
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
वा वा ! दामले मास्तरांचेची
वा वा ! दामले मास्तरां
चेचीपायबोटं लागली धाग्याला.मनीमोहोर, तुमचा शेवटचा प्रतिसाद तुम्ही स्वतः लिहिलाय का? उष्णतेशिवाय पाक होऊ शकतो का?
मनीमोहोर, तुमचा शेवटचा
मनीमोहोर, तुमचा शेवटचा प्रतिसाद तुम्ही स्वतः लिहिलाय का? उष्णतेशिवाय पाक होऊ शकतो का? >> नाही, नेट वरची आहे.
उष्णतेशिवाय पाक होऊ शकतो का? भरत हे तुम्ही का विचारताय ते कळलं नाही. त्या पोस्ट मध्ये उष्णतेशिवाय पाक होऊ शकतो लिहिलं आहे का ?
तिथे म्हटलंय - फळ आणि साखरेचा
तो मजकूर इतका विचित्र वाटतोय, की तुम्ही असं कसं लिहाल असा प्रश्न पडला.
तिथे म्हटलंय - फळ आणि साखरेचा (किंवा गुळाचा) पाक एकत्र करून, ते गरम करून थंड झाल्यावर - गरम पाकातच फळांचे काप घालतात ना? म्हणून विचारलं.
मी कॉपी पेस्ट केलेली पोस्ट
मी कॉपी पेस्ट केलेली पोस्ट ही मुरांब्याची व्याख्या सांगणारी कायदेशीर पोस्ट खचितच नाही. सर्व शक्यता लक्षात घेऊन लिहिलेल्या कायद्याचे अनेक अर्थ निघू शकतात तिथे ह्याच काय घेऊन बसलात ? तरी ही मला वाटणारा ह्याचा मतितार्थ असा.
फक्त उन्हात ठेवून केलेला तोच मुरांबा असं नाही तर पाकात (मग तो गुळाचा असो वा साखरेचा किंवा गॅस वर केलेला असो वा कडक उन्हात ठेवून केलेला ) घातलेल्या फळांच्या फोडी म्हणजे मुरांबा . ( चिनुक्स ची पोस्ट वाचली असेलच ) गॅसवर ठेवून पाक केलेल्या पदार्थाला मुरांबा म्हणणे म्हणजे पूर्व दिशेला पश्चिम दिशा म्हणण्यासारखे आहे असे मला तरी वाटत नाही. अर्थात ह्यातली सीमारेषा फारच धूसर असल्याने ज्याला जे वाटत ते तो म्हणू शकतो. कोणताही शब्द वापरला तरी अर्थाचा फार अनर्थ होणार आहे असं मला वाटत नाही.
हा धागा भरकटू नये म्हणुन इथे माझी लेखन सीमा.
या धाग्यावर आंच वाढेल असं
या धाग्यावर आंच वाढेल असं वाटलं नव्हतं.

पाकव्याप्त फळं म्हणजे मुरांबे - असं म्हणायचा मोह टाळते आहे या ठिकाणी.
पहिला आंबा केशरी मधुर फोडी
पहिला आंबा केशरी मधुर फोडी आहाहा .....स्वर्ग


