ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकेंड आ गया दो दिन कुछ काम नही. खाना पिना सोना और पाकिस्तान के साथ युद्ध लढना यही हम सबने थाना है अब.

पहलगाम मधे २६ निरपराध लोकांना मारणार्‍या राक्षसांना शिक्षा मिळाली का? त्यांचा काही ठावठिकाणा मिळाला का? त्यांना हल्ला करण्यासाठी कुणी पाठविले होते?

पहलगाम हल्ल्यातील एकतरी दहशतवादी जिवंत पकडला गेला पाहिजे. खरे सूत्रधार सुटता कामा नये.

वरचे फोटो पाहता असं जाणवतं की आपले हल्ले अत्यंत अचूक (precision) होते
>>>> २०००+++

एका डिफेन्स ऍनलिस्टच्या मते आपण एक मीटरपर्यंत पिनपॉईंट करू शकलो. म्हणजे हॅंगरच असे नाही तर एखादा रणगाडा किंवा आर्मर्ड व्हेईकल आपण टिपू शकलो असतो.

क्षेपणास्त्राची अचूकता १ मीटर पर्यंत आहे याबद्दल वाद नाही पण ते जिथे धडकणार आहे त्या जागेवर ३ वर्षाची मुलगी असेल तर त्या २५ कोटी रुपयांच्या क्षेपणास्त्राच्या अचूकतेचा उपयोग काय?

पहलगाम हत्याकांड घडविणारे अतिरेकी , राक्षस आजही मोकाट आहेत हे बोचणारे आहे. तिथवर भारताच्या सुरक्षा यंत्रणेचे हात कधी पोहोचतील?

पर्यटन स्थळांच्या जोरदार जाहिराती करण्यापूर्वी ते स्थळ, आसपासचा परिसर , राज्य सुरक्षीत आहे अथवा नाही याची जबाबदारी कुणाची ?

Believe none of what you hear and half of what you see.
—Benjamin Franklin
Why, sometimes I’ve believed as many as six impossible things before breakfast.
—The Queen of Hearts
Alice in Wonderland

They are brilliant people and they make incredible products and we dont do much trading with them. And I have a good relationship with them - ..But I stopped that war. There was going to be a nuclear war - Trump on Pakistan .

https://www.foxnews.com/video/6372932781112
साधारण १२ व्या मिनिटापासून.

आता अमेरिकेवर बहिष्कार घालायचा, व्हाइट हाउस समोर निदर्शने करायची , व्हिसा / ग्रीन कार्ड त्याच्या तोंडावर फेकून परत यायचं
असे अनेक पर्याय आहेत.
Let us show him the power of new भारत

>>पहलगाम हत्याकांड घडविणारे अतिरेकी , राक्षस आजही मोकाट आहेत हे बोचणारे आहे. तिथवर भारताच्या सुरक्षा यंत्रणेचे हात कधी पोहोचतील?<<
थोडा धीर धरा. माबोवर प्रश्न विचारण्या इतकं ते सोप्प नाहि. अमेरिकेला १० वर्षं लागली, ओसामाला ठोकायला. थोडी कळ काढा, भारतीय सेना तुमची इच्छा लवकरंच पुर्ण करेल...

>>> माबोवर प्रश्न विचारण्या इतकं ते सोप्प नाहि.

एकाच वाक्यात दहा पाच आय डी जखमी केलेत. मुळात प्रश्न विचारणारे हे कोण हे कोणीच विचारत नसते ही गंमत आहे.

माबोवर प्रश्न विचारण्या इतकं ते सोप्प नाहि. अमेरिकेला १० वर्षं लागली, ओसामाला ठोकायला. थोडी कळ काढा, भारतीय सेना तुमची इच्छा लवकरंच पुर्ण करेल...<<<<

हो यार खरच, अजून पुलवामा चे अतिरेकी लाइन मध्ये पुढे आहेत. मग ह्यांचा नंबर. जिथे अमेरिके ला दहा वर्षे लागलेत तिथे भारतीय एजन्सी ना किती लागतील? श्री श्री श्री मोदीजी आहेत २०४७ पर्यंत काळजी नसावी भरपूर वेळही आहे आणि जनतेचा पेशन्स ही भरपूर आहे. चालू द्या.

