजंट, देशद्रोही म्हणून चिडवले गेले तिनेच भारताची बाजू उत्तम मांडली. सरकारी पत्रकार अर्णव गोस्वामी असला असता तर त्या होस्टने त्याला दोन मिनिटात बाहेर हाकलले असते.
पक्ष विसरून शशी थरूर पण भारताची भूमिका मांडत आहेत.

अदाणीविषयी प्रेम/राग काहीच नाही. पण त्यांचे शेअर का पडतील? उलट अदाणी ग्रुपने डेव्हलप केलेले कामिकाझे ड्रोन्स पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी वापरले गेलेत. त्यांची डिमांड पर्यायाने शेअरचा भाव वाढला पाहिजे.

पक्ष विसरून शशी थरूर पण भारताची भूमिका मांडत आहेत.
चुकीची तुलना करत आहेत शशी थरूर. पाकिस्तान सारख्या अण्वस्त्रसज्ज देशाशी हल्ला करण्याची जोखीम घेताना भारताने विचारपूर्वक त्याचे परिणाम आणि उपाय ह्याची तयारी केली असणार. ह्याउलट पाकिस्तानशी युद्ध सुरू केल्यावर अमेरिकेने सातवे आरमार पाठवून भारताला युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणला होता. आज पाकिस्तानकडून अण्वस्त्र हल्ल्याची भीती होती तेव्हढीच अमेरिकेच्या सातव्या आरमाराची भीती भारताला होती. परंतु इंदिरा गांधींच्या कणखर आणि धूर्त नेतृत्वासमोर अमेरिका नमली आणि ७वे आरमार माघारी गेले. आजच्या आणि १९७१ च्या युद्धात जोखमीत अजिबात फरक नव्हता.

सहम्त!

सिझफायर तडकाफडकी कसं झालं यावर १००% खात्रीने सांगु शकणारी माहिती पुढे आली नाही. एकंदरीत आपण नूर खान बेस वर हल्ला केल्यानंतर आणि/किंवा पाकिस्तानने NAC मिटींग बोलावली होती यानंतर वेगाने हालचाली झाल्या असे दिसतंय. (आणि पाकिस्तानवर अमेरिकेचा दबाव येऊन किंवा पाकिस्तानने अमेरिकेला मध्यस्थीसाठी मदत मागून सिझफायर झाले असावे.)

यात भर आहे रेडिएशन लिकेज शक्यता आणि त्यावरून केलेल्या दाव्यांची . तर भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यावर हल्ला केला असेल का आणि त्यामुळे भूकंप, रेडिएशन लिकेज झाले असेल का याबत:

१. भारताचा स्टॅण्ड आधीपासुन आणि सिझफायरनंतर सुद्धा स्पष्ट होता/आहे की
अ) दहशतवादी तळांवर नेमका हल्ला केला, नागरिकांना हानी पोचणार नाही याची पूर्ण काळजी घेतली.
ब) नंतरच्या पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणुन त्यांच्या मिलटरी बेसवर तेवढाच अथवा त्यापेक्षा जास्त हल्ला करण्यात येईल.
क) नागरिकांना जीवित हानी पोचवण्याचा उद्देश नाही (म्हणजे शक्य तेवढी टाळली जाईल.)

२. पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यावर हल्ला केल्यास न्यूक्लिअर फॉल आउट नक्की कसे होईल- कुठल्या दिशेने व किती लांब होईल हे सांगता येत नाही. सध्या वातावरण जेवढे तापले होते त्यावरून १क) मुद्द्यानुसार भारत लगेच असे करेल असे वाटत नाही.
आणि किराणा हिल्स भारताच्या सीमेपासून १८० किमीवर आहेत, फार लांब नाहीत. तेव्हा आपण या सगळ्याचा विचार आणि तयारी केल्याशिवाय असे काही करणार नाही.

३. न्यूक्लिअर रेडिएशन्स लिकेज ही गंभीर बाब आहे. पर्यावरण हानी, मानवी अमानवी जीवत हानी, आजार होऊ शकतात. 5.7 मॅग्निट्युडच्या सिस्मिक लहरी निर्माण होईल एवढा स्फोट अणुबॉम्ब स्फोटाशिवाय होणे ( फिशन-चेन रिऍक्शन द्वारे स्फोट न होता क्रिटिकल मास नसल्याने कंट्रोल्ड फिशनमुळे एवढा स्फोट होणे) म्हणजे फारच मोठ्या प्रमाणात झाले. एवढे झाले असते तर पाकिस्तानला मोठा मुद्दा मिळाला असता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला दुषणे देण्याचा आणि कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याचा. भारताने आपली अण्वस्त्रे नष्ट केली तर आपली नाचक्की होईल म्हणुन ते याबाबत गप्प आहेत असा दावा आहे. तर आपल्या जनतेला ते तिथे न्यूक्लिअर रिऍक्टर्ससाठी लागणाऱ्या आण्विक इंधनाचा साठा होता आपल्या अण्वस्त्रांना काहीही झाले नाही असे म्हणु शकले असते आणि जगापुढे भारताने पहा काय केले हे असा कांगावा करू शकले असते.

