कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दोघांनाही... रंग मस्तच आला होता आणि स्वाद ही छान वाटला. भात आणि आमरस खातात पण मी कधी नाही ट्राय केलंय त्यामुळे शंका वाटत होती पण मस्तच लागला.

सीझन संपला ? इतक्या लवकर ? >> होय म्हणजे देवगडचे... तसा आमचा सिझन सुरू ही लवकर होतो पण ह्या वर्षी थोडा जास्त लवकर संपलाय.
आता केशर , बलसाड ,दशेरा आणि माझे सर्वात फेवरेट तोतापुरी हे खायचे...

रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्हा, उत्तर कोकण म्हणजे पालघर जिल्हा हापुस सिझन संपला नसेल अजून. आमचे देवगडचे संपतात लवकर.

हेमाताई आंब्याचा साखरभात सुरेख.

स्वाती, नेक्स्ट बेस्ट पण झकास दिसतेय की.

सुंदर प्लेटिंग… स्कूपिंग काय, स्लायसिंग काय, ऐकत नाही तुम्ही आज 🙂

आणि आइसक्रीमचे टेक्स्चर वरचा क्लास. 👌

कोणता आंबा आहे ?

स्वाती,
जबरदस्त प्लेटिंग
मस्तच.

>>>>>>सांगोपचार पण चालेल. सांगितलेले उपचार. तुम्ही “सामो”पचार केला तरी योग्यच
हाहाहा अनिंद्य Happy सामोपचारच ठीक तर मग.

धन्यवाद. Happy
केसर आंबा आहे, खरंच फार सुंदर केशरी रंगाचा सुवासिक आणि सुमधुर गर आहे.
याचं एक वैशिष्ट्य लक्षात आलं ते म्हणजे आंबा पिकला की मऊ होतो, पण साल पिवळी दिसायला लागेलच असं नाही - वास आणि मऊपणावरून अंदाज येतो.

इथे आमच्याकडे हवा खूप कोरडी, त्यामुळे पाऊस पडत नसेल तर 'फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास' माझ्या मुंबईच्या आठवणींतल्यासारखे घमघमत नाहीत. आंबा काय आणि मोगरा काय, नाकाशी नेऊन वास घ्यायचे. मी दमट हवा मिस करत नाही, पण ते घमघमणं मात्र मिस करते.

'फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास' घमघमत नाहीत..
…..

अरेरे. पण तरी जिव्हातृप्ती घडते आहे हे बेस्ट !

स्वाती फारच सुंदर आईसक्रीम आणि प्लेटिंग ही ...
फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास' घमघमत नाहीत..
…..

अरेरे. पण तरी जिव्हातृप्ती घडते आहे हे बेस्ट ! >> अनुमोदन...

आमच्याकडे मध्यंतरी अक्षरशः नारळा एवढा मोठा केशर आंबा पाठवला होता गावाहून... असाच केशरी रंग होता ... स्वातीचा ही मोठ्ठा च वाटतोय फोडीवरून.

सिंदूरी
>>> आके तेरे धागे पे हर आम लगे सिंदूरी! Happy

हर आम लगे सिंदूरी

😁

ओरिजनल गाणं सुद्धा छान आहे ते

BTW, आंध्र - तेलंगण भागात आंब्याचं “सिंदूरी” वाण लोकप्रिय आहे. फळाची स्किन लाल-शेंदरी असल्याने हे नाव. Super sweet mango.

आंबे आणले नव्हते इतके दिवस
म्हणून ह्या धाग्यावर आलेच नाही
जळफळाट झाला असता Lol
अक्षय तृतीयपासून आंबे आणले अ
जीव शांत झाला
मग आता निवांत इकडे सुद्धा बागडले
.
छान आहे धागा

ओह खरंच का सिंदूरी नाव आहे? मला वाटलं तुम्ही कालच्या चालू घडामोडींवरून म्हणालात.
सुंदर आहे रंग!

इथे भरपूर फोटो डकवायचे असतात, परंतु “खाजगी जागा” फोटो अपलोड मुळे संपली असे दिसत आहे.

नवीन फोटो अपलोड करायला काय करावे लागेल ?

जुने बरेच फोटो उडवले तरी आता जागा नाही.

तुम्ही लोक काय करता ?

>>>तुम्ही लोक काय करता ?
मन मारतो.
मला तर फुलांचे इतके फोटो अपलोड करायचे होते तर सतत म्हणे लार्ज फाइल.

मा बो वर प्र चि कशी अपलोड करा ह्या धाग्यावर गुगल ड्राईव मधून फोटो कसे अपलोड करायचे ते सांगितले आहे, मी ही हल्ली मायबोली खाजगी जागा न वापरता तिथूनच फोटो अपलोड करते, शिकायला मला वेळ लागलाबराच पण तुम्ही लोकं पटकन शिकाल.

Pages