<< थोडा धीर धरा. माबोवर प्रश्न विचारण्या इतकं ते सोप्प नाहि. अमेरिकेला १० वर्षं लागली, ओसामाला ठोकायला. थोडी कळ काढा, भारतीय सेना तुमची इच्छा लवकरंच पुर्ण करेल... >>

----- अमेरिकेला १० वर्ष लागली असतील कारण अमेरिकेकडे डोबाल, शहा, मोदी सारखे कणखर नेतृत्व नव्हते.

येथे राक्षसांना ( आणि त्यांच्या मास्टर माईंडला) शिक्षा होणे हा एक भाग आहे. चार अतिरेक्यांचा ठावठिकाणा यथावकाश कळेल आणि त्यांना अटक / शिक्षा होईल. तोपर्यंत ब्रह्मोसने उडविलेल्या एखाद्या इमारतीचे चित्र दहा वेळा बघायचे.

दुसरा पण तेव्हढाच महत्वाचा भाग म्हणजे २६ निरपराध्यांचे प्राण वाचविण्यात सुरक्षा व्यावस्थेला आलेले अपयश. पहलगाम बर्‍यापैकी सिमेच्या आंतमधे आहे. पर्यटन स्थळाची मोठी जाहिरांत होते मग तिथे किमान सुरक्षा व्यावस्था ठेवण्याची अवशक्ता का भासली नाही. त्या जागेवर आसपास कुठलीच सुरक्षा तैनांत नव्हती हे न उलगडणारे कोडे आहे. एव्हढे गाफिल का राहिलात? घटना घडल्यानंतर ते पसार झाले , आणि आजही त्यांचा थांगपत्ता लागत नाही Sad

> घटना घडल्यानंतर ते पसार झाले , आणि आजही त्यांचा थांगपत्ता लागत नाही
फिकर नॉट. आजच एक व्हॅट्सॅप आले, ऑपरेशन सिंदूर वर आधारीत कर्नाटक संगीतातले गाणे ! त्यार मोदींची करारी मुद्रा, मंत्रीमम्डळाची बैठक, उडणारी मिसाईल्स, सारे काही आहे.
२०२७ मध्ये भारतीय मुलगी मिस युनिव्हर्स होईल, मग तिला घेऊन अक्षय कुमार सिनेमा काढेल.

आखिल भारतील नाराज फूफाजी संघटना काढा आता. इथेच अनेक perpetual नाराज फूफाजी सापडतील - टूल कीट मधे सांगितलेली वाक्य, मुद्दे दळत बसणारे. वाचायला जाम मजा येते ब्वा! Biggrin

भ्रमर
Biggrin

इंडिया टुडे वरची रेणू भाटियांची मुलाखत पाहिली.

या रेणू भाटिया व्हॉट्स अ‍ॅप आँटीजच्या जागतिक संघटनेच्या अध्यक्षा शोभतील. या व्हॉट्स अ‍ॅप आँटीज कराची बंदर नष्ट झालं ; इस्लामाबादवर ताबा मिळवला अशा बातम्या पाहून खुष होत होत्या. सीझफायरची घोषणा झाल्यावर काही एक्साइटिंग आणि हॅपनिंग होत नव्हतं. मग त्यांना विक्रम मिस्री आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चारित्र्यहननाचा एपिसोड झाला. ऑपरेशन सिंदूरच्या आधी हिमांशी नरवालच्या मागे लागल्या होत्या. मग टर्किश टॉवेल आणि अझर भाईजानच्या मागे लागल्या. पण यात मजा येत नव्हती कारण तात्यांनी तोंड दाबून मुक्क्यांचा मार सुरू केला. .

