ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीळी Lol

श्री साठी एक वेगळा धागाच काढता येईल.

<< उदा. पहलगामचे अतिरेकी पकडले का? >>

------ चार आठवडे झाले पण अजूनही काहीच थांगपत्ता लागलेला नाही , त्यामुळे हा प्रश्न सलत रहातो

पुलवामा घटनेमध्ये स्फोटके कशी आली आणि कोण सहभागी होते याचा ७ वर्षानंतर पण तपास पूर्ण झाला नाही. एक कोणी उच्च दर्जाचा पोलीस अधिकारी त्या घटनेनंतर काही देशद्रोही कारवाईत गुंतला आहे आणि त्याला अचानक अटक आणि सुटका पण झाली होती. आता तर ह्याबद्दल कोणीही प्रश्न विचारत नाही.

पहलगामचे अतिरेकी पकडले का?
>>>>>>

आता या सर्व घटनांचा वेग ओसरल्यावर मलाही हा प्रश्न पडू लागला आहे.
काश्मीरमधील एखाद्या टुरिस्ट स्पॉटला इतके वेळ हे थरारनाट्य सुरू होते. ते रोखणे कितपत शक्य होते याची मला कल्पना नाही. पण इतका वेळ हैदोस घालून जर ते दहशतवादी सहीसलामत सुटत असतील आणि आजही मोकळे असतील तर नक्कीच ही चिंतेची बाब आहे.

कदाचित आपल्यातर्फे कुठेतरी काहीतरी कारवाया घडत असतील पण त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नसतील अशी एक शक्यता आहे. तसे असल्यास एखादी चांगली बातमी येण्याची वाट बघूया.

कदाचित आपल्यातर्फे कुठेतरी काहीतरी कारवाया घडत असतील पण त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नसतील अशी एक शक्यता आहे. >>>> तसंच असतं. भरपूर कारवाया घडत असतात वेगवेगळ्या संस्थांच्या co-ordination ने. पोलीस, NIA व Intelligence.... अजून बरीच involvement असते. गुंतागुंत असते. गुप्तता राखली जाते. हे लोक स्वस्थ बसलेले नसतात.

माझेमन , आंतराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासावरची माझी कालची पोस्ट म्हणजे अपूर्व कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट आहे. मी इथे कॉपी पेस्ट केली.
पुढचं जनरल आहे, तुम्हांला उद्देशून नाही.
---
तुर्कस्थान आणि अझरभाईजान हे दोन देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले हे कळलं. तसे कोणते देश भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत?

मोदींच्या इतक्या विदेश दौर्‍यांचं ( या देशाला इतक्या वर्षांत भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असं अनेक भेटींच्या बाबत सांगितलं जायचं) आणि देशोदेशींच्या नेत्यांना मारलेल्या मिठ्यांचं फलित काय ? हाउडी मोदी आणि केम छो ट्रंपचं फलित काय?

रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर नेटोचा दबाव झुगारून भारताने रशियन क्रूड ऑइल आयात केलं हे माहीत आहे. त्याबद्दल मागे वाचलं होतं की ही आयात बहुतांशी रिलायन्सने केली आणि ते प्रोसेस करून प्रॉडक्ट्स युक्रेनच्या युरोपीय देशांना आणि कदाचित अमेरिकेलाही निर्यात केली. भारतीय जनतेला त्या स्वस्त क्रूड ऑइलचा सरळ लाभ झाला नाही.

--
काल तात्यांनी मी भारत पाक संघर्ष थांबवला असं पुन्हा एकदा सांगितलं.
यावरून आठवलं २०२४ च्या लोकसभा निवडणुकां दरम्यान भाजपने वॉर रुकवा दी पापा अशी जाहिरात केली होती.

ही क्लिप मोदींच्या यु ट्यूब चॅनेलची आहे.
https://www.youtube.com/shorts/qnwIfHH7ayY
When PM Modi dialled Russian President Putin to stop the war असं तिचं शीर्षक आहे. यात लेझर आय वाले जयशंकरसुद्धा आहेत.

किरण रिजिजू म्हणताहेत It is a matter of pride to see that India takes a centre stage in the global affairs
आता सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवायला लागताहेत.

#Karma comes back

इतक्या लवकर तर मॅगीही शिजत नाही. >> इथे जे काही चालले असेल ते असो.
पण या कमेंट ने फिस्सकन हसू आलं. Lol
पुढचा मोह आवरला. Happy

आपल्याला इस्राईल वगळता इतर देशांच समर्थन मिळालेलं दिसलं नाही. पहलगाम हल्ल्याचा निषेध केला पण op सिंदूरच्या समर्थनात कोणी प्रतिक्रिया दिलेली वाचली नाही.
विश्वगुरू, भारताचा वाढलेला तथाकथित सन्मान हे सगळे प्रचारचे मुद्दे. ह्यात काहीही तथ्य वाटत नाही.
उक्रेन रशिया युद्धात आपण रशियला समर्थन केल्या मुळे युरोपी देशांनी दुर्लक्ष केलेलं असू शकेल आणि ही युद्धाची वेळ नाही असं रशियाला ऐकवल्यामुळे रशियानेही दुर्लक्ष केलं असू शकेल.

