Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिकेज थांबवण्यासाठी
लिकेज थांबवण्यासाठी अमेरिकेने प्लंबर पाठवले होते. ही खास गुप्त बातमी मला आत्ताच मिळाली. माझ्या गुप्त हेरांचे जाळे सगळीकडे पसरले आहे.
काळजी नसावी आता लिकेज थांबले आहे. बोरोन ची कृपा.
ट्रम्प शेअर मार्केट खेळत आहे.
ट्रम्प शेअर मार्केट खेळत आहे. " Office of profit ".
मानव तुम्ही माझे लेग पुलिंग
मानव तुम्ही माझे लेग पुलिंग करत आहात हे समजतंय>>
तुमचे नाही हो!!
हो वेगवेगळे ठेवले असले तरी ते रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलच आहे ना. आणि ते ही प्रॉपर शिल्ड्समध्ये ठेवलेले रेडीएशन्स पर्यावरणात लिक होऊ नये म्हणुन. आणि सहज मारा करता येणार नाही अशा दुसऱ्या अनेक शिल्ड्स (टेकड्या पर्वत, त्यात परत काँक्रीट भिंती) मध्ये ठेवलेले.
तर समजा असा साठा जिथे आहे तिथे आपण मिसाईल्सने सगळ्या शिल्ड्स भेदून काढल्या. आपले मिसईल्स टेकडीच्या आतील गुहेत जाणाऱ्या रस्त्यातील सगळी दारे तोडून अथवा टेकडीतून घुसून आत गेली आणि आत जाऊन स्फोट केले.
त्यामुळे शिल्डिंग मटेरियलचे तुकडे होऊन आतील रेडिओ ऍक्टिव मटेरीयल सुद्धा इतस्ततः विखुरले गेले काँक्रीट भिंती भेदून. हे स्फोट एवढे प्रचंड होते की त्यामुळे भूकंप झाला. आता टेकडीवर आणि बाजूच्या पर्यावरणात रेडिएशन होत आहे.
हा. हे शक्य आहे.
हा. हे शक्य आहे.
“There are more things in heaven and earth, Horatio, than are dreamt of in your philosophy”
This quote from Shakespeare's "Hamlet" suggests that there are many things in existence that go beyond human understanding and imagination. It reflects the idea that reality may contain mysteries and phenomena that are not yet comprehended by people.
हे म्हणजे ०७.५७ ची fast लोकल दादरला पकडून आत घुसून खिडकी शेजारची जागा पटकावणे झाले की.
मी शरण आलो आहे,मानव, सर. शरणं गच्छामि
Stop it. If you dont stop it,
Stop it. If you dont stop it, we are not goint to do any trade.
People never use the trade the way I use it.
And all of a sudden they said, I think we are going to stop.
And they have.
They did it for a lot of reasons but trade is a big one.
https://www.youtube.com/watch?v=R09jQmt-6GI
शेजारी उभे असलेले गृहस्थ जय भट्टाचार्य ना?
And all of a sudden they said
And all of a sudden they said, I think we are going to stop>>
हा हा हा.... तात्या काही थांबत नाही. गाडी बुंगाट सुटलीय एकदम!
भुकंपाचा केंद्र बिंदू
भुकंपाचा केंद्र बिंदू पृथ्वीच्या गर्भात १० किमी वर होता... कदाचीत पाकिस्तान ने १० किमी खोलीवर अण्वस्त्रे दडवून ठेवली असावीत आणि आपल्या मिसाईलच्या नाकावर बोअर/ बोगदा खणण्याचे यंत्र बसवलेले असणार. मिसाईलवरच्या बोअर खणणाऱ्या यंत्राने आधी १० किमी खड्डा खणला असणार व नंतर वॉरहेडचा स्फोट घडवीला गेला असणार.
उद्या ऑफिसात जाऊ की नको?
उद्या ऑफिसात जाऊ की नको?
हे म्हणजे ०७.५७ ची fast लोकल
हे म्हणजे ०७.५७ ची fast लोकल दादरला पकडून आत घुसून खिडकी शेजारची जागा पटकावणे झाले की.>>> तांत्रिक बिघाडामुळे लोकल कारशेडला जात असल्यास शक्य आहे की.....कृपया आवश्यक नसल्यास दिवे आणि पंखे तेवढे जरा बंद करा आणि हवं तिथे बसा....
प्रचार सुरू
प्रचार सुरू
Toolkit activated
https://x.com/sachin_rt/status/1921956689630089631
हिथं पण बऱ्याच लोकांनी
हिथं पण बऱ्याच लोकांनी operataion सिंदूर च कौतुक केलं हा ही Toolkit चाच भाग आहे की अजून दुसरं काय?