यावर्षीचा पहिला आमरस ,आंब्याचा रंग फोटो लाईट की फ्लॅश मुले पिवळसर आलाय पण प्रत्यक्षात सुरेख केशरी दिसत होता. कॅमेराच्या मर्यादा.
साखरांबा, मुरांबा, मोरांबा
साखरांबा, मुरांबा, मोरांबा शब्द-कृती-चर्चा छानच रंगली इथे. आताच सर्व प्रतिसाद वाचले. नवीन माहिती मिळाली, अनेक आभार.
सिमरन, तुमचे सचित्र प्रतिसाद विशेष. सुरुवात झाली.
… इथे पुलंच्या गोष्टीतले
… इथे पुलंच्या गोष्टीतले मास्तर खूप आहेत…. हे जरा उलगडून सांगा कुणी
# आंबटशौक
# आंबटशौक
कैरीचे सार / आमटी, तूपभात आणि
कैरीचे सार / आमटी, तूपभात आणि कैरीचेच ताजे लोणचे
सिमरन, फोडी अगदी उचलून
सिमरन, फोडी अगदी उचलून खाव्यात अशा.
अनिंद्य,
आंबटशौक....मलाही आहे हा
करकरीत कैरीच्या फोडी. त्याही मीठ लावून तोंडाला पाणी सुटले.
.. कैरीचे सार / आमटी, + भात …
.. कैरीचे सार / आमटी, + भात …
क्या बात है 👌
योगायोगाने काल आमचाही हाच मेन्यू.
Happy meal 😋
आत्ता कैरी ची कढी/ सार संपवले
आत्ता कैरी ची कढी/ सार संपवले.
छान सामो, मी यावेळी केलं नाही
छान सामो, मी यावेळी केलं नाही सार.
बाकी सर्वांचे फोटोही मस्त.
चंद्रमा ताट अगदी तोंपासू
चंद्रमा ताट अगदी तोंपासू दिसतंय, अनिंद्य
>>>>मी यावेळी केलं नाही सार.
>>>>मी यावेळी केलं नाही सार.
कर नक्की. पण मी नारळ खवुन मिक्सरमधुन वगैरे सांगोपचार केले नाहीत, सरळ नारळाचे दूध घातले.
चंद्रमा ताट ? मस्त बारसं केलं
चंद्रमा ताट ? मस्त बारसं केलं.
तेवढीच कलाकुसर हो 😁
अर्थात हे माझे version. यात नारळ / खोबरे वगैरे नाही.
…. आंबटशौक....मलाही आहे हा…. 😁
सांगोपचार नाही साग्रसंगीत
सांगोपचार नाही साग्रसंगीत सोपस्कार म्हणायचे होते.
सांगोपचार पण चालेल. तुम्ही
सांगोपचार पण चालेल. सांगितलेले उपचार.
तुम्ही “सामो”पचार केला तरी योग्यच 😀
(No subject)
फायनली कोकणातले घरचे पाच डझन हापुस आंबे परशुराम जन्मोत्सवा दिवशी आले. लगेच परशुरामाला एकाचा नैवेद्य दाखवला, दुसऱ्या दिवशी अक्षयतृतीयेला सर्व देवांना एकाचा नैवेद्य दाखवला आणि ते आज खाल्ले फार गोड, मधुर काय म्हणतात ते आहेत. शुक्रवारी माहेरी एक डझन, शेजारी थोडे दिले आणि एक इथली ग्रामदेवता म्हणजे गावदेवी तिला अर्पण करुन आले. सुरेख केशरी रंग आहे , तो इथे दिसत नाहीये तेवढा.
सुरीने नीट कापता येत नाही मला पण दोन आंब्यांसाठी विळी काढली नाही.
घरचे पाच डझन हापुस आंबे !
घरचे पाच डझन हापुस आंबे !
येणजॉय !!
स्वातीच्या रेसिपीने
स्वातीच्या रेसिपीने आम्रसांदणी.
अंजू, मस्त आहे फोटो, रंग
अंजू, मस्त आहे फोटो, रंग
शेजाऱ्यांची मज्जा...
भरत,
आम्रसांदणी एक नंबर दिसतायेत.
आवळा मुरवला तर मोरावळा
आवळा मुरवला तर मोरावळा म्हणतात आमच्या भारतातील एका गावात >> आमच्याही गावात
तामिळ भाषेत 'मंगा' म्हणजे आंबा>>>>
मल्याळममध्येही मांगा म्हणजे आंबा. त्यांचे एक कन्नीमांगा (कन्नी -छोटे आंबे/कैरी) किंवा वडू नामक अख्ख्या बाळकैरीचे लोणचे असते. ते तेलातले नसावे बहुतेक पण खार झणझणीत असतो. होस्टेलवर असताना शनिवारी होस्टेलच्या जेवणाचा कंटाळा आला की आम्ही जवळच्या छोट्या घरगुती रेस्टोरंटमध्ये जायचो. उन्हाळ्याच्या दिवसात तिथला दही भात आणि कन्नीमांगा म्हणजे स्वर्ग.
तिखट चालत असेल तर कन्नीमांगा ट्राय करा.
शेजाऱ्यांची मज्जा... >>>
शेजाऱ्यांची मज्जा... >>> यावेळी कमी जणांना देता आले. दोन पेट्या येतात तेव्हा बिल्डिंगमध्ये बऱ्याच जणांना देते. अगदी सोसायटीला नाही फक्त आमची विंग. पाच विंगज आणि ८० फ्लॅटस आहेत त्यामुळे फक्त आमच्या बिल्डिंगमध्ये देते. आमच्या जुन्या मदतनीस नाही हल्ली दोन वर्ष नाही येत पण आंबे येतात तेव्हा त्यांना बोलावते किंवा घरी नेऊन देते, ते ही यंदा करता येणार नाही. नवीन मदतनीस कोणी नाही सध्या.
आम्रसांदणी सहीच एकदम.
मल्याळममध्येही मांगा म्हणजे
मल्याळममध्येही मांगा म्हणजे आंबा.
+ १
कन्नीमंगा नव्हते माहित.
ते अख्ख्या बाळकैरीचे लोणचे मात्र सर्वच सौदेंडियन राज्यात प्रचंड लोकप्रिय आहे. मलाही त्याचे सुपर स्पायसी वर्जन फार आवडते.
@ भरत
@ भरत
आम्रसांदणी नाव आणि रंग दोन्ही सुंदर.
त्या मिनी कैरी मीठाच्या
त्या मिनी कैरी मीठाच्या पाण्यातलयाही मस्त लागतात. लोणचे खाल्लं नाही कधी.
सिमरन चा आमरस, आमटी भात,
सिमरन चा आमरस, आमटी भात, कैरीच्या फोडी , अंजू च्या पिक्या आंब्याच्या फोडी, भरत यांच्या सांदण्या सगळे फोटो मस्तच.

अनिंद्य यांचा आमटी भात मस्तच दिसतोय.
काल मी आंब्याचा रस घालून शिरा करतात तसा साखरभात केला होता. छान लागला, मला आवडला. रस होता त्यामुळे पाणी आणि साखर दोन्ही थोडं कमी घातलं.
आमचे आंबे संपत आले, ह्या रविवार पासून डेली ट्रक सर्व्हिस बंद. खूप कमी दिवस होता ह्या वर्षीचा सिझन...
आमरस घालून साखरभात! तोंपासु!!
आमरस घालून साखरभात! तोंपासु!!
Pages