बिरबलाची मॅगी असेल.
on a serious note, तुर्कस्थान ,अझरबैजान सारख्या देशांनी भारताला जाहीर पाठिंबा दिला नाही याची इतर अनेक कारणे असू शकतात, त्यात त्यांची डोमेस्टिक कंपल्शनस ही आली. त्यांच्यावर आगपाखड करण्यात अर्थ नाही. सत्ताधारी पक्षाच्या जवळचे असे काही 'मिलिटरी एक्सपर्ट्स' टीव्ही वर या देशांविरुद्ध जे काही बोलतात त्यानी हानीच होते भारताची.

२०१५ चा नेपाळ भूकंप आठवला. शेजारी देश म्हणून भारताने लगेच मदत केली पण आपल्या मीडियाने अतिशय वाईट पद्धतीने पद्धतीने वार्तांकन केले. त्यावेळी नेपाळी लोकांनी go home indian media चा ट्रेंड social मीडिया वर चालवला.
नंतर नेपाळ आणि आपले संबंध बिघडले त्यावेळी नेपाळी लोकं त्यांची बाजू मांडायला आपल्या news चॅनेल्स वर आली की आपले news anchors चीनी काम म्हणून चिडवत असतं.

आत्ताही खोट्या बातम्या दाखवून मीडियाने आपले नुकसानच केलं आहे.

८ नोव्हेंबर २०१० - प्रेसिडेंट ओबामांचे भारतीय संसदेतील भाषण

And we’ll continue to insist to Pakistan's leaders that terrorist safe havens within their borders are unacceptable, and that terrorists behind the Mumbai attacks must be brought to justice.

<<<आता सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवायला लागताहेत.>>>

-------यशाचे श्रेय घेण्यासाठी मोदी कायम कॅमेर्या पुढे असतात...
ट्रम्प पुरस्कृत अनपेक्षित युद्धविराम झाल्यावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ ...

भाषण करणं वेगळं आणि खरीच मदत करणं वेगळं. मुंबई हल्ल्यात अमेरिकन, ब्रिटश आणि इस्राएली नागरिक असल्यामुळे त्यांचा ह्या कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असणार.
मुंबई हल्ल्यानंतर ही अमेरिकेने प्रति वर्षी करोडो डॉलर्स ची मदत पाकिस्तान ला चालूच ठेवली होती. त्यामुळे ते आपल्या संसदेत कांय बोलले त्याला काहीच अर्थ राहत नाही. समजा आपण मुंबई हल्ल्या नंतर सिंदूर सारखं एखाद ऑपेरेशन राबवलं असतं तर त्यांणी अजून वेगळी प्रतिक्रिया दिली असती.

सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर, सुप्रिया सुळे, ओवेसी सारख्या लोकांना सहभागी केलं ते योग्यच आहे. आपली बाजू योग्य प्रमाणे मांडणारी लोकं पाहिजे. दोन्ही कडच्या कट्टर समर्थकांना हे आवडणार नाही पण आपला पक्ष वगैरे इतर वेळी परंतु देश संकटात असताना एकत्र असणं महत्वाचं.

अरे पण ते खानग्रेसी, सुळे-पवार, ओवेसी, कनीमोळी वगैरे सगळे देशद्रोही आहेत असं इतके वर्ष ओरडून ओरडून शिकवलंय ना? मग आता भारताची बाजु मांडायला देशद्रोह्यांची फौज कशाला पाठवताय?
एकतर ही मंडळी देशप्रेमीच आहेत आणि त्यांची दशकभर बदनामी केली हे मान्य करावं किंवा त्यांना पाठवूच नये. भाजपाकडे तेजस्वी लोकांची पलटण आहेच की- तेजस्वी सुर्या, आनंद रंगनाथन, अभिजीत अय्यर-मित्रा (तालिबान सेक्युलर, पुरोगामी, फेमिनिस्ट असल्याची ग्वाही देणारे).. झालंच तर आयटीसेलवरचे तेजस्वी तारे अमित मालविय, रेखा शर्मा, शेफालीताई (पवार= औरंगजेब व सुप्रिया= मुमताजमहलची बखर लिहणार्या.. मस्त लिहीतात, अगदी साहित्यिक.).. नायतर गेलाबाजार अर्नब, नाविका वगैरे..