४. भूकंप मापन उपकरणांनी बॉम्ब स्फोटामुळे होणाऱ्या सिस्मिक लहरी नोंदवून ईशारा दिला तरी अशा स्फोटामुळे आणि भूकंपामुळे होणाऱ्या लहरींचे पॅटर्न वेगळे असते आणि तेथील तज्ज्ञ सिस्मोग्राफ पाहुन हा भूकंप होता की स्फोट सांगु शकतात. यात आता मशीन लर्निंग इत्यादि मुळे वगैरे कितीतरी आधुनिकीकरण झाले असेल. तेव्हा पाकिस्तान जमिनी खाली १० किमी न्यूक्लिअर टेस्ट करत असेल तरीही आधुनिक उपकरणे तो भूकम्प नव्हता स्फोट होता हे सांगू शकतील आणि भूकंप झाला असेल तर भूकंप होता, स्फोट नव्हता हे ही सांगु शकतील.

५. नुकतेच हे वाचलेले: पाकिस्तान सारख्या देशाला आपली आण्विक अस्त्रे शत्रू हल्ला करून नष्ट करत आहे असे लक्षात आले तर तो पॅनिक मोड मध्ये शिल्लक असलेल्या अण्वस्त्रांचा लगेच वापर करून घेईल. त्यामुळे पाकिस्तानची सगळी अण्वस्त्रे आपण त्यांना एकाही अण्वस्त्राचा उपयोग करण्याची संधी मिळण्या आत नष्ट करू शकू अशी पूर्ण खात्री असल्याशिवाय भारत केवळ एक दोन स्थानांवरील अण्वस्त्र साठ्यावर हल्ला करेल असे वाटत नाही.

६. भूकंपामुळे न्यूक्लिअर रिऍक्टर्समध्ये रेडिएशन लिकेज होऊ शकते/झाले आहे (जपान २०११). असे आता पाकिस्तानात झाले असेल असे म्हणावे तर फारच योगायोग आणि तसे असेल तर पाकिस्तान ते का लपवून ठेवेल हा सुद्धा प्रश्न आहे.

७. तेव्हा जर रेडिएशन लिकेज खरेच असेल तर त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे अण्वस्त्र हलवताना झालेला अपघात ही।सुद्धा एक शक्यता आहे. असे असेल तर पाकिस्तान ते नक्कीच लपवणार. फक्त यासाठी बोरॉन इजिप्त कडुन का असा मात्र प्रश्न पडला. कारण बोरॉन आणि त्यातही बोरॉन१० आयसोटोप ज्याचा अशा वेळेस वापर होतो ते तुर्की, व चीन या पाक मित्रांकडे इतर देशांच्या तुलनेत बऱ्याच जास्त प्रमाणात आहे असे नेटवर शोधल्यास दिसले.

रेडिएशन लीकेज थिअरी इतर देशांच्या मीडियात आहे का?
https://newschecker.in/fact-check/confidential-letter-confirming-radiati...

Authorized / Credibility असलेल्या सोर्सकडून ही माहिती देण्यात आली आहे का?
https://www.altnews.in/viral-memo-confirming-radiation-leak-in-pakistan-...

@राज जर आपण हल्ला करून काही/बरीच अण्वस्त्रे नष्ट केली, त्यामुळे तिथे रेडिएशन लिकेज झाले हे खरेच आहे निदर्शनास आले तर पळून जाणार नाही. मी साफ चुकलो होतो हे मान्य करून अभ्यास वाढवेन. Happy

मानव- क्र ६ मधे थोडी भर टाकतो. या घटना काल झाल्या आहेत असे वाटते.

जपान मधे २०११ मधे आलेला भूकंप हा फारच मोठा होता ९.१ Mw. लॉग स्केलवर मोजले जाते. ६ आणि ७ Mw मधे ३२ पट जास्त ऊर्जा बाहेर पडते ( shaking amplitude = 10 times). भूकंप झाल्यानंतर काही वेळांतच ( १/२ तास) मोठी त्सुनामी आली. दोन मोठे झटके एकाच वेळी होते म्हणून बॅक अप मेकॅनिझम ( पंप ) काम करत नव्हते.