All Quiet on the Western
All Quiet on the Western Front!
https://www.youtube.com/watch?v=hf8EYbVxtCY
युद्ध म्हणजे काय त्याची थोडीशी कल्पना येईल.
Air India
Air India
@airindia
·
7h
#TravelAdvisory
In view of the latest developments and keeping your safety in mind, flights to and from Jammu, Leh, Jodhpur, Amritsar, Bhuj, Jamnagar, Chandigarh and Rajkot are cancelled for Tuesday, 13th May.
We are monitoring the situation and will keep you updated.
2:55 AM · May 13, 2025
अजून सगळं आलबेल नाही का?
---
ट्रंपच्या ट्रेड नो ट्रेड वक्तव्याबद्दल - ब्र.
--
पहलगामनंतर ज्या लोकांनी काश्मीरची विमानप्रवासाची तिकिटं, तिथली हॉटेल बुकिंग्ज रद्द केली त्याचे पैसे रिफंड झालेले नाहीत.
हा धागा पुर्ण वाचायचाय..
हा धागा पुर्ण वाचायचाय..
>>आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष
युट्युबवर 'पैसे भरून तज्ज्ञांना प्रश्न विचारा' टाईप जी लाईव्ह सेशन्स चालतात त्यात एका प्रश्नकर्त्याने "भारत आणि पाकिस्तानमध्ये इतकी तडकाफडकी शस्त्रसंधी का झाली? रेडिएशन लिकेज बद्दल जे म्हंटलं जात आहे त्याचाच हा परिणाम आहे का?" असा प्रश्न विचारला होता.
त्यावर एका माजी IFS की IAS अधिकारी असलेल्या 'तज्ज्ञाने' दिलेले उत्तर मला फार आवडले. त्यांच्या उत्तराचा सारांश काहीसा असा आहे...
"तुमच्या प्रश्नाचे नेमके उत्तर याक्षणी माझ्याकडे नाही. सध्या मी पण त्याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात आहे. अशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे आपल्यापरीने मिळवण्याच्या प्रक्रियेत आपल्यासमोर आलेल्या माहितीचे विश्लेषण करावे लागते. उपलब्ध माहितीतली काही माहिती सत्य, काही अर्धसत्य तर काही साफ खोटीही असू शकते. आपल्या आकलनक्षमतेनुसार तिचे वर्गीकरण करून सत्य आणि अर्धसत्य वाटलेली माहिती वेगळी करून त्यातली सत्य वाटलेली माहिती वर आणि अर्धसत्य वाटलेली माहिती खाली अशी त्यांच्या शक्यतांची गुणात्मक क्रमवारी लावावी लागते. नित्यनवीन माहितीची भर पडत असल्यास ह्या यादीत काही नवीन शक्यतांची भर पडत असते किंवा आधीच्या काही शक्यता बाद होत असतात त्यामुळे त्यातल्या मुद्द्यांची क्रमवारीही बदलत असते.
वरपासून सुरुवात करून एकेक मुद्दा तर्काच्या कसोटीवर तपासून पाहात खाली खाली जात असताना एखाद्या मुद्द्यावर आपल्याला निष्कर्षाप्रत घेऊन येणारा हा प्रवास अनिश्चित कालावधीचा असतो, कधी तो लवकर संपतो, कधी संयमाची कसोटी पाहणारा ठरतो तर कधी आपण निष्कर्षाप्रत येण्याआधीच अधिकृत स्रोतांकडून त्याचे उत्तर मिळाल्याने अकाली संपतो.
हवाई हल्ल्यांसाठी भारताने निवडलेली ठिकाणे खूप महत्वाची आहेत. त्यातल्या फक्त पाकिस्तानाच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा एखाद्या ठिकाणाचा दरवाजा आपण नुसता ठोठावून जरी आलो असलो तरी त्यातून गेलेल्या संदेशाचे महत्व आणि गांभीर्य भारत-पाकिस्तान सहित उर्वरित जगाला चांगलेच समजते. रेडिएशन लिकेजचा मुद्दा हि आज कितीही अतिशयोक्ती वाटत असली तरी माझ्यामते ते पुर्णसत्य नाही पण अर्धसत्य असू शकते. त्यामुळे हा मुद्दा मी डिसकार्ड न करता त्याला माझ्या शक्यतांचा क्रमवारीत अगदी तळाचे का असेना पण स्थान नक्की देईन.
