दाक्षिणात्य सिनेमा कसा वाटला.

Submitted by mrunali.samad on 9 March, 2023 - 06:23

या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Bloody begger तेलुगू प्राईम सबटायटल्स
एका भिकार्याला काही पैशांच्या बदल्यात एका श्रीमंताच्या वारीसाचं पात्र वठवायला एक वकिल घेऊन जातो आणि त्या एका रात्री नायकाच्या आयुष्यात येतात थ्रीलर ट्वीस्ट्स..सस्पेन्स, डार्क, वायोलंस सिनेमा... बघू शकता ग्रीपींग आहे..

पुष्पा टु बघितला फैमिलीसोबत गाणी आणि काही सीन्स पळवून नेटफ्लिक्सवर हिंदी मधे..
स्टाईलीश ऐक्शन सिनेमा आहे.. चांगला आहे..तीन तास चाळीस मिनटाचा आहे पण बोअर झाला नाही..

Ratnan Prapancham: कन्नड चित्रपट आहे.हिरो, रत्नाकर, हा Insurance Company त कामाला असतो. माध्यम वर्गातील आणि आईशी पटत नसल्यानं कायम वैतागलेला असतो. एक दिवस त्याला एक दिवस एका वृत्तपत्रकारीतेचा फोन येतो आणि सगळेच बदलून जाते. दाक्षिणात्य मारामारी/ कापाकापी आवडत नसेल तर एकदा बघण्यासारखा आहे. शेवटची 15 min काय होणार आहे ते आधीच लक्षात येते. तरीही शेवट बर्‍यापैकी logical आहे.

पुष्पा 2 बघितला नेटफ्लिक्स वर हिंदीतून. एका वाक्यात पिच्चरची स्टोरी सांगायची म्हणजे 'बायकोसाठी कायपण'. पहिल्या पुष्पा ची सगळी गाणी फार आवडली होती . छान होती.पुष्पा 2 चं "अंगारोंसे " श्रेया ने गायलेलं गाणं सोडलं तर गाणी खास नाहीत .या गाण्याचं आणि काली महाकाली छान पिक्चराईजेशन केलंय .एव्हन अंगारोसे चं मेकिंग सॉंग युट्युब वर आहे तेही छान आहे.साडीवालंही युट्यूब वर आहे.मी पण थोडी फायटींग पळवली. कारण पहिल्या भागात फक्त तोंड डोळे झाकून मारामारी आहे .या भागात पुढची स्टेप, हात पाय तोंड डोळे बांधून मारामारी ,आता ती कशी? त्यासाठी चित्रपट बघावा लागेल .पण टोटल मास मुवि आहे फक्त पहिल्या भागातला व्हिलन फवाद फसिल चा इंस्पेक्टर जबरदस्त वाटत होता तितकाच या भागात जोकर टाईप वाटतो. पिच्चर एकंदर चांगला वाटला .बोर नाही झाले मी आणि मराठीतल्या "जिलेबी"वर पाहिल्याने जरा जास्तच आवडला.

1.Ponman मल्याळम हिंदीत हॉटस्टारवर
एक गोल्ड डिलर असतो..तो गावातील लग्नांमधे वधुला लग्नापुरते सोन्याचे दागिने (बहुतेक रेन्टवर) देत असतो..लग्न लागल्यावर परत वसूल करणे एक जिकिरीचे काम बनते जेव्हा स्टेफी दागिने घेऊन गुन्हेगारी बैकग्राऊंड असलेल्या सासरी जाते..
गुंड नवरा दागिने परत देऊ देत नाही आणि दागिने परत घेतल्याशिवाय नायक गप्प बसणार नसतो..
विषय एवढाच आहे पण मल्याळम वाले तो असा दाखवतात कि आपण खिळून राहतो..
छान आहे सिनेमा..

2.Gentlewomen तमिळ प्राईमवर
नवीनच लग्न झालेला नवरा मिसींग होतो आणि संशयाची सुई त्याचं अफेअर असणार्या स्त्री कडे जाते..
बायको आणि ती बाई यांच्यातला ड्रामा,पोलिस इनवेस्टीगेशन, थ्रीलर,क्राईम सिनेमा..
चांगला आहे..

3.Test तमिळ नेटफ्लिक्सवर
चेन्नईत होणाऱ्या इंटरनैशनल क्रिकेट टेस्ट मैच आणि तिंघांची आयुष्ये टांगणीला.. असं काय घडत असतं पहा सिनेमात..
आर माधवन शैताननंतर परत एकदा खलनायकाच्या भुमिकेत..जबरदस्त अभिनय..
मस्त सिनेमा..

Test बघायचा की नाही असा विचार होता. आता पाहूया.

आम्ही कमल हसनचा जुना दशावतारम् पाहिला. मस्त वाटतात असे पिक्चर नवीन पिक्चर पेक्षा. पण असीन फार डोक्यात जाते. खूप कट कट करते.

तिन्ही पिक्चर्स इण्टरेस्टिंग वाटत आहेत! >>> +१ . टेस्ट ऑलरेडी लिस्ट मधे आहे माझ्या.

गजनीमधे पण तशीच >>> टोटली. मला तर त्यात ती मेली तेव्हा 'असंच पाहिजे' टाईप खुनशी आनंद झाला होता Lol दशावतारम मधे कमल हासन वैतागून तिच्या डोक्यात ती मूर्ती घालेल एकदातरी असं वाटलं होतं. पण असं काही झालं नाही.

गजनीमधे पण तशीच >>> टोटली. मला तर त्यात ती मेली तेव्हा 'असंच पाहिजे' टाईप खुनशी आनंद झाला होता >> मला पण Lol

Ponman आणि test आहेत हिंदीत..
Gentlewoman तमिळ वीथ सबटायटल्स तसेही यांत डायलॉग्ज कमी आहेत..

Rmd Lol

Pages