मोठा भूकंप येण्याअगोदर आधी आणि नंतरही अनेक ( शेकडोंनी) धक्के यावेळी बसतात. २०११ मधे ८० अधिक धक्के ६ Mw क्षमतेचे होते काही तर ७ पेक्षा जास्त होते आणि एक ९.१ चा होता.

अदानीचे बाकीचे ' उद्योग ' माहित नाही वाटतं? >>> हो. पण युद्धाच्या दरम्यान काही नवी माहिती उजेडात आली आहे का? मी सध्या युद्ध सोडून इतर काही वाचत नाही त्यामुळे मिस केले असू शकते.

राभु
फार छान संदर्भ दिला आहे. आभार.

Thanks

उदय धन्यवाद. बरोबर. भूकम्पाने फरक/अपघात होऊ नये, भूकंपाची, तशा धक्क्यांचे नोंद झाल्यास ऑटो शटडाऊन होईल याची काळजी घेतली असते.

<<रेडिएशन लीकेज थिअरी इतर देशांच्या मीडियात आहे का?>> एक दोन ठिकाणी दिसली पण त्यांचे संपादक/मालक भारतीय आहेत. Eurasiatimes हे त्यातील एक.

काल परराष्ट्र मंत्रालयाने प्रेस ब्रीफिंग / कॉन्फरंस केली. https://x.com/MEAIndia/status/1922263501986287920
त्याचा वृत्तान्त आजच्या इं. ए. मध्ये आहे. त्याचा मथळा -Mediation, Kashmir & trade : Delhi rebuts TRump claims point by point
त्यातलाच तपशील मानव यांनी वर दिलेला दिसतोय.

--

पाकिस्तानमध्ये रेडिएशन लीकेज झालं तर त्याचा फटका भारतालाही बसू शकेल ना? भारतीय हवाई दल, असं आततायी कृत्य करणार नाही, याचं हेही एक कारण वाटतं.

<< भूकंप मापन उपकरणांनी बॉम्ब स्फोटामुळे होणाऱ्या सिस्मिक लहरी नोंदवून ईशारा दिला तरी अशा स्फोटामुळे आणि भूकंपामुळे होणाऱ्या लहरींचे पॅटर्न वेगळे असते आणि तेथील तज्ज्ञ सिस्मोग्राफ पाहुन हा भूकंप होता की स्फोट सांगु शकतात. >>

------ सहमत. कुठलेही आधूनिक तंत्र न वापरताही असा फरक सांगता येण्यासारखा आहे.

(स्फोटामुळे किंवा अन्य कारणाने असेल ) रेडिएशन लपविता येणार नाही. अमेरिकेकडे Nuclear Detonation Detection System आहे. भारताकडे पण आहे - नॉर्थ कोरियाने केलेल्या अण्वस्त्र चाचण्या आपल्याला कळतात तर पाकमधल्या हालचाली का नको कळायला.

तात्यांनी काल रियाधमध्ये पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सीझफायरचा राग आळवला.
https://x.com/SkyNews/status/1922326118876471700
Maybe we can even get them together a little bit, Marco, where they go out and have a nice dinner together..."

@ भरत कोणता तपशील म्हणताय तुम्ही?
कालचे MEA चे ब्रिफिंग मी पाहिले होते. इंडियन एक्स्प्रेसची तुम्ही म्हणताय ती बातमी नव्हती वाचली पण तशाच इतर काही बातम्या वाचल्या आहेत, आधीचे पण MoD चे बहुतेक ब्रिफिंग्ज बघितले आहेत. माझ्या पोस्टमधील सुरवातीपासून ते मुद्दा क्रमांक एक त्यावरूनच लिहीले आहेत.

<<तात्यांनी काल रियाधमध्ये पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सीझफायरचा राग आळवला.>> नोबेल शांतता पुरस्कार मिळे पर्यंत तात्या थांबणार नाही असे वाटते.

सोफिया कुरेशी, व्योमिका सिंग, आणि विक्रम मिसरी यांच्या पत्रकार परिषदे बद्दल - तिघेही त्यांचे नेमून दिलेले काम / कर्तव्य करत होते / आहेत. सरकारने घेतलेले निर्णय भारतीय जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम. शस्त्रसंधी जाहिर झाली, अनपेक्षित असलेला युद्धविराम मिळाल्यावर तो निर्णय जाहिर करणार्‍या मिसरी यांना आणि त्यांच्या परिवाराला काही लोकांनी लक्ष्य बनविले. एका गलिच्छ पातळीवर टिका केली. युद्ध किंवा नंतरची युद्धबंदी हा भारत सरकारचा निर्णय असतो. मिसरी हे मेसेंजर आहेत. त्यांच्या कुटुंबाला का लक्ष्य बनविले गेले? अशी अश्लाध्य टिका करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई होईल का?