अशी तडकाफडकी शस्त्रसंधी होण्यास ज्या एक किंवा अनेक गोष्टी कारणीभूत असतील त्याची माहिती कालांतराने आपल्यासमोर येईलच परंतु तोपर्यंत किंवा मी कुठल्या निष्कर्षापर्यंत पोचण्याआधी जरी चुकीच्या किंवा अतिरंजित प्रकारे हा मुद्दा समोर आला असला तरी वरील एकाच कारणासाठी त्याची एक सहस्त्रांश का असेना पण शक्यता वाटत असल्याने त्याला थेट केराची टोपली दाखवणार नाही."
केवळ प्रश्नकर्त्याने विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भातच नाही तर इतरही गहन प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दिशादर्शक ठरेल अशी माहिती त्या साहेबांनी आपल्या उत्तरात दिली असल्याने मला तरी त्यांनी मांडलेला मुद्दा आणि विचार आवडले आणि पटले आहेत!
हे महाशय माझ्या विषयी बोलत
हे महाशय माझ्या विषयी बोलत आहेत.
लिकेज आणि भूकंप ह्या विषयांची चर्चा आंतरजालावर सगळीकडे चालू आहे त्याचे पडसाद मायबोलीवरही उमटले. मी तो पर्यंत ह्या धाग्यावर मी एकही प्रतिसाद दिला नव्हता. त्या अनुषंगाने मी लिहिले होते. मी का लिहिले त्याला कारण आहे. ते मी इथे लिहिणार नाही.
त्यांचा गैरसमज झाला असावा. की मी त्यांनाच टार्गेट करत आहे. चोराच्या मनात चांदणे. असो.
भुकंपा विषयी बोलायचे झाले तर आज वैद्न्यानिकांनी त्याचे स्पष्टीकारण दिले आहे. जिद्न्यासुंनी अवश्य वाचावे.
ही घ्या लिंक https://economictimes.indiatimes.com/news/international/world-news/epice...
मी विज्ञान कथा लिहितो, हा लोकांचा गैरसमज आहे. त्याबद्दल त्यांनी एक तिरकस वाक्य लिहिले आहे. चालायचंच. माझ्या कथा वाचून कोणी आत्महत्या केली असेल किंवा करणार असेल तर प्लीज हात वर करा.
संजय भावे, इथे रेडिएशन लिकेज
संजय भावे, इथे रेडिएशन लिकेज वरच्या पोस्ट्स मी केल्या आहेत आणि त्याचा तुम्ही अथवा कुण्याही मायबोली सदस्यचा संबध नाही. हा व्हिडिओ बघा जो मी परवा रात्री मायबोलीवर दुसऱ्या एका धाग्यात "युद्धस्य कथा रम्या" अशा कॉमेंटने दिला होता. तो पर्यंत मायबोलीवर तरी कुणी रेडिएशन लिक बद्दल लिहिल्याचे माझ्या वाचनात नाही. असे अजूनही व्हिडीओ आहेत. व्हाट्सऍपवर सुद्धा याबाबत बरीच चर्चा झाली. तेव्हा इथे कुणीही स्वतःच ती थिअरी शोधुन पसरवतंय असं पुसटसेही वाटण्याची शक्यता नाही. ही थिअरी पाकिस्तानात भूकंप, US DOE चे रावळपिंडीला दिसलेले विमान (जे अमेरिकेने पाकिस्तनला २०१० मध्ये दिले होते असे रेकॉर्ड्स सुद्धा कुणी दिले आहेत.) यावर आधारीत आहेत हे मी इतरत्र कालच सकाळीच लिहिले होते.
मी वर दिलेल्या व्हिडिओप्रमाणे जे लोक अगदी छातीठोक पणे स्वतः थिअरी रचून ती पसरवत आहेत त्यांच्याबद्दल रेडिएशन लिकेजवरच्या पोस्ट्स आहेत, एक वगळता.
याबद्दलची माझी या धाग्यावरील कालची पहिली पोस्ट "पण न्यूक्लिअर रेडिएशन लिकेज हे फार मोठं आणि गुंतागुंतीचं प्रकरण असतं ना? " अशा सुरवाती पासून केलेली इथे सगळेच ज्यांना ही थिअरी खरी की नाही प्रश्न पडला आहे त्यांना उद्देशुन होती.
मानव
मानव
SORRY.
तुम्ही उगाचच ह्याच्यात फसलात.
लक्ष्य मी होतो.
>>"इथे रेडिएशन लिकेज वरच्या
>>"इथे रेडिएशन लिकेज वरच्या पोस्ट्स मी केल्या आहेत आणि त्याचा तुम्ही अथवा कुण्याही मायबोली सदस्यचा संबध नाही...">>
ओक्के....