त्यांना देशद्रोही म्हणणं चुकीचंच आहे. उद्या सुप्रिया सुळे भाजपात आल्या तर मंत्री पण होतील आणि काँग्रेस वाले त्यांचा लवासा प्रकरण उकरून काढतील. म्हणूणच म्हटलं दोन्ही कडच्या कट्टर समर्थकांना हे आवडल नसेल.
सुळे, थरूर इत्यादी संयत पणे बाजू मांडू शकतात आणि ते खासदारही आहेत. बाकी तेजस्वी, रंगराजन वगैरेना कधी ऐकलं नाही.

भरपूर कारवाया घडत असतात वेगवेगळ्या संस्थांच्या co-ordination ने. पोलीस, NIA व Intelligence.... अजून बरीच involvement असते. गुंतागुंत असते. गुप्तता राखली जाते. हे लोक स्वस्थ बसलेले नसतात.>> हे फक्त या सरकारमधेच होतं की आधीही हे सर्व होत होतं? म्हणजे कारवाया, गुंतागुंत, गुप्तता वगेरे..

BJP MP Nishikant Dubey, who had last month dubbed former chief election commissioner S.Y. Quraishi a "Muslim commissioner", on Sunday said the government's decision to include him and his political rival Asaduddin Owaisi in the same diplomatic delegation showed the "most beautiful face of democracy"

Dubey and AIMIM chief Owaisi, two firebrand and polarising faces from the opposite sides of the political divide, are part of a delegation that will travel to Muslim countries later this month to convey India's message of zero tolerance against terrorism against the backdrop of Operation Sindoor.

परदेशात एक बोलायचं आणि घरात दुसरं हा आदर्श मोदींनीच घालून दिलाय.

त्यांना देशद्रोही म्हणणं चुकीचंच आहे. उद्या सुप्रिया सुळे भाजपात आल्या तर मंत्री पण होतील >> ह्याला काय अर्थ आहे? एक काहीतरी ठरवायला नको का? मतदाराने काय करावे? अशाने सगळेच देशद्रोही भाजपात शिरतील..

आता या मुस्लिम देशांत विचारलं की प्रा अली खान महमुदाबाद आणि कंवर विजय शहा या दोघांना सरकार, पोलिस वेगवेगळा न्याय का लावतात, तर दुबे काय उत्तर देतील?

तरी तेजस्वी सूर्याला अरब देशांत पाठवत नाहीएत , ते बरं. आदर्णीय सूर्याजी शशी थरूर सोबत उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत फिरायला चाललेत. दोघांचा म्युच्युअल अ‍ॅडमिरेशन क्लब आधीपासून आहेच.

मला तरी ते देशद्रोही वाटत नाहीत.मतदाराने आप आपल्या विचाराने योग्य माणसाला मतदान करावे. देशद्रोह्यांचं माहिती नाही पण भ्रष्टाचारी लोकांना भाजपा पावन करून घेतच आहे. पण हिथे भाजपा काँग्रेस चा प्रश्नच नाही देशाचा आहे.

<<<. दोन्ही कडच्या कट्टर समर्थकांना हे आवडणार नाही पण आपला पक्ष वगैरे इतर वेळी परंतु देश संकटात एकत्र असणं महत्वाचं.>>>

------ मुंबईवर हल्ला झाला तेव्हा देश संकटात असताना मोदी लगेच मुंबईला भेट देण्यासाठी आले होते. परिस्थिती नियंत्रणातही नव्हती... आणि त्यांनी तत्कालीन पंतप्रधानांना लक्ष्य केले होते.

कट्टर मोदी समर्थकांनी ट्रोल आणि चारित्र्यहनन केलेली हिमांशी नरवाल ही हरयाणाचीच ना? त्या ट्रोल्सवर पोलिस केस करावी असं रेणू भाटिया (व्हॉट्स अ‍ॅप आँटीजच्या जागतिक संघटनेच्या अध्यक्षा) यांना वाटलं नाही. राष्ट्रीय महिला आयोगाने असं कलायचं नाई अं, असं त्या ट्रोल्सना सांगितलं.

दुसरीकडे मध्य प्रदेशचे मंत्री कंवर विजय शहा यांच्यावर न्यायालयानेच ताशेरे मारले तरी तिथले मंत्री , नेते त्यांचा बचाव करताहेत. पोलिसांनी एफ आय आर लिहिताना भरपूर पाणी घातलं असं न्यायालय म्हणतंय.

आणि प्रा महमुदाबादना तडकाफडकी अटक झाली आणि त्यांनी लिहिलेल्या पोस्टचा अर्थ लावायला तीन पोलिस अधिकार्‍यांची एस आय टी स्थापन झाली.

दहशतवाद्यांनी धर्म बघून मारलं ; यावर सेक्युलरिझम माय फूट अशी प्रतिक्रिया होती. इस्लामी दहशतवाद्यांकडून सेक्युलरि झमची अपेक्षा ठेवणार्‍यांना शासन यंत्रणा धर्म बघून वागते, यात काही खटकलं नसावं.

Pages