काल या व्हॉट्स अ‍ॅप आँटीज खूप एक्साइट झाल्या असतील. कारण अर्णव गोस्वामीने भारताच्या काँग्रेस पक्षाचं तुर्कस्थानमध्ये ऑफिस आहे, असा शोध लावला. अमित मालवीयने या क्लिप्स व्हॉट्स अ‍ॅप आँटीजना पाठवल्या. चला नाचूया.

Ali Mahmudabad' यांचं स्टेटमेंट

> या रेणू भाटिया व्हॉट्स अ‍ॅप आँटीजच्या जागतिक संघटनेच्या अध्यक्षा शोभतील.
ये अन्याय है! रेखा शर्माजींना निदान महासचिव तरी करा मग.

पेहेलगाम घटनेचे मोदीभक्तांना दु:ख नसून आनंदच झाला आहे हे माझे निरिक्षण बरोबर आहे. अय्या किती छान इव्हेंट झाला तो तिरंगा यात्रा ! आता सिनेमात हिरॉइन कोण असेल बरं ?

पाकिस्तान एअर फोर्स शक्तिशाली आहे. एका मिनिटात शत्रूची जास्तीत विमाने पाडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. शत्रूची बलस्थाने ओळखणे व acknowledge करणे म्हणजे गद्दारी नव्हे, पण गेली काही वर्षे आलेल्या प्रोपॅगंडा पटांमुळे मुघल, अदिलशाही, खिल्जी , इंग्रज , पाकडे हे सारे धांदरट व बावळट व आपण म्हणजे शूर वीर अशी प्रतिमा लोकांमध्ये झाली आहे. त्यामुळेच आपले राफेल पडले अशी बातमी येताच सर्व अंकल आंटीज कानावर हात ठेवून 'कह दो के ये झूट है' असे म्हणत होते. भारताने पाकिस्तान च्या हदीत घुसून तीनशे अतिरेकी मारले वगैरे बातमी वाचताच माझी पहिली प्रतिक्रिया skepticism असते ती यामुळेच.

२०१९ मध्येही आपण F16 पाडलेले नाही के कटू वास्तव आहे. पण denial इतके strong आहे की अभिनंदन ला वीर चक्र देतानाही F16 पाडल्याचा उल्लेख केला गेला.

राजाने कपडे घातलेले नाहीत हे दाखवून दिल्याबद्दल मला 'नाराज फूफाजी' पदवी मिळात असेल तर ती शिरोधार्ह आहे.

< प्राथमिक अंदाजानुसार हजार टेररिस्ट आणी पाकी नागरिक मारले गेले असावेत. अर्थात पाक हे कधीच मान्य करणार नाही. > यावेळी आकड्यांच्या
फार पुड्या सोडल्या नाहीत.

जनरल असीम मुनीर यांची फील्ड मार्शल पदावर बढती - ही नेमणूक नेमकी ११ एअरबेस उद्ध्वस्त करून घेतल्यापायी आहे की इंटरनेटच्या युगातही पाकिस्तानी जनतेला आपणच जिंकलो या भ्रमात ठेवण्याबद्दल हे माहीती नाही. पण जगाच्या इतिहासातले अनोखे उदाहरण नमूद करणे गरजेचे आहे.

दोन्हीकडचे दावे खरे कि खोटे हे पडताळून पाहण्यासाठी कोर्टात गेले तर..
>>>>> कोर्टाला असली फालतू कामं करायला वेळ नाही. त्यांना सोमनाथ मंदिराच्या कंपाऊंड वॉलची उंची १२ फूट असावी की ६ फूट वगैरे महत्वाच्या गोष्टी ठरवायच्या असतात.

जनरल असीम मुनीर यांची फील्ड मार्शल पदावर बढती. >>>> थोडक्यात त्याचे अधिकार काढून घेतले आहेत. सेरिमोनियल उचलबांगडी.

थोडक्यात त्याचे अधिकार काढून घेतले आहेत >>> अधिकार कोण काढून घेणार? पाकिस्तानात पंतप्रधान आर्मी चीफला रिपोर्ट करतात आणि ब्रिफिंगसाठी रावळपिंडीला जातात.

Pages