आमच्या केकू शेठनी स्वतःच बाणासमोर येऊन उभे राहात आपल्यालाच जखमी करून घेतलंय आणि तुमचाही खुलासा पटला असल्याने आधीच्या प्रतिसादातले पाहिले दोन परिच्छेद काढून टाकत आहे, खालची माहिती तेवढी ठेवतो!
चू. भू. दे. घे.
चला. धागा संपादित झाला.
चला. धागा संपादित झाला.
मी बाणा समोर का आलो? ज्याना उत्सुकता असेल त्यांनी मला विपु करा. मी लिंक देईन. आता काय झालं आहे की संपादन केल्यामुळे त्रयस्थाना संदर्भ समजणार नाही. हे आधी माहित असते तर स्कीनशॉट घेऊन ठेवला असता.
मी संपादन करणारही नाही वा डिलिटही करणार नाही.
>>"मला विपु करा. मी लिंक देईन
>>"मला विपु करा. मी लिंक देईन.">>
वरचा प्रतिसाद संपादित करुन त्यातच सगळ्या लिंक्स द्या कि शेठ....
सगळ्यांचीच करमणुक होउन जाउद्यात राव 😀
धागाकर्ते... थोड्या अवांतरासाठी क्षमा करा हो...
फार्स विथ द डिफरन्स, पेवॉल
फार्स विथ द डिफरन्स, पेवॉल ओलांडून मिळालेल्या न्यु यॉर्क टाइम्सच्या बातमीच्या लिंकसाठी धन्यवाद.
मानव व इतरांच्या
मानव व इतरांच्या न्युक्लीयर रेडियेशनबद्दलच्या पोस्ट्स आता पुन्हा वाचल्या. तो व्हिडियोही पाहायचा प्रयत्न केला. ते माजी लष्करी अधिकारी फारच जास्त आत्मविश्वासाने बोलत होते , असं वाटलं. फारच जास्त = अति.
मोदींचं भाषण आज पेपरात वाचलं. We wont accept pak nuclear blackmail. असं ते म्हणाले.
न्यु यॉर्क टाइम्सची बातमी पुन्हा वाचली (आभार फा वि द डि)
या सगळ्यातून पाकच्या न्युक्लिअर
वॉर हेड्सनाशस्त्र योजनेला धोका निर्माण झाला - ती भारताच्या मार्याच्या टप्प्यात आहे -हे स्पष्ट झालंBut the most significant causes for concern came late Friday, when explosions hit the Nur Khan air base in Rawalpindi, Pakistan, the garrison city adjacent to Islamabad.
The base is a key installation, one of the central transport hubs for Pakistan’s military and the home to the air refueling capability that would keep Pakistani fighters aloft. But it is also just a short distance from the headquarters of Pakistan’s Strategic Plans Division, which oversees and protects the country’s nuclear arsenal, now believed to include about 170 or more warheads. The warheads themselves are presumed to be spread around the country. One former American official long familiar with Pakistan’s nuclear program noted on Saturday that Pakistan’s deepest fear is of its nuclear command authority being decapitated. The missile strike on Nur Khan could have been interpreted, the former official said, as a warning that India could do just that.
यातला तांत्रिक भाग समजून घ्यायला भरपूर वेळ लागेल. पण मी आतापुरता लावलेला अर्थ - न्युक्लिअर वॉर हेड्स (अण्वस्त्र?) )देशभर विखरून ठेवलेली. पण त्यांचे नियंत्रण करणारी यंत्रणा इथे. ती भारत उद्ध्वस्त करू शकतो , हे पाकिस्तान आणि अमेरिकेला कळलं. आणि अमेरिकेत पुढच्या हालचाली झाल्या.
अमेरिकेने आधी पाकिस्तानला युद्धविरामासाठी तयार केलं. मग भारताशी बोलले. भारताने युद्धविरामाची तयारी स्वतः पाकिस्तानने आमच्याशी बोलून दाखवावी. थोडक्यात आम्हांला पांढरं निशाण दाखवावं, असं म्हटलं पाकने तसं केल्यावर युद्धविराम झाला.
ही घोषणा या दोन्ही देशांकडून होणं उचित होतं. पण ट्रंपना मीच खरा विश्वगुरू सिंड्रोम झाला आणि त्यांनी घोषणा करून टाकली. अमेरिकेच्या सांगण्यावरून आपण युद्धविराम केला हे भारतासाठी फार खरं नसावं आणि तसं जाहीर होणं भारताला कधीही नको असेल. पण पुन्हा विश्वगुरू सिंड्रोम.
