कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या आठवड्यात गुहागरचे हापूस आंबे आले. फळ थोडे लहान, मध्यम आकाराचे.

Packing जरा fancy होते. याआधी असे नसायचे.

अतीव गोड निघाले. 😍

aad57bc1-4b85-46a9-a4a7-0af3fed7e3ff.jpeg

अनिंद्य, तुम्ही फोटो उडवले म्हणजे काय केलं? माझीही खाजगी जागा भरत येते. मग मी खाजगी जागेतले काही जुने फोटो डिलीट करतो. थोडी जागा मिळते.

खाजगी जागेतले काही जुने फोटो डिलीट केले मी.

त्यानी थोडी जागा झाली पण हे काही फार दिवस कामी येणार नाही. कैरी आंब्याचेच २० फोटो वाट बघताहेत इथे डेब्यू करण्याची 🙂

Packing जरा fancy होते. >>>> जास्तच fancy दिसतंय.
कैरी आंब्याचेच २० फोटो वाट बघताहेत इथे डेब्यू करण्याची>>>> आणा त्यांना लवकर इथे..

आमच्याकडे मिळणार्‍या आंब्यांना असंच पॅकिंग असतं.
परवाच २ डझन हापूस आणले. आमरस बनताही ही है
4a2ea491-a83a-4c30-9272-4c5d0dc03127.jpeg

आमरस छानच दिसतोय.
रस जरी आवडीचा नसला तरी presentation भारी आहे.
बाठयाच्या बाजूच्या शिरा कापूनही उरलेल्याचा रस एक डबा भरून झाला आहे.दोन दिवसांनी शिरा करायला हवा.
मला मात्र सकाळ संध्याकाळ उरलेल्या बाठ्याचा रस काढून वैताग आला आहे.

आता अजून एक पेटी मागवली आहे.मग संपला आंबा.
चौसा ,केशर चांगले लागतात.तेही संपल्यावर आंबे नसताना आपण कसे जेवत होतो याचे नवल वाटेल.

आणि मोगरा काय, नाकाशी नेऊन वास घ्यायचे. मी दमट हवा मिस करत नाही, पण ते घमघमणं मात्र मिस करते...... .. स्वाती,आताचे हापूसही तेवढे घमघमत नाही.विजयदुर्गकडचे हापूस आंबे आहेत .पण अगदी मंद सुवास येतो.पायरीचा मात्र घमघमाट खुळावून सोडणारा होता.चवीला दोन्ही स्वर्गीय!

…शोधाशोध करायला लागू नये म्हणून …

हे बेस्ट केलेत. 👍

आंब्याच्या “पाट्या” :

हे बघा. भाषा कशीही असली तरी कारणे-सूचना धमाल आहेत

IMG_8561.jpeg

IMG-20250512-WA0028.jpg

फायनली आज आमरस पुरी बेत केला, लगे हात पालक भजी, मिरची भजी, पापड तळण केलं.

छान लालसर केशरी रंग आहे आमरसाचा, फोटोत पिवळसर का दिसतो, समजत नाही.

छान.

हे आमचे Sundowner - of a different kind.

कैरीयुक्त शेवपुरी, चिंचेला पूर्ण फाटा. 😋

1f18d008-4341-406f-a41e-a9a4de1efc12.jpeg

अनिंद्य, सायो, अस्मिता मस्त फोटो.

इथे डोंबिवलीत ठाकुर वडापावमध्ये विविध सॅलड घालून देतात, कैरीच्या दिवसात कैरी असते. त्यांच्या मुळ वड्यापेक्षा सॅलड आवडते मला.

शेवपुरी, आमरस पुरी दोन्ही मस्त!
अनिद्य ही पाटी मागच्याच विक मधे नेटवर फार गाजलेल्या किस्श्यानतरची आहे की आधीची?

हे मुंबईवासिनी (मूळ कानपूरकर) मैत्रिणीकडचे आम्रस्वागत. त्यांच्या उप्रवाल्या आमराईतल्या आंब्यांचा मँगो शेक / रस.

तसेही यंदा हापूस भरपूर झाला. आता दशहरी, केशर, बदामी, चौसा, तोतापुरी आणि अन्य देशी आंबे खुणावत आहेत.

@ प्राजक्ता,

नेटकिश्श्याबद्दल अनभिज्ञ आहे. प्रकाश पाडा. 🙂

@ अन्जू,

कैरी सॅलड आवडीचे, विशेषत: थाय स्टाइल. पण म्हणून ते वडापाव सोबत नाही खाणार. तो मान तळलेल्या हिरव्या मिरच्यांचाच 😋

अनिंद्य, मस्त दिसतोय शेक.
इकडे आमच्याकडे हापूस वगैरे मिळत नाही तेव्हा मेक्सिकन आंबे आवडतात आम्हांला. पिकायला लागले की घमघमाट सुटतो.

हो, जैसा देस वैसा भेस. Eat local.

सर्व प्रकारच्या आंब्यांना न्याय द्या. 👍

BTW, “घमघमाट” हा मेक्सिकन आंब्यांचा usp/ गुणविशेष आहे का ? वर अजून कुणीतरी हेच म्हटले आहे.

भरत,

तुमचा स्नेह आहे, अन्यथा सर्व फोटो जुन्या फोन ने सहा-दहा सेकंदात काढलेले असतात-आहेत.

त्याला कारण नेहेमी असलेली खाण्याची घाई 😁

भरत, मँगो कलाकंद लिंक बद्दल धन्यवाद.
ती आंबे तोडू नका पाटी भारी आहे.
अंजू, मस्त दिसतंय ताट.
अनिंद्य,
सगळ्या नव्या एन्ट्र्या मस्त.
त्यांच्या उप्रवाल्या आमराईतल्या आंब्यांचा मँगो शेक / रस.>>>> कातिल फोटो.
आम्हाला बोलवा की....

त्यांच्या उप्रवाल्या आमराईतल्या आंब्यांचा मँगो शेक / रस.... .सुंदर दिसतेय.

यावेळी पायरी खूप कमी मिळाला.

Pages