आज म प्र च्या एका मंत्र्याचा व्हिडिओ बघितला. त्यामधे सोफिया कुरेशी यांचे नाव घेतले नाही पण मंत्र्याचे बोलणे अशोभादायक आहे. आता माफी मागत आहे.
https://www.youtube.com/live/kYnQ9pYdTNw?si=hEKD7x-e2PFqYQBi

OP Sindoor मुळे आकाश साठी अनेक देशांकडून विचारणा होत आहे. ही माहिती अधिकृत नाही, पण याबाबतीत घोषणा होईल असे वाटते.
चाणक्य आणि अशाच ठिकाणी या बातम्या आहेत.
अर्मेनियाची 6000 कोटींची ऑर्डर पूर्ण झाली आहे. पण नवीन संभाव्य ग्राहक हे आहेत.

https://chanakyaforum.com/after-armenia-order-philippines-brazil-egypt-s....
आकाशाच्या बल्क प्रॉडक्शन बद्दल रक्षा मंत्रालयाचे बरेच आक्षेप आहेत म्हणून नवीन प्रॉडक्शन ठप्प झाले.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत हेवी इंजिनिअरिंग लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्यांकडे बल्क प्रॉडक्शन जबाबदारी आहे. या दोन कंपन्या 300 हून अधिक प्रायव्हेट कंपन्यांकडून पार्टस बनवून घेतात. एकाच एका कंपनीला काम देत नाहीत. यामुळे सुसूत्रता हा मोठा इश्यू आहे. ही ऑर्डर एकाच ठिकाणी असावी यासाठी गोदरेज, एल अ‍ॅण्ड टी, टाटा, रिलायन्स डिफेन्स, अदानी अशा कंपन्या प्रयत्नशील आहेत.

या मिसाइल किंमत आटोक्यात ठेवण्यात दोन्ही भारत कंपन्या अपयशी ठरत आहेत.

या गोंधळामुळे नवीन ऑर्डर अद्याप निघालेली नाही.
आता कदाचित काही तरी बदलेल.

https://www.shankariasparliament.com/current-affairs/mains/akash-missile...

तेजस साठी पण विचारणा होत आहे असे Saffron Medua च्या आणि युट्यूबर्सच्या गोतावळ्यात प्रसारित होत आहे. खखोगोमीजा.

5000 कोटी डॉलर्सच्या ऑर्डर्स मिळणार आहेत असे हा मीडिया सांगतोय. कन्फर्म करण्यासाठी सोर्स नाही.
https://www.google.com/amp/s/www.newindianexpress.com/amp/story/nation/2...

हाल (HAL) कडून आणखी कुणाला सब कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं का ते माहित नाही.

चुकीच्या बातम्या बद्दल खरं तर कारवाई करायला पाहिजे होती. ह्या वेळी पाकिस्तान आहे म्हणून वाईट वाटत नाही. पण पुढच्या वेळी मोदी सरकारला खुश करण्यासाठी आपल्याच जनतेच्या एखाद्या प्रश्नाविषयी हीच मीडिया चुकीच्या बातम्या देऊ शकेल किंवा देत ही असेल.
मी ऐकलं की राफेल ची बातमी कुठलंही confirmation नसताना print ने दिली म्हणून त्यांची वेबसाईट बंद केली होती. मग ९ मेच्या रात्री आपण पाकिस्तान जिंकल्याच्या चुकीच्या बातम्या दिल्या बद्दल अजून कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. जगभर आपल्या मीडियाने दिलेल्या बातम्याना काडीचीही किंमत नसेल.

>>रेडिएशन लीकेज थिअरी इतर देशांच्या मीडियात आहे का?<<
या प्रश्नालगत दिलेली लिंक हास्यास्पद आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन फेक होतं अशी ती बातमी आहे, कारण पाकिस्तान ऑफिशियल कबुली कधीहि देणार नाहि.

@मानव पृथ्वीकर, माझा आक्षेप कोणा एका व्यक्तीवर नाहि, प्रवृत्तीवर आहे. आणि विशेष करुन एका विशिष्ठ कंपुकडुन (हु हॅपन्ड टु बी मोदि/बीजेपी हेटर्स) केल्या जाणार्‍या नी-जर्क रिअ‍ॅक्शनवर. पाकिस्तान, आणि आता भारतीय टॉपब्रास देखील ती बातमी टोन-डाउन का करतंय हे समजण्या इतपत तुमचा अभ्यास आहे असं गृहित धरतो. मोरओवर, ती स्टोरी अजुन डेवलपिंग आहे, योग्य वेळेस सगळे डिटेल्स पब्लिक डोमेन मधे येतीलंच. हॅव सम पेंशन्स..

तुर्तास, या मुलाखतीने तुमचं समाधान होइल अशी आशा बाळगतो...

Pages