भारताने अमेरिकेवर इग्नोरास्त्र मारलं. त्यात आपलेच दात आपलेच ओठ अशी परिस्थिती. शिवाय कुठेतरी काहीतरी अडकलेलंही असेल. त्यामुळे तात्यांचा क्लेम अधिकृतरीत्या नाकारणं शक्य नाही.
मधल्यामध्ये पाकिस्तानला अमेरिकेने आमच्यात समेट घडवून आणला असं म्हणून पतली गली से निकलने का मौका मिळाला.
वेस्टर्न मीडियामध्ये पाकिस्तानची बाजू मांडणारे त्यांच्या देशाचे सरकारशी संबंधित किंवा माजी , लोक दिसले. भारताकडून असं कोणी दिसतंय का? शशी थरूर काय भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले नसतील.
पीअर्स मॉर्गन शो वर हीना रब्बानी खानला बरखा दत्त अतिरेकी मुद्राभिनयाने चिडवताना दिसली. तिच्या शेजारी बीअर बायसेप्स दिसला. या दोघांनी हीनाच्या म्हणण्याच्या चिंध्या केल्या असं वाचलं. बघायचं धाडस नाही. पण बीअर बाय सेप्स? गेला बाजार अभिजीत अय्यर मित्रा चालला असता
बीअर बाय सेप्स >>>
बीअर बाय सेप्स >>>
रणवीर अलाहाबादियाने ओसामा बिन लादेनचा आणि रौफ अझहरचा फोटो दाखवून चांगले पॉईंट्स मांडले. विशेषतः बिन लादेनच्या पॉइंटवर घियास नामक पाकिस्तानी रिप्रेझेंटीटीव्हने लादेन पाकिस्तानी आर्मीपासून लपून बसला होता असं बिनडोक स्टेटमेंट मारल्यावर पिअर्स मॉर्गननेही त्याची जाहीर थट्टा केली. हिना रब्बानीचं स्टेटमेंट ऐकायला मी थांबले नाही.
शशी थरूर काय भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले नसतील.
>>> पण ते भारताचे प्रतिनिधी असल्यासारखे वावरत आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय फोरम्सवर वावरण्याचा अनुभव आणि वक्तृत्वकला याचा योग्य उपयोग करून घेतला जावा.
पिअर्स मॉर्गनने मुद्दाम
पिअर्स मॉर्गनने मुद्दाम इन्फ्लुएन्सर्स बोलवले होते का? पाकिस्ता वाला सुद्धा यु ट्युबर होता असं वाचलं.
>>हिना रब्बानीचं स्टेटमेंट
>>हिना रब्बानीचं स्टेटमेंट ऐकायला मी थांबले नाही.<<
तिने देखील टेररिस्टना पाकिस्तान थारा देतं कि नाहि? या प्रश्नाला सतत बगल दिली. त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी जाहिर कबुली दिल्याचा दाखला दिल्यावर तर तिने अक्षरशः पळ काढला. थोडक्यात पाकिस्तान काय किंवा इथे काय, बातमीची सत्यता हळु-हळु बाहेर येउ लागल्यावर सारवासारव करुन पळ काढण्याची प्रथा आहे...
>>सगळ्यांचीच करमणुक होउन
>>सगळ्यांचीच करमणुक होउन जाउद्यात राव <<
बहुतेक तुम्हि माबोवर नविन आहात. हँग टाइट. इथले नेहेमीचे अयशस्वी कलाकार करमणुकिच्या बाबतीत निराश करत नाहित...
टेररिस्टना पाकिस्तान थारा
टेररिस्टना पाकिस्तान थारा देतं की नाही यावरची तिची प्रतिक्रिया पाहिली होती इथेच बरखा तिला चिडवत होती.
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं जाहीर स्टेटमेंट म्हणजे we have been doing the dirty work of the USA and the west for decades हेच ना? मग त्यातला अर्धाच भाग का उचलायचा?
हा मुद्दा आला की . त्यावरची हिलरीची स्टेटमेंट्स पुन्हा आठवतात.
सध्या सगळ्यात जास्त करमणूक तातोबा करताहेत .
Trade didn’t come up in any
Trade didn’t come up in any talks with US on evolving military situation, says MEA
आपल्याला माहीत आहे अर्थात, MEA कडुन आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण.
तात्याला अर्थात तरीही फरक पडणार नाही ती गोष्ट वेगळी.
अशा लोकांना भर चौकात
अशा लोकांना भर चौकात जोड्याने का मारू नये ?
https://www.livehindustan.com/madhya-pradesh/mp-minister-controversial-s...
Pages